In this Article
- घनपदार्थ म्हणजे काय?
- बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना
- माझे बाळ घनपदार्थांसाठी तयार आहे हे कसे ओळखावे?
- बाळाला भरवण्याचे पहिले अन्न
- बाळाला भरवण्याचे वेळापत्रक
- जर तुमच्या बाळाने खाण्यास नकार दिला तर काय?
- बाळासाठी घनपदार्थ तक्ता
- बाळांना होणाऱ्या अन्नपदार्थांच्या ऍलर्जी
- जर माझ्या बाळाच्या घशात घास अडकला तर काय?
बाळाच्या आहारात हळू हळू घनपदार्थांचा समावेश केल्यास, बाळाला दूध ते रोजचे जेवण हे संक्रमण सोपे जाईल. पण हा बदल बाळासाठी कठीण नाही ना हे तपासून पहिले पाहिजे.
घनपदार्थ म्हणजे काय?
बाळासाठीचे घन पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे बाळाला दूध ते रोजचे जेवण ह्या संक्रमणास मदत करतात. ४-६ महिन्यांच्या कालावधीनंतर फॉर्मुला दूध किंवा स्तनपान हे बाळासाठी पुरेसे नसते. म्हणून बाळाच्या आहारात घन पदार्थांचा समावेश करणे जरुरीचे असते.
बाळाला घनपदार्थांची सुरुवात करताना
जेव्हा बाळ पावलं टाकायला लागते तेव्हा अन्नपदार्थांविषयी उत्सुक असते, परंतु त्याआधीच बाळाला अन्नपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे.
१. आपण आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख केव्हा करून दिली पाहिजे?
बाळ जेव्हा ४ महिन्यांचे होते तेव्हा बाळाची पचनसंस्था घनपदार्थांसाठी तयार होते. तसेच घनपदार्थ गिळण्याचे कौशल्य सुद्धा त्याने आत्मसात केलेले असते. बाळ घनपदार्थ घेऊ शकते अशी लक्षणे दिसताच बाळाला घनपदार्थांची सुरुवात केली पाहिजे.
२. मी बाळाला घनपदार्थाची ओळख कशी करून देऊ?
बाळाला घनपदार्थांची करताना अन्नपदार्थ उकडून, त्याची प्युरी करून अथवा मॅश करून देता येईल. एकधान्य सीरिअल पासून सुरुवात करा आणि मग फळे आणि भाज्या इत्यादी अन्नपदार्थ सुद्धा तुम्ही भरवू शकता. एक अन्नपदार्थ बाळाला देऊन पहा, २-३ दिवस थांबून बाळाला त्याची ऍलर्जी आहे का हे तपासून पहा. बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये मीठ किंवा साखर घालू नका. सुरुवातीला छोट्या चमच्याने सुरुवात करून बाळाची अन्नपदार्थाविषयीची प्रतिक्रिया जाणून घ्या. जर बाळ खाण्यास नकार देत असेल तर जबरदस्ती भरवू नका. एका आठवड्यानंतर पुन्हा प्रयत्न करा.
३. बाळाला कितीवेळा आणि किती प्रमाणात भरवले पाहिजे?
४ -६ महिन्यांच्या कालावधीत बाळाला दिवसातून १ टेबलस्पून घनपदार्थ द्या. ६ महिन्यांच्या बाळाचे भरवण्याचे वेळापत्रक म्हणजे २-४ टेबलस्पून २ वेळा असे असावे.
माझे बाळ घनपदार्थांसाठी तयार आहे हे कसे ओळखावे?
तुम्ही तुमचे बाळ घनपदार्थ घेण्यासाठी तयार आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे. त्यासाठी खालील लक्षणांकडे लक्ष द्या.
- तुमचे बाळ मान धरू लागले असेल आणि ते फीडिंग चेअर मध्ये ताठ बसत असेल, जेणेकरून बाळाला घास गिळता येईल.
- जर तुमच्या बाळाचे वजन लक्षणीयरीत्या वाढले असेल आणि त्याच्या जन्मवजनाच्या दुप्पट वजन झाले असेल.
- तुमचे बाळ जर तुम्ही काय खात आहात ह्याविषयी उत्सुक असेल आणि ते घेण्याचा प्रयत्न करत असेल.
बाळाला भरवण्याचे पहिले अन्न
प्रत्येक बाळ हे वेगळं असते आणि म्हणूनच आपले डॉक्टर आपल्याला ह्या बाबतीत योग्य सल्ला देऊ शकतात. किंबहुना अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिकस (AAP) बाळाला लोहाचा स्रोत म्हणून मांस देण्याचे सुचवतात कारण ६ व्या महिन्यापासून लोह कमी होऊ लागते. बरेच पालक एकच घटक असलेले अन्न बाळाला देतात ते सुद्धा मीठ न घालता. तुम्ही एकधान्य सीरिअलची प्युरी, रताळे, केळं बाळाला देऊ शकता.
१. कुठले अन्न खावे
बाळाला घन पदार्थांची सुरुवात ४-६ महिन्यापासून केली पाहिजे. बाळाला घनपदार्थांची सुरुवात हळू हळू आणि काळजीपूर्वक केली पाहिजे. जरी खूप वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाणे चांगले असले तरी बाळाचे घनपदार्थाकडे संक्रमण प्युरी पासून सुरु करून नंतर मॅश केलेले पदार्थ, आणि त्यानंतर फिंगर फूड चे छोटे छोटे तुकडे दिले पाहिजेत जे बाळ चावून खाऊ शकते. रताळे हे सर्वात पहिल्यांदा भरवण्यास सुचवले जाते.
जेव्हा तुमचे बाळ सीरिअल पेक्षा काही वेगळे अन्न खाण्याचा प्रयत्न करीत असेल तर तुम्ही अन्नपदार्थांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करू शकता. सिरीयल भरवताना काही चमचे भाजी आणि फळे घाला आणि तुमचे बाळ कशी प्रतिक्रिया देते ते पहा. हे अन्न एकदम मऊ असले पाहिजे जेणेकरून बाळ तो घास जिभेने तोंडात दाबू शकेल.
२. कुठले अन्न टाळायला हवे
-
मध
मध खूप गोड आणि नैसर्गिक असून त्यामध्ये clostridium botulinum बॅक्टरीया ची अंडी असतात. ही अंडी बाळाच्या पोटात वाढून Botulism होतो. मोठ्या बाळांची पचनसंस्था विकसित असते आणि परंतु एक वर्षापर्यंतच्या बाळास खूप गंभीर परिणाम होतात. त्यामुळे एक वर्षाखालील बाळासाठी मध देणे सूचित केले जात नाही.
-
दूध
गाईचे दूध किंवा दुधामध्ये प्रथिने असतात जे बाळाला पचवणे कठीण जाते. काही खनिजांमुळे बाळाच्या मूत्रपिंडावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. काही बाळांना लॅक्टोस इंटॉलरन्स मुळे ऍलर्जी होऊन जुलाब होऊ शकतात.
-
पीनट बटर
ह्यामुळे अगदी गंभीर ऍलर्जी होऊ शकते. ह्याच्या घट्टपणामुळे बटर बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता सुद्धा असते.
-
काही भाज्या
पालक, बीटरूट आणि लेट्युस मध्ये नायट्रेट असते जरी प्युरी करून अथवा शिजवून भरवले तरी ते बाळाच्या नाजूक पचनसंस्थेला पचवणे कठीण जाते, म्हणून अशा भाज्या टाळायला हव्यात.
-
काही मासे
मॅकेरेल, शार्क, स्वर्डफिश आणि टून ह्या माशांमध्ये जास्त प्रमाणात पारा असतो त्यामुळे एक वर्षाखालील मुलांसाठी ते प्रमाण खूप जास्त आहे. जर तुमच्या कुटुंबाला शेलफिश ची ऍलर्जी असेल तर ते बाळाला देऊ नका. काही शेल फिश जसे की ऑयस्टर्स आणि लॉब्स्टर्समुळे गंभीर ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे बाळ ३ वर्षांचे होईपर्यंत मुलांना हे मासे देण्याची वाट पहा.
-
बेरी आणि लिंबूवर्गीय फळे
ब्लूबेरी, रासबेरी, ब्लॅकबेरी मध्ये प्रथिने असतात आणि बाळांना पचनास जड जातात. संत्री आणि द्राक्षे ही आम्लयुक्त असून त्यामुळे पोट बिघडू शकते. त्यामुळे ही फळे छोट्या तुकड्यांमध्ये कापून पाण्याने धुवून बाळाला द्यावीत. बाळाच्या आहारात समावेश करण्याआधी त्याची बाळाला काही ऍलर्जी नाही ना हे बघितले पाहिजे.
-
मीठ
बाळांना एका दिवसाला १ ग्रॅम पेक्षा कमी मीठ लागते. बाळाची मूत्रपिंडे अजून विकसित न झाल्यामुळे जास्त प्रमाणात मीठ त्यांना प्रक्रिया करता येत नाही.
-
बिया आणि सुकामेवा
बिया आणि सुकामेवा खूप ऍलर्जिक असतात. बाळाची श्वसननलिका छोटी असते आणि त्यामुळे ते घशात अडकण्याची शक्यता असते.
-
द्राक्षे आणि मनुके
आकाराने मोठे आणि टणक असल्यामुळे द्राक्षे बाळाच्या घशात अडकू शकतात. तसेच द्राक्षाचे साल पचवणे बाळासाठी कठीण जाते.
-
अंड्याचा पांढरा भाग
बाळांना अंड्याची ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते, प्रामुख्याने अंड्याच्या पांढऱ्या बलकाची. दुर्दैवाने हे खूप सामान्य आहे.
-
चॉकलेट
चॉकलेट मधील कॅफेन मुळे ऍलर्जी होऊ शकते, चॉकलेट मधील दुग्धजन्य पदार्थ पचायला जड असू शकतात. तसेच ते घशात अडकण्याची शक्यता असते. चहा आणि कॉफी मध्ये सुद्धा कॅफेन असते. म्हणून ते टाळले पाहिजेत.
-
घशात अडकून गुदमरण्याचा धोका असलेले अन्नपदार्थ
कच्चे गाजर आणि कच्च्या भाज्या ज्या बाळासाठी चावण्यास कडक आणि कठीण असतात. तसेच पॉपकॉर्न, चॉकलेट्स हे असे काही अन्नपदार्थ आहेत जे घशात अडकण्याची शक्यता असते आणि म्हणून ते टाळणे आवश्यक आहेत.
-
गहू
जर तुमच्या कुटुंबात ग्लूटेन ऍलर्जीचा इतिहास असेल तर बाळ एक वर्षांचे होईपर्यंत बाळाला कुठलाही गव्हाचा पदार्थ देण्याआधी वाट पाहणे चांगले असते.
-
सॉफ्ट ड्रिंक्स
कोला आणि सोड्यामध्ये साखर, सोडियम आणि कृत्रिम चवीमुळे हे पदार्थ बाळासाठी चांगले नसतात. ही पेय कार्बोनेट करण्यासाठी जो गॅस वापरला जाते त्यामुळे बाळाचे पोट बिघडू शकते.
बाळाला भरवण्याचे वेळापत्रक
बाळाला भरवण्याची अशी काही निश्चित वेळ नसते. जर तुम्ही बाळाला स्तनपान देत असाल आणि जेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की दूध कमी येत आहे तेव्हा तुम्ही बाळाला घनपदार्थ देऊ शकता. काही बाळांना नाश्त्यासाठी घनपदार्थ आवडू शकतात. बाळ घन पदार्थ घेण्यास तयार आहे किंवा कसे हे तुम्हाला बाळाच्या काही लक्षणांवरून लक्षात येईल. तुम्हाला आणि तुमच्या बाळासाठी योग्य असेल असे वेळापत्रक मिळेपर्यंत प्रयोग करत रहा.
घनपदार्थांची सुरुवात करताना दिवसातून एकदा घनपदार्थ भरविण्यास सुरुवात करा, नंतर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा बाळास घनपदार्थ द्या. हळूहळू घनपदार्थ देण्याच्या वेळा वाढवा आणि मग वाढत्या बाळास दिवसातून ३ वेळा घनपदार्थ द्या. तुमच्या बाळाला आणि तुम्हाला योग्य असे वेळापत्रक होईपर्यंत प्रयोग करत रहा.
जेव्हा बाळ ६-९ महिन्यांचे होईल तेव्हा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे नियमित वेळापत्रक करा. ह्यामुळे बाळाला सुद्धा त्याची सवय होईल.
संदर्भासाठी इथे एक तक्ता दिला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बाळाचे वेळापत्रक करू शकता.
वय | अन्न | एका दिवसाचे जेवण | प्रमाण | भरवतानाच्या टिप्स |
०-४ महिने | स्तनपान | मागणीनुसार | ५-१० मिनिटे एका स्तनावर |
|
फॉर्मुला- १ महिना | ६-८ वेळा | ६०-१०० मि.ली. | ||
फॉर्मुला -१ ते २ महिने | ५-७ वेळा | ९०-१५० मि.ली. | ||
फॉर्मुला – २ ते ३ महिने | ४-६ वेळा | १२०-२०० मि.ली. | ||
फॉर्मुला ३ ते ४ महिने | ४-६ वेळा | १५०-२५० मि.ली. | ||
४-६ महिने | स्तनपान किंवा फॉर्मुला दूध | ४-६ वेळा | १५०-२५० मि.ली. |
|
बेबी सीरिअल | १-२ वेळा | १-२ टेबलस्पून | ||
६-८ महिने | स्तनपान | ३-५ वेळा | १५०-२५० मिली |
|
फॉर्मुला | ३-५ वेळा | २-४ टेबलस्पून | ||
बेबी सीरिअल | १-२ वेळा | २-३ टेबलस्पून | ||
उकडलेल्या भाज्या आणि फळे | २-४ वेळा | |||
८-१२ महिने | स्तनपान | ३-४ वेळा | १५० मि.ली. -२५० मि.ली. |
|
फॉर्मुला | ३-४ वेळा | २-४ टेबल स्पून | ||
दही | ३-४ वेळा | ५० मि.ली. -२५० मि.ली. | ||
कॉटेज चीझ | ओळख करून द्या/ खायला द्या | १/४ ते १/२ कप्स | ||
बेबी सीरिअल | ओळख करून द्या/ खायला द्या | १-२ टेबल स्पून | ||
ब्रेड | १-२ वेळा | २-४ टेबल स्पून | ||
सीरिअल | १-२ वेळा | थोडेसे | ||
भाज्या आणि फळे
(उकडून मॅश केलेल्या) |
३-४ वेळा | ३-४ टेबलस्पून | ||
फळांचा रस
(संत्री व्यतिरिक्त) |
एकदा | १२० मि.ली. | ||
मांस आणि बीन्स
( उकडून प्युरी केलेले) |
१-२ वेळा | ३-४ टेबलस्पून |
जर तुमच्या बाळाने खाण्यास नकार दिला तर काय?
बाळे घनपदार्थ खाण्याचे टाळतात हे खूप सामान्य आहे. त्यांना घनपदार्थांचा पोत आवडत नसावा किंवा घनपदार्थ घशात ढकलण्याचे कौशल्य त्यांना अवगत झालेले नसावे. बाळाला खाण्यासाठी जबरदस्ती न करणे हे सर्वात महत्वाचे आहे. बाळाला तुम्ही भरपूर दूध देत आहात ना ह्याची खात्री करा.
तुमच्या बाळाला घनपदार्थाना स्पर्श करू द्या आणि खेळू सुद्धा द्या. त्यामुळे त्यांना घनपदार्थांचा पोत आणि आकाराशी ओळख होईल. बाळांना असे करू दिल्याने घनपदार्थांशी त्यांची जवळीक वाढेल आणि ते घनपदार्थ खाण्याची शक्यता वाढेल. चमच्याशी त्यांची ओळख होण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या. कधी कधी बाळे अन्नपदार्थ भिरकावतील, ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना ते आवडत नाहीत. फक्त त्यांना गोंधळ घालायचा असतो.
बाळाला हातात अन्नपदार्थ द्या. तो पदार्थ तोंडात घालून त्याची चव कशी घ्यावी हे त्याला दाखवा. जेव्हा बाळ हाताने खाण्यास सुरुवात करते, तेव्हा बाळाला चमचा द्या. बाळाला थोडा वेळ द्या कारण खाणे, चावणे, गिळणे ही कौशल्ये त्यांनी शिकण्याची गरज असते. हे बाळांमध्ये निसर्गतः नसते.
तोंडात घास घेण्यासाठी शारीरिक सुसंगतता लागते आणि ते बाळास एक आव्हान वाटते. नैसर्गिक प्रतिक्रिया जिभेने अन्न बाहेर ढकलणे ही असते. त्यामुळे तुमच्या बाळाला वेळ द्या.
बाळासाठी घनपदार्थ तक्ता
बाळ कधी जेवायला लागेल, हा प्रश्न अनेक मातांना गोंधळात टाकतो. खालील तक्ता बाळाच्या वयानुसार बाळ काय खाईल ह्या शंकेचं निरसन काही प्रमाणात करेल.
वेळ | घन पदार्थाचे प्रमाण |
०-४ महिने |
|
४-६ महिने |
|
६-७ महिने |
|
७-९ महिने |
|
९-१२ महिने |
|
अन्न चांगले मॅश केलेले आणि शिजवलेले असले पाहिजे किंवा एका घासात मावतील असे छोटे छोटे तुकडे केलेले असले पाहिजे.
बाळाची स्तनपानाची किंवा फॉर्मुला दुधाची गरज भागत आहे ह्याची खात्री करा. तुम्ही बाळाची दुधाची सवय हळू हळू कमी करून बाळाला दिवसातून ३-४ वेळा दूध देऊ शकता तसेच बाळाच्या आहारात घनपदार्थ वाढवू शकता.
बाळांना होणाऱ्या अन्नपदार्थांच्या ऍलर्जी
बाळाला अन्नपदार्थांची ऍलर्जी असेल तर लक्षणे लगेच दिसतात किंवा त्यास काही तास लागू शकतात. साधारणपणे प्रतिक्रिया सौम्य असते. परंतु जर तीव्र असेल तर बाळाला पित्त, उलट्या, जुलाब होऊ शकतात. अशा वेळी आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
खूपच टोकाच्या प्रतिक्रिया म्हणजे बाळाला श्वासोच्छवासास त्रास होतो, चेहऱ्यावर सूज येऊ शकते अशावेळी बाळाला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज असते.
जर माझ्या बाळाच्या घशात घास अडकला तर काय?
जर बाळ श्वास घेऊ शकत नसेल तर श्वासनलिकेत अडथळा असण्याची शक्यता असते. परिस्थिती ओळखून पटकन तो दूर करण्यासाठी बाळाला मदत केली पाहिजे. बाळाच्या पाठीवर आणि छातीवर चपट्या मारून अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करा. बाळाच्या खांद्यांवर सुद्धा तुमच्या हाताच्या तळव्यानी हळूच मारा. असे केल्याने अडथळा दूर होण्याची शक्यता असते.
जर अडथळा दिसत असेल तर तो तुम्ही हाताने दूर करा. परंतु न बघताच बाळाच्या तोंडात बोट घालू नका तसे केल्यास तो घशात अडकण्याची शक्यता असते.
बाळाच्या खांद्यावर हळूच चापट मारून ओरडा. जर बाळ प्रतिसाद देत नसेल किंवा श्वास घेऊ शकत नसेल तर घरच्या घरी सीपीआर सुरु करा.
तुमच्या बाळाला पदार्थाची चव, पोत आणि संवेदना ह्यांची सवय होण्यास वेळ लागेल. त्यामुळे ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन संक्रमणास सुरुवात करावी.