अन्न आणि पोषण

२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

पोषणमूल्ये आणि बाळाचा आहार ह्या दृष्टीने बाळाची काळजी घेणे तुम्हाला आवाहनात्मक वाटू शकते. ह्या कालावधीत त्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो आणि त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या विकासाच्या टप्प्यांच्या दरम्यान ते पालकांसाठी त्रासाचे होऊ शकते. त्यामुळे बाळाच्या आहाराचे नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

२१ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाची गरज

खाली दिलेली पोषणमूल्ये २१ महिन्यांच्या बाळासाठी महत्वाची आहेत.

. कर्बोदके

कर्बोदकांपैकी ग्लुकोज हे मेंदूसाठी इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. २१ महिन्यांच्या बाळासाठी लागणारी कर्बोदके ही साधारणपणे १३० ग्रॅम्स इतकी असतात. मोठ्या माणसाच्या मेंदूचे कार्य सुरळीत चालावे म्हणून साधारणपणे इतकीच कर्बोदके लागतात.

. प्रथिने

बाळांना कमी प्रथिनांचा आहार लागतो. आणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना १३ ग्रॅम्स प्रथिने दिवसाला लागतात.

. चरबी

मुलांसाठी चरबी हा गरजेचा पोषक घटक आहे. चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे, पेशींची वाढ, स्नायूंची हालचाल आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया इत्यादींसाठी चरबी आवश्यक असते.

. सोडियम

सोडियम शरीरात इलेक्ट्रोलाईट म्हणून काम करते, मज्जातंतूंच्या कार्यासाठी, स्नायूंच्या संकुचनासाठी आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी ते आवश्यक असते. छोट्या बाळाला जास्तीत जास्त कार्यरत राहण्यासाठी कमीत कमी १ ग्रॅम सोडियम आवश्यक असते.

. लोह

लोह तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते, ह्या तांबड्या रक्तपेशी रक्तातून ऑक्सिजन प्रवाहित करतात. लोह कमी पडल्यामुळे वारंवार संसर्ग होतो, थकवा येतो आणि त्वचा फिकी पडते. मुलांना ७ मिली ग्रॅम इतके लोह दिवसाला लागते.

. कॅल्शिअम

हाडे आणि दातांच्या विकासासाठी तसेच हृदयाच्या कार्यासाठी कॅल्शिअम हे सर्वात महत्वाचे सूक्ष्मपोषक मूल्य आहे. ३ वर्षांच्या मुलांना ७०० मिलिग्रॅम कॅल्शिअम दिवसाला लागते.

. व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हे शरीरात कॅल्शिअम शोषणासाठी आणि त्याचा शरीरास उपयोग होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. मुलांना दिवसाला व्हिटॅमिन्सचे ३००-४०० युनिट्स लागतात.

. पाणी

२१ महिन्यांच्या मुलांना १.३ लिटर्स पाणी लागते आणि ते वेगवेगळ्या स्रोतांपासून मिळते जसे की अन्न, दूध वगेरे/शरीरात पाण्याचे वजन हे ७०-७५% इतके असते आणि मोठ्या रेणूंची रचना समतुल्य करण्यासाठी, इतर पोषक पदार्थांचे वहन करण्यासाठी, तसेच अवयवांची आर्द्रता टिकवून आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी तसेच शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पाणी गरजेचे असते.

२१ महिन्यांच्या बाळाला किती अन्नपदार्थांची गरज असते?

वाढीचा वेग मंदावल्यामुळे मोठ्या बाळांना लहान बाळांपेक्षा कमी ऊर्जेची गरज असते. मोठ्या बाळांना दररोज१,०० ० ते १,४०० कॅलरीज एवढ्या ऊर्जेची गरज असते आणि ही गरज बाळांचा आकार, शारीरिक क्रियाकलाप आणि वयावर अवलंबून असते. म्हणजे साधारणपणे १/२ कप भात, १ छोटे फळ, १ कप शिजवून कुस्करलेल्या भाज्या, १ शिजवलेले अंडे आणि १ कप दूध दररोज होय. मोठ्या बाळांना त्यांच्या जेवणात तेलाची सुद्धा गरज असते.

२१ महिन्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम आहार

मुलांच्या पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी घरी केलेले अन्नपदार्थ त्यांना देणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे कारण त्या पदार्थांवर कमी प्रक्रिया झालेली असते. २१ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ म्हणजे:

. शिजवलेली अंडी

अंडी उकडून किंवा त्याची भुर्जी करून बटर किंवा चीझ सोबत बाळाला देऊ शकता

. ब्रेड रोल्स

ब्रेडच्या तुकड्यावर बटर लावून रोल करून ते फिंगर फूड म्हणून बाळाला देऊ शकता

. रवा डोसा

तुमच्या नेहमीच्या डोसा पिठामध्ये थोडा रवा घाला त्यामुळे चांगला पोत येईल

. इडली

तुमच्या मुलाला साधी इडली मसालेदार चटणी सोबत द्या

. उपमा

मटार किंवा गाजर उपमा तूप घालून बाळाला देऊ शकता

. चीझ पराठा

मऊ आणि चीझ घातलेला पराठा दिल्यास बाळाला तो पुनःपुन्हा खावासा वाटेल.

. टोमॅटो सूप

टोमॅटो सूप मध्ये क्रीम घालून दिल्यास ते बाळासाठी पोषक आणि चवदार जेवण होते.

. केळ्याचे पॅनकेक

कुस्करलेले केळे किंवा पॅनकेक मध घालून देऊ शकता.

. फळे

वेगवेगळी हंगामी फळे एकत्र करून बाळाला दिल्यास त्यामुळे बाळाची पोषणमूल्ये वाढतील

१०. मसूर डोसा

हा पर्याय पोटभरीचा असून तो चवदार होण्यासाठी दही किंवा बटर सोबत तुम्ही देऊ शकता.

२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता/ जेवणाचे नियोजन

तुमच्या बाळाला प्रत्येक नवीन पदार्थाची चव घेऊन पाहायला सांगा. इथे तुमच्या २१ महिन्यांच्या भारतीय बाळासाठी सुचवलेला आहार तक्ता

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना - १ ला आठवडा

जेवणन्याहारी

नाश्ता

दुपारी

संध्याकाळीरात्री

दिवस १ ला

छोले पराठा + दूध१ वेलची केळंसंपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीच्या तांदळाचा भातदही/ गुळ घालून दहीज्वारीची रोटी आणि मटकीची भाजी, दुधी भोपळा आणि पालक सूप
दिवस २ रा

नाचणीचा डोसा, सांबार किंवा चटणी सोबत

केळं/ सफरचंद/ किंवा कुठलेही उपलब्ध फळपोळी, अंडा भुर्जी+ दही भात आणि बीटरूट कोशिंबीरनाचणीची लापशी आणि दही

दुधीभोपळा-मेथी मुठिया ताकासहित

दिवस ३ राडाळीच्या पिठाचे धिरडे हिरव्या चटणी सोबतकेळं/ सफरचंद/ कुठलेही उपलब्ध असलेले फळपोळी+ डाळ+ आवडीची भाजी + भोपळ्याच्या काही फोडी + हातसडीचा तांदळाचा भातकेळी-अक्रोड मिल्कशेक

पराठ्यासोबत शाही पनीर आणि टोमॅटो-मशरूम सूप

दिवस ४ था

उकडलेले अंडे किंवा पनीरचे तुकडे

कलिंगड किंवा गाजराचा रस

बेसन- मेथी पराठा आणि गाजर व पालकाची कोशिंबीर

योगर्ट

पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा, बीन्स सूप किंवा किसलेल्या गाजर कोशिंबीरीसोबत
दिवस ५ वा१ कप काबुली चणे - पोहे एक ग्लास दुधासोबतपपई - सफरचंद चाट

नाचणी - गहू रोटी + मोड आलेली धान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटो

पनीर चटणीसोबतटोमॅटो सूप + पनीर पराठा
दिवस ६ वा

मेथी पराठा मँगो मिल्कशेक सोबत

कुस्करलेले सफरचंद/केळं/ बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही फळ

पोळी+ डाळ+ आवडीची कुठलीही भाजी+ गाजराचे काही काप+ हातसडीच्या तांदळाचा भात

बटाटा-चीझ लॉलीपॉप

बिसिबेळे भात आणि दही तसेच काकडीचे काही काप
दिवस ७ वा

सफरचंद आणि चिकू मिल्कशेक

कुस्करलेले केळं

पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो

खजुराचे तुकडे आणि बदाम पावडर घालून केलेली शेवयांची लापशी

डाळ खिचडी आणि दुधी भोपळ्याचे सूप

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना - २ रा आठवडा

जेवणन्याहारीनाश्तादुपारीसंध्याकाळीरात्री
दिवस १ लासाबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीरखजूर आणि सुकामेवा बर्फी

संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीचा तांदूळ

केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध कुठलेही फळ आणि दही

पनीर कटलेट किंवा भाजलेला मासा, टोमॅटो कोथिंबीर सूप सोबत

दिवस २ रादूध पोहे चिरलेले केळे किंवा सफरचंदासोबतमिल्कशेक

पोळीसोबत अंडाभुर्जी + दहीभात आणि बीटरूट कोशिंबीर

केळी बदाम मिल्कशेकउकडलेले बीन्स आणि टोस्ट
दिवस ३ राज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर

पपई/ केळं/सफरचंद

पोळी+ डाळ+ आवडीची भाजी+ काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भातबदाम अंजीर मिल्कशेक

नारळ दही चटणी आणि डोसा

दिवस ४ था

मँगो लस्सी + मुरमुरे चिक्की

-३ घरी केलेली बिस्किटे + दूध

बेसन- मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

पालक पोहे कोशिंबीर

व्हेजिटेबल रिसोतो

दिवस ५ वा

ओट्स - बदाम खीर

मसाला मखाना + केळ्याचे मिल्कशेक

नाचणी गहू रोटी + मोड आलेली कडधान्ये + चेरी टोमॅटो

शेंगदाण्याची चिक्की + /२ कप सफरचंद

भरलेली भोपळी मिरची + पुलाव + पालक सूप

दिवस ६ वा

पोहे किसलेल्या गाजरासोबत + सफरचंद मिल्कशेक

उकडलेला बटाटा + गाजर चाट

पोळी +डाळ + आवडीची भाजी+ गाजराचे काही काप + हातसडीचा तांदूळ

मँगो मिल्कशेक

डाळ बाटी आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर

दिवस ७ वा

केळ्याचा पॅनकेक

नारळ- मावा लाडूपालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो

दलिया

डाळ भात

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना - ३ रा आठवडा

जेवणन्याहारी

नाश्ता

दुपारीसंध्याकाळीरात्री
दिवस १ ला

नारळ आणि गुळ घालून तांदळाच्या पिठाचे पॅनकेक्स

गाजर- बीटरूट सूप कुस्करलेले मुरमुरे घालून

संपूर्णधान्य रोटी+ डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात

खाकरा दही

काळे मसूर आणि पराठा, गाजराचे काप आणि दही

दिवस २ रा

टोमॅटो उत्तपा आणि दही

फ्रुट चाट

अंड्याची भुर्जी आणि पोळी + दही भात आणि बीटरूट कोशिंबीर

कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर

हक्का नूडल्स + स्वीट कॉर्न सूप
दिवस ३ राकिसलेली काकडी - ओट्स पॅनकेकलिंबाचा रस - संत्र्याचा ज्यूस

आमरस पुरी + मटार बटाट्याची भाजी

-३ घरी केलेली बिस्किटे + दूधमेथीचे पिठले आणि ज्वारीची भाकरी
दिवस ४ था

भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक

फळांचा ज्यूस

बेसन- मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेकपराठा दही किंवा लस्सीसोबत
दिवस ५ वाऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच

फ्रुट चाट

नाचणी -गहू रोटी + मोड आलेले धान्य आणि पालक + काही चेरी टोमॅटो

राजगिरा चिक्की दुधात भिजवून

बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

दिवस ६ वाबेदाणे घातलेला राजगिरा गहू शिराकाला जामून - सफरचंद चाटपोळी+ डाळ + आवडीची भाजी + काही गाजराचे काप + हातसडीच्या तांदळाचा भातनाचणीचा लाडू आणि दूधमोड आलेले मूग ओट्स कटलेट सोबत + घरी तयार केलेली ओट्स- खजूर -पुदिना चटणी

दिवस ७ वा

इडली चटणी सांबार

फ्रुट चाट, काळे मीठ घालून

पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो

दही/ कुस्करलेले केळं/कुस्करलेली पपई/ अननस कोशिंबीर

आमरस पुरी आणि बटाटा भाजी

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना - ४ था आठवडा

जेवणन्याहारी

नाश्ता

सकाळी

दुपारी

संध्याकाळी
दिवस १ लाघरी तयार केलेला ताजा मेदुवडा आणि चटणीअननस काप चाटमसाला किंवा मधासोबतसंपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूटचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भातनाचणीची बिस्किटे आणि दूधछोटी पोळी + डाळ + तुमच्या आवडीची कुठलीही भाजी + गाजर/काकडी/टोमॅटोचे काप + कोथिंबीर/पुदिना चटणी
दिवस २ रादूध पोहे चिरलेल्या फळांसहित

केळं/ सफरचंद/उपलब्ध असलेले कुठलेही फळ

पोळी आणि अंडाभुर्जी + दही भात आणि बीटरूट कोशिंबीरतांदळाची बिस्किटे आणि चीझ स्प्रेडपोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात
दिवस ३ रा

ज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर

केळं/सफरचंद/ बाजारात आवडलेले कुठलेही एक फळ

पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात

पनीर फ्रुट चाट

भाज्यांची कोशिंबीर+ भाज्यांचा पुलाव + मूग डाळ सूप
दिवस ४ था

१ कप कबुली चना -पोहे + १ ग्लास दूध

भाजलेले आणि कापलेले रताळे

बेसन -मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

चिरलेली फळे

व्हेज रीसोत्तो

दिवस ५ वा

मेथी पराठा आणि मँगो मिल्कशेक

केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध असलेले फळ

नाचणी-गहू रोटी + मोड आलेली कडधान्ये आणि पालक + काही चेरी टोमॅटोचिकू मिल्कशेकछोले पराठा आणि भोपळ्याचे सूप
दिवस ६ वाइडली सांबर दूधफ्रुट चाट

पोळी+ डाळ + आवडीची भाजी + गाजराचे काप + हातसडीचा तांदूळ

पनीर -खजूर लाडूचिकन/पनीर रस्सा आणि भात
दिवस ७ वा

पराठा + चॉकलेट मिल्क

केळं/सफरचंद/ बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही फळ

पालक पनीर आणि पराठा + काही चेरी टोमॅटो

केळी-बदाम मिल्कशेकमेथी ठेपला आणि बटाट्याची भाजी + दही

२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ

इथे काही पोटभरीच्या आणि पोषक पाककृती दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या २१ महिन्यांच्या बाळासाठी करून बघू शकता.

. बटाट्याचे पराठे

बटाट्यामध्ये कर्बोदके जास्त असतात आणि हे पराठे तेल, कर्बोदके आणि प्रथिने ह्यांचे चांगले स्रोत असतात.घटक कृतीबटाटे धुवून त्याचे साल काढून उकडून घ्या. कुस्करून त्यामध्ये एक चिमूट मीठ घाला आणि बाजूला ठेवा. पीठ चांगले मऊ मळून घ्या. पिठाचा छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्या. थोडा कुस्करलेला गोळा मध्यभागी ठेवा आणि आणि लाटलेल्या पिठाच्या लाटीचे आवरण त्या गोळ्याभोवती गोळा करा. पुन्हा लाटा. तापलेल्या तव्यावर तो टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या. वाढायच्या आधी दोन्ही बाजूने तूप लावून घ्या.

. गव्हाचे पॅनकेक, मधासोबत

गव्हाचे पॅनकेक हे मऊ असतात आणि तुमच्या बाळाला ते खुप आवडतीलघटक कृती एका भांड्यात पीठ, बेकिंग पावडर, मीठ, साखर घेऊन ते चांगले मिक्स करा. मध्ये छोटा खड्डा करून त्यामध्ये दूध, फेटलेले अंडे आणि वितळवलेले लोणी घाला. अगदी मऊ बॅटर होईपर्यंत फेटत राहा. तवा तापवून त्यावर एक चमचा बॅटर घाला. दोन्ही बाजूने भाजून घेऊन मधासोबत द्या.

. पोंगल

पोंगल मध्ये प्रथिने, कर्बोदके आणि फॅट्स असतातघटक कृती अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत घाला. मूग डाळ कोरडी भाजून घ्या आणि बाजूला ठेवा. जिऱ्याची फोडणी द्या. थोडी कढीपत्त्याची पाने आणि आले घालून परतून घ्या. तांदूळ आणि डाळ घाला, त्यामध्ये ५ कप पाणी घालून ५ शिट्ट्या करा. ५ मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करा. थंड होऊ द्या आणि मिश्रण मॅश करा. बाळाला देण्याआधी पाने काढून टाका.

. चिकन सूप

चिकन सूप हे तब्येतीसाठी चांगले असते.घटक कृती चिकन स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करा. आले, लसूण आणि कांदा बारीक चिरा किंवा वाटून घ्या. जिरे, अर्धा कांदा आणि कोथिंबिरीची बारीक पेस्ट करून घ्या. तूप कुकर मध्ये गरम करा आणि त्यावर जिऱ्याची फोडणी द्या आणि दालचिनी व लवंग त्यावर भाजून घ्या. उरलेला कांदा, आणि बारीक चिरलेले आले लसूण आणि पेस्ट त्यावर घाला. त्याचा वास जाईपर्यंत परता. आता उरलेले घटक त्यात घाला आणि थोडा वेळ परतून घ्या. पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या करा. -३ मिनिटे शिजू द्या, गॅस बंद करा. बाळाला देण्याआधी सूप चाळणीने गाळून घ्या.

. क्रीम सॉस पास्ता

क्रीम सॉस मध्ये शिजवलेला गव्हाचा पास्ता हा तुमच्या मुलांसाठी चवदार पर्याय आहे.घटक कृती थोडे मीठ आणि १ चमचा तेल घालून पास्ता पाण्यात उकडून घ्या. थंड पाण्याखाली तो धुवून घ्या. थोडे बटर पॅन मध्ये घालून ते वितळू द्या. मैदा घालून हलवा. करपू देऊ नका. थोडे दूध घाला आणि ढवळत रहा. गाठी होऊ देऊ नका. आता उकळी येऊ द्या आणि जोपर्यंत मटार शिजून मऊ होत नाहीत तोपर्यंत शिजू द्या. .थंङ होऊ द्या आणि वरून काही ऑलिव्ह घाला.

भरवण्याच्या टिप्स

इथे काही भरवण्याच्या टिप्स आहेत त्यामुळे जेवणाच्या वेळेचा त्रास कमी होण्यास मदत होईल. २१ महिन्यांच्या वयातील लहान मुले प्रयोगात्मक आणि कठीण असू शकतात, त्याचा ताण तुम्ही घेऊ नका. सगळी मुले सारखी नसतात हे समजून घ्या, त्यांची भूक आणि चव त्यांच्या मूड प्रमाणे बदलते.आपणास काही वेळा अपयश येईल, परंतु धैर्याने, आपण एका लहान मुलाचे संगोपन कराल . बाळाला वेगवेगळ्या अन्नपदार्थांची आवड आहे आणि वेगवेगळ्या चवींशी जुळवून घेऊन बाळाची वाढ होईल.अस्वीकरण
  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता.
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका .
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा.
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३-४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या.
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved