अन्य

आपल्या बाळाचे नाक कसे स्वच्छ करावे?

आपल्याला लहानपणी एक इंग्रजी कविता होती,“Ten little fingers, ten little toes, two little eyes and one little nose. One little stuffy nose and crying the baby goes." आणि ते अगदी खरंय, नाक चोंदलेले असेल तर बाळ चिडचिड करते. बाळाचे नाक बंद होऊन श्वास घेण्यास अडचण येते. बाळाचे नाक साफ केल्यास त्यांना चांगला श्वास घेता येईल, संसर्गाची शक्यता कमी होईल आणि शांत झोप येण्यास मदत होईल. जर आपल्या बाळाला घाम येत असेल, श्वास घेताना आवाज येत असेल, त्याला खायला घालणे अवघड होत असेल किंवा बाळ खूप चिडचिड करत असेल तर ते बाळाचे नाक बंद झाल्यामुळे हे सगळे होत असण्याची शक्यता आहे.

बाळाचे नाक स्वच्छ करण्याचे परिणामकारक मार्ग

सर्दी, फ्लू, सौम्य प्रमाणातील संसर्ग, श्लेष्मा साठून राहणे किंवा हवामानातील बदलांमुळे बाळाचे नाक चोंदले जाते. काही वेळा खूप जास्त प्रमाणात असलेला श्लेष्मा सुकून नाक बंद होते. बाळाचे नाक खरेच बंद झाले आहे की बाळाच्या नाकात काही अडकले तर नाही ना हे तुम्ही तपासून पाहू शकता. बंद नाक मोकळे करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बाळाला शिंकायला लावून श्लेष्मा बाहेर पडू देणे हा होय. परंतु बाळ थोडे मोठे असल्यासच हे शक्य होते. छोट्या बाळांसाठी नोझ क्लिनर वापरून बंद नाक स्वच्छ आणि मोकळे करावे लागते.

सलाईन नेझल स्प्रे वापरून बाळाचे नाक स्वच्छ करणे

छोट्या बाळांचे आणि मुलांचे नाक स्वच्छ करण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे सलाईन नेझल स्प्रे हा होय. त्यामुळे श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते, नाक मोकळे आणि स्वच्छ होते.

नेझल स्प्रे कसा वापराल?

बाळाच्या नाकासाठी हे सलाईन वॉटर तुम्ही घरी सुद्धा करू शकता.

रबर ब्लब सिरिंजने बाळाचे नाक स्वच्छ करणे

तुम्ही बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी ब्लब सिरिंजचा वापर करू शकता. बाळाच्या छोट्या नाकपुड्यांसाठी त्या विशेषकरून तयार केल्या जातात.

बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी नेझल ऍस्पिरेटरचा वापर

ब्लब सिरिंजच्या तुलनेत नेझल ऍस्पिरेटर्स हे खूप परिणामकारक, सौम्य आणि वापरण्यास सहज आणि सुलभ असतात. ह्यामध्ये नोझल, मऊ आणि लांब नळीचा तुकडा आणि तोंडाने ओढण्यासाठी एक भाग (माऊथपीस) इत्यादींचा समावेश असतो. तुम्ही बॅटरीवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रॉनिक ऍस्पिरेटरची निवड करू शकता. आणि ऑनलाईन किंवा दुकानात मिळतात का हे बघू शकता. तुमच्या बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नेझल ऍस्पिरेटरचा वापर कसा कराल:

रबर ब्लब सिरिंज आणि नेझल ऍस्पिरेटर वापरण्यासाठी काही टिप्स

बाळाच्या नाकातील श्लेष्मा काढण्यासाठी जरी ही साधने सुरक्षित असली तरी सुद्धा ती वापरताना खालील प्रकारे काळजी घेतली पाहिजे

बाळाचे नाक स्वच्छ करण्यासाठी इतर पद्धती

बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या नाकाच्या अवतीभोवतीच्या भाग कापसाच्या बोळ्याने किंवा गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने तुम्ही नियमितपणे स्वच्छ केला पाहिजे. नाकाच्या आतील बाजूच्या आवरणाला हानी पोहोचू नये म्हणून नाकामध्ये काहीही घालू नका.

. झोपताना बाळाचे डोके उंचावर ठेवा

बाळाचे डोके थोडे उंचावर ठेवल्यास चोंदलेल्या नाकापासून थोडा आराम मिळतो आणि श्वासोच्छवासास मदत होते. तसेच बाळाच्या डोक्याखाली टॉवेलची गुंडाळी ठेवा. असे केल्याने झोपेच्या वेळेला बाळाला आराम मिळेल. बाळाला भरपूर विश्रांती मिळते आहे ना ह्याची खात्री करा.

. वाफ द्या

आर्द्रता आणि उबदारपणामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. गरम पाण्याचा शॉवर बाथरूम मध्ये सोडून द्या आणि तिथे वाफ तयार होऊ द्या. नंतर तिथे बाळाला घेऊन थोडा वेळ बसा. असे केल्याने बाळाच्या नाकातील श्लेष्मा पातळ होऊन मोकळा होईल आणि बाळाचे बंद नाक मोकळे होईल. जास्त द्रवपदार्थ घेतल्याने सुद्धा मदत होईल.

. व्हेपोरायझर किंवा ह्युमिडीफायरचा वापर करा

कोरड्या हवेमुळे नाक कोरडे पडते. जर तुम्ही कोरड्या हवामानात रहात असाल तर ह्युमिडीफायर घ्या. हवेतील आर्द्रतेमुळे नाक मोकळे होण्यास मदत होईल. विशेषकरून हिवाळ्यात ह्याची जास्त मदत होते. बऱ्याच वेळा घरच्या घरी एक किंवा दोन आठवड्यांमध्ये वरील उपाय करून नाक मोकळे करता येते. खालील परिस्थतीत मात्र बाळाच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा

न्याझोफ्यारेंजीएल सक्शनिंग (एनपी)

हे वैद्यकीय तज्ञ, रेस्पिरेटरी थेरपिस्ट किंवा डॉक्टर करतात, आणि ते खालील परिस्थितीत केले जाते: ह्या प्रक्रियेत, कोरडा श्लेष्मा ओला करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करतात. एक पातळ निमुळती सक्शन नळी बाळाच्या नाकातून घशापर्यंत घातली जाते. त्यामुळे खोकला येऊन श्लेष्मा घशात येतो. आणि नंतर तो सक्शनने काढून टाकला जातो. नाक मोकळे झाल्यावर बाळाच्या नाकपुडीतून ट्यूब हळूच काढून घेतली जाते. ही प्रक्रिया जशी गरज भासेल तशी पुनःपुन्हा केली जाते. परंतु खूप वेळा केल्यावर नाकातून सौम्याप्रमाणत रक्त येऊ शकते किंवा नाकाच्या आतील भागाला सूज येऊ शकते. अशा वेळी निओ सकर किंवा छोटी सक्शन ट्यूब वापरतात. बऱ्याच वेळा साधे घरगुती उपाय परिणामकारक असतात, त्यामुळे बाळाला बंद नाकापासून सुटका मिळते आणि आराम वाटतो. जर घरगुती उपचारांनी सुधारणा झाली नाही तर नेझल स्प्रे किंवा ऍस्पिरेटर वापरा. परंतु जर पुनःपुन्हा नाक बंद होत राहिले तर लवकरात लवकर बालरोगतज्ञांशी संपर्क साधा. आणखी वाचा: बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved