बाळ

नवजात बाळाला योग्यरित्या कसे घ्यावे? (छायाचित्रांसहित)

नव्याने पालक झालेल्या आई बाबांना बाळाला कसे घ्यावे ह्याचे दडपण येऊ शकते कारण बाळाला कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू नये असे त्यांना वाटत असते. परंतु एखाद्या विशिष्ट स्थितीत बाळाला घेतल्यावर, बाळ कशी प्रतिक्रिया देते हे लक्षात आल्यावर, बाळाला कसे घ्यावे ह्या भीतीवर सहज मात करता येऊ शकते.

नवजात शिशुला कसे धरावे ह्यासाठी काही टिप्स

तुम्ही बाळाला घेण्याआधी खाली काही टिप्स आहेत त्या जरूर पाळा.

१. हात स्वच्छ धुवा

बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा नीट विकसित झालेली नसते, त्यामुळे अस्वच्छ हातावरील सूक्ष्म जिवाणूंमुळे बाळाला संसर्ग होऊ शकतो. बाळाला घेण्याआधी तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. आणीबाणीच्या काळात सॅनिटायझर जवळ ठेवा.

२. आरामदायक व्हा

तुम्ही स्वतः आधी शांत आणि आरामशीर रहा, ज्यामुळे बाळ पडणार नाही किंवा तुमच्या हातून चूक होणार नाही. तुम्ही बाळाला घेण्याआधी तुम्हाला आत्मविश्वास असणे जरुरी आहे. तसेच हातातील घड्याळ किंवा पिना काढून ठेवा ज्यामुळे बाळाच्या अंगावर ओरखडा उठणार नाही.

३. तुमची स्थिती निश्चित करा

तुम्हाला बाळाला घेण्याचा अनुभव नसेल तर, तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आरामदायी आहात, जेणेकरून तुम्ही बाळाला नीट धरू शकाल हे निश्चित करा.

४. आधार द्या

बाळाची मान खूप जड असते आणि बाळाचं मानेवर नियंत्रण नसते म्हणून तुम्ही बाळाला घेतल्यावर बाळाच्या डोक्याला तसेच मानेला आधार देणे खूप महत्वाचे असते. बाळ तीन महिन्यांचे होईपर्यंत किंवा जो पर्यंत बाळ मान धरत नाही तोपर्यंत बाळाला घेताना त्याच्या डोक्याला आणि मानेला आधार देणे महत्वाचे आहे.

तुम्ही बाळाला कसे घ्याल?

बाळाला घेताना बाळाच्या डोक्याखाली एक हात आणि दुसरा हात त्याच्या कुल्ल्याखाली घेऊन तुमच्या छातीजवळ घ्या. बाळाला घेताना एक हात कायम बाळाच्या डोक्याखाली ठेवा.

बाळाला घेण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती

इथे बाळाला घेण्यासाठी काही चांगल्या पद्धती दिल्या आहेत.

१. खांद्यावर घेणे (Shoulder Hold)

ही बाळाला घेण्याची सर्वात सामान्य पद्धत आहे, बाळाला असे घेतल्याने बाळाला तुमच्या हृदयाचे ठोके ऐकू येतील https://oesterreichischeapotheke.com. तुमच्या खांद्याच्या उंचीपर्यंत बाळाला उचला जेणेकरून बाळाची स्थिती तुम्हाला समांतर राहील. बाळाचे डोके तुमच्या खांद्यावर ठेवा. तुमच्या बाळाच्या डोक्याला आणि मानेला एका हाताने आधार द्या आणि दुसऱ्या हाताने खाली आधार द्या.

२. दोन्ही हातांवर घेणे (Football Hold)

बाळाला पाजताना ह्या स्थितीला प्राधान्य दिले जाते. बाळाचे डोके आणि मानेखाली एका हाताने आधार द्या आणि त्याच हाताने बाळाच्या पाठीला आधार द्या. बाळाला तुमच्या अगदी जवळ ओढा आणि बाळाचे पाय तुमच्या मागे घ्या. बाळाला तुमच्या छातीशी घ्या आणि दुसऱ्या हाताने बाळाच्या मानेला आणि डोक्याला आधार द्या.

३. बाळाला पायांवर घेणे (Lap Hold)

ही एक आरामदायी स्थिती आहे आणि बाळाला भरवताना ही स्थिती उत्तम आहे. तुमचे पाय जमिनीवर घट्ट ठेवा आणि बाळाला तुमच्या मांडीवर घ्या. बाळाचे डोके तुमच्या गुडघ्यापाशी आणि चेहरा आकाशाकडे अश्या स्थितीत ठेवा. तुमच्या दोन्ही हातांनी बाळाच्या डोक्याला आधार द्या आणि हात बाळाच्या पाठीखाली ठेवा.

४. खुर्चीवर बसताना (Chair Hold)

ह्या स्थितीला " हॅलो-वर्ल्ड होल्ड " म्हणतात. जे बाळ आजूबाजूला बघण्यात फार उत्सुक असते त्यांच्यासाठी ही स्थिती फार योग्य आहे. तुमच्या बाळाला तुमच्या छातीवर डोके टेकवू द्या, तुमचा एक हात बाळाच्या छातीवर ठेवा आणि दुसरा हात बाळाखाली ठेवून पाठीला आधार द्या.

५. छातीशी घेणे (Cradle Hold)

बाळाला घेण्याची ही सर्वात नैसर्गिक पद्धत आहे. ही पद्धत बाळाला झोपवताना वापरतात. बाळाला तुमच्या छातीशी समांतर ठेवा. एक हात बाळाच्या मानेखाली आणि डोक्याखाली ठेवा आणि दुसरा हात कुल्ल्यांखाली ठेवा. डोक्याखालचा हात अशा पद्धतीने थोडा सरकवा की बाळाला त्याचे डोके तुमच्या ढोपराजवळच्या खाचेत टेकवता येईल.

६. कमरेवर घेणे (Hip Hold)

तीन महिन्यांवरील बाळे जी मान धरू लागली आहेत अशा बाळांसाठी हे स्थिती उत्तम आहे. बाळाचा चेहरा समोरच्या दिशेला करून बाळाला तुमच्या कमरेवर घ्या. आणि तुमचा हात बाळाच्या भोवती घेऊन बाळाला घट्ट धरा.

७. तुमच्या चेहऱ्याच्या समांतर बाळाचा चेहरा धरणे (Face to Face)

तुमच्या बाळाशी बंध निर्माण करण्यासाठी तसेच बाळाशी गप्पा मारण्यासाठी ही स्थिती उत्तम आहे. बाळाच्या डोक्याला आणि मानेला एका हाताने आधार द्या आणि बाळाच्या खालच्या बाजूला दुसऱ्या हाताने धरा. तुमच्या छातीच्या थोडं खाली बाळाला धरा जेणेकरून बाळाचा चेहरा तुमच्याकडे राहील.

स्तनपानानंतर बाळाला कसे धरावे?

बाळाला पाजून झाल्यानंतर, बाळाला उभे धरून बाळ ढेकर काढेपर्यंत पाठीवर थोपटा. स्तनपानानंतर बाळाला जास्त हलवू नका त्यामुळे बाळाला उलटी होण्याची शक्यता असते.

बाळाला योग्यप्रकारे घेण्यासाठी काही टिप्स

बाळाला धरल्यावर बाळ कसे प्रतिक्रिया देते ह्याकडे लक्ष द्या. बाळ जर किरकिर करत असेल तर बाळाला योग्यरीत्या कसे घ्यावे ह्याविषयी काही टिप्स इथे आहेत. स्तनपानाविषयी संपूर्ण मार्गदर्शन इथे दिले आहे.

रडणाऱ्या बाळाला कसे घ्यावे?

पॅसिफिक ओशन पेडिऍट्रिकस चे डॉक्टर रॉबर्ट हॅमिल्टन ह्यांनी बाळाचे रडणे क्षणात थांबवणारी एक स्थिती शोधून काढली आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी ही स्थिती योग्य आहे, कारण त्यापुढच्या बाळांचे वजन जास्त असते.

अंघोळ घालताना तुमच्या नवजात शिशुला कसे धरावे?

अंघोळीच्या वेळेला बाळाला खालील स्थितीत धरल्यास बाळाला खूप मज्जा येईल लक्षात असुद्या की बाळाला घेण्याआधी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तसेच तुम्ही शांत असले पाहिजे. बाळाला नेहमी निवांत आणि आरामात राहू द्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved