गर्भारपण

बाळाच्या जन्मानंतर भारतातील बाळंतपणाची पद्धत

यशस्वीरित्या निरोगी बाळाला जन्म देणे ही आई आणि बाळ दोघांसाठी एक मोठी कामगिरी आहे. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आई आणि बाळ दोघांवर परिणाम करते कारण त्यामुळे दोघांच्या शरीरावर ताण येत असतो. या टप्प्यावर, आई खूप असुरक्षित असते कारण तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते आणि तिच्या शरीराची सगळी ऊर्जा बाळाला जन्म देण्यावर केंद्रित असते. दुसरीकडे, बाळाला जास्त धोका असतो कारण ते नुकतेच ह्या जगात आलेले असते आणि जीवनाचे सर्व नवीन पैलू पहिल्यांदाच अनुभवत असते. त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच प्रसूतीनंतरच्या बाळंतपणाविषयी अधिक जाणून घ्या.

बाळंतपण म्हणजे काय?

बाळंतपणामध्ये प्रसूतीनंतर आवश्यक त्या सर्व बाबी विचारात घेतल्या जातात. त्यादरम्यान आई आणि बाळ दोघांची काळजी घेतली जाते. त्यासाठी बाळ आणि आईची काळजी घेण्यासाठी घरात कुणीतरी मदतीला असणे आवश्यक आहे. बाळंतपणात आई आणि बाळ दोघांनाही विशिष्ट कालावधीसाठी घरात राहण्याचा सल्ला दिला जातो आणि आईची तब्येत सुधारावी हा त्यामागचा उद्धेश्य असतो. कुटुंबातील सदस्य असंख्य गोष्टींची काळजी घेतात आणि बाळाची काळजी घेण्यासाठी आईला आवश्यक तो पाठिंबा देतात.

बाळाच्या जन्मानंतर बाळंपणाचा कालावधी किती असतो?

बाळंतपणाचा कालावधी सामान्यत: आई आणि बाळाची रिकव्हरी कशी होते यावर अवलंबून असतो. कधीकधी, सिझेरियन प्रसूतीमुळे थोडा वेळ वाढू शकतो. विशेषत: जर दोघांच्याही तब्येतीत जन्मादरम्यान गुंतागुंत झाली असेल तर बरे होण्यासाठी अजून काही काळ हवा असतो आणि आईला स्वत: ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी साधारणपणे ४० दिवसांचा कालावधी पुरेसा मानला जातो. काही भागांमध्ये, बाळंतपणाच्या विशिष्ठ कालावधीवर माता विश्वास ठेवत नाहीत आणि जेव्हा त्यांना बरे वाटू लागते तेव्हा त्या सामान्य जीवन पुन्हा सुरु करतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सामान्यत: पुरेशा सुट्ट्या नसल्यास कामावर रुजू व्हावे लागते किंवा शक्य तितक्या लवकर त्यांना पुन्हा कामावर जाण्याची गरज भासते.

भारतात बाळंतपण कसे केले जाते?

देशातील वेगवेगळ्या प्रदेशात मातांसाठी पारंपारिक पद्धती वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे, स्तनपानास उत्तेजन देणा-या विशेष आहाराद्वारे आई आणि मुलासाठी गमावलेली शक्ती पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. शरीरावर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

. प्रसुतीपूर्व मालिश

आईने शारीरिकदृष्ट्या बर्‍याच गोष्टी केल्या आहेत आणि पुन्हा निरोगी होण्यासाठी तिला काही मदतीची आवश्यकता आहे.

. बेबी मसाज

आईबरोबरच बाळालाही स्वतः मालिश करण्याची आवश्यकता असते. प्रसूतीनंतर बाळ पहिल्यांदाच गर्भाच्या बाहेर येते आणि बाहेरच्या जगामध्ये टिकण्यासाठी त्याचे शरीर मजबूत होणे आवश्यक असते त्यामुळे बाळाची मालिश सुद्धा तितकीच गरजेची असते.

. बाळंतपणातील भारतीय आहार

प्रसूतीनंतर आईचा आहार पौष्टिक असला पाहिजे यात काही शंका नाही. आईला तिच्या मातृत्वाच्या नवीन टप्प्यात मदत करण्यासाठी आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश केला गेला आहे.

. बाळंतपणादरम्यान आईसाठीचे नियम

काही माता काही विशिष्ट परंपरा पाळू शकतात, जसेः बाळंतपणामुळे प्रसूतीनंतर आईच्या पुनर्प्राप्तीसाठी मदत होते. अलिकडच्या काळात या प्रक्रियेच्या काही पारंपारिक बाबी बदलल्या गेल्या असतील परंतु आपण शक्य तितक्या लवकर सामान्य स्थितीत परत यावे आणि आपल्या बाळाची काळजी घेण्याचा आनंद घेता यावा यासाठी इतर बर्‍याच गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणखी वाचा: गर्भपातानंतरचा भारतीय आहार सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved