Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण १ ली, २ री आणि ३ री च्या मुलांसाठी प्रजासत्ताक दिनाविषयी निबंध

१ ली, २ री आणि ३ री च्या मुलांसाठी प्रजासत्ताक दिनाविषयी निबंध

१ ली, २ री आणि ३ री च्या मुलांसाठी प्रजासत्ताक दिनाविषयी निबंध

प्रजासत्ताक दिन हा भारतात साजरा केला जाणारा महत्त्वाचा दिवस आहे. हा देशभक्तीचा आणि अभिमानाचा दिवस आहे. प्रजासत्ताक दिन हा तुमच्या मुलांसाठी महत्त्वाचा विषय आहे कारण त्यांना  लहान वयात त्यांच्या देशाबद्दल माहिती मिळते. निबंध लेखन तुमच्या मुलाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. जेव्हा तुमचे मूल निबंध लिहिते, तेव्हा ते वेगवेगळ्या कल्पनांवर विचार करत असते. त्यामुळे त्याची विचार प्रक्रिया सुधारते. जेव्हा लहान मुले त्यांचे विचार छोट्या आणि सोप्या वाक्यात लिहितात तेव्हा विचारांना शब्दात कसे व्यक्त करायचे हे ते शिकतात. त्यामुळे त्यांचा भाषा आणि इंग्रजी व्याकरणाचा पाया मजबूत होतो. लिखाणामुळे तुमच्या मुलाची मोटार कौशल्ये विकसित होतात. प्रजासत्ताक दिनानिमित्त इंग्रजीमध्ये निबंध लिहिणे तुमच्या मुलांसाठी आव्हानात्मक असू शकते कारण त्यांना काही तथ्ये शिकावी लागतील आणि ही तथ्ये लक्षात ठेवावी लागतील. त्यांचे विचार आणि कल्पना त्यांना निबंधात सादर कराव्या लागतील. चला तर मग आपल्या मुलाला प्रजासत्ताक दिन ह्या विषयावर चांगली रचना लिहिण्यास मदत करूया.

प्रजासत्ताक दिनानिमित्त निबंध लिहिताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे

प्रजासत्ताक दिनानिमित्त निबंध लिहिताना तुमच्या मुलाने काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. प्रजासत्ताक दिनी परिच्छेद लिहिण्यासाठी तुमच्या लहान मुलाला मार्गदर्शन करूया:

  • सर्वात आधी, तुमच्या मुलाला दिलेल्या विषयावर विचार करू द्या.
  • नंतर, त्यांना त्यांचे विचार कागदावर लिहायला सांगा. त्यामुळे एक बाह्य रूपरेषा तयार होईल आणि परिच्छेद लिहिताना सर्व मुद्द्यांचा समावेश होण्यास मदत होईल.
  • नंतर, तुमच्या मुलाला बाह्य रुपरेषेच्या आधारे सोपी सोपी वाक्ये तयार करण्यास सांगा.
  • तुमच्या मुलाला कोणत्याही कल्पनेवर खोलवर विचार करण्याचे टाळण्यास सांगा.त्यामुळे त्यांना मर्यादेवर टिकून राहण्यास मदत होईल.
  • तुमच्या मुलाला ओघवते लिहिण्यास मदत करा. त्यामुळे त्यांना निबंध लिहिण्यात मजा येईल.
  • तुमचा मुलगा त्याच्या निबंधामध्ये प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो, तो का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास, आज तो कसा साजरा केला जातो याचा उल्लेख करू शकतो.

प्रजासत्ताक दिनावर मराठीमध्ये १० ओळी

प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशातील महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या मुलाला १ ली आणि २ री साठी  निबंध लिहिण्यास मदत करूया:

1. प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला असतो.
2. आपल्या देशात हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
3. ही राष्ट्रीय सुट्टी आहे.
4. हा देशभक्तीचा अभिमानाचा दिवस आहे.
5. देशाच्या प्रत्येक भागात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
6. भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
7. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत भव्य परेड होते.
8. या दिवशी भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज फडकवला जातो.
9. शाळा हा दिवस देशभक्तीपर गीते गाऊन, स्किट्स सादर करून आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करतात.
10. शाळांमध्ये मुलांना मिठाई वाटली जाते.

प्रजासत्ताक दिनावर छोटा परिच्छेद – १५० शब्दांचा निबंध

प्रजासत्ताक दिन हा देशातील महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाचा आणि त्याच्या इतिहासाचा अभिमान वाटण्यासाठी या दिवसाचे महत्त्व मुलांनी जाणून घेतले पाहिजे. या विशेष दिवशी आपल्या मुलाला एक छोटासा निबंध लिहिण्यास मदत करूया.

प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. भारताची राज्यघटना या दिवशी डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी लिहिली. आपल्या देशाच्या इतिहासातील या भव्य घटनेची आठवण म्हणून आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. भारताचे संविधान भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून चिन्हांकित करते. याचा अर्थ देश चालवणारे सरकार देशाचे लोक निवडतात. प्रजासत्ताक दिन ही राष्ट्रीय सुट्टी आहे. हा सण  देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. राजधानी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड हा एक भव्य कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम देशभरातील लोक त्यांच्या टेलिव्हिजनवर पाहू शकतात. हा कार्यक्रम इंडिया गेट येथे होतो. भारताचा राष्ट्रध्वज फडकावला जातो आणि राष्ट्रगीत गायले जाते. भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखा म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल या भव्य शोमध्ये सहभागी होतात.  शाळांमध्ये देशभक्तीपर गीते गाऊन, स्किट्स सादर करून आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून प्रजासत्ताक साजरा करतात.

प्रजासत्ताक दिनावर लहान मुलांसाठी मराठीमध्ये मोठा निबंध

प्रजासत्ताक दिन हा देशातील महत्त्वाचा दिवस आहे. जसजशी मुले इयत्ता 3 पर्यंत प्रगती करतात, तसतसे ते त्यांच्या विचार आणि कल्पना जास्त विकसित होतात. प्रजासत्ताक दिन ह्या विषयावर इयत्ता ३ री साठी निबंध कसा तयार करायचा हे आपल्या मुलाला शिकवूया:

भारतात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. भारत शेकडो वर्षे ब्रिटीशांच्या वसाहतीत राहिला. अनेक वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. सुमारे अडीच वर्षांनंतर भारत लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. या दिवशी आपल्या मातृभूमीला सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही दृष्ट्या प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. ह्याचाच अर्थ भारतातील जनतेला देशासाठी सरकार निवडण्याचा अधिकार आहे. देशाच्या इतिहासातील ह्या भव्य घटनेचे स्मरण करण्यासाठी, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपली राज्यघटना डॉ बी. आर. आंबेडकर ह्यांनी लिहिली आहे. भारतात प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. राजधानी नवी दिल्लीमध्ये हा सर्वात मोठा उत्सव होतो.

भारताचे राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकावतात आणि भारतीय सशस्त्र दल, लष्कर, नौदल आणि हवाई दल एक परेड आयोजित करतात. उत्सवांमध्ये ध्वजारोहण समारंभाचा समावेश होतो आणि तेथे तिरंगा फडकवला जातो. लष्करी बँड राष्ट्रगीत वाजवतो आणि २१ तोफांच्या सलामीसह स्वातंत्र्य लढ्यात प्राण गमावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जातो. देशासाठी शहीद झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनाही लोक श्रद्धांजली अर्पण करतात. सर्व रेजिमेंटचे मिलिटरी बँड, एनसीसी कॅडेट्स आणि माजी सैनिकही परेडमध्ये सामील होतात. परेडनंतर भारतातील सर्व राज्यांतील तबकड्या प्रदर्शित केल्या जातात. ही परेड भारताच्या समृद्ध ‘एकता आणि विविधता’ संस्कृतीचे प्रदर्शन करते. उत्सवादरम्यान लोकनृत्य आणि इतर सादरीकरणे देखील सहभागी लष्करी जवानांद्वारे प्रदर्शित केली जातात. भारताचे राष्ट्रपती २५ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतात. कार्यक्रमाच्या शेवटी, भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या फुलांच्या पाकळ्यांचा आकाशातील हेलिकॉप्टरमधून वर्षाव केला जातो, त्यामुळे भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिमा तयार होते! हा उत्सव सर्व रेडिओ आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित केला जातो.

२०२२ पासून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त २३जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू होईल. नेताजी हे एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका विसरता येणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात, भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मविभूषण आणि भारतरत्न यांसारखे नागरी पुरस्कारही जाहीर केले जातात.

प्रजासत्ताक दिनाच्या निबंधातून तुमचे मूल काय शिकेल?

प्रजासत्ताक दिनावर निबंध लिहिल्याने तुमच्या मुलामध्ये देशभक्ती जागृत होईल. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या प्रेमापोटी केलेल्या शूर लढ्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. निबंध लेखनामुळे तुमच्या मुलाचे लेखन कौशल्य विकसित होईल आणि त्याचा शब्दसंग्रह सुधारेल. लिखाण केल्यास ते तुमच्या मुलाच्या आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत उपयुक्त ठरेल.

आम्हाला आशा आहे की वरील निबंध लेखन तुमच्या मुलाला प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अप्रतिम निबंध लिहिण्यास मदत करेल!

आणखी वाचा:

 तुमच्या मुलांना प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती द्या

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article