Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गरोदरपणासाठी आपले शरीर कसे तयार करावे?

गरोदरपणासाठी आपले शरीर कसे तयार करावे?

गरोदरपणासाठी आपले शरीर कसे तयार करावे?

तुम्ही गर्भवती होण्याचे ठरवले असेल, तर एका नवीन जीवाला वाढवण्यासाठी तुमचे शरीर तयार हवे. निरोगी गर्भारपणासाठी, गर्भधारणेच्या आधी बऱ्याचशा स्त्रिया नियोजन करताना आढळतात.

तसेच, गर्भारपणादरम्यान तुम्ही जी निरोगी जीवनशैली अंगिकारता ती गर्भारपणानंतर सुद्धा तशीच राहते आणि तुमच्या आयुष्याचा भाग बनते.

गर्भारपणासाठी तुमचे शरीर तयार करण्यासाठी १२ टिप्स

तुमचे शरीर गर्भारपणासाठी तयार करण्यासाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.

. डॉक्टरांची भेट घ्या

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमचे पती दोघांनी डॉक्टरांची भेट घ्या. डॉक्टर तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास तपासून बघतील आणि गर्भारपणात काही समस्या तर उद्भवणार नाहीत ना ह्याची शक्यता पडताळून पाहतील. जर काही समस्या आढळली तर त्यावर उपचार केले जातील. मोठ्या आजारांसाठीचे तुमचे लसीकरण झालेले आहे का हे सुद्धा डॉक्टर तपासून पाहतील. कांजिण्या आणि गोवर ह्यासाठी तुमचे लसीकरण झालेले असले पाहिजे आणि तुम्हाला गर्भधारणा होण्याआधी तीन महिने ह्या लसी तुम्ही घेतल्या असल्या पाहिजेत.

तुमचे डॉक्टर तुमची लैंगिक आजारासंबंधीची तपासणी करतील. निरोगी गर्भारपणासाठी काय काळजी आणि उपचार घेतले पाहिजेत ह्याविषयी डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतील.

तसेच, तुम्हाला जर काही आजार असतील आणि त्यासाठी तुम्हाला दररोज औषधे घ्यावी लागत असतील उदा: मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा, फिट येणे इत्यादी, तर तुम्ही डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे त्यानुसार गर्भधारणेआधी उपचारपद्धती मध्ये योग्य ते बदल केला जाईल.

. संततिनियमन थांबवा

तुम्ही कुठल्याही प्रकाचे संततिनियमनाचे साधन वापरत असाल तर ते बंद केले पाहिजे. जर तुम्ही संततिनियमनासाठी कुठली साधने बसवून घेतली असतील तर स्त्रीरोगतज्ञांकडून ती काढून घ्या. संततिनियमन थांबवल्यानंतर दोन आठवड्यात काही स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते तर काहींना त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

. आहारात सुधारणा करा

तुमच्या आहारातून पोषक नसलेले अन्नपदार्थ काढून टाका आणि आहारात पोषक आणि ऑरगॅनिक अन्नपदार्थांची निवड करा. भरपूर पाणी प्या. नाश्त्यासाठी कर्बोदके आणि जंक फूड खाण्याऐवजी सुकामेवा आणि फळे खाल्ल्यास तुमच्यासाठी ते चांगले आहे तसेच त्यामुळे विषारीद्रव्ये कमी होतील. कच्ची अंडी आणि अर्धवट शिजवलेले मांस खाणे टाळा, त्यामुळे साल्मोनेलाचा धोका टळेल. जर तुमचा बीएमआय ३० पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही लठ्ठ असाल तर पोषक आहार घेणे खूप महत्वाचे आहे. वजन कमी असणे हि सुद्धा समस्या आहे कारण त्यामुळे मासिक पाळी चक्रावर परिणाम होतो आणि त्यामुळे पाळी अनियमित होते. ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक महिन्याला तुमचे ओव्यूलेशन होत नाही. म्हणून तुम्ही जर निरोगी गर्भारपणाचा विचार करीत असाल तर तुमचा बीएमआय १९२५ इतका असला पाहिजे.

. व्यायामाचा समावेश करा

आठवड्याला कमीत कमी चार ते पाच दिवस ३० मिनिटे व्यायामाचा समावेश करा. जोमाने व्यायाम करण्याआधी सुरुवातीला २० मिनिटे चालण्याच्या व्यायामाने सुरुवात करा. जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करीत असाल तर तुम्ही आठवड्यातून पाच ते सहा दिवस दररोज ४५ मिनिट्स व्यायाम करू शकता.

. पूरक जीवनसत्वे

काही जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासही, बरेच डॉक्टर्स स्त्रियांना मल्टीव्हिटॅमिन्स घेण्याचा सल्ला देतात. ही पूरक औषधे घेतल्याने, पोषणात काही कमतरता असल्यास गर्भधारणेच्या आधी ती भरून निघते. लोह आणि कॅल्शिअम समृद्ध अन्नपदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत.

. फॉलिक ऍसिड

पूरक जीवनसत्वांसोबतच तुम्ही फॉलिक ऍसिडचा सुद्धा समावेश केला पाहिजे. गर्भारपणात मज्जातंतू नलिकेचे दोष निर्माण होण्याची शक्यतेला फॉलिक ऍसिड मुळे प्रतिबंध होतो. जरी ही पूरक औषधे औषधांच्या दुकानात सहज उपलबध असली तरी त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या आधी ४०० ते ८०० मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दररोज घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टर डोस बदलू शकतील.

. धूम्रपान, मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन बंद करा.

ह्या तिन्ही सवयी तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी हानिकारक आहेत. धूम्रपान केल्याने तुम्हाला दोघांना विषारी द्रव्यांचा सामना करावा लागेल आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होईल. तसेच धूम्रपान केल्याने प्रजननक्षमतेवर परिणाम होतो, अकाली प्रसूती, गर्भपात किंवा बाळाचा पोटात असताना मृत्यू होऊ शकतो. मद्यपान केल्याने त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात आणि बाळाच्या विकासामध्ये समस्या येतात तसेच बाळाला फिटल अल्कोहोल सिंड्रोमहोऊ शकतो. अमली पदार्थांचे सेवन करणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. हेरॉईन आणि कोकेन ह्यासारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्यास अमली पदार्थांवर अवलंबून असणाऱ्या बाळांचा जन्म होऊ शकतो. तुमचे पती जर धूम्रपान करत असतील तर त्यांनासुद्धा धूम्रपान बंद करण्यास सांगा कारण धूम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. विशेषकरून गर्भारपणात धूम्रपान होत असलेल्या ठिकाणी असणे चांगले नाही. तसेच तुम्ही तुमचे कॅफेन घेण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. गर्भवती स्त्रियांसाठी कॅफेनची मर्यादा ३०० मिली दररोज इतकी असते.

. ताण कमी करण्यासाठी उपाय

गर्भधारणेचा प्रयत्न करीत असताना ताण येऊ शकतो. परंतु हा आलेला ताण हाताळता येणे खूप महत्वाचे आहे कारण ताणामुळे कोर्टिसोलची पातळी वाढू शकते, ओव्यूलेशनवर आळा बसतो तसेच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा सुद्धा होत नाही. हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही योग, ध्यानधारणा, संगीत किंवा वाचन ह्यासारखे उपाय करू शकता.

. भरपूर झोप घ्या

दररोज रात्रीची झोप नीट झाल्यवास तुमचे शरीर चांगले कार्यरत राहते. झोप कमी झाल्यास ताण येतो, शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही आणि तुम्हाला आणखी थकल्यासारखे वाटते.

१०. दातांची तपासणी करून घ्या

हिरड्यांचा आजार असल्यास अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते आणि बाळांचे जन्माच्या वेळचे वजन कमी असू शकते. तुम्ही दंतवैद्यांची भेट घ्या आणि गर्भवती होण्याच्या आधीच दातांच्या समस्यांवर उपाय करा.

११. सगळी माहिती मिळवा

गर्भधारणा कशी होते हे समजून घ्या. तुमच्या डॉक्टरांशी बोलून गर्भधारणा होण्याआधी तुम्हाला लागणारी सगळी माहिती मिळवा. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला कशाकशाला सामोरे जावे लागणार आहे ह्याविषयी भरपूर वाचन करा. तसेच तुमच्या मासिक पाळी चक्रावर लक्ष ठेवा. ओव्यूलेशन केव्हा होते हे माहिती असल्यास तुमच्या गर्भधारणेची शक्यता लक्षणीय रित्या वाढते. तुम्ही त्यासाठी ओव्यूलेशन किटचा वापर करू शकता.

१२. आपल्या जोडीदारास सामील करून घ्या

गर्भवती होणे आणि गर्भधारणेची तयारी करणे ही तुमची जबाबदारी आहे. शुक्राणूंच्या संख्येत मदत होते म्हणून आपण आपल्या पतीला सुद्धा फॉलिक ऍसिड घेण्यास सांगू शकता. त्यांनी सुद्धा तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी धूम्रपान, मद्यपान किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निरोगी गर्भधारणा सुलभ करण्यासाठी तुम्ही दोघांनाही निरोगी जीवनशैली अंगीकारणे महत्वाचे आहे.

तसेच त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करून घ्यावी कारण ३०% पेक्षा जास्त वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये पुरुष वंध्यत्व आढळून येते.

तुमच्या घरात एका नवीन जीवाचे स्वागत करण्यास तुम्ही तयार आहात, परंतु तुम्ही ह्या जबाबदारी साठी मानसिक दृष्ट्या सुद्धा तयार असले पाहिजे. तुम्ही बाळाची काळजी घेतली पाहिजे तसेच बाळाचे नीट पालनपोषण केले पाहिजे तसेच बाळाच्या वाढीसाठी शक्य तितके चांगले वातावरण सुद्धा असले पाहिजे. जीवनशैलीमध्ये काही मूलभूत बदल केल्यास ही जबाबदारी सहज पार पडण्यास मदत होईल.

तसेच, गर्भधारणा होणे हे काहींसाठी अगदी सहज असते तर काहींसाठी तितकेच अवघड असते. लगेच गर्भधारणा झाली नाही तरी आशा सोडू नका. थोडा वेळ द्या आणि चिकाटी सोडू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेचा आनंद घ्या. जर तुम्हाला काही गंभीर समस्या आली तर तुमच्या डॉक्टरांशी त्यामागच्या कारणांची चर्चा करून समस्या कशी सोडवता येईल ह्यावरच्या उपायांची माहिती घ्या.

आणखी वाचा:

लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?
गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article