Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी १२ उत्तम वनौषधी

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी १२ उत्तम वनौषधी

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी १२ उत्तम वनौषधी

प्रजननक्षमता वाढवण्यासाठी आहार आणि औषधे ह्यांचा महत्वाचा सहभाग असतो. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर मुळापासून सुरुवात केली पाहिजे आणि आहार आणि औषधांसाठी नैसर्गिक (जास्तीत जास्त) स्रोतांचा वापर केला पाहिजे.

वनौषधींमुळे प्रजननक्षमता वाढण्यास कशी मदत होते?

पोषक आहारास पूरक अशा ह्या औषधी वनस्पती असतात त्यामुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत रहाते. काही औषधी वनस्पतींमुळे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते, तर काही वनौषधींमुळे प्रतिकार यंत्रणा सुधारण्यास मदत होते. (कारण काही वेळा भ्रूण हे बाहेरील धोकादायक गोष्ट आहे असे समजून गर्भधारणेस प्रतिबंध होतो) आणि काही वनौषधी संप्रेरकांचे संतुलन राखण्यास मदत करतात. (प्रजनन क्षमता संप्रेरकांवर जास्त अवलंबून असते)

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वनौषधी

१. ब्लॅक कोहोष

ही वनौषधी उत्तर अमेरिकेत सापडते. शेकडो वर्षांपासून ही वनस्पती वेदनाशामक म्हणून सर्वज्ञात आहे. ह्या वनस्पतीचा प्रजननाशी संबंधित उपयोग म्हणजे मासिक पाळी नियमित होते. ह्या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांमुळे जर पाळीला उशीर झाला असेल तर ती सुरु होते. तसेच मासिकपाळी दरम्यान होणाऱ्या वेदना, गर्भाशयातील अस्वस्थता, अंडाशयचे दुखणे, पाळीच्या आधी डोके दुखणे  तसेच गर्भाशयातील फायब्रॉइड्स, अंडाशयातील सिस्ट्स आणि एन्डोमेट्रिओसिस बरे करण्यासाठी सुद्धा ही औषधी वनस्पती मदत करते.

कृपया लक्षात घ्या की ब्लॅक कोहोष ही अगदी परिणामकारक वनौषधी आहे आणि ती दीर्घकाळासाठी घेऊ नये.

२. जेष्ठमध

ज्येष्ठमध पातळ औषधाच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता किंवा त्याचे मूळ सुद्धा आणून तुम्ही त्याचा काढा करू शकता. प्रजननक्षमतेशी संबंधित ज्येष्ठमधाचे  कार्य दोन पद्धतीने होते

  • ज्येष्ठमधामुळे  यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात तसेच ह्या वनस्पतीमुळे अंतःस्रावी प्रणालीस (endocrine system) मदत होते आणि प्रतिकार यंत्रणा सुधारते. ह्या तीन कार्यांमुळे संप्रेरके नियमित होतात.

  • हे फायटोइस्ट्रोजेन आहे म्हणजेच शरीराकडून त्याची निर्मिती होत नाही, परंतु इस्ट्रोजेन सारखे कार्य करते. फायटोइस्ट्रोजेन इस्ट्रोजेनच्या रिसेप्टर साईट्सशी बांधले जाते आणि त्यामुळे झेनोहॉर्मोन्स त्या साईट्स वर बांधले जाऊ शकत नाही. (झेनोहॉर्मोन्स हे बाहेरचे रेणू असून हॉर्मोन रिसेप्टरला बांधले जाते त्यामुळे शरीराचे आरोग्य बिघडते)

ज्येष्ठमध शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करते, तसेच विरोधी दाहक (anti inflammatory) म्हणून कार्य करते, पचनास मदत करते तसेच योनीमार्गाचा स्त्राव निर्मितीस सुद्धा मदत करते. ज्येष्ठमध घेताना, सांगितलेला डोस घ्यावा. जास्त प्रमाणात ज्येष्ठमध घेऊ नये.

३. अश्वगंधा

अश्वगंधा मूळ हे पातळ औषधाच्या स्वरूपात किंवा कॅप्सूल च्या स्वरूपात घेता येते. अश्वगंधा घेतल्याने शरीरास ताणाशी सामना करण्याची क्षमता वाढते. तसेच एंडोक्राइन प्रणालीला मदत करते. तसेच प्रतिकार यंत्रणा नॉर्मल होण्यास मदत होते आणि ह्यापैकी कशातही बिघाड झाला तर प्रजननात प्रश्न निर्माण होतात.

ताणामुळे पुरुषांमध्ये आलेल्या वंध्यत्वाशी अश्वगंधामुळे लढा देता येतो. गर्भारपणात खूप जास्त अश्वगंधा घेणे टाळा.

४. इव्हीनिंग प्रिमरोझ ऑइल (EPO)

इव्हीनिंग प्रिमरोझ ऑइल हे इव्हनिंग प्रिमरोझ ह्या वनस्पती पासून काढले जाते. संप्रेरकांचे संतुलन ह्यामुळे राखले जाते तसेच PMS ची लक्षणे जसे की डोकेदुखी, दुखरे स्तन, पोट फुगणे आणि चिडचिड कमी होण्यास मदत होते. तसेच EPO गर्भाशयाच्या मुखातील चिकट स्त्राव सुद्धा वाढवते. शुक्राणूंचा स्त्रीबीजाकडील प्रवासासाठी हा स्त्राव महत्वाचा आहे त्यामुळे गर्भधारणेस मदत होते.

५. शतावरी

शतावरी काढ्याच्या स्वरूपात किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाऊ शकते. शतावरी पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये शेकडो वर्षांपासून वंध्यत्वाच्या उपचारासाठी वापरले जाते. प्रजननक्षमता वाढवण्यासाठी शतावरीची मदत होते. शतावरी घेतल्याने प्रतिकार  यंत्रणा सुधारते, ताणाशी सामना करता येतो, गर्भाशयाच्या मुखातील चिकट स्त्राव वाढतो आणि त्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.

६. एरंडेल तेल

हे तेल एरंडेलच्या झाडापासून काढले जाते. एरंडेल तेल बाहेरून पॅक च्या स्वरूपात लावले जाते. हा पॅक करण्यासाठी मऊ कापड एरंडेल च्या तेलात भिजवून कंबरेवर ठेवले जाते. हे कापड प्लास्टिक ने झाकले जाते आणि वर गरम पाण्याची बाटली ठेवली जाते.

एरंडेल तेलामुळे लिम्फटिक सिस्टिमला चालना मिळते (रोगांशी सामना करते आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाण्यास मदत करते), रक्ताभिसरण संस्था (आरोग्य चांगले राखते) आणि यकृत (विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते व संप्रेरकांचे संतुलन राखते)

७. माका

माका ही पेरूच्या डोंगराळ प्रदेशातील स्वदेशी वनस्पती आहे. डोंगराळ प्रदेशातील ज्वालामुखीय मातीत वाढणारी माका ही वनस्पती खनिज आणि फायटोनुट्रिएंट्सने समृद्ध आहे. ह्या वनस्पतीमुळे संप्रेरकांचे संतुलन राखले जाते तसेच थायरॉईड चे आरोग्य चांगले राहण्यास प्रोत्साहित करते. तसेच ऊर्जा, सहनशक्ती आणि कामेच्छा वाढवते.

माका  पातळ औषध किंवा कॅप्सूल च्या स्वरूपात घेतला जाऊ शकतो. परंतु सामान्यतः माका पावडरच्या स्वरूपात ज्यूस, स्मूदीस आणि बेक केलेल्या वस्तूंच्या मिश्रणांसाठी  वापरले जाते. माका पेरूमधील लोकांसाठी एक प्रमुख अन्न (केवळ औषध नाही) आहे आणि म्हणूनच त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

८. दमियाना

दमियाना हे पिवळ्या फुलांचे एक झाड आहे जे संपूर्ण दक्षिण आणि मध्य अमेरिका, मेक्सिको आणि वेस्टइंडीजमध्ये आढळते. त्याची पाने सुकलेली असतात आणि ती चहा बनविण्यासाठी वापरली जातात जी ऍफ्रोडायझिक म्हणून कार्य करते. हे तंत्रिका (nerves) उत्तेजित करते आणि लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवते. दमियाना पुरुषांना नपुंसकत्वावर मात करण्यास मदत करते आणि spermatorrhea सुधारित करण्यास मदत करते, ही एक अशी स्थिती आहे आहे ज्यामुळे खूप जास्त, अपघाती वीर्यपतन होते.

९. मिल्क थिसल

मिल्क थिसल  ही एक काटेरी वनस्पती आहे जी  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, युनायटेड स्टेट्स, इराण आणि दक्षिणी इंग्लंडमधील प्रदेशांमध्ये आढळते. ही वनौषधी  पातळ औषधाच्या स्वरूपात घेणे चांगले कारण त्याचे बियाणे पचणे कठीण आहे. मिल्क थिसल यकृतासाठी उत्कृष्ट नैसर्गिक औषध आहे. हे आपल्या यकृताचे शुद्धीकरण, नूतनीकरण आणि संरक्षण करते. यामुळे यकृत चांगले संप्रेरकांशी निगडित आरोग्य चांगले राखते.

मिल्क थिसल स्तनपानाच्या निर्मितीस देखील मदत करते आणि पोस्टपर्टम डिप्रेशन टाळण्यास मदत करते.

१०. दालचिनी

दालचिनीच्या सालाची पावडर करून त्यांची कॅप्सूल बनविली जाऊ शकते किंवा त्याच्या मुळापासून पातळ औषध तयार करता येते. ह्या यादीत इतर नैसर्गिक प्रजननक्षम औषधांप्रमाणेच दालचिनीचे अनेक फायदेदेखील आहेत जे प्रजनन क्षमता वाढविण्यास मदत करतात.

इन्सुलिन प्रतिरोध दालचिनी कमी करते हे दिसून आले आहे. इन्सुलिन प्रतिरोध हे महिलांमध्ये पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) होण्यासाठी कारणीभूत घटकांपैकी एक मानले जाते आणि ते वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे. १० पैकी एका महिलेला हा त्रास होतो असे मानले जाते. दालचिनी मासिक पाळीत रक्तस्त्राव देखील नियंत्रित करण्यास मदत करते.

११. व्हाइट पीओनी

व्हाईट पोनी ही महत्वाची चीनी औषधी वनस्पती आहे. गर्भधारणेसाठी इतर औषधी वनस्पतींसह ही वनौषधी वापरली जाते. वेदनादायक मासिक पाळी, एंडोमेट्रॉयसिस, गर्भाशयाचे फायब्रोइड्स आणि पीसीओएस कमी करते. ओटीपोटाजवळच्या भागात रक्ताभिसरणासाठी ही वनौषधी मदत करते.

ही  वनौषधी मुळाचा काढा किंवा पातळ औषधाच्या स्वरूपात घेतली जाऊ शकते.

१२. डाँग क्वाई

डोंग क्वाई ही  एक प्रभावी प्रजननक्षम औषधी वनस्पती आहे आणि प्राचीन काळापासून ती वापरात आहे. अनियमित मासिक पाळीच्या उपचारासाठी ती वापरतात तसेच गर्भाशयाच्या आरोग्यास (स्नायू आरोग्य) मदत म्हणून ह्या वनैषधीचा समावेश होतो. ही वनौषधी  ओटीपोटाच्या भागामध्ये रक्त प्रवाह वाढवते त्यामुळे विलंब झालेली मासिक पाळी, मासिक पाळीच्या वेळेला पोटात दुखणे, मासिक पाळीच्या वेळेला होणार हलका रक्तस्त्राव इत्यादी त्रास कमी होण्यास मदत होते. पातळ औषधांच्या स्वरूपात ही वनौषधी घेतली जाते.

हजारो युगांपासून मानवाचा संबंध वनौषनधींबरोबर आहे. ह्या वनौषधी आपली पहिली औषधे होती आणि आहेत तसेच ह्या वनौषधी परिणामकारक आणि बिनविषारी असतात. जर तुम्ही कुठल्याही आजारासाठी औषधे घेत असाल तर वनौषधी घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांना  त्याबद्दलची माहिती देण्यास विसरू नका.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article