Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना प्रजननक्षमता व्हजायनल (योनी) रिंग – एक गर्भनिरोधक पर्याय

व्हजायनल (योनी) रिंग – एक गर्भनिरोधक पर्याय

व्हजायनल (योनी) रिंग – एक गर्भनिरोधक पर्याय

प्रजननक्षमतेवर नियंत्रण ठेवणारी औषधे आणि साधने अनेक वर्षांपासून बाजारात आहेत. काळानुसार, वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होऊन ती परिणामकारक आणि सुरक्षित गर्भनिरोधनाची साधने झाली आहेत. स्त्रियांसाठी अगदी हल्लीच विकसित झालेले गर्भनिरोधक साधन म्हणजे योनी रिंग, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. ह्या साधनामुळे गर्भनिरोधक संप्रेरके योनीमार्गात सोडली जातात आणि त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणे पासून संरक्षण मिळते. ह्या लेखामध्ये योनी रिंग विषयीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा केली आहे.

योनी रिंग म्हणजे काय?

योनी रिंग म्हणजे रिंगच्या आकाराचे साधन असते आणि ते योनीमार्गात घालायचे असते. ते मऊ प्लास्टिकचे बनलेले असते आणि त्यावर गर्भधारणा रोखणाऱ्या संप्रेरकांचा थर असतो. हे साधे गर्भनिरोधक साधन वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाने विकले जाते आणि ते कुठल्याही कुटुंब नियोजन केंद्रात सहज उपलब्ध होते

हे कसे कार्य करते?

फलानाची प्रक्रिया रोखण्याचे काम ही योनी रिंग करते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन ह्या संप्ररेकांचे आवरण असलेली ही रिंग योनीमार्गात घातली जाते. ही दोन्ही संप्रेरके योनिमार्गाच्या आवाराणांद्वारे प्रजनन प्रणाली मध्ये शोषली जातात आणि गर्भधारणा रोखण्यासाठी तीन प्रकारे कार्य करतात.

  • गर्भनिरोधक गोळ्याप्रमाणे, ही संप्रेरके ओव्यूलेशनची प्रक्रिया किंवा स्त्रीबीज तयार करण्याची प्रक्रिया रोखतात
  • गर्भाशयाच्या मुखाच्या श्लेष्माच्या थराचा घट्टपणा वाढतो आणि त्यामुळे शुक्रजंतू गर्भाशयात पोहचत नाहीत
  • ह्यामुळे गर्भाशयाचे आतील आवरण पातळ होते. हे आवरण जर घट्ट असेल तर फलित स्त्रीबीजाचे त्यावर रोपण होते आणि ते वाढते. ह्या घट्टपणाला प्रतिबंध घातला जातो तसेच योनी रिंग मुळे फलित स्त्रीबीजाचे रोपण होत नाही

वापरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

मासिक पाळी सोडून महिनाभर तुम्ही योनी रिंग वापरू शकता. म्हणजेच तीन आठवडे रिंग घालून आणि एक आठवडा मासिक पाळी साठीं रिंग न घालता असावा. मासिक पाळी एकदा संपली की नको असलेल्या गर्भधारणेपासून संरक्षण मिळावे म्हणून नवीन रिंग घातली जाते.

. रिंग कशी घालावी?

रिंग घालणे आणि वापरणे खूप सोपे आहे. रिंग घालण्याच्या आधी घ्यायची काळजी म्हणजे तुम्ही रिंग उघडण्याआधी हात निर्जंतुक करून घेतले पाहिजेत तसेच रिंग वापरण्याची तारीख किती आहे हे तपासून घेतले पाहिजे. योनीमार्गात योनी रिंग घालण्यासाठी, निर्जंतुक पॅकेट उघडा आणि रिंग अशा पद्धतीने दाबा कि त्याच्या विरुद्ध बाजू एकमेकांना चिकटल्या पाहिजेत. ह्याच स्थिती मध्ये योनीमार्गात योनी रिंग घालून सोडा नंतर ती गोल आकार घेईल.

. कशी काढावी?

रिंग काढण्यासाठी तुमचा निर्जंतुक केलेला हात योनीमार्गात घालून हळूच रिंग बाहेर काढा. रिंग काढताना हळुवारपणे काढा. रिंगच्या पॅकिंग मटेरियल मध्ये घालून सॅनिटरी कचऱ्यात टाकुन द्या. रिंग फ्लश करू नका.

.जर तुम्हाला मासिक पाळी यायला पाहिजे असे वाटत असेल तर रिंग कशी वापरावी?

गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच योनीमार्गात वापरली जाणारी रिंग मासिक पाळी नियमित करण्यासाठी वापरू शकता. तुमची मासिक पाळी येण्यासाठी तीन आठवड्यांसाठी रिंग घालून ठेवा आणि तीन आठवड्यांनंतर तुम्ही रिंग घातलेला दिवस लक्षात ठेऊन त्या दिवशीच रिंग बाहेर काढा. तुम्ही रिंग काढल्यानंतर लगेच मासिक पाळी येईल. साधारणपणे पाळी नंतर तुम्ही नवीन रिंग घालू शकता. नवीन रिंग घातल्यानंतर जर हलका रक्तस्त्राव झाला तर सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पून वापरा. रिंग तशीच राहू द्या. मेन्स्ट्रूअल कप वापरू नका कारण त्यामुळे बसवलेल्या रिंगला अडथळा येऊ शकतो.

. पाळी चुकवण्यासाठी रिंग कशी वापरावी?

तुमच्या मासिक पाळी चक्रामध्ये बदल करण्यासाठी योनी रिंग मुळे फायदा होतो. हे तंत्रज्ञान खूप सोपे आहे आणि त्याच्या तपशिलाबाबत तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. तुम्हाला एखाद्या महिन्यासाठी पाळी चुकवायची असेल तर तुम्ही तीन आठवड्यांऐवजी चार आठवडे रिंग वापरू शकता. चौथ्या आठवड्याच्या शेवटी, ज्या दिवशी तुम्ही रिंग घातली होती त्याच दिवशी तुम्ही नवीन रिंग घालू शकता. पाळी चुकवण्यासाठी रिंग घातली असेल तर सौम्य रक्तस्त्राव होऊ शकतो आणि ह्या पद्धतीवर कुठलाही हानिकारक परिणाम दिसून येत नाही.

गर्भनिरोधक रिंग किती परिणामकारक आहे?

आतापर्यंत, ही बाजारात उपलब्ध असणारी सर्वात परिणामकारक गर्भनिरोधक पद्धती आहे. आणि ह्या पद्धतीची परिणामाकत ९१% आहे. रिंग वापरण्याचा सर्वात महत्वाचा मुद्धा म्हणजे काढताना आणि घालताना देखभाल सोपी आहे.

तुमच्यासाठी रिंग सर्वात जास्त परिणामकारक कशी कराल?

हे गर्भनिरोधकाचे साधन जास्त परिणामकारक होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  • संततिनियमनाची पद्धती म्हणून योनी रिंगची परिणामकता वाढवण्यासाठी तीन आठवडे रिंग घालणे आणि एक आठवडा काढून टाकणे हा नियम पाळला पाहिजे.
  • आठवड्याच्या एकाच दिवशी रिंग घाला आणि काढून टाका. उदा: जर तुम्ही सोमवारी रिंग घातलीत तर तीन आठवडे संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी ती काढली पाहिजे. असे केल्यास चक्र नियमित राहील.
  • रिंग योनीमार्गात घालताना निर्जंतुक केलेली असावी जेणेकरून योनीमार्गाचा संसर्ग होणार नाही
  • रिंग घालताना ती नक्की कुठे घालावी अशी नक्की जागा नाही परंतु योनीमार्गात खूप आत घातल्यास रिंग बाहेर निघून येण्याची शक्यता कमी असते

गर्भनिरोधक रिंग कोण वापरू शकते?

सर्व वयोगटाच्या स्त्रिया ह्या गर्भनिरोधक रिंगचा वापर करू शकतात. जर रिंग वापरण्यास अडथळा आणणारी कुठलीही वैद्यकीय समस्या नसेल तर कुठल्याही समस्येशिवाय प्रत्येकजण ती वापरू शकते. ज्या स्त्रीची नुकतीच प्रसूती झाली आहे ती स्त्री प्रसूतीनंतर २१ दिवसांनी रिंग वापरण्यास सुरुवात करू शकते परंतु स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये दुधाचा पुरवठा कमी होऊ शकतो. स्तनपानाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये रिंग वापरणे टाळले पाहिजे. गर्भपात झाला असल्यास योग्य प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे.

गर्भनिरोधक रिंग कुणी वापरणे टाळले पाहिजे?

बऱ्याच स्त्रियांसाठी रिंग वापरणे योग्य असले तरी सुद्धा ज्यांना खालील समस्या आहेत त्यांनी रिंग वापरणे टाळले पाहिजे

समस्या पुढीलप्रमाणे

  • हृदयरोग
  • शिरा आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या
  • धूम्रपानाची सवय आणि ज्यांनी ३५ वर्षे वयाचा टप्पा गाठलेला आहे
  • स्तनाचा कर्करोग
  • मधुमेह
  • लठ्ठपणा
  • रिंग बसण्यासाठी योनीमार्ग खूप मोठा किंवा लहान असणे

योनी रिंगचे फायदे

योनी रिंगचे संतती नियमनाव्यतरिरिक्त इतरही अनेक फायदे आहेत जसे कि

  • मासिक पाळी दरम्यान येणारे पेटके आणि पीएमएस कमी करणे
  • मासिकपाळीदरम्यान रक्तस्त्राव कमी होणे
  • गंभीर दुष्परिणाम होत नाही
  • काही कर्करोगांचा धोका कमी होतो

योनी रिंग घालण्यासाठी अत्यंत सोपी असते आणि दररोज लक्ष ठेवण्याची गरज नसते. लैंगिक संबंधांदरम्यान सुद्धा अडथळे येत नाहीत, आणि ते संतती नियमनाचे अगदी सोयीचे साधन होते.

योनी रिंगचे धोके आणि दुष्परिणाम

योनी रिंग ही संप्रेरकांवर आधारित संततिनियमनाची प्रक्रिया असली तरी त्याचे गर्भनिरोधक गोळ्यांसारखेच दुष्परिणाम असतात. काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे

  • मळमळ
  • स्तन हळुवार आणि दुखरे होणे
  • मनःस्थितीतील बदल
  • योनीमार्गातील स्त्राव
  • डोकेदुखी
  • थकवा आणि वजनातील वाढ

रिंगमुळे होणारे धोके म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते तसेच स्तनाच्या कर्करोगाचा सुद्धा धोका असतो.

तुम्ही जर रिंग काढण्याचे विसरलात तर काय?

काही वेळा जर तुम्ही रिंग काढण्याचे विसरलात तर तुम्हाला संरक्षण न मिळण्याचा धोका असतो, कारण संप्रेरकांचा सक्रियतेचा काळ संपलेला असू शकतो. जर तुम्ही कधीतरी रिंग काढण्याचे विसरलात तर, जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा लागलीच रिंग काढून टाका. जर तिसऱ्या आठवड्यांनंतर रिंग सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आतमध्ये राहिली तर रिंग काढून टाका आणि मासिक पाळीसाठी ७ दिवसांचा ब्रेक घ्या आणि नंतर नवीन रिंग घाला. जर तिसऱ्या आठवड्यानंतर एक आठवड्यापेक्षा जास्त काळ रिंग आतमध्ये राहिली तर ती ताबडतोब काढून टाका आणि नवीन रिंग घाला. जर तुम्ही रिंग काढायचे विसरलात आणि त्या काळात शारीरिक संबंध ठेवले असतील तर आपत्कालीन स्थितीत घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या घ्या. तसेच त्याच्या पुढच्या आठवड्यात शारीरिक संबंध ठेवताना काळजी घ्या.

जर रिंग आपोपाप बाहेर आली तर काय?

काहीवेळा, जर रिंग नीट बसवली गेली नाही तर रिंग विलग होऊन लैंगिक संबंधांच्या वेळेला किंवा इतर वेळी सुद्धा बाहेर येऊ शकते. आत घातल्यानंतर रिंग केव्हा बाहेर आली त्यानुसार खालील गोष्टी करू शकता.

  • जर रिंग बाहेर येऊन तीन तासांपॆक्षा कमी कालावधी झाला असेल तर थंड किंवा कोमट पाण्याने ती धुवून काळजीपूर्वक पुन्हा घाला
  • जर रिंग बाहेर आली आणि त्यास तीन तासांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल, विशेषकरून घातल्यानंतरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असे झाले तर थंड किंवा कोमट पाण्याने ती धुवून घ्या आणि पुन्हा घाला. तसेच सात दिवस गर्भनिरोधक गोळ्या घ्या. जर लैंगिक संबंधांनंतर रिंग अपघाताने लवकर निघाली तर गर्भधारणा टाळण्यासाठी आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घ्या.
  • जर रिंग बसवल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ती तीन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिली तर मासिक पाळी येण्यासाठी रिंग काढून टाका आणि जर मासिक पाळी टाळायची असेल तर नवीन रिंग घाला.

लैंगिक संबंधांमधून पसरणाऱ्या आजारांपासून योनी रिंगमुळे संरक्षण मिळते का?

लैंगिक संबंधांमधून पसरणाऱ्या आजारांपासून योनी रिंग मुळे संरक्षण मिळत नाही. जर असे आजार पसरण्याची शक्यता असल्यास काँडोम्स वापरणे बंधनकारक असेल.

इतर औषधांसोबत योनी रिंग

काही औषधांमुळे योनी रिंगच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे परिणामकता कमी होते. जर तुम्ही योनीरिंग वापरत असाल तर तुम्ही ती वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे

  • प्रतिजैविके (रिफाम्पीसीन, रिफामेट, रिफाम्पीन)
  • एचआयव्ही साठी दिली जाणारी औषधे
  • अँटीफंगल ग्रीसीओफ़ल्वीन
  • काही अँटीएपिलेप्टिक औषधे
  • जॉन्स वोर्ट

नेहमी विचारली जाणारी प्रश्नोत्तरे

. व्हजायनल (योनी) रिंगचे काम केव्हा सुरु होते?

योनी रिंग घातल्यानंतर सात दिवसांनंतर संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. जर तुम्ही तुमच्या मासिक पाळी चक्राच्या पहिल्या दिवशी रिंग बसवली तर त्यादिवसापासून संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. जर त्याव्यतिरिक्त इतर दिवशी रिंग घातली तर सात दिवस त्यासोबत इतर गर्भनिरोधक साधने वापरली पाहिजेत.

. बाळाच्या जन्मानंतर मी केव्हा व्हजायनल रिंग वापरली पाहिजे?

तुम्ही प्रसूतीनंतर २१ दिवसानंतर रिंग वापरायला सुरुवात करू शकता. परंतु जर तुम्हाला बाळाला स्तनपान करायचे असेल तर प्रसूतीनंतर ६ महिन्यांनी रिंग वापरण्यास सुरुवात करा, कारण रिंग मध्ये असलेल्या संप्रेरकांमुळे दुधाचा पुरवठा कमी होतो.

. गर्भपात झाल्यानंतर मी केव्हा रिंग वापरू शकते?

गर्भपातानंतर तुम्ही लगेच रिंग वापरू शकता

. स्तनपान करताना मी रिंग वापरू शकते का?

जरी स्तनपान करताना रिंग वापरणे धोकादायक नसले तरी रिंग वापरल्यास दूध पुरवठा कमी होतो. म्हणून प्रसूतीनंतर कमीत कमी सहा महिने रिंग न वापरण्याचा सल्ला दिला जातो.

नीट काळजीपूर्वक वापरल्यास व्हजायनल (योनी) रिंग हे निर्विवादपणे परिणामकारक गर्भनिरोधक आहे. रिंग विषयी अधिक माहितीसाठी आणि नको असलेल्या गर्भधारणेस प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञाची मदत घेऊ शकता.

आणखी वाचा: संतती नियमन थांबवताना त्याचे गर्भधारणेवर होणारे परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article