गर्भधारणा होताना

गर्भपातानंतर गर्भधारणेची शक्यता

बाळाची चाहूल लागताच सगळ्या कुटुंबात आनंद पसरतो. पण जेव्हा गर्भधारणा गर्भपातात परावर्तित होते तेव्हा हा आनंद फक्त थोड्या काळासाठी टिकतो. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होण्याचे काहीच कारण नाही तुम्ही बाळासाठी नक्कीच पुन्हा प्रयत्न करू शकता.

गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा  होणे सोपे आहे का?

गर्भपातामुळे प्रजननक्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही कारण शरीरात ओव्युलेशनची प्रक्रिया सुरूच राहते. ह्याचा अर्थ एखादी स्त्री गर्भपातानंतर पुन्हा गर्भवती होऊ इच्छित असेल तर तांत्रिकदृष्टया ती गर्भवती होऊ शकते. परंतु, बेकायदेशीर गर्भपातामुळे मुत्राशयाला किंवा आतड्यांना हानी पोहोचू  शकते आणि  गुंतागुंत वाढू शकते. त्यामुळे प्रजनन संस्थेचे सुद्धा दीर्घकालीन  नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा गर्भपात करणारे सर्जन कौशल्यपूर्ण नसल्यामुळे किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेशी संसाधने नसल्यामुळे ही गुंतागुंत होते.

गर्भपातानंतर लवकरात लवकर मला केव्हा गर्भधारणा होऊ शकते?

"गर्भपातानंतर मला गर्भधारणा केव्हा होईल? " तुम्ही असाच विचार करत आहात ना?, ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगू. ओव्युलेशन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. गर्भपातानंतर जितक्या लवकर नॉर्मल ओव्युलेशनचे चक्र सुरु होईल तितक्या लवकर तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही गर्भनिरोधक वापरले नसतील तर गर्भपातानंतर तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. जरी रक्तस्त्राव सुरु असला तरी सुद्धा तुम्ही गर्भपातानंतर ७-१० दिवसांमध्ये पुन्हा गर्भवती होऊ शकता. लगेच गर्भधारणा होणे शक्य आहे पण तसे करणे योग्य नाही कारण तुमच्या शरीराला झालेली झीज भरून निघण्यासाठी वेळ आवश्यक आहे.
पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्याअगोदर कमीत कमी ३ महिने वाट पाहणे जरुरीचे आहे. हे बाळाच्या आणि आईच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. गर्भपाताच्या धक्क्यातून सावरण्यासाठी तुमच्या शरीराला सुद्धा वेळ पाहिजे. तुमच्या शरीराचा झालेला पोषणाचा ऱ्हास आणि तोटा भरून निघण्यासाठी थोडे थांबणे जरुरीचे आहे. पुन्हा गर्भपात टाळण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सांगतील तसेच गर्भधारणेपूर्वी काय काळजी घ्यायला हवी ते सुद्धा सांगतील. जर तुमचा गर्भपात सर्जिकल पद्धतीने  झाला असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला कमीत कमी एक महिना थांबण्याचा सल्ला देतील त्यामुळे गर्भाशय दुरुस्त होण्यास वेळ मिळेल. जर तुमचा गर्भपात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत झाला असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला जास्त वेळ वाट बघण्याचा सल्ला देतील त्यामुळे शरीरास आराम  मिळेल आणि झालेली झीज भरून निघेल. तुम्हाला फॉलीक ऍसिड सारखी पूरक औषधे डॉक्टर्स देतात. त्यामुळे पुढच्या गर्भधारणेत न्यूरल ट्यूब मध्ये काही व्यंग आढळणार नाही. जर काही वैद्यकीय गुंतागुंत नसेल तर गर्भपातानंतर गर्भारपण सुरक्षित असते.

गर्भपातामुळे वंध्यत्व येऊ शकते का?

गर्भपातामुळे ताण वाढतो. गेलेल्या जीवाची अपराधीपणाची भावना तुमच्यावर खूप परिणाम करते. बऱ्याच स्त्रिया खूप गर्भपातांना सामोऱ्या जातात आणि त्यांना निराशा येते. जर कुशल सर्जन द्वारे कायदेशीर गर्भपात झाला असेल तर तुम्हाला पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी काहीच प्रश्न येणार नाही. परंतु जर गर्भपात बेकायदेशीर रित्या किंवा अकुशल डॉक्टर्स, सुईणीकडून किंवा अस्वच्छ परिस्थितीत झाला असेल तर पुनश्च गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामध्ये संसर्ग, किंवा अर्धवट गर्भपात होणे ह्यामुळे आरोग्याला मोठा धोका होण्याचा संभव असतो आणि पुन्हा गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. वंध्यत्वाचा प्रश्न खालील परिस्थितीत निर्माण होतो:

आधी झालेल्या गर्भपातामुळे पुन्हा गर्भधारणा होणे अवघड होईल का?

एकदा किंवा अनेकदा झालेल्या गर्भपातामुळे भविष्यात गर्भधारणेला अडथळा येतो ह्याचा कुठलाही पुरावा नाही. जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल आणि तुमचे गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार असेल तर काळजीचे काही कारण नाही. काही जोडपी कुटुंबाची सुरुवात करण्यास तयार नसल्याने किंवा वैद्यकीय कारणामुळे गर्भपात करण्याचा निर्णय घेतात. गर्भपातानंतरच्या गर्भधारणेसाठी दक्षता घेतली पाहिजे आणि नियोजन सुद्धा केले पाहिजे. गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा राहील का ह्या विचाराने जोडपी चिंताग्रस्त होतात.

जोखीम घटक कुठले असतात?

जर गर्भपात योग्य तंज्ञाकडून नीट हाताळला गेला असेल तर त्यामध्ये काही धोके नसतात आणि स्त्रीला दुसऱ्या वेळेला सामान्य गर्भधारणा होते. काही वेळा, गर्भपातानंतर गर्भधारणेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नीट काळजी घेतल्यास आणि सावधगिरी बाळगल्यास तो प्रश्न हाताळता येऊ शकतो.

एकापेक्षा जास्त वेळा गर्भपात झाला असेल तर मला धोका आहे का?

ज्या स्त्रियांचे एकापेक्षा जास्त वेळा गर्भपात झाले असतील तर त्यांना त्यानंतर संसर्गाचा धोका असतो. अगदी सर्वात वाईट परिस्थितीत, बीजवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, आणि त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा अशक्य होते.

गर्भपातानंतर गर्भधारणा होताना

गर्भपातानंतर लगेच गर्भधारणा होण्यासाठी:

गर्भपातानंतर गर्भधारणा झाली आहे हे कसे निश्चित कराल?

  गर्भधारणा झाली आहे किंवा कसे हे समजण्यासाठी एका साध्या गर्भधारणा किटची तुम्हाला मदत होऊ शकते. जरी तुम्हाला गर्भधारणा झाली नसली तर गर्भपातानंतर ही चाचणी सकारात्मक निकाल दाखवू शकते. जर तुम्ही साशंक असाल तर एक आठवड्यांनंतर पुन्हा चाचणी करून पहा.

गर्भपातानंतर पुन्हा बाळाचा विचार करताना तुम्हाला माहित असाव्यात अशा गोष्टी

जर तुम्ही पुन्हा गर्भधारणेचा विचार करीत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. गर्भपात झाला म्हणजे त्याचा अर्थ पुन्हा गर्भधारणा होणार नाही असे नाही. हा विषय थोडा निषिद्ध असल्याने बऱ्याच लोकांना गर्भपाताविषयी गैरसमज आहेत. गर्भपात अधिकृत दवाखान्यातून केला गेला असल्यास, तो सुरक्षित असतो आणि त्याचा आईच्या आरोग्यावर परिणाम होत नाही.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved