गर्भधारणा होताना

पाळीच्या आधी, नंतर आणि पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता

गर्भधारणा आणि बाळाचा जन्म म्हणजे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, जसे की आनंद आणि भीती तर काहींना ते एखाद्या भयपटाप्रमाणे वाटू शकते. हे सगळं गर्भधारणेच्या वेळेवर अवलंबून असते - स्त्रियांना पैशांच्या दृष्टीने किंवा वैयक्तिक पातळीवर सुद्धा बाळाची जबाबदारी घेणे आरामदायक वाटत नाही. तर काही जणींना पालकत्व स्वीकारण्याआधी थोडा वेळ हवा असतो. जर तुम्ही  गर्भधारणेचा (किंवा गर्भधारणेला प्रतिबंध) करण्याचा विचार करीत असाल तर वेळ हा अतिशय महत्वाचा घटक आहे. इथे, आपण मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळी दरम्यान आणि मासिक पाळी नंतर तुमची गर्भधारणेची किती शक्यता आहे ह्याची चर्चा करणार आहोत.

गर्भधारणा कशी होते?

जेव्हा वहन होत आलेला शुक्रजंतू स्त्रीबीजाचे फलन करण्यात यशस्वी होतो तेव्हा ह्या फलन झालेल्या स्त्रीबीजाचे गर्भाशयाच्या आवारणामध्ये रोपण होते. हे होण्यासाठी शुक्रजंतूचे योनीमार्गातून, गर्भाशयाच्या मुखाद्वारे बीजवाहिन्यांपर्यंत वहन झाले पाहिजे. फलनानंतर, स्त्रीबीजाचे बीजवाहिनीमधून गर्भाशयापर्यंत वहन होते. इथे त्याचे गर्भाशयाच्या आवरणांमध्ये रोपण होते आणि त्यानंतर, बाकीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियांना सुरुवात होते. गर्भधारणेला केव्हाही सुरुवात होते, म्हणजेच संभोगानंतर काही तासांनी किंवा शारीरिक संबंध आल्यानंतर ५-७ दिवसांनी हे केव्हाही होऊ शकते. सर्वात वेगाने वहन होणारा शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत ४५ मिनिटांपर्यंत पोहोचतो आणि हळू वहन होणाऱ्या शुक्रजंतूला प्रवास संपवण्यासाठी १२ तास लागू शकतात. शुक्रजंतू बीजवाहिन्यांमध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतात आणि स्त्रीबीजाला फलित करण्याचे प्राथमिक कार्य ते करू शकतात. शारीरिक संबंधांनंतर जर ७ दिवसांनी ओव्यूलेशन झाले तर असे होऊ शकते. त्यामुळे जर ह्या फलनाची संधी असलेल्या कालावधीत जर स्त्रीबीज सोडले गेले तर शुक्रजंतूंना त्याचे फलन करण्याची संधी आहे. म्हणून, गर्भधारणेची प्रक्रिया होत असताना खूप काही गोष्टी आहेत ज्या जुळून आल्या पाहिजेत: जेव्हा गर्भाशयात जिवंत स्त्रीबीज असते त्या कालावधीला ओव्यूलेशन असे म्हणतात. ह्या वेळेला, म्हणजेच ओव्यूलेशन च्या कालावधीत गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते.

तुमच्या मासिक पाळीच्या आधी गरोदर राहण्याची शक्यता

मासिक पाळीच्या थोडं आधी स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते का? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी, पाळीच्या आधीच्या एक आठवड्याचा विचार करूयात. ह्या परिस्थितीत, स्त्रीला तिच्या मासिकपाळी चक्राविषयी नीट माहिती पाहिजे. अशा वेळी, ह्या आठवड्यात जर तिचे ओव्यूलेशन होत नसेल तर, ह्या आठवड्यात शारीरिक संबंध आले तरी गर्भधारणा होणार नाही. सामान्यतः स्त्रीचा गर्भधारणा होण्यासाठी सर्वात जास्त उपजाऊ काळ (fertile period) हा ओव्युलेशनच्या आधी ५ दिवस आधी ते ओव्यूलेशनच्या दिवसापर्यंतचा काळ होय. अगदी दुर्मिळ प्रकरणांमध्ये ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी चक्र १९-२२ दिवसांचे असते, तेव्हा पाळीच्या आधी शारीरिक संबंध येतात तेव्हा गर्भधारणा होते. जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल आणि जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की,' मला ओव्यूलेशन नंतर आणि पाळीच्या आधी गर्भधारणा होऊ शकते का?', तर ह्या प्रश्नाचे उत्तर 'हो' आहे, तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. असे होण्याची शक्यता खूप कमी असली तरी, ते अशक्य मुळीच नाही.

तुमच्या मासिक पाळी दरम्यान गर्भधारणेची शक्यता

मासिक पाळी दरम्यान एखादी स्त्री गर्भवती होऊ शकते का? तर हे सर्वस्वी त्या स्त्रीवर, तिच्या मासिक पाळी चक्र किती दिवसांचे आहे त्यावर, मासिक पाळीची नियमितता आणि ओव्यूलेशनची वेळ ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते. मासिक पाळी दरम्यान जर शारीरिक संबंध आले तर गर्भधारणा होऊ शकते का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर खालील गोष्टी तुमच्या बाबतीत खऱ्या असतील तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत, मासिक पाळी सुरु असताना संभोगादरम्यान शुक्रजंतूनी तुमच्या शरीरात प्रवेश केला आहे त्यामुळे स्त्रीबीजाचे फलन होऊन तुम्ही गरोदर राहू शकता.

मासिकपाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याविषयी काही टिप्स

पाळी दरम्यान संभोगाचे विविध फायदे आहेत. पाहिलं म्हणजे, ते नैसर्गिक वेदनाशामक ठरू शकते (काहींसाठी) आणि त्यामुळे पेटके आणि डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. तसेच स्नेहकाची (lubricant) गरज भासत नाही. तसेच इतर वेळेपेक्षा मासिक पाळी दरम्यान संप्रेरकांच्या वर खाली होणाऱ्या पातळीमुळे तुम्ही जास्त उत्तेजित असता. पाळीदरम्यानचे शारीरिक संबंध इतर वेळेपेक्षा घाण वाटू शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाटू शकते, पण खाली दिलेल्या टिप्स च्या आधारे तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. १. सर्वात पाहिलं  म्हणजे जर तुम्हाला गरोदर राहण्याची शक्यता टाळायची असेल तर तुमच्या जोडीदारास काँडोम्स वापरण्यास सांगा. त्यामुळे लैंगिक संबंधातून पसरणारे आजार दूर राहतील. २. जर तुम्ही पाळीदरम्यान टॅम्पून्स वापरत असाल तर तुम्ही ते बाहेर काढून टाकत आहात ना ह्याची खात्री करा. ३. तुमच्या बिछान्यावर गडद रंगाचा  आणि जाड टॉवेल पसरावा त्यामुळे ओघळणारे रक्त त्यावर शोषले जाईल आणि तुमचे बेडशीट्स स्वच्छ राहण्यास त्यामुळे मदत होईल. ४. तुमच्या बेडच्या बाजूला ओले टॉवेल किंवा रुमाल ठेवा, जेणेकरून तुमचं झाल्यावर तुम्हाला ते लगेच वापरता येईल. ५. हे सर्वात महत्वाचे आहे की तुमच्या जोडीदाराशी तुम्ही मोकळेपणाने तुमच्या गरजांविषयायी आणि काळजीविषयी बोलले पाहिजे. जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीने अस्वस्थता येत असेल तर तुमच्या जोडीदारास ते तुम्ही सांगत आहात ना ह्याची खात्री करा. तुम्ही गोष्टी सुरळीत होत आहेत ना ह्याकडे लक्ष द्या आणि त्यावर कलात्मक उपाय शोधून पाळीच्या काळातील संभोगादरम्यान मजा कशी येईल ह्याकडे लक्ष द्या.

तुमच्या पाळी नंतर गरोदर राहण्याची शक्यता

पाळी संपल्यावर तुम्ही गरोदर राहू शकता, किंबहुना, पाळी संपल्यानंतर ३-५ दिवस हे उपजाऊ (fertile) दिवस असतात. जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करीत असाल तर नियमित शारीरिक संबंध, दररोज किंवा दिवसाआड ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या मासिक पाळी चक्राचे अर्ध्याच्या वर दिवस उलटून जाईपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवा. उदा: जर तुमचा मासिक पाळी चक्राचा मध्य १४ असेल तर ६ दिवस आधी आणि ४ दिवस नंतर हे सर्वोत्तम समजले जातात.

तुमचे मासिक पाळी चक्र समजून घेताना

बऱ्याच स्त्रियांचे मासिकपाळी चक्र २८-३२ दिवसांचे असते, तर इतर स्त्रियांचे मासिक पाळी चक्र सरासरी पेक्षा छोटे किंवा मोठे असू शकते.ओव्यूलेशन चा काळ समजणे हे गर्भधारणेसाठी खूप महत्वाचे असते. मध्यावर ओव्युलेशनचा काळ असतो. साधारणपणे हा कालावधी १०व्या आणि १५व्या दिवसांच्या मधला असतो. ह्या दिवसांमध्ये गर्भधारणा राहण्याची खूप जास्त शक्यता असते. ओव्युलेशनचा काळ म्हणजे स्त्रीचा सर्वात जास्त उपजाऊ (fertile) काळ असतो आणि ह्या काळात संभोग केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. मासिक पाळीचक्राच्या १०व्या  दिवसापासून पुढचे ५ दिवस गर्भधारणेची शक्यता जास्त असते आणि ती शक्यता १६ ते २१ दिवसांपर्यंत तशीच जास्त असते. योनीमार्गातील स्रावावरून ओव्यूलेशन होते आहे किंवा नाही हे ओळखता येते, हा स्त्राव अंड्याच्या पांढऱ्या बलकाप्रमाणे असतो. शरीराचे मूलभूत तापमान सुद्धा ह्या कालावधीत जास्त असते.

गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम करणारे घटक

गर्भधारणेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करणारे कुठले घटक आहेत? तुम्ही ह्या अडथळ्यांचा तुमच्या चांगल्यासाठी कसा उपयोग करू शकता?, गर्भधारणा होऊ नये ह्याची खात्री कशी कराल? कसे ते जाणून घेऊयात.

१. आईचे वय

तुमच्या विशीतील गर्भधारणेची शक्यता तिशीत १५-२५ टक्क्यांनी  कमी होते आणि चाळीशीत आणखी कमी होते. म्हणून, जर तुम्हाला बाळ हवे असेल तर लवकर सुरुवात करा.

२. नियमित पाळी येणे

मासिक पाळी अनियमित असल्यास ओव्युलेशनचा  अंदाज लावणे कठीण असते आणि त्यामुळे गर्भधारणेसाठी योग्य वेळ कोणती ते कळत नाही.

३. खूप जास्त वेळा किंवा खूप कमी वेळा संभोग करणे

संभोगाची वारंवारिता ही महत्वाची आहे, दररोज संभोगापेक्षा एक दिवसाआड संभोग केल्यास ते परिणामकारक असते. पुरुषांना पुनर्प्राप्ती साठी थोडा वेळ दिला पाहिजे. तसेच ही क्रिया तांत्रिक किंवा एक काम म्हणून केले जाऊ नये.

४. वैद्यकीय मदत केव्हा घेतली पाहिजे?

जर एक वर्ष एखादे जोडपे नियमित संभोग करीत असेल आणि तरीही गर्भधारणा होत नसेल तर त्यांनी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे आणि लैंगिक आरोग्याचे काही प्रश्न आहेत का ते तपासून पहिले पाहिजेत.

५. इतर काही वैद्यकीय समस्या आहेत का हे पहिले पाहिजे

दोघांपैकी कुणालाही कुठलेही आजारपण किंवा वैद्यकीय समस्या असतील तर त्याचा गर्भधारणेवर परिणाम होईल.

तुमच्या पाळीदरम्यान गर्भधारणेविषयी गैरसमज

गर्भधारणेच्या क्रियेविषयी आणि त्याचे मासिक पाळीविषयी असलेले नातं ह्याविषयी बरेच गैरसमज आहेत. चला त्यापैकी काही स्पष्ट करूयात

१. मासिकपाळी नंतर गर्भधारणा होण्याची शक्यता नसते

सर्वात सामान्यपणे आढळणारा गैरसमज म्हणजे पाळीच्या नुकतंच आधी किंवा पाळीनंतर लगेच संभोग केल्यास गर्भधारणा होत नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे, हे प्रत्येकाच्या मासिक पाळी चक्रावर अवलंबून असते आणि ओव्यूलेशन च्या काळाचा अंदाज लावण्यासाठी केला जातो.

२. दररोज संभोग करणे हे गर्भधारणेसाठी चांगले असते

खूप वेळा शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते हा गैरसमज खोटा आहे. नियमित संभोग केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढतेच परंतु आयुष्यात प्रमाणापेक्षा गुणवत्ता खूप जास्त महत्वाची आहे. एक शुक्रजंतू हा गर्भधारणा होण्यासाठी पुरेसा असतो आणि एका वेळेला वीर्यपतन झाल्यावर, कितीवेळा शारीरिक संबंध आले हे महत्वाचे नसून शुक्रजंतूंच्या गुणवत्तेस महत्व आहे - त्यांचे वहन आणि त्यांच्या गुणसूत्रांचे आरोग्य ह्याचा गर्भधारणेवर परिणाम होतो. जर स्त्रीच्या ओव्युलेशनच्या काळात एकदा जरी स्खलन(ejaculation)झाले आणि शुक्रजंतूचे वहन चांगले होत असले तर ते गर्भधारणेसाठी पुरेसे असते.

३. आधी काही लैंगिक संबंधातून पसरलेले आजार असतील तर त्यांचा गर्भधारणेवर परिणाम होत नाही

लैंगिक संबंधांतून पसरलेल्या लैंगिक आजारांमुळे प्रजनन अवयवांवर परिणाम होतो आणि त्याचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. chlamydia आणि gonorrhoea ह्या आजारांवर जर वेळीच उपचार झाले नाहीत तर स्त्री आणि पुरुषांवर प्रतिकूल परिणाम होतो. पेल्विक इन्फ्लमेटोरी डिसीज किंवा पी.आय.डी. म्हणजे गंभीर परिस्थिती असते आणि त्यामुळे गर्भाशय आणि बीजवाहिन्यांना कायमचे नुकसान होऊ शकते.

४. काही विशिष्ट लैंगिक स्थिती ह्या इतर स्थितींपेक्षा गर्भधारणेसाठी चांगल्या असतात

लैंगिक स्थिती आणि त्याचं गर्भधारणेवर नातं ह्यावर माहिती मिळवणं अवघड असल्याने हा प्रश्न तुम्हाला वैयक्तिकरित्या कुठल्या स्थितीत आरामदायी वाटते आणि तुमच्या वैयक्तिक प्राधान्यावर अवलंबून आहे.

५. स्त्रीच्या उत्कटतेचा गर्भधारणा होण्यावर काहीही परिणाम होत नाही

बऱ्याच सर्वेक्षणांद्वारे असे दिसून आले आहे की, शारीरिक संबंधांदरम्यान स्त्रीची भावनोत्कटता ही एक चांगली गोष्ट आहे. योनिमार्गाच्या स्नायूंच्या लयबद्ध संकुचनाद्वारे गर्भाशय शुक्रजंतूंना स्त्रीबीजांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. त्या भागात रक्ताचा पुरवठा आणि संप्रेरके तयार करण्याने यशस्वीरीत्या गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

६. प्रजननक्षमता जोडप्याच्या वयावर अवलंबून असते

मनुष्याचे प्रजननाचे वय हे २० आणि ३० वर्षांच्या मध्ये असते. प्रजननक्षमतेच्या पातळीत वयाच्या ३५ नंतर थोडी  घट होते आणि त्यानंतर लक्षणीय घट होते. त्यानंतर वयाच्या ४० वर्षे आणि त्यापुढील  काळात, निरोगी आणि आनुवंशिक दोष नसलेल्या गर्भधारणेची शक्यता खूपच कमी असते.  हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत खरे आहे.

यशस्वी गर्भधारणेची चिन्हे

यशस्वी गर्भधारणेची चिन्हे कायम नजरचुकीने दुर्लक्षिली जातात. गर्भारपणाच्या चिन्हे ही व्यक्तिनुरूप बदलतात, काही स्त्रियांना आपण गरोदर आहोत किंवा नाही हे समजत नाही आणि त्यांचा गोंधळ उडू शकतो. काही स्त्रिया ही लक्षणे अगदी सहज ओळखू शकतात आणि काही स्त्रिया ओळखू शकत नाहीत विशेषकरून ज्यांना अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे आणि ज्यांची पाळी चुकते अशा स्त्रियांच्या बाबतीत हे आढळते. गर्भधारणेची सामान्य लक्षणे ही खालीलप्रमाणे: ही सगळी लक्षणे वेगवेगळ्या वेळेला आढळतात, आणि काही वेळा अजिबात आढळत नाहीत. म्हणून गर्भधारणा झाली आहे किंवा कसे हे निश्चित करण्यासाठी औषधांच्या दुकानात मिळणारी चाचणी किंवा प्रयोगशाळेत चाचणी करून घेतली  पाहिजे आणि वैद्यकीय तपासणी सुद्धा केली पाहिजे.

गर्भधारणेसाठी प्रयन्त करत असताना सामान्य चुका टाळणे

१. वेळ

चुकीच्या वेळेला संभोग करणे ही पहिली चूक आहे जी बरेच लोक करतात. जर त्यांना ओव्यूलेशनचा काळ नीट माहिती असेल आणि शारीरिक संबंध केव्हा ठेवायचे ह्याविषयी योग्य नियोजन केले तर त्यांना यश मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे.

२. डॉक्टरांची लवकर भेट न घेणे

एखादे जोडपे वर्षभर नियमित शारीरिक संबंध ठेवत असेल आणि त्यांना गर्भधारणेत यश येत नसेल तर त्यांनी डॉक्टरांची लवकरात लवकर भेट घेतली पाहिजे. दोघांचेही लैंगिक आरोग्य तसेच एकूण सगळ्याच आरोग्य तपासण्यासाठी चाचण्यांची गरज आहे.

३. खूपच लवकर डॉक्टरांची भेट घेणे

यशस्वी गर्भधारणेसाठी तुम्हाला एक वर्ष लागते. ६-८ महिन्यानंतरच्या नियमित शारीरिक संबंधांनंतर लगेच डॉक्टरांची भेट घेणे म्हणजे गर्भधारणेविषयी खूप जास्त काळजी करणे होय आणि ह्या काळजीमुळे गर्भधारणेवर उलट परिणाम होतो.

४. आरोग्यास हानिकारक सवयी

मद्यपान, धूम्रपान, ड्रग्स घेणे, खूप जास्त व्यायाम करणे किंवा खूप जास्त काम करणे, ह्या सगळ्या सवयीचा तुमच्या आरोग्यावर, प्रजननक्षमतेवर आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुमचे शुक्रजंतू, स्त्रीबीज ह्यावर परिणाम होतो आणि गर्भधारणेची शक्यता कमी होते.

५. लैंगिक स्नेहक वापरणे

सगळीच लैंगिक स्नेहके(ल्युब्रिकंट्स) शुक्राणूंसाठी अनुकूल नसतात, त्यामुळे ज्या लैंगिक स्नेहकांमध्ये शुक्राणू नाशक नसतात ती स्नेहके वापरण्यास योग्य असतात. तसेच ज्या स्नेहकांमुळे ओव्युलेशनच्या कालावधीत योनिमार्गाचे नैसर्गिक गुण तसेच राहतील अशी स्नेहके शोधण्यामध्ये काहीच नुकसान नाही.

 ६. दररोज शारीरिक संबंध ठेवल्याने

दररोज संभोग केल्याने शुक्राणूंच्या संख्येत घट होते, शारीरिक संबंधांचा आनंद घेण्याऐवजी ते एक काम होऊन जाते, त्यामुळे जास्त ताण येतो. त्यामुळे एकदिवसाआड शारीरिक संबंध ठेवणे हा पर्याय चांगला आहे.

७. पुरुष साथीदाराच्या काही लैंगिक आरोग्यविषयक समस्या असतील तर त्या तपासून न पहाणे

स्त्रीमध्येच दोष आहे असे समजणे ही चूक आहे. ४०% प्रजननाशी संबंधित समस्या ह्या पुरुषांमुळे असतात. त्यामुळे यशस्वी गर्भधारणेसाठी दोघांच्याही  लैंगिक आरोग्यविषयक समस्यांचे अचूक निदान करणे आवश्यक आहे.

८. आयुष्यात बाळासाठी प्रयत्न करण्यास खूप उशिरा सुरुवात करणे

तुमच्या वयाच्या विशीपेक्षा चाळीशीत प्रजननक्षमता ५०% कमी होते. जर तुम्हाला मूल हवे असेल तर जेव्हा यशाची जास्त खात्री असते  तेव्हाच प्रयत्न करणे चांगले. गर्भधारणेसाठी वेळ अतिशय महत्वाची असते - परंतु तो एकच घटक नाही!. तर तुमच्या गर्भधारणेसाठी इतरही काही घटक कारणीभूत आहेत. तुम्ही तुमचा हेतू साध्य  करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्य काळजी घेत आहात ना ह्याची खात्री केली पाहिजे.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved