In this Article
तुमचे बाळ तापाशी सामना करत आहे आणि अशावेळी काय करावे ह्याची माहिती तुम्हाला नसल्यास सुदैवाने, काही प्रभावी घरगुती उपायांसह शरीराचे तापमान खाली आणले जाऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी वाचत रहा.
नवजात बाळांच्या तापासाठी सहज सोपे उपचार
आपल्या बाळाची अस्वस्थता दूर करण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा वापर करा.
१. थंड पाण्याच्या पट्ट्या
जेव्हा बाळ झोपलेले असेल तेव्हा बाळाच्या कपाळावर ओलसर पट्ट्या ठेवा. बाळांना येणाऱ्या उच्च तापावर हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. असे केल्याने बाळाच्या शरीराचे तापमान कमी होते आणि अस्वस्थता कमी होते.
२. कोमट पाण्याने अंघोळ
तुमच्या बाळाला टबमध्ये कोमट पाण्याने अंघोळ घाला किंवा गरम पाण्याने बाळाला स्पंजबाथ द्या. बाळाच्या शरीरातून पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने बाळाच्या शरीराचे तापमान कमी होईल. सामान्य तापमानाच्या पाण्याने बाळाला आंघोळ घालू नका. ह्यामुळे तापमानात तीव्र बदल होऊ शकतो आणि बाळाच्या शरीराचे तापमान वाढू शकते.
३. द्रवपदार्थ घेणे
तापाने ग्रस्त असताना तुमच्या बाळाला भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ द्या. पाणी, रस आणि दही बाळाच्या शरीरासाठी चांगले आहे.
४. योग्य वस्त्रे निवडा
जर तुमच्या बाळाने कपड्यांचे अनेक स्तर परिधान केले असतील तर त्यातील काही काढा आणि बाळाच्या त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या. बाळाला कॉटनचे कपडे घाला आणि आवश्यक असल्यास पंखा लावा. जर बाहेर असाल तर मात्र बाळाला सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आणू नका.
५. कांदा
कांदा हा तापासाठी भारतीय घरगुती औषधांचा एक सामान्य आणि अष्टपैलू घटक आहे. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यात मदत करतो आणि तापामुळे होणार्या शरीराच्या वेदनापासून शरीर मुक्त होते.
- फक्त कांदा कापून तुमच्या मुलाच्या पायावर २ –३ काप प्रत्येकी २ मिनिटांसाठी ठेवा.
- दिवसातून २ वेळा असे करा.
कांदा खायलाही देऊ शकता
- रस तयार करण्यासाठी कांदा बारीक वाटून घ्या.
- दिवसभरात, आपल्या बाळाला हा रस काही वेळा द्या.
६. अंघोळीच्या पाण्यात आले घाला
सुमारे दोन चमचे आले पावडर तुमच्या बाळाच्या अंघोळीच्या कोमट पाण्यात घाला. ह्या पाण्याने तुमच्या बाळास १० मिनिटे अंघोळ घाला. आले घाम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अशुद्धी बाहेर पडतात. नवजात शिशुंमध्ये विषाणूजन्य तापासाठी हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.
७. लसूण घातलेल्या मोहरीच्या तेलाची मालिश
आले, मोहरीचे तेल आणि लसूण एकत्र करून त्या तेलाची मालिश केल्याने घाम येणे आणि विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
- हे तेल तयार करण्यासाठी २ चमचे मोहरीचे तेल घ्या आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये तीस सेकंद गरम करा.
- ह्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घाला आणि मिक्स करा. उष्णतेमुळे तेलामध्ये पेस्ट मिसळण्यास मदत होते.
- सामान्य तापमानास येण्यासाठी हे मिश्रण २ मिनिटे तसेच ठेवा.
आता, आपल्या बाळाच्या छाती, पाठ, मान, तळवे आणि पायांना या मिश्रणाने मालिश करा.
मालिश नंतर विश्रांती घेणे आवश्यक असल्याने, आपल्या बाळाच्या झोपेच्या वेळेच्या आधी हे करणे योग्य आहे.
८. अंड्याचा पांढरा बलक
अंड्याचे पांढरे बलक अंड्यातील पिवळा बलक वाढवण्यास मदत करते. अंड्याच्या पांढऱ्या बालकाच्या वैशिष्ट्यपूर्ण चिकट गुणधर्मामुळे ते उष्णतेचे शोषक आहे, कारण ते आसपासच्या वातावरणातून मोठ्या प्रमाणात औष्णिक ऊर्जा शोषून घेऊन कोरडे होते.
- अंड्यातून पिवळा बलक बाजूला करा आणि अंड्याचा पांढरा बलक मऊ होईपर्यंत चांगला फेटून घ्या.
- फेटून घेतलेल्या अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये कापडाच्या पट्ट्या बुडवून ठेवा.
- आपल्या बाळाच्या पायाभोवती ह्या भिजलेल्या पट्ट्या हळूवारपणे गुंडाळा आणि त्या जागेवर राहण्यासाठी सैलसर मोजे घाला
- सुमारे एक तासासाठी हे तसेच ठेवा.
९. लिंबू आणि मध
लिंबू आणि मध दोन्ही प्रतिकारशक्ती वाढवणारे शक्तिशाली घटक आहेत.
- लिंबाच्या रसामध्ये (लिंबू पिळून पाणी न घातलेला रस) अर्धा चमचा आले पावडर मिसळा.
- आपल्या मुलास दिवसातून दोनदा एक चमचा ह्या प्रमाणे हे मिश्रण द्या.
काही अतिरिक्त टिप्स
जेव्हा मुलांना ताप येतो तेव्हा त्याविषयी बरेच गैरसमज आहेत. आपल्या मुलाचा ताप व्यवस्थापित करताना तुम्ही लक्षात घ्यायला हवेत असे काही महत्वपूर्ण मुद्दे इथे दिलेले आहेत.
- जेव्हा शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती विषाणू किंवा जिवाणूंशी लढा देत असते तेव्हा ताप येतो. ह्या जिवाणू किंवा विषाणूंशी होणाऱ्या लढाई मुळे शरीराच्या तापमानात वाढ होते आणि त्यास आपण “ताप” असे म्हणतो.
- हे लक्षात ठेवा की ताप येणे हा मानवी शरीराच्या विकासाचा एक नैसर्गिक भाग आहे कारण त्यामुळे प्रत्येक वेळी, त्याची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. ताप हा आरोग्याच्या गंभीर दोषांचे लक्षण नाही, परंतु जेव्हा तापमान खूपच जास्त वाढते किंवा इतर लक्षणांसमवेत असते, तेव्हा ते शरीराच्या गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते.
- १२ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या मुलामध्ये ताप नेहमीच गंभीरपणे घेतला जाणे आवश्यक आहे, तथापि, ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी, ३९. ५ डिग्री सेल्सियस (१०३.५ फॅ) पेक्षा कमी असेल तर त्याला तत्काळ वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता नसते.
- तापासोबत इतर लक्षणे जसे की आळशीपणा, सुस्तपणा, उलट्या, अतिसार, अयोग्य आहार इत्यादी असतील तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता असते.
- बालरोगतज्ञांशी सल्लामसलत केल्याशिवाय आपल्या बाळाला स्वत: औषधोपचार करण्याचा प्रयत्न करु नका. आयबॉप्रोफेन, ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असुरक्षित आहे कारण यामुळे हानिकारक दुष्परिणाम होऊ शकतात. अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की जास्त प्रमाणात आयबॉप्रोफेन सेवन केल्यास ते पाचन तंत्र आणि मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकते.
- ओटीसी औषधांच्या डोसबद्दल आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. आजकाल विशेषतः मुलांसाठी बनवलेली सौम्य औषधे उपलब्ध आहेत. अॅसिटामिनोफेन हा बाळांसाठीच्या औषधांचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे.
- कधीकधी, ताप हा ताप नसतो, परंतु बाळाला जास्त कपडे घातल्यामुळे किंवा उबदार खोलीमुळे बाळाच्या शरीराचे तापमान वाढल्यासारखे वाटते. ३६ ते ३८ डिग्री सेल्सिअस (९७ –१०४ फॅ) दरम्यान जे काही जास्त आहे, ते अद्याप मानवी शरीराच्या सामान्य तापमानाच्या श्रेणीत येते.
- पाऱ्याने भरलेले थर्मामीटर वापरणे टाळा कारण ते तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यास धोकादायक आहेत.
- तुमच्या बाळासाठी थर्मामीटर वापरण्यापूर्वी ते एखाद्या जंतुनाशक किंवा अल्कोहोलने स्वच्छ करा आणि थंड पाण्यात स्वच्छ धुवा.
- गुदाशय थर्मामीटर वापरताना, तुमच्या बाळाला तुमच्या गुडघ्यापाशी खाली वाकवा. वंगण म्हणून पेट्रोलियम जेली वापरा. ते तुमच्या मुलाच्या गुदद्वारामध्ये १/२ ते १ इंच खोलीपर्यंत घाला आणि तापमान नोंदवत असताना, बीप वाजत नाही तोपर्यंत तुमच्या बोटाच्या मधोमध हळू धरून ठेवा.
- तुम्ही तोंडात घालण्याचा थर्मामीटर (बगलेखाली ठेवण्याचा थर्मामीटर) वापरत असल्यास, सावधगिरीसाठी आलेल्या वाचनात एक डिग्री जोडा.
- इतर प्रकारचे थर्मामीटर, म्हणजेच कपाळ आणि कानावर वापरले जाणारे थर्मामीटर,अविश्वसनीय म्हणून ओळखले जातात कारण तापमानात खूप फरक आढळतो. म्हणूनच याची शिफारस केली जात नाही.
- ताप ३ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी गंभीर असतो , परंतु मोठ्या मुलांसाठी धोकादायक पेक्षा तो अधिक भयानक असतो. ताप येणे हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे तुमच्या वाढत्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
पालक म्हणून, तुमच्या बाळास ताप आलेले पहाणे चिंताजनक ठरू शकते. जर तुमच्या बाळाचा ताप कमी होत नसेल तर लवकरात लवकर त्याला आपल्या विश्वसनीय बालरोगतज्ञांकडे बाळाला घेऊन जा.
आणखी वाचा:
बाळांमधील निर्जलीकरण (डिहायड्रेशन): लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध
बाळांना होणारा सनबर्न – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध