जर तुमचे बाळ सतत तीन दिवस तीन तासांपेक्षा जास्त वेळ रडत असेल तर बाळाला पोटशूळ झालेला असू शकतो. पोटशूळ झालेली बाळे पाठीची कमान करतात, मुठी घट्ट आवळून घेतात, पोटातील स्नायू आखडून घेतात आणि रडत असताना हात आणि गुडघे पोटापर्यंत वाकवतात. त्यांच्या ओटीपोटातील स्नायू सामान्यत: ताणलेले असतात आणि बाळांच्या पोटात बराच वायू होतो. साधारणपणे बाळ ३ आठवड्यांचे झाल्यावर पोटशूळ सुरु होतो आणि त्याचे वय ४–६ महिने होईपर्यंत हा त्रास सुरु राहतो. आईचे दुधातील पदार्थांबद्दल असहिष्णुतेमुळे देखील असे होऊ शकते. आपल्या बाळाच्या पोटशूळ समस्येवर उपचार करण्यासाठी तुम्ही करू शकता असे काही नैसर्गिक उपाय येथे दिलेले आहेत.
अर्भकांमधील पोटशूळांवर उपचार करण्यासाठी २३ प्रभावी नैसर्गिक उपाय
पोटशूळ झाल्यास बाळाला खूप वेदना होऊन बाळ अस्वस्थ होऊ शकते. हे नैसर्गिक उपाय केल्यास बाळाची पोटशूळातून मुक्तता होऊ शकते.
१. कोमट पाण्याने अंघोळ
बाळांना होणाऱ्या पोटशूळावर कोमट पाण्याने आंघोळ घालणे हा एक नैसर्गिक उपाय आहे. कोमट पाणी वेदना कमी करते. तुम्ही बाळाला आंघोळ घालताना बाळाच्या पोटास हळूवारपणे मालिश देखील करू शकता.
२. गरम शेक
शेकल्याने गॅसपासून आराम मिळतो. टॉवेल कोमट पाण्यात बुडवून घ्या आणि पिळून घ्या. आपल्या बाळाच्या पोटावर तो ठेवा किंवा बाळाच्या पोटावर हळुवारपणे चोळा.
३. बाळाची मालिश करा
मालिश केवळ बाळांना शांत करत नाही तर पचनास देखील मदत करते. ऑलिव्ह ऑईल किंवा नारळ तेल आपल्या तळहातावर घ्या आणि घड्याळाच्या दिशेने आपल्या बाळाच्या पोटावर मालिश करा.
४. बाळाच्या पायांची वर्तुळाकार हालचाल करा
हा एक साधा पण प्रभावी व्यायाम आहे. बाळाला पाठीवर झोपवा. बाळाचे घोटे काळजीपूर्वक एकत्र धरा आणि हळुवारपणे एकावेळी एक पाय बाळाच्या पोटाकडे घेऊन जा. प्रत्येक पाय काही सेकंदांपर्यंत पोटाजवळ धरा. काही मिनिटांसाठी ह्या व्यायामाची पुनरावृत्ती करा. तथापि, जर तुमच्या बाळाने ह्या व्यायामाचा प्रतिकार झाला तर तो त्वरित बंद करा.
५. बाळाची ढेकर काढा
आहार दिल्यानंतर नेहमीच बाळाची ढेकर काढली पाहिजे. असे केल्याने वायूपासून मुक्त होण्यास मदत होते आणि बाळाच्या पोटात वायू अडकून रहात नाही. बाळाला दूध पाजल्यानंतर आपल्या खांद्यावर घ्या. बाळाच्या गळ्याला आणि खांद्यांना आधार द्या. ढेकर येईपर्यंत हळूवारपणे चोळा किंवा थोपटा.
६. हिंग वापरा
हिंग वायूपासून मुक्त करते आणि पचनास मदत करते. नवजात बाळांना पोटशूळ झाल्यास हा एक लोकप्रिय भारतीय घरगुती उपाय आहे. एक चमचा पाण्यात एक चिमूटभर हिंग घाला आणि उकळवा. आपल्या मुलाच्या नाभीभोवती हा काढा वापरा. ज्या मुलांना घन पदार्थ सुरू केले आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या पाण्यात किंवा अन्नात थोडे हिंग मिसळा.
७. प्रत्येक स्तनावर जास्त वेळ स्तनपान द्या
आपल्या बाळाला प्रत्येक स्तनावर थोडे थोडे पाजण्याऐवजी प्रत्येक स्तनावर जास्त वेळ स्तनपान करा. बाळाने स्तनांमधून दूध ओढायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला येणारे घट्ट दूध (हिंड मिल्क) हे नंतर येणाऱ्या (फोर मिल्क) पातळ दुधापेक्षा खूप पोषक असते. सुरुवातीच्या घट्ट दुधामध्ये चरबी असते ज्यामुळे पचन चांगले होते आणि पोटाला आराम मिळतो. नंतरचे पातळ दूध खूप जास्त घेतल्याने पचनसंस्थेवर ताण येतो.
८. बाळाला हलत्या खुर्चीवर ठेवा
बाळाला आपल्या हातांमध्ये किंवा हलत्या खुर्चीवर ठेवून झुलवा किंवा तुम्ही उभे राहून बाळाला झोक्यात झुलवा. असे केल्याने तुम्ही अस्वस्थ बाळाला शांत करू शकता.
९. तुळशीच्या पानांचा काढा करा
तुळशी (तुळस) पानांमध्ये एंटीस्पास्मोडिक गुणधर्म असतात. म्हणूनच, तुळशीच्या पानांचा काढा तुमच्या पचनाच्या समस्यांचा सामना करण्यास मदत करू शकतात. पाण्यात काही तुळशीची पाने घाला आणि उकळी आणा. ते थंड झाल्यावर बाळाला प्यायला द्या.
१०. बडीशेप
एका कप उकळत्या पाण्यात एक चमचा बडीशेप घाला. १० मिनिटे तसेच राहूद्या आणि नंतर गाळून घ्या. हे पाणी आपल्या बाळाला द्या.
११. प्रोबायोटिक्स द्या
होणे, पचन क्रिया मंद असणे किंवा ऍसिड रिफ्लक्समुळे पोटशूळ होऊ शकतो . लैक्टोबॅसिलस रीटेरि नावाच्या प्रोबियटिक्सचा एक विशिष्ट प्रकार पोटशूळ हाताळण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ते आतड्यातील सूज कमी करण्यास मदत करते, जीवाणू नष्ट करते आणि पोटशूळ नसलेल्या बाळांच्या तुलनेत पोटशूळ असलेल्या बाळांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा ई कोलाई बॅक्टेरिया प्रतिबंधित करते. तसेच, पोटशूळ असलेली बरीच बाळे ३ आठवड्यांत बरी होतात. ६ महिन्यांनंतर प्रोबायोटिक्सची ओळख करुन देणे चांगले आहे, कारण बाळाला केवळ स्तनपान दिले जाते तोपर्यंत याची आवश्यकता नसते. आपल्या बाळाला कोणते प्रोबायोटिक द्यायचे हे ठरविण्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१२. पुदिना वापरुन पहा
पुदिन्यामध्ये शांत आणि एंटीस्पास्मोडिक (स्नायूंमध्ये येणारे पेटके टाळता येण्याचे) गुणधर्म आहेत. बाळाच्या मालिशच्या एक चमचा तेलामध्ये ह्याचा एक थेंब घाला आणि ते उबदार होण्यासाठी तळहातावर चोळा. नंतर, तेलाने बाळाच्या पोटावर हळूवारपणे मालिश करा.
१३. आपण काय खात आहात त्यावर लक्ष ठेवा
आपल्या आहाराचा परिणाम दुधावर होतो. म्हणून, आपण काय खात आहात यावर लक्ष द्या. जर आपल्या मुलास पोटशूळ असेल तर दुग्धजन्य पदार्थ, ग्लूटेन, लिंबूवर्गीय फळे, कॅफिन आणि मसालेदार पदार्थ टाळा.
१४. शांतता राखा
आपल्या बाळाशी मोठ्याने बोलून किंवा गाणी म्हणून त्यास शांत करू नका. शांत वातावरण तयार करा.
१५. दुधाची बाटली बदला
दुधाची बाटली न बदलणे देखील पोटशूळ होण्याचे कारण असू शकते. दुधाची बाटली बदलल्याने बाळास दूध देताना बाळ गिळत असलेल्या हवेचे प्रमाण बदलते. ह्यामुळे पचनावर परिणाम होतो. म्हणून खात्री करुन घ्या की तुम्ही तुमच्या बाळाची दुधाची बाटली बदलली आहे.
१६. ग्राईप वॉटर वापरा
१००% नैसर्गिक ग्राईप वॉटर कोलिक उपचारांवर प्रभावी म्हणून ओळखले जाते. हे पाणी सहसा कॅमोमाइल, बडीशेप, आले आणि लिंबू यांचे मिश्रण असते. पाणी विकत घेताना, ते पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्यामध्ये कोणत्याही संरक्षक नाहीत याची खात्री करा. तसेच, आपल्या डॉक्टरांना प्रिझर्व्हेटिव्ह नसलेल्या ग्राईप वॉटरची शिफारस करण्यास सांगा.
१७. फॉर्म्युला दुधाचा ब्रँड बदला
जर आपल्या बाळाला सारख्या वेदना होत असतील तर, दुधाचा ब्रँड बदलल्यास मदत होऊ शकते. कधीकधी, विशिष्ट फॉर्म्युला दुधाचे घटक पोटशूळ होण्याचे कारण असू शकते. जर तुम्ही तुमच्या मुलास स्तनपानासह फॉर्मुला दूध देण्यास सुरुवात केलेली असेल आणि त्याला पोटशूळचा त्रास झाला असेल तर फॉर्म्युला दूध बदलून पहा.
१८. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर छातीतील जळजळ कमी करण्यात मदत करते आणि यीस्टच्या संसर्गाशी लढा देते. म्हणून, ऍपल सायडर व्हिनेगर वापरुन बाळाच्या पोटशूळ समस्येचे निराकरण होईल. एकदा बाळ ६ महिन्याचे झाल्यावर बाळाला ऍपल सायडर व्हिनेगरची ओळख करुन दिली जाऊ शकते. तसेच, बाळासाठी तुम्ही पाश्चराइज्ड आणि शुद्ध ऍपल सायडर व्हिनेगर निवडल्याचे सुनिश्चित करा. तीव्र ऍपल सायडर व्हिनेगर मुळे जळजळ होऊ शकते कारण त्यात ५% आंबटपणा आहे, म्हणून ते पातळ करण्याची शिफारस केली जाते. त्यासाठी तुम्ही १ टीस्पून ऍपल सायडर व्हिनेगर ४ औंस पाण्यात घालू शकता. मोठ्या मुलांसाठी तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगरचे प्रमाण १ टेबलस्पून ४ औंस पाण्यात असे करू शकता.
१९. पुदीना चहा
पुदीना आतड्यांच्या पेटक्यांपासून आराम प्रदान करते. तथापि, हे केवळ ६ महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांना दिले जाऊ शकते. एक कप गरम पाण्यात एक चमचा पुदीना घाला आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, हे गाळून तुमच्या बाळाला ह्या चहाचे काही चमचे द्या.
२०. मदत घ्या
पोटशूळ ही एक आरोग्यविषयक समस्या आहे ज्यामध्ये कोणतेही विशिष्ट कारण किंवा उपचार नसतात. जर परिस्थिती अयोग्य बनली तर तुम्ही तुमच्या जोडीदाराची किंवा बाळाच्या आजी–आजोबांची मदत घ्या.
२१. पोटावर झोपवण्याची वेळ निश्चित करा
बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवा. बाळाच्या पाठीवर चोळल्यास वायू निघून जाण्यास मदत होते. बाळ जागे असताना त्याला पोटावर झोपवा. पण लक्षात ठेवा, दूध पाजल्यावर लगेच त्याला पोटावर झोपवू नका. दूध पाजल्यावर पोटावर झोपवण्याआधी किमान ३० मिनिटांचा कालावधी गेला पाहिजे.
२२. स्तनपानानंतर बाळाला सरळ धरा
आपण आपल्या बाळाला स्तनपानानंतर लगेच झोपायला लावल्यास, दूध अन्ननलिकेत परत येऊ शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते. ऍसिड रिफ्लक्सची क्षणे टाळण्यासाठी आपल्या बाळास सरळ उभे धरा.
२३. वायू निघून जाण्यासाठी ड्रॉप्स वापरुन पहा
ह्या ड्रॉप्स मुळे गॅस पोटातून बाहेर पडतो आणि पोटशूळ कमी होतो. आपल्या बाळाला ते देण्यापूर्वी बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटशूळ ही पालकांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. बाळाच्या सततच्या रडण्याला सामोरे जाणे अवघड आहे, परंतु ही परिस्थिती सुरुवातीच्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. तुम्हाला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे असे वाटल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आणखी वाचा:
बाळाचे वजन का वाढत नाही? – कारणे, लक्षणे आणि उपाय
बाळांच्या घसा खवखवण्यावर १० सर्वोत्तम घरगुती उपाय