In this Article
जशी मुले मोठी होऊ लागतात तसे त्यांना काय खायला द्यावे हा प्रश्न असतो. बाळ जरी आता घनपदार्थ खाऊ लागले असेल तरी सुद्धा योग्य पोषण असलेले, बाळाला आवडतील असे वेगवेगळे अन्नपदार्थ करणे म्हणजे तारेवरची कसरत वाटू शकते.
१६ महिन्यांच्या बाळाच्या पोषणाच्या गरजा
नाश्ता किंवा जेवण असो, तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाला त्याला आवश्यक असलेली पोषणमूल्ये योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत.
- फळे: म्हणजे फक्त तंतुमय पदार्थांचा स्रोत नव्हे तर त्यांच्याद्वारे लागणारी जीवनसत्वे सुद्धा मिळतात जी शरीरात अगदी सहजपणे शोषली जातात. केळी, किवी, आंबे, आणि इतर फळे दिवसातून २ वेळा खाण्यास सांगितले जाते.
- संपूर्ण धान्य: मुलांच्या पोषक आहारात, जेवणाच्या विविध पर्यायांमध्ये हा आवश्यक घटक आहे. किंबहुना एखाद्या धान्याच्या बिस्किटातूनसुद्धा मुलांना योग्य प्रमाणात आवश्यक असलेली पोषणमूल्य मिळतात.
- चरबी: चरबी हा ऊर्जेचा स्रोत असतोच, पण त्याव्यतिरिक्त येत्या काही महिन्यांमध्ये तुमचे बाळ निरोगी राण्यास आणि बाळाची वाढ होण्यास सुद्धा त्याची मदत होते. जेवणात ऑलिव्ह ऑईलचा किंवा नारळ व अवोकाडो इत्यांदींचा समावेश केल्यास शरीराला चांगल्या प्रमाणात चरबी मिळते.
- भाज्या: तुमचे मूल घनपदार्थ खाण्यायोग्य असल्याने, आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांसोबतच ब्रोकोली आणि कॉलीफ्लॉवर ह्या भाज्या उकडून दिल्या पाहिजेत.
- मांस आणि अंडी: हे तुमच्या बाळासाठी खूप स्वस्त, सोपे सहज आणि सर्वोत्तम प्रथिनांचे स्रोत आहेत. अंडी, मांसाचे तुकडे किंवा थोडे समुद्री खाद्य हे तुमच्या बाळाच्या आहारासाठी एक चांगला पर्याय आहे.
- लोह: लोह समृद्ध धान्यासोबतच व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नपदार्थ सुद्धा असले पाहिजेत कारण त्यामुळे तुमच्या शरीरात लोह शोषले जाते. कुठल्याही पालेभाज्या, लाल मांस आणि लिबूवर्गीय फळे हे एकत्र दिल्यास चांगले.
- दुग्धजन्य पदार्थ: बाळाचे स्तनपान सोडवताना बाळाच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून बाळाचे पोषण योग्य होईल. वेगवेगळे चीझ, योगर्ट, आणि फुल क्रीम दूध ह्यांचा समावेश गरजेचं आहे.
- सुकामेवा आणि शेंगा: अशा गोष्टींचा आहारात समावेश केल्यास मुलांच्या चावण्याचा क्षमतेचा उपगोय करून घेता येतो. जवसाच्या दाण्यांपासून मटार ते पीनट बटर हे थोड्या प्रमाणात नियमित घेतल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे होतात.
वयाच्या १६ व्य महिन्यात बाळाला किती अन्न लागते
बाळ १६ महिन्यांचे झाल्यावर बाळाचा वाढीचा वेग थोडा मंदावतो, परंतु त्यांच्या पोषणाच्या गरज त्याच असतात. त्यांना लागणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण सुद्धा १किलोकॅलरी ते १.५ किलोकॅलरी इतके असते.
तुमच्या १६ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ
१६ महिन्यांच्या बाळासाठी दुपारच्या जेवणाचे पर्याय देताना, काही महत्वाचे अन्नपदार्थ ज्यांचा बाळाच्या आहार योजनेत समावेश केला पाहिजे ते खालीलप्रमाणे:
१. लापशी
लापशी म्हणजे प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ ह्यांनी समृद्ध असते तसेच ती पोषक तर असतेच आणि लहान मुलांसाठी ते पोटभरीचे अन्न असते त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला दिल्यास चांगले.
२. समुद्री खाद्य
होय, काही माशांमध्ये पारा आणि अर्सेनिक असते आणि त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते. तथापि, रावस आणि बांगडा ह्या सारखे मासे हे सुरक्षित असतात आणि त्यामध्ये ओमेगा–३–ऍसिड्स असतात आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी त्याची मदत होते.
३. अंडी
एक साधा अन्नपदार्थ ज्यामुळे खूप ऊर्जा मिळते तो म्हणजे अंडी. तुमच्या बाळाला जसे योग्य वाटेल त्या स्वरूपात तो द्या. अंड्यामधील पोषणमूल्यांमुळे चव चांगली असते आणि ऊर्जा मिळते तसेच अंडी खाणे ही दीर्घकालीन सवय झाली पाहिजे. (अर्धवट शिजवलेली अंडी टाळा)
४. बीन्स
बीन्स हे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पचायला अगदी हलके असतात आणि ते बाळाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन्स, तंतुमय पदार्थ आणि लोह पुरवतात. शेंगांचे सूप करून ते बाळाला दिल्यास बीन्सचा आहारात समावेश करण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरू शकतो.
५. भाज्या
भाज्या उकडून त्या खायला देणे हा एक उत्तम मार्ग आहे परंतु भाज्यांचे सूप करून दिल्यास बाळाची प्रतिकारशक्ती वाढते.
६. चिकन
चिकन हे फक्त प्रथिनांनीच समृद्ध नसते तर लोहाचा सुद्धा तो एक समृद्ध स्रोत आहे, ह्या वयाच्या मुलांसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. चिकन तयार करण्याच्या पाककृती ह्या तयार करण्यासाठी अवघड नाहीत.
७. फळे
जर तुमचे बाळ अजूनही फळे खात नसेल तर आता त्याने फळे खाण्यास सुरवात केली पाहिजे. फळे खाण्यामागे व्हिटॅमिन्स आणि खनिजद्रव्ये मिळावीत हाच फक्त हेतू नाही तर फळांचा पोत आणि वास वेगवेगळा असतो त्यामुळे तुमच्या बाळाचे चव कलिका (Taste buds)विकसित होतात.
८. योगर्ट
बऱ्याच दुग्धपदार्थांपैकी डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ योगर्ट खाण्याची शिफारस करतात.
चविष्ट लागण्यासाठी तसेच दह्याद्वारे चांगले जिवाणू पोटात जाऊन पोटाचे कार्य चांगले चालण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांबरोबर सुद्धा आपण ते देऊ शकतो
९. दूध
जर तुम्ही अजूनही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल तर काहीच प्रश्न नाही. परंतु जर स्तनपान बंद केले असेल तर बाळाला बाटली ऐवजी कपमधून दूध देण्यास सुरुवात करा. दूध पिणे हे खूप गरजेचे आणि तसेच बाळाची योग्य वाढ होण्यास सुद्धा त्याची मदत होते आणि पोषणाची पातळी चांगली राहते.
१०. संपूर्ण धान्य
हे बाळाला देताना नेहमीच्या पाककृती करून उपयोग नाही. संपूर्ण धान्य बाळाला ब्रेड, मफिन, सँडविचेस इत्यादीसारख्या पदार्थांमधून मिळू शकते. जेवणामध्ये वेगवेगळ्या पर्यायांचा समावेश केला आहे ह्याची खात्री करा.
१६ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/आहाराची योजना
तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाचे वेळापत्रक नीट आखता यावे म्हणून आम्ही तुम्हाला त्याचा एक नमुना
इथे देत आहोत, तो तुम्ही आहे तसा वापरू शकता किंवा तुमच्या जीवनशैलीला योग्य असा बदल तुम्ही त्यात करू शकता.
१६ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – आठवडा १ ला
जेवण | न्याहारी | नाश्ता | दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता | रात्रीचे जेवण |
दिवस १ ला |
गव्हाचा पॅनकेक, मध किंवा साखरेसोबत आणि दूध |
१ छोटे सफरचंद |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप +हातसडीच्या तांदळाचा भात |
आंबा /केळ्याचा मिल्कशेक | मेथीचा ठेपला + दुधी हलवा |
दिवस २ रा | अंडाभुर्जी + टोस्ट + १ ग्लास चॉकलेट मिल्कशेक | १ छोटी वाटी टरबूज | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप+हातसडीच्या तांदळाचा भात | रव्याचा शिरा |
भाज्यांचे सूप + फ्राईड राईस + गाजराचे काही काप |
दिवस ३ रा |
१ कप छोले–ढोबळी मिरची पोहे आणि १ ग्लास दूध |
१ छोटी वाटी पपईचे काप | संपूर्ण धान्य रोटी + डाळ +आवडीची भाजी + किसलेले गाजर+हातसडीच्या तांदळाचा भात | बाजरीची लापशी आणि दही | शाही पनीर आणि पराठा व टोमॅटो–मशरूम सूप |
दिवस ४ था |
नाचणी डोसा किंवा इडली चटणी + १ ग्लास दूध |
सफरचंद | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | उकडलेले गाजर किंवा परतून घेतलेली ब्रोकोली आणि दही पालक | भाजून घेतलेले पनीर सँडविच आणि भोपळ्याचे सूप |
दिवस ५ वा |
बदाम,अक्रोड पूड घातलेली लाह्यांची लापशी |
चिकू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | दही घालून तयार केलेली नाचणीची लापशी | पोंगल आणि व्हेजिटेबल सूप |
दिवस ६ वा | ज्वारी उपमा | पीच किंवा केळं | पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | भाजलेले पनीर | पराठा दही किंवा लस्सी |
दिवस ७ वा | फ्रुट कस्टर्ड | बिया काढून कुस्करलेले सीताफळ | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काप + हातसडीचा तांदळाचा भात |
१ ग्लास दूध, घरी केलेल्या बिस्किटांसोबतकिंवा पोळी आणि गोड लोणचे |
ज्वारी–गहू रोटी + छोले पालक + काही चेरी टोमॅटो |
१६ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – आठवडा २ रा
जेवण |
न्याहारी |
नाश्ता |
दुपारचे जेवण | संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | भाज्या घालून केलेला उपमा + दूध | अननसाचे किंवा सफरचंदाचे काप | संपूर्णधान्य रोटी + डाळ +आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | नाचणीचे लाडू |
बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि कढी |
दिवस २ रा |
नाचणीचा डोसा + दूध |
पेअर किंवा सफरचंदाचे काप |
पोळी +डाळ +आवडीची भाजी + काकडीचे काही काप+हातसडीच्या तांदळाचा भात | खांडवी आणि चटणी | व्हाईट सॉस पास्ता आणि भाज्यांचे सूप |
दिवस ३ रा |
सफरचंदाची खीर + गाजर पराठा |
संत्र्याच्या काही पाकळ्या | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर + हातसडीच्या तांदळाचा भात |
ज्वारीच्या पिठाचा पॅनकेक |
राजमा कटलेट आणि मिक्स भाज्यांचे सूप |
दिवस ४ था | दलिया | पपईचे काप |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
पनीर आणि पुदिना चटणी |
शेवग्याचे सूप आणि पनीर पराठा |
दिवस ५ वा | पोंगल आणि दूध |
बिया काढलेल्या जांभुळाचे छोटे तुकडे |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | सफरचंद मिल्कशेक |
पोळी, दुधी भोपळ्याचे वरण आणि ताक |
दिवस ६ वा | पुरी भाजी आणि लस्सी | आंब्याचे काप |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात |
गुळ पापडी आणि दूध |
पराठा + पनीर भुर्जी |
दिवस ७ वा |
अंडे किंवा पनीर कुठल्याही स्वरूपात |
कापलेले पीच किंवा सफरचंद |
संपूर्णाधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
बाजरीची लापशी आणि दही |
कोबी पराठा आणि घरी तयार केलेले ताक किंवा दही |
१६ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – आठवडा ३ रा
जेवण | न्याहारी | नाश्ता |
दुपारचे जेवण |
संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | पोहे आणि दूध | राजगिरा शिरा | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | ओट्स आणि फ्रुट स्मूदी |
डाळ खिचडी आणि गाजराचा हलवा |
दिवस २ रा |
रवा घालून केलेला ब्रोकोली उपमा + वेलची–केशर दूध |
नारळ बर्फी |
पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप+हातसडीच्या तांदळाचा भात |
ढोकळा आणि हिरवी चटणी |
टोमॅटो–भोपळा–मसूर डाळ सूप आणि हातसडीच्या तांदळाचा पुलाव |
दिवस ३ रा |
केळी–व्हॅनिला मिल्कशेक |
भोपळ्याचे सूप आणि टोस्ट | संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर + हातसडीच्या तांदळाचा भात | फ्रुट कस्टर्ड |
पालक पनीर पराठा |
दिवस ४ था | अंडे किंवा पनीर पराठा आणि हिरवी चटणी | पनीर आणि पपई चाट | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | ताजी नारळ बर्फी | भाज्या घालून केलेली खिचडी आणि दही किंवा ताक |
दिवस ५ वा | रव्याचा शिरा आणि दूध | अननस ज्यूस |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
नाचणी सत्व | मेथी ठेपला + दुधी हलवा |
दिवस ६ वा | गव्हाचा लाडू आणि दूध |
कलिंगडाचे काप |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | बटाटा–चीझ लॉलीपॉप | पराठा + पनीर भुर्जी |
दिवस ७ वा | फ्रुट कस्टर्ड |
खीर |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीचा तांदळाचा भात |
उकडलेला मका आणि मोड आलेल्या धान्यांची भेळ |
चिकन रस्सा, साधा भात आणि भाज्यांचे सूप |
१६ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना – आठवडा ४ था
जेवण |
न्याहारी | नाश्ता |
दुपारचे जेवण |
संध्याकाळचा नाश्ता |
रात्रीचे जेवण |
दिवस १ ला | ज्वारी इडली + चटणी | पास्ता–पनीर पुडिंग | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | मठरी आणि दूध | डाळ खिचडी, राजगिरा आणि भोपळ्याचे सूप |
दिवस २ रा | कॉर्नफ्लेक्स आणि दूध, कापलेले सफरचंद |
काही स्ट्रॉबेरीचे आणि केळ्याचे काप |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | बटाटा चाट आणि दही | तांदळाची लापशी, बेसन घालून केलेली मेथीची भाजी |
दिवस ३ रा | बदाम–खजूर मिल्कशेक | नाचणीचा लाडू | संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर + हातसडीच्या तांदळाचा भात |
पनीर–खजूर लाडू |
पोंगल आणि व्हेजिटेबल सूप |
दिवस ४ था | ऑम्लेट किंवा बेसनाचे धिरडे आणि ब्रेड बटर | १ ग्लास सफरचंदाचा मिल्कशेक |
रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
भाजके पोहे चिवडा आणि दूध |
पनीर कटलेट किंवा भाजलेले मासे आणि टोमॅटो–कोथिंबीर सूप |
दिवस ५ वा | केळ्याचा पॅनकेक + दूध |
१ ग्लास चॉकलेट मिल्कशेक |
संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप + हातसडीच्या तांदळाचा भात |
चिकन सूप |
पुलाव आणि टोमॅटो सूप |
दिवस ६ वा | मफिन + १ ग्लास दूध | कापलेली पपई | रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | रोझ मिल्क | नाचणीचा डोसा आणि बटाटा भाजी, सांबर |
दिवस ७ वा |
गहू– सफरचंदाची लापशी आणि दूध |
१ ग्लास दूध | संपूर्णधान्य रोटी + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप + हातसडीच्या तांदळाचा भात | गूळ पापडी | मेथीचे पिठले आणि ज्वारीची भाकरी |
१६ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती
तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी ह्या पाककृती परिणामकारक ठरतील. कारण एकतर त्या पटकन करता येतात आणि त्या पोषक सुद्धा आहेत.
१. मूग डाळ डोसा
नेहमी केल्या जाणाऱ्या डोशापेक्षा थोडासा वेगळा हा डोसा आहे. हा चविष्ट तर आहेच परंतु त्याचा पोत सुद्धा चांगला असतो त्यामुळे तुमच्या बाळाला तो चविष्ट लागेल.
- ताक
- हिंग
- गरम मसाला
- धने पूड
- हळद
- मीठ
- मोड आलेले मूग
- बेसन
कृती
- भिजवलेली डाळ एका भांड्यात घेऊन त्यात बेसन घालून चांगले मिक्स करा
- मीठ सोडून बाकी सगळे मसाले त्यामध्ये घाला आणि नंतर ताक घाला. चांगले मिक्स करून घट्टसर पीठ करून घ्या
- १० मिनिटे ते तसेच राहूद्या आणि त्यामध्ये मीठ घाला
- तवा घेऊन त्यावर तूप लावा. त्यावर गोलाकार पीठ घाला आणि दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्या.
- दोन्ही बाजूने तांबूस लाल झाल्यावर चटणी सोबत खायला द्या
२. मटार बटाटा पराठा
हा पदार्थ त्याच्या चवीमुळे आणि खाल्ल्यावर पोट भरत असल्यामुळे चांगला प्रसिद्ध आहे.
घटक
- तूप
- गव्हाचे पीठ
- अनार पावडर
- आमसूल
- कोथिंबीर
- उकडलेले मटार
- गरम मसाला
- धने पावडर
- मीठ
- उकडलेले बटाटे
कृती
- मोठे भांडे घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, आमसूल, धने पूड, गरम मसाला, मीठ आणि उकडलेले बटाटे
- अनार पावडर, गरम मसाला आणि उकडलेले बटाटे घाला आणि एकत्र चांगले कुस्करून घ्या
- एक पिठाचा गोळा घेऊन रोटी करून घ्या आणि त्यात हे मिश्रण भरा, त्यामध्ये उकडलेले मटार घाला
- आता व्यवस्थित लाटून घ्या. पॅनमध्ये थोडे तूप घाला आणि पराठा त्यावर भाजून घ्या
- थोड्या दह्यासोबत खायला द्या.
३. पोंगल
ही पाककृती दक्षिण भारतातील आहे आणि फक्त सणासुदीलाच हा पदार्थ केला पाहिजे असे नाही. तुमच्या लहानग्या साठी हा चांगला पर्याय आहे.
घटक
- आले
- जिरे
- तूप
- मूग
- डाळ
- तांदूळ
कृती
- मूग डाळ आणि तांदूळ ३० मिनिटांसाठी चांगले भिजवून घ्या.
- कूकरमध्ये थोडे तूप घेऊन त्यात जिरे घाला. त्यामध्ये गरम असतानाच आले आणि कढीपत्त्याची पाने घाला आणि चांगले परतून घ्या.
- त्यामध्ये डाळ आणि तांदूळ हे मिश्रण घाला, तसेच ४–५ कप पाणीसुद्धा घाला आणि मध्यम आचेवर ५ शिट्ट्या होऊद्यात.
- शिजल्यावर भात बाहेर घेऊन त्यातील कढीपत्त्याची पाने काढून टाका आणि ते चांगले कुस्करून घ्या.
४. बेसन पराठा
जर तुम्ही रात्री खूप थकलेला असाल आणि तुमच्या बाळाच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला काहीतरी करायचे असेल तर ह्या बेसन पराठ्यामुळे तुमची सुटका होऊ शकते.
घटक
- तूप
- तेल
- वेलची
- गरम मसाला
- कोथिंबीर
- धने पूड
- मीठ
- कांदा
- बेसन
कृती
- तेल आणि तुपाव्यतिरिक्त वरील सगळे साहित्य मोठ्या भांड्यात घेऊन चांगले मिक्स करा
- त्यामध्ये थोडे तेल घाला आणि पीठ चांगले मळून घ्या
- छोटा पिठाचा गोळा घेऊन त्यामध्ये बेसन भरा
- पराठा लाटून घ्या आणि तो थोड्या तुपावर भाजून घ्या. त्यावर थोडे बटर घाला आणि चटणीसोबत खा.
५. बीटरूट रोल्स
एखाद्या संध्याकाळी मजेदार नाश्ता करावासा वाटतो. तुमच्या मुलांना चविष्ट बीटरूट रोल्स देऊन आश्चर्यचकित करा.
घटक
- तेल
- ब्रेड
- रवा
- लिंबाचा रस
- चाट मसाला
- गरम मसाला
- मीठ
- मोहरी
- जिरे
- कांदा
- गाजर
- बीटरूट
- उकडलेले बटाटे
कृती
- तवा घेऊन त्यावर थोडे तेल घाला, नंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा चांगला परतून घ्या
- एका भांड्यात गाजर, बीटरूट आणि बटाटे घाला आणि चांगले मिक्स करा आणि त्यावर कांदा घालून चांगले मिक्स करून घ्या
- मिश्रणात ओला ब्रेड घालून चांगले मिक्स करून घ्या, आता मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या त्यावर रवा लावा
- हे रोल चांगले तळून घ्या आणि केचप सोबत खायला द्या.
भरवण्यासाठी काही टिप्स
इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमच्या मुलाचा जेवणाचा अनुभव चांगला होऊ शकेल.
- बाळाने खाण्यास नकार दिलेले पदार्थ अन्य मार्गाने भरवून बघा
- मुलांना खाण्यास मोहित करण्यासाठी खाद्यपदार्थ आकर्षकरित्या सादर करा
- वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ निवड जेणेकरून बाळाचे ताट आकर्षक दिसेल
- मुलांना न आवडणाऱ्या पदार्थांसोबत आवडणारे पदार्थ सुद्धा ठेवा
- बाळाला एकदम जास्त भरवण्याऐवजी थोडे थोडे भरवा
- जेवण झाल्यावर बाळ पाणी पीत आहे ना ह्याकडे लक्ष द्या.
अशा खूप भारतीय पाककृती आहेत ज्या तुमच्या बाळासाठी जेवणाचे पर्याय ठरू शकतात आणि तुम्ही तुमच्या बाळाला भरवू शकता. फक्त ते खूप मसालेदार किंवा त्याची चव खूप उग्र नाही ना ह्याची खात्री करा. तसेच बाळाला थोडे गोड़ पदार्थ भरवण्यास विसरू नका.
अस्वीकरण
- प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता
- बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका
- फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा
- बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते
- काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३–४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या
- दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता
- बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका
- जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता
- तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा