In this Article
- लहान मुलांना दालचिनी देणे सुरक्षित आहे का?
- तुम्ही तुमच्या बाळाच्या अन्नात दालचिनी कधी घालू शकता?
- लहान मुलांसाठी दालचिनीचे आरोग्यविषयक फायदे
- दालचिनी बाळांना दात येणाऱ्या बाळांसाठी चांगली आहे का?
- लहान मुलांना होणारी दालचिनीची ऍलर्जी
- बाळांसाठी दालचिनीची निवड आणि साठवणूक
- लक्षात ठेवण्याची खबरदारी
- तुमच्या बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचे मार्ग
दालचिनी हा एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ आहे आणि तो औषधी वनस्पती म्हणून पण वापरला जातो. दालचिनी म्हणजे झाडाची साल आहे आणि शेकडो वर्षांपासून मसाला आणि औषध म्हणून वापरली जाते आहे.
जर तुम्ही बाळाचे पालक असाल, तर तो ६ महिन्यांचा झाल्यावर तुम्ही त्याच्या आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचा समावेश करण्याचा विचार करत असाल. दालचिनीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. दालचिनी बाळासाठी सुरक्षित आहे का हे ह्या लेखाद्वारे जाणून घेऊयात!
लहान मुलांना दालचिनी देणे सुरक्षित आहे का?
बाळ घन पदार्थ खाऊ लागल्यावर बऱ्याच माता बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करतात. लहान मुलांच्या आहारात थोड्या प्रमाणात दालचिनी असणे सुरक्षित मानले जाते. अन्नपदार्थांवर अगदी थोड्या प्रमाणात दालचिनी शिंपडल्यास लहान मुलांना त्याचा त्रास होत नाही. परंतु प्रमाण जास्त असल्यास बाळांना पोटदुखी, अतिसार आणि ऍलर्जी होऊ शकते. तसेच मुलांसाठी विशिष्ट प्रकारची दालचिनी सुरक्षित मानली जाते.
टीप: जास्तीत जास्त फायद्यांसाठी, तुम्ही तुमच्या बाळासाठी सिलोन दालचिनी निवडा आणि कॅसिया दालचिनी टाळा कारण ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.
तुम्ही तुमच्या बाळाच्या अन्नात दालचिनी कधी घालू शकता?
बाळांना दालचिनी कधी मिळेल असा विचार करणाऱ्या मातांसाठी बाळ ६ महिन्यांचे झाल्यानंतर दालचिनीचा समावेश करणे चांगले मानले जाते.
लहान मुलांसाठी दालचिनीचे आरोग्यविषयक फायदे
लहान मुलांसाठी दालचिनीचे काही आरोग्यविषयक फायदे खाली दिलेले आहेत
- दालचिनीमध्ये दाहक–विरोधी गुणधर्म असतात. हे गुणधर्म दुखापतीतून बरे होण्यासाठी चांगले असतात आणि मूल आजारी पडत नाही
- दालचिनी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे. दालचिनी शरीराचे, मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि महत्वाच्या अवयवांचे संरक्षण होते
- दालचिनी पचनासाठी चांगली असते आणि बाळाची पचन क्षमता सुधारते. दालचिनी पोटाच्या अस्तराचे रक्षण करते. दालचिनी, पाचन रसांमुळे अस्तरांना हानी पोहोचवण्यापासून प्रतिबंधित करते
- दालचिनीमध्ये असलेली काही संयुगे दम्यावर उपचारासाठी मदत करतात कारण त्यामध्ये दाहक–विरोधी गुणधर्म असतात. हे घटक वायुमार्गातील अडथळे कमी करतात आणि चांगल्या श्वासोच्छवासास मदत करतात
- दालचिनीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुलांचे रोगांपासून संरक्षण होते. दालचिनीच्या सेवनाने सर्दी आणि पोटातील संसर्गापासून बचाव होतो
- दालचिनीमुळे जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते कारण त्यामध्ये प्रतिजैविक आणि दाहक–विरोधी गुणधर्म असतात
- हाडे फ्रॅक्चर झाल्यावर होणाऱ्या जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत होते तसेच त्याचे दाहक–विरोधी गुणधर्मांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते
- दालचिनी दात आणि हिरड्यांचे रक्षण करते. भाजलेल्या दालचिनीने दातांची मसाज केल्याने दात किडणे थांबते. हिरड्या दुखून रक्तस्त्राव सुरु होतो
- दालचिनी मुलांच्या त्वचेसाठी देखील चांगली आहे आणि प्रदूषकांपासून संरक्षण करते. एक्झिमा सारख्या त्वचाविकारांपासून संरक्षण होते
- दालचिनीचे नियमित सेवन केल्याने मुलांना ऍलर्जी होण्याचे प्रमाण कमी होते कारण त्यामुळे प्रतिजनांशी लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
दालचिनी बाळांना दात येणाऱ्या बाळांसाठी चांगली आहे का?
अनेक पालक दात येणा–या बाळांना त्यांच्या हिरड्यांचे दुखणे कमी करण्यासाठी दालचिनीच्या काड्या देतात. दालचिनीचे दाहक–विरोधी गुणधर्म आणि चव ह्यामुळे त्यांच्या दात येणा–या हिरड्यांमधील वेदना कमी होण्यास मदत होते असा समज आहे. ज्या लहान मुलांना दालचिनीच्या काड्या दिल्या जातात ती लहान मुले लवकर शांत होतात. दालचिनीच्या काड्या इतक्या सहजतेने तुटून जात नाहीत म्हणून काळजी करण्याची फारशी गरज नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या बाळाला दालचिनीची काडी देण्याचा विचार करीत असाल तर बाळावर लक्ष ठेवणे आणि बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय, तुमच्या बाळाला चघळण्यासाठी दालचिनीची काडी देण्याआधी तुम्ही तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांशी बोलले पाहिजे.
लहान मुलांना होणारी दालचिनीची ऍलर्जी
जरी हे असामान्य असले तरी, काही बाळांना दालचिनीची ऍलर्जी असू शकते कारण त्यांची विकसनशील रोगप्रतिकारक प्रणाली दालचिनी म्हणजे शरीरासाठी धोका आहे असे समजते. रोगप्रतिकारक प्रणाली अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन्स तयार करते ज्यामुळे शरीरात जळजळ कमी होते. खाली काही ऍलर्जीची लक्षणे दिलेली आहेत.
त्वचेवरील अलेर्जीची लक्षणे
ऍलर्जीनच्या संपर्कात आल्यानंतर काही मिनिटांतच, बाळाच्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा आणि जळजळ दिसून येईल. तसेच त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे, फोड येणे किंवा एक्जिमा, मुंग्या येणे अशीही लक्षणे दिसून येतात.
सर्दीसारखी लक्षणे
नाक वाहणे, धाप लागणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे, सुजलेले ओठ आणि जीभ ही अन्नाच्या ऍलर्जीची लक्षणे आहेत.
पोट खराब होणे
दालचिनीच्या ऍलर्जीमुळे पचन संस्था खराब होऊ शकते आणि अतिसार, पोटात मुरडा येणे आणि उलट्या होऊ शकतात.
ऍनाफिलेक्सिस
ऍलर्जीच्या गंभीर प्रकरणांमध्ये, बाळांना ऍनाफिलेक्सिसमध्ये जाऊ शकते. हे जीवघेणे असू शकते. ह्याच्या काही लक्षणांमध्ये सुजलेले ओठ आणि घसा ह्यामुळे वायुमार्गात अडथळा येतो, श्वसन नलिका घट्ट होणे, उलट्या होणे, डोके दुखणे, रक्तदाब कमी होणे, बेशुद्ध होणे ह्यांचा समावेश होतो. ही वैद्यकीय आणीबाणी आहे आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्यक आहे.
बाळांसाठी दालचिनीची निवड आणि साठवणूक
उत्पादनांमध्ये भेसळ असण्याच्या शक्यतेमुळे तुमच्या बाळासाठी मसाले निवडताना तुम्ही जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. विश्वासू दुकानदाराकडून किंवा विक्रेत्याकडून आणि फक्त सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली दालचिनी खरेदी केली आहे ह्याची खात्री करा. विकिरणित दालचिनीमध्ये कॅरोटीनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते, म्हणून नैसर्गिक प्रक्रिया न केलेली दालचिनी निवडा. दालचिनी,. काड्या आणि पावडरच्या स्वरूपात उपलब्ध असते. हवाबंद डब्यात ठेवल्यास, काड्या सुमारे एक वर्ष टिकतात आणि पावडर सुमारे ६ महिने चांगली राहते. पावडरला तीव्र चव आणि गोड वास असला तरी तो कमी काळ टिकतो. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डिशमध्ये सर्व पोषक तत्वांचा अधिक स्वाद हवा असेल तर ही पावडर त्यांच्या स्मूदी किंवा प्युरीमध्ये घाला.
लक्षात ठेवण्याची खबरदारी
जर तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा दालचिनी देत असाल तर स्किन पॅच टेस्ट करून ऍलर्जीची तपासणी करणे चांगले आहे. जर ऍलर्जी आढळली तर तुम्हाला दालचिनी आहारातून काढून टाकण्याचा सल्ला दिला जाईल. तसेच, जर मूल रक्त पातळ करण्यासाठी कोणतेही औषध घेत असेल तर दालचिनी टाळा. सुपरमार्केटमधून खरेदी केलेल्या उत्पादनांची लेबल तपासून त्यामध्ये दालचिनी आहे का हे तपासून पहा. ऍलर्जी बरी करण्यासाठी औषधे नसल्यामुळे, बाळाच्या ऍलर्जीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला बालरोगतज्ञांची मदत घ्यावी लागेल. दालचिनी योग्य प्रमाणात वापरणे चांगले. जास्त दालचिनीमुळे पचनसंस्थेच्या समस्या उद्भवू शकतात.
तुमच्या बाळाच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्याचे मार्ग
दालचिनी हा एक अष्टपैलू मसाला आहे आणि बऱ्याच पदार्थांमध्ये तुम्ही तो घालू शकता. चवीसोबतच, दालचिनी बाळाला पोषक तत्वे प्रदान करते. आहारात त्याचा परिचय देण्यासाठी येथे काही पाककृती आहेत:
- गाजर आणि सफरचंद प्युरी मध्ये दालचिनी घालू शकता
- नारळाच्या दुधात मॅश केलेल्या केळ्यामध्ये दालचिनी घालू शकता
- तांदूळ पुडिंग मध्ये पीच व दालचिनी फ्लेव्हर घालू शकता
- घरी केलेल्या बदामाच्या दुधात दालचिनी घालू शकता
जोपर्यंत तुमच्या बाळाला दालचिनीची अॅलर्जी होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षित आणि आनंददायक पद्धतीने कमी प्रमाणात दालचिनी खायला देऊ शकता.
आणखी वाचा:
बाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती
बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती