अन्य

बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे. हा विधी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ही पारंपरिक पद्धत आहे आणि त्यामागे बरेच छुपे संदर्भ आणि त्याचे महत्व देखील आहे. जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न असतात आणि तो विधी खूप काळजीपूर्वक केला पाहिजे.

बाळे आणि मुलांसाठी असलेला जावळाचा विधी म्हणजे काय?

जावळ विधी किंवा 'जावळ संस्कार' ही भारतातील प्रसिद्ध पारंपरिक प्रथा आहे आणि तो करून घेणे शुभ असते असा विश्वास आहे. हिंदूंमध्ये केल्या जाणाऱ्या 'जावळ संस्कार' ह्या विधीमध्ये मुलाचे केस संपूर्णपणे काढून देवाला अर्पण केले जातात.

बाळाचे जावळ काढण्यामागे भारतीय संस्कृतीचा असलेला विश्वास

हिंदू संस्कृतीमध्ये असा ठाम विश्वास आहे की मुलाचे डोक्यावरील पहिले आलेले केस काढून टाकल्याने मुलाची शुद्धी होते आणि कोणत्याही वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तींपासून त्याला मुक्त करते. ह्या प्रथेमागे इतरही विश्वास आहेत. आणखी माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा:

जावळविधी केव्हा केला जातो?

जावळ करण्यासाठी, मुलाचे वय १-३ वर्षे (ते बहुतेकवेळा जेव्हा मूल ७,९ किंवा ११) महिन्यांचे असते. काही लोक नंतरसुद्धा हा विधी करतात. ह्या कार्यक्रमासाठी, बाळाच्या पहिल्या केसांची चांगली वाढ झालेली असली पाहिजे.

जावळ विधी नंतर बाळाच्या केसांची चांगली वाढ होते हे खरे की खोटे?

बाळाच्या डोक्यावरील केस संपूर्णपणे काढून टाकल्यावर केसांची वाढ चांगली होते ह्यामागे शास्त्रीय कारण आहे. लहान मुलांमध्ये सर्वसामान्यपणे केसांची वाढ विरळ असते, कारण ते अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि लागणारी पोषणमूल्ये शोधून घेणे त्यांच्या वाढीसाठी गरजेचे असते आणि ती प्रक्रिया अजूनही होत असते. जेव्हा पहिल्यांदा मुलाचे केस वाढतात तेव्हा ते फार मजबूत नसतात. केसांचे बीजकोष सुद्धा विखुरलेले असतात. जेव्हा हे कमकुवत केस काढून टाकले जातात तेव्हा नवीन केसांना जागा होते. ह्या नवीन केसांचे बीजकोष मजबूत असतात. नवीन केसांचा वाढीचा नमुना हा विखुरलेला किंवा गबाळा नसतो. म्हणूनमी जावळ केल्यानंतर बाळाच्या केसांची वाढ ही नक्कीच चांगली असते आणि हे नवीन आलेले केस दाट आणि मजबूत असतात.

जावळ संस्कार विधी

जावळ विधी सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी काही टिप्स आणि घ्यायची खबरदारी

हा कार्यक्रम धोकादायक असतो आणि तो करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. इथे काही महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत त्याची काळजी तुम्ही बाळाच्या जावळ विधी करण्याच्या आधी घेतली पाहिजे. जावळ काढताना मुले अस्वस्थ आणि किरकिर करत असतात आणि थोडी जरी चूक झाली तर बाळाला जखम होऊ शकते.
निष्कर्ष: जावळ काढण्याच्या सोहळ्याला खूप महत्त्व आणि अर्थ जोडलेले आहेत, म्हणूनच आजही अनेक कुटुंबे त्यास आपल्या परंपरेचा भाग बनवतात. अध्यात्मिक कारणांव्यतिरिक्त, या प्रथेचे मुलांसाठी फायदे आहेत. फक्त हा सांस्कृतिक सोहळा कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि संस्मरणीय प्रसंग व्हावा म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी वाचा: बाळाला पाणी देण्यास केव्हा आणि कशी सुरुवात करावी? बाळाला दात येतानाचा क्रम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved