In this Article
- व्हिडिओ: मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा?
- मुलांच्या डोकेदुखीची कारणे
- तुमच्या मुलास डोकेदुखीचा त्रास असल्यास तुम्ही काळजी करावी का?
- मुलांमधील डोकेदुखीचे प्रकार
- मुलांमधील डोकेदुखीचे निदान
- मुलांना होणाऱ्या डोकेदुखीवर उपचार
- मुलांमध्ये आढळणारी डोकेदुखी कशी टाळावी?
- मुलांच्या डोकेदुखीवर घरगुती उपाय
- मुलांसाठी स्व-मदत टिप्स
- डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
तुमच्या मुलाला डोकेदुखीचा त्रास होण्याची अनेक कारणे आहेत. ताणतणाव, दृष्टीच्या समस्या, झोपेची कमतरता, अशी डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. डोकेदुखीचे कारण जाणून घेतल्याने तुम्हाला आणि तुमच्या मुलाला त्याचा सामना करण्यास मदत होईल. ह्या लेखाचा उद्देश हा मुलांमधील डोकेदुखीबद्दल काही आवश्यक माहिती प्रदान करणे आणि पालक ह्याचा सामना कसा करू शकतात ह्याबद्दल आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
व्हिडिओ: मुलांना होणाऱ्या डोकेदुखीचा सामना कसा करावा?
मुलांच्या डोकेदुखीची कारणे
जरी आपण सहसा मुलांना सुद्धा डोकेदुखी होत असल्याचा विचार करत नसलो, तरीही डोकेदुखी होणाऱ्या मुलांची संख्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मुलांच्या डोकेदुखीची अनेक कारणे आहेत.
१. आजार
डोकेदुखीच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे सर्दी, ताप, फ्लू किंवा सायनस संक्रमणासारखे आजार होय. अंतर्निहित आजार किंवा संसर्गावर उपचार केल्यानंतर अशा प्रकारची डोकेदुखी आपोआप नाहीशी होईल. ह्या स्थितीत, डोकेदुखी हे निर्जलीकरणाचे लक्षण आहे.
२. डोक्याला झालेली दुखापत
खेळताना किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे डोकेदुखी होऊ शकते. डोक्याला मार लागल्यावर अनेकदा ते चिंतेचे कारण नसले तरी सुद्धा तुम्ही वैद्यकीय मदत घेणे चांगले आहे. डोकेदुखी कालांतराने वाढत राहिल्यास, आपल्याला वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
३. भावनिक ताण
तणाव आणि चिंता हे मुलांमधील डोकेदुखीचे प्रमुख कारण असू शकते. शाळेच्या तणावामुळे आणि शाळेनंतरच्या क्रियाकलापांमुळे, काही मुलांना या दबावाला कसे सामोरे जावे हे माहित नसते आणि त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. नैराश्याच्या लक्षणांपैकी एक म्हणजे डोकेदुखी होय.
४. काही खाद्यपदार्थ आणि पेये
खाद्यपदार्थातील काही पदार्थांमुळे डोकेदुखी होऊ शकते. खारवून वाळवलेले डुकराचे मांस किंवा हॅम सारख्या मांसामध्ये नायट्रेट्स असतात आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास डोकेदुखी होऊ शकते. म्हणजे सामान्यतः अन्नपदार्थांमध्ये आढळणारा आणखी एक पदार्थ म्हणजे एमएसजी होय, ते डोकेदुखीचे आणखी एक कारण आहे. सोडा, कॉफी आणि चहा यांसारख्या कॅफिनयुक्त पेयांमुळेही डोकेदुखी होऊ शकते.
५. आनुवंशिकता
मायग्रेन सारखी डोकेदुखी आनुवंशिक असते आणि जर तुम्हाला किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला असा त्रास होत असेल तर त्याचा मुलांवर परिणाम होईल.
६. मेंदूच्या समस्या
कधीकधी, डोकेदुखी हे मेंदूच्या समस्येचे लक्षण असू शकते. डोकेदुखी हे रक्तस्त्राव, गळू किंवा ट्यूमरचे सूचक असू शकते. परंतु दृष्टी अंधुक होण्यासारखी इतर लक्षणे सुद्धा दिसतात.
तुमच्या मुलास डोकेदुखीचा त्रास असल्यास तुम्ही काळजी करावी का?
बहुतेक वेळा, डोकेदुखी निर्जलीकरण किंवा तणाव यासारख्या साध्या कारणांमुळे होते आणि मुलाला विश्रांती आणि बरे होण्यासाठी वेळ लागला की डोकेदुखी नाहीशी होते. परंतु, काही वेळा, खाली नमूद केल्याप्रमाणे, वैद्यकीय सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.
- महिन्यातून एकापेक्षा जास्त वेळा डोके दुखणे
- पुरेशी झोप घेतल्यानंतरही डोकेदुखीने उठणे
- सतत वेदना होणे
- कालांतराने वाढत जाणारी डोकेदुखी
- शुद्ध हरपणे
- डोकेदुखी सोबत मळमळ, चक्कर येणे आणि मान दुखणे यासारखी इतर लक्षणे दिसणे
मुलांमधील डोकेदुखीचे प्रकार
डोकेदुखीचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. डोकेदुखी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवते आणि म्हणूनच, त्यावर केले जाणारे उपचार सुद्धा बदलतात. मुलाला एकापेक्षा जास्त प्रकारची डोकेदुखी असू शकते आणि डोकेदुखीचा प्रकार ओळखणे ही अर्धी लढाई जिंकल्यासारखे आहे.
१. मायग्रेन डोकेदुखी
तणाव, झोप न लागणे किंवा काही खाद्यपदार्थ यांसारख्या ट्रिगर्समुळे मायग्रेनचा त्रास होतो. मुलांना होणारा मायग्रेनचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे पॅरोक्सिस्मल व्हर्टिगो आणि सतत उलट्या होणे. पहिला प्रकार व्हर्टिगोशी संबंधितआहे, ह्या प्रकारात थोडी चक्कर येते आणि थांबते. दुसऱ्या प्रकारात उलट्या होतात. काही वेळा फक्त उलट्या होतात, डोकेदुखी होत नाही.
लक्षणे
- डोक्याची एक किंवा दोन्ही बाजू तीव्र दुखणे
- खूप कष्ट झाल्यावर डोकेदुखी वाढणे
- मळमळ
- उलट्या होणे
- प्रकाश आणि ध्वनी संवेदनशीलता.
- चक्कर येणे
- पोटदुखी
२. तणावामुळे होणारी डोकेदुखी
लहान मुलांना अशी डोकेदुखी होणे सर्वात सामान्य आहे. काही प्रकारच्या भावनिक उलथापालथीमुळे किंवा कोणत्याही शारीरिक तणावामुळे असे होते. अभ्यास किंवा इतर तणावाची कारणे ओळ्खल्यास त्याचे निराकरण करण्यास मदत होते. तुमच्या मुलाचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाशी खुली चर्चा करू शकता.
लक्षणे
- डोके किंवा मानेच्या स्नायूंचा घट्टपणा
- डोके एकाच किंवा दोन्ही बाजूने कमी अथवा तीव्र स्वरूपात दुखत नाही
- शारीरिक हालचालींमुळे वेदना वाढत नाही
- ह्या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये मळमळ किंवा उलट्या होत नाहीत
३. क्लस्टर हेडेक (डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होणे)
अश्या प्रकारची डोकेदुखी सामान्यतः दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये दिसून येते. या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये सहसा डोळ्याच्या मागे वेदना होण्यास सुरुवात होते आणि ह्या वेदना एक आठवड्यापासून एक महिन्यापर्यंत टिकू शकतात.
लक्षणे
- क्लस्टर डोकेदुखीचे कमीत कमी पाच भाग उद्भवतात
- दिवसातून एकदा ते एकाच दिवसात आठ वेळा अशी डोकेदुखी होऊ शकते
- तीक्ष्णआणि एका डोळ्याच्या मागे किंवा बाजूला तीन तासांपेक्षा कमी काळ टिकणारी वेदना
- डोकेदुखी होताना नाक वाहणे, रक्तसंचय आणि पापणी सूजणे
४. दररोज होणारी तीव्र डोकेदुखी
जर डोकेदुखी, मायग्रेन असो किंवा टेन्शन-प्रकार, महिन्यातून १५ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी होत असेल तर तुमच्या मुलाचे डॉक्टर अश्या डोकेदुखीला क्रॉनिक डेली हेडेक किंवा सीडीएच असे म्हणतील. अनेक औषधांचा दीर्घकाळ वापर, संसर्ग किंवा डोक्याला किरकोळ दुखापत अशी अनेक कारणे अश्या डोकेदुखीला कारणीभूत आहेत.
मुलांमधील डोकेदुखीचे निदान
जर डोकेदुखी वारंवार होत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. डॉक्टर तुमच्या मुलाच्या वैद्यकीय इतिहासाची सखोल नोंद मागतील. तुमच्या मुलाला कधी डोकेदुखीचा अनुभव येतो याची नोंद ठेवा आणि ही माहिती डॉक्टरांना सांगा. प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्या मुलाला डोकेदुखी होते तेव्हा तुमचे मूल काय खाते आणि किती झोपते याची नोंद ठेवा. डोकेदुखीच्या प्रकाराचे निदान करण्यात सक्षम होण्यासाठी डॉक्टर प्रश्न विचारतील. त्यामध्ये खालील प्रश्नांचा समावेश होतो.
- डोकेदुखी कधी होते?
- डोकेदुखी किती काळ टिकते?
- डोक्याचा कोणता भाग दुखतो?
- झोपण्याच्या किंवा खाण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल झाले आहेत का?
- मुलाला झोपेची समस्या आहे का?
- स्थितीत बदल झाल्यामुळे डोकेदुखीचे स्वरूप बदलते का?
- भूतकाळात अशी कोणतीही घटना घडली आहे का ज्यामुळे भावनिक ताण आला असेल?
- डोक्याला किंवा मानेला काही आघात झाला आहे का?
या प्रश्नांच्या उत्तरांच्या आधारे, डॉक्टर डोकेदुखीचे कारण आणि स्वरूप काय असू शकते हे सांगू शकतील. डॉक्टर अंतर्निहित वैद्यकीय परिस्थिती नाकारण्यासाठी चाचण्या देखील करू शकतात. ह्या चाचण्यांमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनचा समावेश होतो.
मुलांना होणाऱ्या डोकेदुखीवर उपचार
तुमच्या मुलाचे वय, वैद्यकीय इतिहास, औषधांची ऍलर्जी आणि अर्थातच डोकेदुखीचा प्रकार ह्यानुसार तुमचे डॉक्टर उपचार सांगू शकतील.
१. विश्रांती
तुमच्या मुलाला पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे असे डॉक्टर सांगतील. जर डोकेदुखी किंवा ताण तणावामुळे डोकेदुखी होत असेल तर या उपचाराची शिफारस केली जाते.
२. वेदनेवर औषधे
वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर कदाचित तुमच्या मुलाला वेदनाशामक औषधे देऊ शकतात.
३. रिलॅक्सेशन थेरपी
जर तुमचे मूल भावनिक आणि मानसिक तणावामुळे चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असेल, तर तुमचे डॉक्टर तणाव कमी करण्यासाठी आणि शेवटी वारंवार डोकेदुखीचा सामना करण्यासाठी विश्रांती घेण्यास सांगू शकतील. ह्या तंत्रांमध्ये ध्यान, योग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम इत्यादींचा समावेश असेल. ह्या समस्येसाठी तुम्ही चाईल्ड थेरपिस्टची मदत घेणे चांगले.
४. संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (सीबीटी)
तुमच्या मुलाला दैनंदिन जीवनातील ताणतणावांना सामोरे जाण्याची साधने देण्यासाठी बाल चिकित्सक सीबीटीचा वापर करू शकतात. सिबीटी प्रशिक्षित व्यावसायिकाने केले पाहिजे आणि घरी या तंत्राचा सराव करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला मदत केली पाहिजे.
५. बायोफीडबॅक प्रशिक्षण
तणाव, नैराश्य आणि चिंता या लक्षणांचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्रांपैकी एक म्हणजे शारीरिक घटकांवर नियंत्रण ठेवणे. श्वासोच्छवास, हृदय गती आणि रक्तदाब इत्यादी घटकांचा ह्यामध्ये समावेश होतो. शरीराला ताण हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्यावर मानसिक ताण हाताळणे सोपे होते.
६. वैकल्पिक उपचार
डोकेदुखीचा सामना करण्यासाठी तुम्ही एक्यूप्रेशर आणि मसाज यांसारख्या अपारंपरिक उपचारांचाही शोध घेऊ शकता.
७. आहारातील पूरक घटक
अभ्यासातून असे दिसून आले आहे की आहारातील काही जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांच्या पूरक आहारामुळे मुलांमधील डोकेदुखीची समस्या कमी होऊ शकते.
मुलांमध्ये आढळणारी डोकेदुखी कशी टाळावी?
सुदैवाने, मुलांमध्ये आढळणारी डोकेदुखी टाळण्याचे अनेक मार्ग आहेत. ह्या सोप्या तंत्रांचे पालन केल्याने डोकेदुखीची वारंवारता कमी होईल. एकदा ट्रिगर्स ओळखले की, डोकेदुखी टाळण्यासाठी तुमच्या मुलाला त्या ट्रिगर्सपासून दूर ठेवावे.
- कोल्ड कॉम्प्रेसच्या वापरामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होईल
- झोपेची कमतरता हे मुलांमध्ये आढळणाऱ्या डोकेदुखीचे सर्वात सामान्य कारण आहे. वेळेवर झोपण्यासारख्या झोपेच्या चांगल्या सवयींचा सराव करा
- मोठे आवाज मायग्रेनचा त्रास होण्यास कारणीभूत असतात आणि शक्य असेल तेव्हा मोठा आवाज टाळला पाहिजे
- तुमच्या मुलाला जेव्हा परीक्षेसारख्या तणावपूर्ण प्रसंगाचा सामना करण्यास सांगितले जाते तेव्हा श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा सराव केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल
- पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्यासारख्या साध्या गोष्टीमुळे डोकेदुखी होऊ शकते हे बहुतेकांना कळत नाही. तुमच्या मुलाच्या डॉक्टरांशी बोला आणि दररोज किती पाणी प्यायले पाहिजे तेशोधा. तसेच, तुमचे मूल रोज ताजी फळे खात आहे ना ते पहा.
- ताजे अन्न हा तुमच्या मुलाच्या आहाराचा मुख्य भाग असावा आणि त्यात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश असावा. जास्त तेल वापरू नका आणि संतुलित आहार घ्या.
मुलांच्या डोकेदुखीवर घरगुती उपाय
तुमच्या मुलाची डोकेदुखी टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. परंतु, आपल्या मुलाचे नाजूक शरीर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नसल्यामुळे, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तुम्ही तुमच्या मुलाला फिव्हरफ्यु सप्लिमेंट्स देऊ शकता, त्यामुळे मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी २५% कमी होते
- तणावग्रस्त डोकेदुखी दूर करण्यासाठी आणि नसा शांत करण्यासाठी पेपरमिंट तेल देखील वापरू शकता. या तेलाचे दोन थेंब बदामाच्या तेलात मिसळा आणि डोक्याला मसाज करा
- तुमचे मूल वाफ घेऊन अरोमाथेरपी देखील घेऊन बघू शकते. सायनसच्या डोकेदुखीपासून आराम देण्यासाठी लॅव्हेंडर तेल किंवा निलगिरी तेलाचे काही थेंब मिसळा
- डोकेदुखी कमी करण्यासाठी दालचिनीची मदत होते. कोमट दुधात एक चिमूटभर ताजे किसलेले मसाले घाला आणि तुमच्या मुलाला रोज रात्री झोपण्यापूर्वी पिण्यास द्या
- लवंग वेदना कमी करते आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी चघळता येते
मुलांसाठी स्व-मदत टिप्स
डोकेदुखीचा सामना करण्यासाठी किंवा डोकेदुखी टाळण्यास मदत करण्यासाठी तुमच्या मुलाला वेगवेगळ्या पद्धती शिकवणे गरजेचे आहे
- अंधाऱ्या खोलीत झोपल्याने वेदना कमी होण्यास आणि डोकेदुखीचा कालावधी कमी होण्यास मदत होईल
- कोल्ड कॉम्प्रेस किंवा अगदी ओलसर, थंड कापड कपाळावर लावल्याने वेदना कमी होऊ शकते
- श्वासोच्छवासाचे व्यायाम शिकणे आणि दिवसभर त्यांचा सराव करणे
- डोकेदुखी दूर करण्यासाठी झोपणे हा सर्वोत्तम उपाय असू शकतो
- नैसर्गिक खाणे आणि पिणे देखील डोकेदुखी कमी करण्यास मदत करू शकते
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
डोकेदुखीसह खालील लक्षणे दिसल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- उलट्या होणे
- सतर्कता कमी होणे
- डोकेदुखीमुळे झोपन येणे
- दृष्टीमध्ये बदल होणे
- पुरळ उठणे
- मुंग्या येणे
- फिटयेणे
- मान दुखणे किंवा कडक होणे
- समन्वयाचा अभाव
- दुखापत झाल्यामुळे डोकेदुखी झाल्यास
- नीट उभे राहता न येणे
- चालण्यात अडचण निर्माण होणे
- ताप
- व्यक्तिमत्वात बदल
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१. माझ्या मुलाला वारंवार डोकेदुखी होत असल्यास मी काय करावे?
जर तुमच्या मुलाला वारंवार डोकेदुखी होत असेल, तर तुम्ही डोकेदुखीची घटना नोंदवलेल्या डोकेदुखीची डायरी ठेवा. तुमच्या मुलाने त्या दिवशी किती झोप घेतली आहे याची आहार आणि क्रियाकलापांसह नोंद करा. तुमच्या मुलाला परीक्षा किंवा स्पर्धा ह्यासारख्या तणावपूर्ण गोष्टींना सामोरे जावे लागत असेल तर त्याची नोंद ठेवा. असे केल्याने तुम्हाला डोकेदुखीचा पॅटर्न लक्षात येईल आणि तुम्ही त्याचे ट्रिगर शोधू शकता.
२. मुलांमध्ये डोकेदुखी वाढू शकते का?
मुलांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. परंतु, हे डोकेदुखीच्या प्रकारावर अवलंबून असते. असे दिसून आले आहे की किशोरवयात मुलांचा मायग्रेनचा त्रास वाढतो. हार्मोनल बदलांमुळे मुलींना नंतरच्या आयुष्यात डोकेदुखी होत राहते.
तुम्ही तुमच्या मुलास डोकेदुखीचा सामना करण्यास मदत करू शकता असे बरेच मार्ग आहेत, साधे घरगुती उपाय आणि मुलांनी स्वतःची काळजी घेतल्यास ही समस्या बर्याच अंशी कमी करू शकते. परंतु, जर सारखीच डोकेदुखी होत असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काळजी वाटत असेल, तर तुम्ही वैद्यकीय मदत घेणे चांगले आहे, कारण डोकेदुखी हे मोठ्या वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते.
आणखी वाचा:
मुलांच्या डोक्यातील उवांसाठी परिणामकारक उपाय
मुलांच्या केसातील कोंडा: कारणे,उपचार आणि घरगुती उपाय