Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) अन्न आणि पोषण १९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती

१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती

१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, आहार आणि पाककृती

आपले पारंपरिक जेवण हे ठराविक भारतीय पाककृतींनी युक्त असते. आपल्या जेवणात चवींची विविधता असली तरी ते मुलांना त्याची पुनरावृती केल्यासारखे वाटू शकते. नाश्त्यासाठी थोडा वेगळा पर्याय निवडणे किंवा वेगवेगळ्या पाककृती एकत्र करून तुम्ही आहार तक्ता बनवू शकता ज्यामध्ये सगळीकडील मजेदार पाककृती असतील.

१९ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज

दुपारच्या जेवणापासून ते संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी बाळ काय खाईल इथपर्यंतच्या गोष्टींचे, बाळाला संतुलित आहार मिळण्याची खात्री होण्यासाठी नीट नियोजन केले पाहिजे.

. कर्बोदके

मुलांसाठी कर्बोदके म्हणजे सर्वकाही आहे, मुलांना त्यांची ऊर्जेची पातळी जास्त ठेवली पाहिजे ज्यामुळे ते जास्त खेळू शकतील आणि त्यांना काय पाहिजे ते करू शकतील.

. प्रथिने

बाळाची शारीरिक वाढ ही प्रथिनांवर अवलंबून असते. तुम्ही विचार करीत असाल तेवढी त्यांची प्रथिनांची गरज कदाचित जास्त नसेल. तुमच्या कुटुंबाच्या आहारावर आधारित, प्रथिने किती प्रमाणात घेतली पाहिजेत हे नियंत्रित केले पाहिजे.

. लोह

मुलांमधील ऍनिमिया हा सर्वत्र ऐकिवात आहे, आणि त्याच्या बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होतो. वेगवेगळ्या स्वरूपात लोहाचा समावेश करणे आवश्यक आहे कारण ह्या वयात मुले स्तनपान करत नाहीत.

. जीवनसत्वे

लोकांच्या मताच्या उलट, एखाद्या समस्येचे निदान झाल्यानंतर डॉक्टर पूरक जीवनसत्वे सुचवत नाहीत. तर बाळाला कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये म्हणून पूरक जीवनसत्वे लिहून दिली जातात.

जीवनसत्वे

. सोडियम

आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर जास्त मिठामुळे हृदयविकार होऊ शकतात परंतु आत्ताच्या टप्प्यावर मिठाच्या अभावामुळे बाळाच्या विकासाच्या समस्या येऊ शकतात.

. कॅलरी

ऊर्जा आणि पोषण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु ह्या दोन्ही गोष्टी शरीराकडून वेगवेगळ्या मार्गाने मिळवल्या जातात. पोषक आहारातून ऊर्जा मिळेलच असे नाही त्यामुळे कॅलरी किती घेतल्या जातात ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

. तंतुमय पदार्थ

लहान मुलांना तंतुमय पदार्थांची कमतरता भासणे ही दुर्मिळ गोष्ट आहे कारण वेगवेगळ्या अन्नपदार्थांमधून ते बाळांना मिळत असते. जितके जास्त नियमितपणे फळे भाज्या खाल्ल्या जातील तितके जास्त तंतुमय पदार्थ शरीरास मिळतील.

. पाणी

मुलाना दिवसभर पाणी पिण्यास सांगितले जाते. गरजेपेक्षा कमी पाणी पिणे सहज विसरले जाते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

१९. महिन्यांच्या मुलाला किती अन्नाची गरज असते?

बरीच मुले दीड वर्षांची झाल्यानंतर त्यांचे क्रियाकलाप वाढतात. म्हणून त्यांच्या ऊर्जेची गरज जी १. २ ते १. ४ किलोकॅलरीज (१२००१४०० कॅलरीज ) इतकी असते आणि ती बाळाच्या शारीरिक संरचनेवर आणि चयापचयावर अवलंबून असते.

१९ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

तुमच्या १९ महिन्यांच्या बाळासाठी काही पदार्थ जे तुम्ही बाळाला भरवू शकता

. मांस

जी कुटुंबे आपल्या बाळाला मांस देण्याचा पर्याय निवडतात त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की ते मांस ताजे आणि ऑरगॅनिक असले पाहिजे, आणि ते योग्य प्रकारे शिजवले पाहिजे. तसेच बाळाला मांसाचे मोठे तुकडे देण्यापेक्षा छोटे छोटे तुकडे द्यावेत.

. दूध

दररोज एक ग्लास दूध प्यायल्याने बाळाला पुरेसे पोषण मिळते. तुमचे बाळ दूध सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही पीत असले तरीसुद्धा त्यामध्ये सुकामेवा घालून त्याचे पोषणमूल्य तुम्ही वाढवू शकता.

दूध

. फळे

काही फळे जसे की केळी आणि सफरचंद तसेच किवी आणि ड्रॅगनफ्रूट हे सुद्धा उपयोगी असतात. ही फळे त्यांचा रस करून पिण्यापेक्षा तशीच खाणे चांगले.

. दुधयुक्त पदार्थ

दही आणि ताक हे पोषणमूल्यांचे संतुलन तसेच आरोग्य चांगले राखतात. चीझ सॅन्डविच हा सुद्धा चांगला पर्याय आहे.

दुधयुक्त पदार्थ

. सुकामेवा

सुकामेवा तुम्ही बाळाला दुधात मिसळून देऊ शकता किंवा इतर पदार्थांसोबत घेऊ शकता. किंवा तुम्ही ते बाळाला तसेच खायला देऊ शकता. सुक्यामेव्यामध्ये ओमेगाफॅटी ऍसिडस पासून चरबीपर्यंत बरीच पोषणमूल्ये असतात त्यामुळे बाळाला त्याचा फायदा होतो.

. समुद्री अन्न

मुलांना मासे देताना ज्या माशांमध्ये जास्त प्रमाणात पारा आहे तसेच ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची बाळास ऍलर्जी आहे असे मासे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

समुद्री अन्न

. संपूर्णधान्य

जर तुमच्या बाळाला ब्रेड किंवा तत्सम पदार्थ आवडत नसतील तर त्याऐवजी तुम्ही बाळाला तपकिरी तांदूळ किंवा बाजरी चे पदार्थ सुद्धा देऊ शकता. हे संपूर्ण धान्य पदार्थ हे शरीरासाठी चांगले असतात आणि त्यामुळे बाळाला प्रथिने मिळतात.

. अंडी

ऑम्लेट करा आणि ते सँडविच सोबत बाळाला द्या. बाळांना अंडी उकडून द्या किंवा त्याची भुर्जी करून द्या. तुम्ही स्वतः अंड्यांच्या वेगवेळ्या पाककृती करून बघा आणि जास्त पोषण आणि ऊर्जा कुठल्या उत्तम पर्यायाने शक्य आहे ते पहा.

अंडी

. तेल

मोठ्या माणसांसाठी सूर्यफूल तेल हे चांगले नाही त्यामुळे तुम्ही त्याचा वापर तुमच्या कुटूंबात कमीत कमी करू शकता. त्यामुळे पोषक तेलाचा पर्याय निवडा आणि त्याचा वापर योग्य प्रमाणात करा जेणेकरून तुमच्या बाळाच्या आरोग्याला फायदा होईल.

१०. भाज्या

भारतीय जेवणात वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरल्या जातात. हे महत्वाचे आहे की काही भाज्या ह्या वेगवेगळ्या सलाड मध्ये कच्च्या स्वरूपात वापरल्या जातात त्यामुळे त्यांची चव नेहमीपेक्षा वेगळी लागते.

१९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार योजना

  • १९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता आठवडा १ ला

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला नाचणीओट्स केळ्याचा पॅनकेक आणि दूध नारळाचे पाणी क्रीम सहित पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात मुरमुरे चिक्की आणि दूध थालीपीठ, बटर घालून आणि ताक
दिवस २ रा पोंगल आणि दही फ्रुट कस्टर्ड संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या गाजराचे तुकडे + दही भात भाजक्या पोह्यांचा चिवडा, सुकामेवा नसलेला + दूध पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे, टोमॅटो सूप सोबत
दिवस ३ रा घरी केलेला नाचणीचा केक आणि दूध द्राक्षे अर्धी कापलेली रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात खाकरा छोटे तुकडे दह्यासोबत राजमा टोस्ट आणि चीझ
दिवस ४ था पुदिना पराठा, खजूर टोमॅटो चटणी आणि चिकू मिल्कशेक पपई पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर अप्पे, नारळ आणि दह्याची चटणी
दिवस ५ वा अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू आणि अंजीर मिल्कशेक पेरू संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात ३ घरी केलेली बिस्किटे + दूध टोफू भुर्जी, ज्वारी गहू रोटी आणि किसलेल्या गाजराचा रायता
दिवस ६ वा बदाम पावडर घातलेला रव्याचा शिरा कलिंगड बेसन मेथी पराठा, गाजर पालक रायता सोबत मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेक पनीर पराठा आणि टोमॅटो सूप
दिवस ७ वा मखाना लापशी, मनुक्याची पेस्ट आणि अक्रोड पावडर सोबत सफरचंद पोळी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात राजगिरा चिक्की दुधात बुडवून पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात
  • १९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता आठवडा २ रा

जेवण न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक साधे दही आणि कुठलेही फळ ( डाळिंब आणि द्राक्षे नकोत ) पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात उकडलेले छोले चाट नाचणीचा डोसा, बटाटा भाजी आणि सांबार
दिवस २ रा भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक अननसाचे काप चाट मसाला किंवा मधासोबत संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या गाजराचे काही काप + दही भात गव्हाच्या पिठाचा अक्रोड घालून लाडू मेथी पिठलं आणि ज्वारीची भाकरी
दिवस ३ रा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच पीच/ सफरचंद पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात हरा भरा कबाब आणि दही भरलेला पराठा आणि दही किंवा लस्सी
दिवस ४ था राजगिरागहू शिरा आणि गोडीसाठी बारीक केलेले मनुके कलिंगड पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप उकडलेले रताळे किंवा बटाट्याचे तुकडे बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक रायता
दिवस ५ वा बदाम ओट्स खीर आंब्याच्या फोडी संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप +हातसडीच्या तांदळाचा भात पेअर खजूर मिल्कशेक मोड आलेले मूगओट्स कटलेट्स आणि घरी केलेली खजूर टोमॅटो पुदिना चटणी
दिवस ६ वा पोहे, टोमॅटोसोबत + चॉकलेटअक्रोड मिल्कशेक डाळिंबाचा ज्यूस दहीभात आणि किसलेली काकडी छोले पावडर आणि खजूर लाडू आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी
दिवस ७ वा केळ्याचा पॅनकेक ३ मठरी रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात फ्रुट योगर्ट छोटा रोटी आणि व्हेजिटेबल सूप
  • १९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता आठवडा ३ रा

जेवण

न्याहारी

सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला फ्रुट कस्टर्ड पपई आणि सफरचंद चाट रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात मुरमुरे चिक्की + दूध

थालीपीठ आणि घरी केलेले लोणी किंवा ताक

दिवस २ रा किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक स्वीट लाईम आणि संत्र्याचा रस संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या गाजराचे काही तुकडे + दही भात भाजक्या पोह्यांचा चिवडा (सुकामेवा न घातलेला ) + दूध पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे, टोमॅटो सूप सोबत
दिवस ३ रा भाज्यांचा उपमा आणि ताक डाळिंब आणि कलिंगड ज्यूस पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात प्लेन खाकऱ्याचे छोटे तुकडे आणि दही राजमा टोस्ट
दिवस ४ था ब्रेड ऑम्लेट किंवा पनीर सँडविच चिकू + पीच/ सफरचंद पनीर पुलाव आणि भोपळ्याचे सूप कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर दह्यातल्या नारळाच्या चटणीसोबत अप्पे
दिवस ५ वा राजगिरा गहू शिरा + दूध सफरचंद आणि केळ्याचे चाट संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीचा तांदूळ ३ घरी केलेली बिस्किटे + दूध टोफू भुर्जी आणि ज्वारी भाकरी किंवा पोळी आणि किसलेले गाजराचा रायता
दिवस ६ वा दूध पोहे, बारीक चिरलेले पीच किंवा स्ट्रॉबेरी पेरू + पेअर, काळे मीठ घालून बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक रायता मसाला मखाना + केळ्याचा मिल्कशेक पनीर पराठा टोमॅटो सूप सोबत
दिवस ७ वा ज्वारीची खीर पपई पोळी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काप + हातसडीचा तांदळाचा भात राजगिरा चिक्की आणि दूध पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात
  • १९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता आठवडा ४ था

जेवण न्याहारी सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला केळी अक्रोड पॅनकेक आणि चॉकलेट मिल्क पेअर संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या गाजराचे काप + दही भात उकडलेले मका व्हेजिटेबल पुलाव + पालक सूप
दिवस २ रा अंडाभुर्जी टोस्ट + चिकू मिल्कशेक संत्रे रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात केळ्याचा शिरा छोले पराठा + भोपळ्याचे सूप
दिवस ३ रा मुगाच्या डाळपालक ढोकळा, हिरव्या चटणीसोबत पेरूचा ज्यूस आणि चाट मसाला पनीर पुलाव, भोपळा सूप भाजक्या पोह्याचा चिवडा आणि दूध चिकन किंवा पनीर रस्सा आणि भात
दिवस ३ रा दूध, बदाम आणि खजूर कुठलेही फळ संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीचा तांदूळ चणेमुरमुरे चाट मेथी ठेपले आणि बटाटा भाजी + दही
दिवस ५ वा इडली चटणी किंवा सांबार चिकू बेसन मेथी पराठा, गाजर पालक रायता शेवयांची लापशी छोले पुरी + लस्सी
दिवस ६ वा मँगो लस्सी + मुरमुरा चिक्की अननस रायता पोळी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काप + हातसडीचा तांदळाचा भात चिकू मिल्कशेक पोंगल व्हेजिटेबल सूप सोबत

१९ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

इथे काही मजेदार पाककृती दिल्या आहेत ज्यामुळे जेवणानंतर सुद्धा तुमचे बाळ बोटे चाटत बसेल.

. गाजर चीझ पराठा

शरीरात आवश्यक असे २ घटक चवदार पराठ्यामध्ये लपेटलेले असतात

घटक

  • तूप
  • ओवा
  • टोमॅटो
  • काळेमिरे
  • चीझ
  • गाजर
  • गव्हाचे पीठ

गाजर चीझ पराठा

कृती

  • एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये ओवा घाला आणि तो चांगला तडतडू द्या
  • नंतर टोमॅटो, गाजर, काळे मिरे आणि मीठ घाला आणि ते चांगले एकत्र शिजू द्या
  • हे मिश्रण गार झाल्यावर, पीठ मळून घ्या आणि त्याची पोळी करून घ्या
  • त्यामध्ये हे भाज्यांचे मिश्रण भरा आणि वरती चीझ किसून घाला
  • आणि पुन्हा लाटा, तूप घालून पॅनवर पुन्हा भाजून घ्या

. डोसा

जेव्हा तुमचे मुलाला खूप भूक लागलेली असेल आणि तुम्हाला स्वयंपाक करायला वेळ नसेल तर डोसा हा तुमचा स्वयंपाकघरातील लाडका पर्याय होऊ शकतो.

घटक

  • तूप
  • डोसा पीठ

डोसा

कृती

  • तवा चांगला गरम करा.
  • गरम झाल्यावर तव्याच्या मध्यभागी डोसा पीठ घाला आणि वर्तुळाकारात गोलाकार पसरवा.
  • जाळी पडू लागल्यावर डोसा आणि आजूबाजूला तूप सोडा.
  • काही मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या आणि मऊ झाल्यावर डोसा काढून घ्या.
  • टोमॅटो चटणी सोबत खायला द्या किंवा डोसा पिठामध्येच इतर घटक घाला.

. रवा टोस्ट

रव्याचे आरोग्यास फायदे असतात तसेच टोस्ट सुद्धा कुरकुरीत आणि चविष्ठ होतात

घटक

  • ब्रेड
  • तूप
  • मिरपूड
  • मीठ
  • ढोबळी मिरची
  • कांदा
  • गाजर
  • क्रीम
  • भाजलेला रवा

रवा टोस्ट

कृती

  • ब्रेडच्या एका बाजूला तूप लावून घ्या. एका भांड्यात वरील सर्व घटक एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
  • ह्याचा पेस्ट म्हणून वापर करा आणि ब्रेडच्या तुकड्यांवर लावा
  • एक तवा घेऊन त्यामध्ये तूप घाला. आणि पेस्ट लावलेली बाजू तव्यावर भाजून घ्या
  • एकदा झाल्यावर, उलटा आणि दोन्ही बाजू भाजल्यावर वाढा

. गव्हाचा पॅनकेक

जर तुम्ही गोडासोबत हा गव्हाचा पॅनकेक खाल्ल्यास नाश्त्यासाठी एक पोषक पर्याय ठरू शकतो.

घटक

  • तूप
  • बडीशेप
  • पाणी
  • गूळ सिरप
  • गव्हाचे पीठ

गव्हाचा पॅनकेक

कृती

  • पिठामध्ये गूळ सिरप घाला आणि बॅटर तयार करून घ्या. त्यामध्ये बडीशेप आणि पाणी घाला. पीठ तुम्ही रात्री तयार करून ठेऊ शकता
  • पॅनमध्ये थोडे तूप घाला. गरम होऊ द्या आणि त्यामध्ये गोलाकार पीठ पसरावा
  • एका बाजून भाजून घ्या आणि मग उलटून दुसऱ्या बाजूने भाजा. गोडी वाढवण्यासाठी मधासोबत खायला द्या

. स्प्रिंग रोल्स

तुमचे बाळ हा पदार्थ तुमच्या हातातून घेऊन खाईल.

घटक

  • मीठ
  • ऑलिव्ह ऑइल
  • गव्हाचे पीठ
  • मैदा
  • सोया सॉस
  • काळे मिरे
  • मीठ
  • फ्रेंच बीन्स
  • बेबी कॉर्न
  • कोबी
  • ढोबळी मिरची
  • कांदा
  • गाजर

स्प्रिंग रोल्स

कृती

  • पीठ, मैदा आणि पाणी एकत्र करून पीठ मध्यम सुसंगतीचे करून घ्या
  • छोटा गोळा घेऊन, आयताकृती आकारात जितके पातळ लाटता येतील तितके लाटून घ्या. असे अनेक आयताकृती आकाराच्या लाट्या लाटून ठेवा आणि ओल्या नॅपकिनने झाकून ठेवा.
  • एका गरम तव्यात, तेलावर कांदा भाज्यांसोबत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • एका भांड्यात मैदा आणि पाणी घेऊन घट्ट पेस्ट करून घ्या
  • आता, हे मिश्रण आयताकृती छोट्या पोळी वर घाला आणि रोल करा आणि वरील मैदा पेस्टने रोलच्या उघड्या बाजू बंद करा
  • अशा प्रकारे सगळे रोल तयार करा आणि तळून घ्या आणि चटणी सोबत वाढा

भरवण्यासाठी टिप्स

नाश्त्याच्या वेगवेगळ्या पर्यायांसोबतच बाळाला भरवण्याचा अनुभव सुखद आणि सोपा होण्यासाठी खाली काही टिप्स देत आहोत

  • बाळाच्या आहारात विविधता असुद्या
  • बाळाला स्वतःचे प्लास्टिक चमचे वापरू द्या
  • खाताना काटा चमचा वापरायला शिकवा
  • बाळाला मांसाहार सुरु करताना तुमच्या डॉक्टरांशी बोला
  • जेवणाची वेळ आरामदायक असुद्या
  • चव वाढवण्यासाठी भाजीवर लिंबू पिळा
  • जेवताना बाळाला कमी पाणी पिण्यास सांगा
  • बाळाला सुकामेवा आणि फिंगर फूड देण्याचे टाळा
  • बाळाने खावे म्हणून स्तनपान बंद करू नका
  • रात्रीच्या जेवणाच्या वेळी द्रवपदार्थ कमी ठेवा

तुमच्या बाळासाठी परिणामकारक तसेच पोषक आहार योजना मिळाल्यास तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. रात्रीच्या जेवणासाठी पर्याय हाताशी असतील तर ते करण्यास सोपे जाते. अवघड पाककृती तुम्ही सुटीच्या दिवशी सेलिब्रेशन म्हणून करू शकता.

अस्वीकारण:

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article