गर्भधारणेचे आठवडे

गर्भधारणा: ३५वा आठवडा

गर्भारपणाचा ३५वा आठवडा म्हणजे खूप संमिश्र भावनांनी भरलेला असतो. गरोदर स्त्रीला गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे आनंद होत असतो, तसेच जसजशी प्रसूतीची तारीख जवळ येते तशी खूप चिंता जाणवते. ह्या आठवड्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळ ओटीपोटाकडे सरकते आणि नवीन जगात येण्यासाठी स्वतःला तयार करते.

गर्भारपणाच्या ३५व्या आठवड्यातील तुमचे बाळ

आता तुमच्या तिसऱ्या तिमाहीचा शेवट जवळ येत आहे आणि तुमच्या बाळामध्ये खालीलप्रमाणे काही बदल होत आहेत. बाळाच्या वजनामध्ये काहीशे ग्रॅम्स इतकी वाढ होत आहे आणि प्रसूतीपर्यंत ती होत राहील कारण बाळाच्या शरीरावरील चरबीचा थर वाढत आहे. शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी चरबीची मदत होते. बाळाच्या मेंदूची झपाट्याने वाढ होत असते आणि बाळाच्या डोक्याचा काही मऊ भाग ह्या बदलाला सामावून घेण्यास सक्षम असतो. तसेच बाळाचे डोके मऊ असल्याने प्रसूती सुलभ होते तसेच बाळ जनन मार्गातून सहजगत्या पुढे सरकू शकते. आता बाळाची मूत्रपिंडे पूर्णतः विकसित झालेली आहेत. यकृत आता पूर्णपणे कार्यरत होते कारण काही टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया करण्याचे काम ते करू लागते.

बाळाचा आकार केवढा असतो?

जेव्हा तुम्ही ३५ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा बाळाचा आकार हा साधारणपणे खरबूजाइतका असतो म्हणजेच त्याची लांबी जवळ जवळ १८ इंच इतकी असते! बाळाचे वजन आता खूप वाढले असून ते २.३ किलोग्रॅमच्या आसपास असते. म्हणजेच १४- इंची लॅपटॉप इतके वजन तुम्ही तुमच्या पोटात घेऊन वावरता आहात!

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

३५व्या आठवड्यात आढळणारे प्रमुख बदल खालील प्रमाणे: बऱ्याच गर्भवती महिलांचे वजन तर जवळपास १० किलोने वाढलेले असते. वजनात झपाट्याने होणारी ही वाढ बाळाच्या शरीरावरील चरबीच्या थरांमुळे होते आणि त्यामुळे तुमच्या वजनात वाढ होते. बाळाच्या वाढत्या वजनामुळे तुमचा मागच्या दोन आठवड्यांपासून श्वसनास त्रास होऊ शकतो कारण फुप्फुसे पूर्णपणे विस्तारित होत नाहीत. तथापि प्रसूतीची तयारीसाठी बाळ खाली सरकू लागते आणि त्यामुळे फुप्फुसांवरील दाब कमी होतो. काही माता कोलोस्ट्रम तयार होण्याचा अनुभव घेतात आणि त्यामुळे स्तन जड होऊ लागतात.

३५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणात आढळणारी काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी नैसर्गिक प्रसूतीसाठी बाळ ओटीपोटाकडे सरकू लागते, तथापि त्यामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते. बाळ जेव्हा खाली सरकू लागते तेव्हा ओटीपोटावर त्याचा दाब पडतो, हा दाब ओटीपोटाच्या काही मज्जातंतूंवर सुद्धा पडतो आणि त्यामुळे तो भाग बधिर झाल्यासारखा वाटतो. जसजशी बाळाची वाढ होते तसे काही अवयवांवर दाब पडतो उदा: पोट, त्यामुळे जळजळ आणि इतर पोटाचे त्रास होऊ शकतात. सराव कळा आणि प्रसूती कळा ह्यामध्ये गोंधळ उडू शकतो. तसेच काही महिलांना सराव कळा आलेल्या समजत सुद्धा नाही. सराव कळा आणि प्रसूती कळा ह्यामधील फरक म्हणजे सराव कळा ह्या अनियमित असतात.

गरोदरपणाच्या ३५व्या आठवड्यात पोटाचा आकार

बाळाच्या वजनात लक्षणीयरित्या वाढ झाल्यामुळे, पोटाचा आकार मोठा असतो आणि कुणालाही लगेच कळेल की तुम्ही गरोदर आहात. आतापर्यंत गर्भाशय त्याच्या मूळ आकाराच्या १००० पट विस्तारलेले आहे.

गर्भावस्थेच्या ३५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या सोनोग्राफी दरम्यान डॉक्टरांना लक्षात येईल की बाळाची स्थिती नैसर्गिक प्रसूतीयोग्य (Breech Position) आहे किंवा नाही आणि त्यानुसार तुमचे डॉक्टर्स सिझेरिअन करायचे किंवा नाही हे ठरवतील.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ३५व्या आठवड्यातील आहार तंतुमय पदार्थानीयुक्त असला पाहिजे कारण त्यामुळे आतड्यांची हालचाल चांगली होते, तसेच बद्धकोष्ठता वगैरे ह्यासारखे प्रश्न उद्भवत नाहीत. तुम्ही ब्रोकोली, पेअर, काळे बीन्स आणि ओटमील ह्यांनी समृद्ध पदार्थ खाल्ले पाहिजेत

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

इथे काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ह्या आठवड्यात स्वतःची पुरेशी काळजी घेता येईल.

हे करा

हे करू नका

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

बाळाच्या जन्माच्या वेळी काही गोष्टी तुम्हाला हाताशी लागू शकतात.

१. नॅपी आणि बेबी वाईप्स

तुमच्या दवाखान्यात जाताना नेण्यासाठीच्या बॅगमध्ये तुम्ही ते ठेवू शकता कारण बाळाला ते लागणार आहेत.

२. दुधाच्या बाटल्या

तुम्ही जरी बाळाला स्तनपान करण्याचे ठरवले असेल तरीही तुम्हाला बाळासाठी दुधाच्या बाटल्या लागणार आहे. स्तनाग्रे तोंडात धरता यावे म्हणून तुमचे डॉक्टर्स बाळाला बाटली देण्याचे सुचवू शकतात परंतु बरीच बाळे ते स्वतःचे स्वतः शिकतात त्यामुळे हा पर्याय गरज भासल्यासच वापरावा. गर्भारपणाच्या ३५वा आठवडा म्हणजे बाळाचे आगमन लवकरच होणार आहे, हे अपेक्षित असणार आहे. ह्या काळात बाळाच्या आईला खूप असुरक्षित वाटू शकते. त्यामुळे नित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांचा आधार असणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे, प्रसूती कुठल्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे प्रसूती लक्षणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मागील आठवडा: गर्भधारणा: ३४वा आठवडा पुढील आठवडा: गर्भधारणा: ३६वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved