अन्य

गरोदरपणात झोपतानाच्या सर्वोत्तम स्थिती

गर्भवती स्त्रीला चांगली झोप मिळावी असे वाटत असते परंतु शांत चांगली झोप मिळणे अवघड असते. गर्भारपणात झोपेत अडथळा येणे हे काही असामान्य नाही आणि जवळजवळ सगळ्याच गरोदर स्त्रियांना झोपेची समस्या येते. जेव्हा गर्भारपणाची पहिली तिमाही संपते तेव्हा विशेषकरून ही समस्या जास्त येते. गर्भारपणात, रात्रीची आरामदायक झोप मिळाणे अवघड होते ह्यामागे चिंता, संप्रेरकांचे असंतुलन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शारीरिक बदल ही कारणे आहेत. पोटाचा वाढणारा आकार, दुखणारी पाठ, पायांना येणारी सूज, आणि सतत लघवीला जावे लागणे इत्यादींमुळे तुम्ही नेहमी झोपता तसे तुम्हाला आरामात झोपता येत नाही. जसजसे गर्भारपणाचे दिवस पुढे सरकतात आणि दुसरी तिमाही सुरु होते तसे तुम्हाला झोपण्याची आरामदायक स्थिती सापडणे अवघड होते. अशा परिस्थितीत, तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे आणि चांगली झोप मिळण्यासाठी कसे झोपावे आणि गर्भारपणात पाठीवर झोपणे सुरक्षित आहे का असे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. गर्भार स्त्रीसाठी रात्रीची झोप खूप गरजेची असते. तज्ञांच्या मते, गर्भारपणात, तुमच्या डाव्या कुशीवर झोपणे हे तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले असते. ह्या स्थितीत नाळेकडे रक्तप्रवाह जास्त होतो आणि नाळेद्वारे पोषणमूल्ये शोषून घेतली जातात आणि ती बाळापर्यंत पोहोचतात. एका कुशीवर झोपल्याने मूत्रपिंडाचे कार्य सुद्धा चांगले चालते आणि त्यामुळे विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे पाय, घोटे आणि हातावरची सूज कमी होण्यास मदत होते.

नेहमीच्या झोपण्याच्या स्थिती गर्भारपणात आरामदायक का नसतात?

गर्भारपणात विशेषकरून दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पोटावर किंवा पाठीवर झोपणे अवघड होऊन जाते. पोटाचा वाढणारा आकार, पाठदुखी, धाप लागणे आणि छातीत जळजळ ह्यामुळे अस्वस्थता निर्माण होते.

झोपण्याची योग्य स्थिती कोणती ?

गर्भारपणात, झोपण्याची सुयोग्य स्थिती म्हणजे कुशीवर झोपणे आणि ते सुद्धा डाव्या कुशीवर ह्यात काही शंकाच नाही. हृदयाला रक्तपुरवठा करणारी सर्वात मोठी वाहिनी उजव्या बाजूला असते, म्हणून डाव्या बाजूला झोपण्याची शिफारस केली जाते.
तज्ञांच्या सल्ल्यानुसार पाठीखाली आणि पोटाखाली उशी ठेवल्यास चांगली झोप होईल आणि ताण कमी येईल. झोपताना कॉटनचे सैल कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.

गर्भवती असताना झोपण्याच्या कुठल्या स्थिती टाळल्या पाहिजेत?

गर्भारपणात पाठीवर किंवा पोटावर झोपणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे खाली सांगितल्याप्रमाणे तब्येतीच्या अनेक तक्रारी येऊ शकतात:

आरामात झोपण्यासाठी काही टिप्स

गर्भारपणात स्रुक्षितपणे आणि आरामात झोपण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत
एकाच स्थितीत रात्रभर झोपणे हे आरामदायक नाही. त्यामुळे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपणे तसेच जास्त करून डाव्या कुशीवर झोपणे हा शांत झोपेसाठी उपाय आहे. जर तुम्हाला जाग येताना तुम्ही पाठीवर किंवा पोटावर झोपलेल्या असल्याचे तुमच्या लक्षात आले तर घाबरून जाऊ नका. फक्त कुशीवर वळून पुन्हा झोपी जा. सुलभ गर्भारपणासाठी गर्भवती स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते तसेच त्यांच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल सुद्धा करावे लागतात. झोपताना ह्या नवीन स्थितीत झोपणे हा त्या बदलांचा फक्त एक भाग आहे. काही रात्री किंबहुना काही आठवडे तुम्हाला अस्वस्थ वाटणे हे सामान्य आहे कारण शरीराला कसेही झोपायची सवय असते. आणि जसे गर्भारपणाचे दिवस पुढे सरकतात तसे हे सगळे सोपे होत जाते. तुमच्या मनाला आणि शरीराला थोडा वेळ द्या. तुम्हाला ह्या नवीन स्थितीची लवकरच सवय होईल. आणखी वाचा:  गरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे गरोदरपणात खाऊ नयेत असे २४ अन्नपदार्थ
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved