Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे गर्भधारणा: ३८वा आठवडा

गर्भधारणा: ३८वा आठवडा

गर्भधारणा: ३८वा आठवडा

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात बाळ खाली ओटीपोटाकडे सरकते आणि बाळाचा दाब खूप संवेदनशील अशा वेगवेगळ्या मज्जातंतूंवर पडतो. त्यामुळे गर्भवती आईला पाय आणि योनी जवळच्या भागात वेगवेगळ्या संवेदना जाणवतात. होय, आई ह्या काळात खूप वेगवेगळ्या अनुभवांमधून जात असते.

बाळाचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो आणि त्यामुळे निवांत आणि आरामात राहण्याचा प्रयत्न करणे हे सर्वात उत्तम.

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यातील तुमचे बाळ

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात बाळाच्या हाताची पकड घट्ट होते आणि प्रसूतीनंतर जेव्हा आई बाळाचा हात पकडते तेव्हा तिला ह्याचा पहिल्यांदा अनुभव येतो. ह्या आठवड्यात बाळाचे सगळे अवयव संपूर्णतः विकसित झालेले असतात आणि आता आईच्या उदरातून बाहेर पडून बाहेरील जगाचा अनुभव घेण्यासाठी बाळ तयार झालेले आहे. बाळाच्या त्वचेवरील लव आणि मेणासारखा पांढरा थर टाकून दिला जाण्याची प्रक्रिया सुरूच रहाते (Lanugo and Vernix). बाळ गर्भजल गिळते आणि ते बाळाच्या आतडयामध्ये साठते. आतड्यांमध्ये मृत पेशी तसेच इतर टाकाऊ पदार्थ सुद्धा असतात. ह्या सगळ्या साठलेल्या पदार्थांचे बाळाच्या जन्मानंतर बाळाला पहिले शौच होते.

बाळाच्या डोळ्यांच्या रंगाचा विचार करत आहात? जर जन्माच्या वेळी बाळाचे डोळे तपकिरी रंगाचे असतील तर तो रंग तसाच राहतो. परंतु जर जन्माच्या वेळी बाळाच्या डोळ्यांचा रंग गडद निळा किंवा करडा असेल तर तो निळा किंवा करडा राहू शकतो किंवा बाळाच्या वयाच्या ९व्या महिन्यांपर्यंत तो हिरवा, तपकिरी किंवा तांबूस पिंगट होऊ शकतो. असे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाच्या बुब्बुळांना बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये रंगद्रव्ये प्राप्त होतात. हा रंग गडद होत जातो पण फिका होत नाही.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाच्या लांबीची तुलना कांद्याच्या पातीच्या जुडीशी केली जाऊ शकते. ३८ आठवड्यांच्या बाळाचा आकार हा १९.५ इंचांपेक्षा जास्त असतो आणि बाळाचे वजन ३ किलोच्या आसपास असते.

शरीरात होणारे बदल

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात शरीरात बदल होतात आणि हे बदल गर्भावस्थेचा शेवट जवळ आला आहे हे दर्शवतात आणि त्यातील प्रमुख बदल म्हणजे गर्भाशयाचे मुख उघडू लागणे. ह्यातील काही बदल गर्भवती आईला जाणवतील उदा: बाळाचे ओटीपोटाकडे सरकणे. हे ओळखण्याची प्रमुख लक्षणे म्हणजे ओटीपोटावरील  दाब वाढतो आणि आधी होत असलेला श्वसनाचा त्रास कमी होतो. कधी कधी आईला स्तनांमधून द्रव गळत असल्याचे सुद्धा अनुभव येईल. हा पिवळसर द्रवपदार्थ म्हणजे कोलोस्ट्रम असतो आणि त्यामध्ये साखर तसेच चरबीचे प्रमाण कमी असते, तसेच त्यामध्ये अँटीबॉडीज सुद्धा असतात. कोलोस्ट्रम मुळे  नवजात बाळाचे संरक्षण होते आणि बाळाच्या जन्मानंतर स्तनपानाबरोबर कोलोस्ट्रम सुद्धा  तयार होत असते.

३८व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात सामान्यपणे गर्भवती आई ज्या लक्षणांचा अनुभव घेते ती खालीलप्रमाणे:

१. सराव कळा (Braxton Hicks Contraction)

गर्भवती आईला पोटाच्या भागात घट्टपणा किंवा पेटके जाणवतील त्याला सराव कळा किंवा Braxton Hicks Contraction असे म्हणतात. जर आईने स्थिती बदलल्यावर ह्या वेदनादायी कळा नाहीश्या झाल्या तर त्यासुद्धा सराव कळा असतील.

२. झोपण्यास त्रास होणे

दुखण्यामुळे किंवा चिंतेमुळे आईला रात्रीची आरामात झोप लागणे कठीण होईल.

३. योनीमार्गातील स्रावामध्ये वाढ होणे

योनीमार्गातील स्रावामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. ह्या घट्ट चिकट पदार्थाला इंग्रजी मध्ये ‘म्युकस प्लग’ असे म्हणतात. हा चिकट पदार्थ असणे हे संपूर्णतः सामान्य आहे. गर्भाशयाचे मुख उघडू लागल्यामुळे स्रावामध्ये वाढ होते.

४. पोटाला खाज सुटते

आईचे पोट खूप जास्त ताणले गेले असल्यामुळे पोटाची त्वचा खूप जास्त संवेदनशील झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये त्वचा सजलीत ठेवणे खूप आवश्यक असते. त्यामुळे त्वचेला चांगले मॉइश्चराझर लावणे महत्वाचे आहे. तसेच भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ पिणे हा सुद्धा त्यावर उपाय आहे. जर ऍलर्जी असेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

५. पावले आणि घोट्यांना सूज येणे

पायांची सूज कमी करण्यासाठी पाठ मागे टेकून पाय वर घेऊन बसल्याने ती कमी होऊ शकते. नियमित चालल्याने सूज कमी होईल आणि रक्ताभिसरण चांगले राहील.

६. चिंता

गर्भवती महिलांमध्ये हे लक्षण आढळणे हे सामान्य आहे. चिंता कमी होण्यासाठी मन कशात तरी गुंतवून ठेवणे चांगले आहे, तसेच चित्रपट बघणे किंवा मित्र मैत्रिणीसोबत अथवा कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सुद्धा आराम मिळू शकेल.

प्रसूतीची लक्षणे कुठली?

प्रसूतीची गुंतागुंतीची प्रक्रिया प्रत्येक स्त्री साठी वेगळी असते. काही स्त्रियांना तीव्र वेदना होतात तर काही स्त्रियांना गर्भाशयात घट्टपणा जाणवतो. प्रसूती कळा सुरु होण्याआधीच गर्भजल पिशवी फुटू शकते. जेव्हा प्रसूती कळा सुरु होतात तेव्हा आईला नियमित कळा जाणवतील तसेच त्यांची वारंवारिता वाढेल आणि त्या अधिक तीव्र होतील. गर्भाशयाच्या वरील भागापासून सुरु होणाऱ्या ह्या कळा लाटेप्रमाणे गर्भाशयाच्या खालच्या भागापर्यंत पोहोचतात. ह्या कळा बाळाला खालच्या दिशेने म्हणजे श्रोणी (pelvis) मध्ये सरकावतात आणि त्यामुळे गर्भाशयाच्या मुखावर दाब पडतो आणि त्यामुळे गर्भाशयाचे मुख उघडू लागते आणि प्रसूतीच्या वेळेला जनन मार्गातून पुढे सरकते.

३८ व्या आठवड्यात प्रसूती प्रवृत्त करणे

गरोदरपणातील मधुमेह, गर्भाशयाचा संसर्ग किंवा नाळेमधील गुंतागुंत अशा कारणांमुळे काही वेळा गर्भावस्थेच्या ३८व्या आठवड्यातच प्रसूती प्रवृत्त (induce) करावी लागते. अजून काही कारणे जसे की रक्तस्त्राव किंवा जुळी बाळे असतील तर डॉक्टर प्रसूती प्रवृत्त करण्याचा सल्ला देतात. परंतु काळजी करण्याचे काही कारण नाही. गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात नैसर्गिकरित्या प्रसूती प्रवृत्त करण्याचा सल्ला दिला जात नाही. तसे करण्याच्या काही पद्धती असुरक्षित मानल्या जातात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच जर आई पूर्ण दिवस भरू देण्याची वाट बघ शकत असेल तर उत्तमच!

गर्भधारणेच्या ३८व्या आठवड्यात पोटाचा आकार

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात पोटाचा आकार खूप मोठा असतो त्यामुळे मान आणि पाठ दुखू लागतात तसेच खूप थकवाही जाणवतो. पोटाचा आकार जसा वाढू लागतो तसे आईचे वजन वाढू लागते.

थोडे परंतु पोषक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळे पचनसंस्थेवरील ताण कमी होतो.

गर्भधारणेच्या ३८व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये बाळाचा आकार खूप जास्त वाढल्यामुळे बाळाला पोटात हालचाल करण्यासाठी कमी जागा उरते. जर बाळाच्या तब्बेतीविषयी किंवा विकासाविषयी काही तक्रारी असतील तर अल्ट्रासाऊंड केले जाते. त्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत ना ह्याची खात्री होते आणि तसेच हृदयाचे ठोके सामान्य श्रेणी मध्ये आहेत ना हे तपासून पहिले जाते.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या ३८व्या आठवड्यात प्रामुख्याने लागणारा पोषक घटक म्हणजे ‘Choline’. मेंदूचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी ते आवश्यक असते.  गरोदरपणात आईचा मेंदू आक्रसला जातो (Pregnancy Brain). हा प्रश्न कमी करण्यास त्याची मदत होतेच तसेच बाळाचा मेंदू आणि मणका विकसित होण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. Choline ने समृद्ध असलेले अन्नपदार्थ ज्यांचा समावेश तुम्ही आहारात केला पाहिजे ते खालीलप्रमाणे:

  • पालक
  • शेलफिश
  • यकृत
  • अंडी
  • गहू
  • मोड आलेले ब्रुसेल
  • ब्रोकोली
  • शेंगदाणे
  • मिल्क चॉकलेट

ह्या व्यतिरिक्त, खूप ऊर्जा असलेले अन्नपदार्थ नाश्त्यामध्ये खाणे हा एक चांगला पर्याय आहे, त्यामुळे प्रसूतीच्या वेळी तुम्हाला ताकद राहील आणि स्तनपान करताना सुद्धा त्याची मदत होईल.

खालील पदार्थांचा त्यामध्ये समावेश होतो

  • सुकामेवा
  • ताजी फळे
  • मनुके, ऍप्रिकॉट्स आणि इतर सुकामेवा
  • केळी
  • सीरिअल बार

ह्या आठवड्यात सजलीत राहणे सुद्धा खूप महत्वाचे आहे, त्यामुळे सोबत एक ज्यूसची बाटली ठेवणे चांगले.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

गर्भारपणाच्या ३८ व्या आठवड्यात काय काळजी घ्यावी ह्याविषयी काही टिप्स

हे करा

  • कळा नियमित येत आहेत ह्याची खात्री करा. स्थिती बदलून पहा, जर स्थिती बदलल्यावर कळा थांबल्यास त्या सराव कळा किंवा Braxton Hicks Contractions असू शकतात.
  • घरात लागणाऱ्या गोष्टी फ्रिज मध्ये आणून ठेवा. गर्भधारणेविषयी पुस्तके वाचून स्वतःला प्रसूतीसाठी आणि स्तनपानासाठी तयार करा.

हे करू नका

  • मद्यपान करू नका कारण त्यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.
  • खूप जास्त दगदग करू नका कारण त्यामुळे ताण आणि थकवा येतो.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

इथे काही गोष्टींची यादी दिली आहे, त्या गोष्टी होणाऱ्या आईने ह्या काळात आणून ठेवल्या पाहिजेत.

  • स्तनपानाचा साठा करून ठेवण्यासाठी पिशव्या (Breast milk storage bags) आणि जर तुम्ही वापरायचे ठरवले असेल तर ब्रेस्ट पंप आणून ठेवा.
  • बाळासाठी लागणारे क्रिब, नॅपी बदलण्यासाठी टेबल, अंघोळीसाठी टब, रॉकर आणि इतर गोष्टी.
  • बाळाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी जसे की टोकदार कडांपासून संरक्षण मिळावे म्हणून बम्पर्स, बाळ घसरू नये म्हणून नॉन-स्लिप पॅड्स इत्यादी. जसजसे तुमचे बाळ मोठे होत जाईल तसे ह्या यादीमध्ये आणखी काही गोष्टी समाविष्ट होतील.
  • प्रवास करताना लागणारे कर सीट, स्ट्रोलर तसेच बेबी कॅरियर

३८ व्या आठवड्यात तुम्हाला कधीही प्रसूतीसाठी दवाखान्यात जावे लागू शकते. त्यामुळे दवाखान्याची बॅग भरून ठेवणे गरजेचे आहे. ह्या वेळात प्रसूतीसाठीची मानसिक तयारी करा आणि लवकरच बाळाला तुमच्या कुशीत घेण्यासाठी तयार रहा.

मागील आठवडा: गर्भधारणा: ३७वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: ३९वा आठवडा

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article