Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) शिक्षण लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा

लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा

लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा

मुलांना गोष्टी सांगताना पालक आणि मुलांमध्ये बंध निर्माण होतो आणि मजेदार व रोमांचक पद्धतीने मुलांमध्ये मूल्यांची जोपासना होते. तुमच्या मुलांना ह्या बाळ कृष्णाच्या कथा नक्कीच आवडतील!

कृष्णाच्या नैतिक कथा

हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर नऊ अवतार घेतले. त्यापैकी एक अवतार म्हणजे कृष्णावतार. आजही कृष्णाच्या बाळलीला खूप हौसेने सांगितल्या जातात.

. दैवी भविष्यवाणी

अनेक युगांपूर्वी, उग्रसेन नावाचा राजा होता. त्याला दोन अपत्ये होती मुलगा कंस आणि मुलगी देवकी. देवकी सुस्वभावी होती, परंतु कंस कपटी वृत्तीचा होता. मोठे झाल्यावर कंसाने आपल्या वडिलांना कारागृहात टाकले.

दरम्यानच्या काळात, देवकीचे लग्न वासुदेवाशी झाले. जेव्हा कंस त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यास जात होता तेव्हा आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र मोठा होऊन तुला ठार करेल“. आपला जीव वाचवण्यासाठी कंसाला आपल्या बहिणीला ठार करायचे होते. परंतु वासुदेवाने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी कंसाकडे याचना केली आणि कंसाला वचन दिले की त्यांचे प्रत्येक मूल जन्माला आले की ते कंसाकडे सुपूर्त करतील. वासुदेवाने वचन दिल्यामुळे कंस शांत झाला आणि त्याने दोघांना कारागृहात ठेवले.

तात्पर्य: आपल्या पालकांचा अनादर कधीही करू नये.

. कृष्णजन्म

देवकी आणि वासुदेवाला कंसाने कारागृहात टाकले आणि त्याच्या सेवकांना पहारा देण्याची आज्ञा केली. प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर कंस कारागृहात जाऊ देवकी व वासुदेवाची भेट घेत असे आणि बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करीत असे. जेव्हा सातव्या वेळेला देवकी गर्भवती राहिली तेव्हा तो गर्भ वृंदावनात रोहिणीच्या उदरात चमत्कारिकरीत्या धाडला गेला. बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे कंसाला सांगण्यात आले. देवकी आणि वासुदेवाचा आठवा पुत्र म्हणजेच कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला. आणि हा विशेष दिवस कृष्णजन्म म्हणून साजरा केला जातो.

तात्पर्य: तुम्ही कुणाला शब्द दिल्यास तो पाळावा

. गोकुळातील कृष्ण

कृष्ण जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेवाच्या कारागृहाबाहेरील सेवक गाढ झोपेत होते, कारागृहाची कुलपे उघडून खाली निखळली.

गोकुळातील कृष्ण

कृष्णाला टोपलीत घेऊन, वासुदेव गोकुळाकडे निघाला. वासुदेव यमुनेकाठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आलेला त्याने पहिला. परंतु त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होतात. त्यामुळे, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता वासुदेव नदीपात्रात चालू लागला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक नदीचे पाणी कमी होऊ लागले. विष्णुदेवताचा सर्प आदिशेषने पावसापासून कृष्णचे संरक्षण केले.

जेव्हा कृष्ण नंदाघरी पोहोचला तेव्हा, यशोदेने मुलीला जन्म दिला होता. हळूचकन त्याने त्या मुलीला उचलून कृष्णाला त्या जागी ठेवले. वासुदेव त्या मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे परतला. देवकी आणि वासुदेवाला वाटले कंस त्या छोट्या मुलाला सोडून देईल कारण आकाशवाणी मध्ये देवीचा आठवा पुत्र अशी घोषणा झाली होती. परंतु कंसाला दया आली नाही त्याने त्या मुलीला देवकी वासुदेवाकडून हिसकावून घेतले आणि भिंतीवर तिचे डोके आपटले. तितक्यात चमत्कार झाला, त्या मुलीच्या जागी देवी दुर्गा अवतरली आणि तिने कंसाला सांगितले की देवकीचा आठवा पुत्र जिवंत असून लवकरच तो तुझा वध करेल.

तात्पर्य: ईच्छा तिथे मार्ग

. कृष्णा आणि पुतना

कंसाला कृष्णाचा वध करायचा होतात त्यामुळे त्याने पुतना राक्षशिणीला पाचारण केले. त्याने पुतना राक्षशिणीला सुंदर तरुण स्त्रीच्या रूपात येण्यास सांगितले आणि दहा दिवसात जन्मलेल्या सगळ्या बाळांना मारण्यास सांगितले. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याची संधी बघून पुतना राक्षसीण लगेच तयार झाली.

पुतनाने कृष्णाच्या गावात प्रवेश केला. यशोदेच्या नुतक्याच झालेल्या पुत्राविषयी तिने सगळ्यांना बोलताना ऐकले आणि तिला लक्षात आले की हेच ते बाळ ज्याला आपणास नष्ट करायचे आहे. यशोदेचे लक्ष दुसरीकडे वळवून, तिने कृष्णाचे तोंड तिच्या विष लावलेल्या स्तनाग्रांना लावले. त्या विषामुळे कृष्णाला काही झाले नाही पण पुतना राक्षशिणीचा तात्काळ मृत्यू झाला.

तात्पर्य: कुठल्याही माणसाला किंवा प्राण्याला सहेतुक इजा करू नका. तुम्हाला त्याचे भोग भोगावे लागतील.

. कृष्णचे लोणी प्रेम

कृष्णाला लोणी खाण्यास खूप आवडत असे. कृष्ण थोडा मोठा झाल्यावर तो आपल्या आणि शेजारच्यांच्या घरातून लोणी चोरत असे. यशोदा लोण्याचा घट वर छताला टांगून ठेवत असे, जेणेकरून कृष्ण तिथपर्यंत पोहोचू नये. हळूहळू इतर गोपी सुद्धा तसे करू लागल्या.

कृष्णचे लोणी प्रेम

कृष्ण आणि त्याचे मित्र सहज हार मानत नव्हते. त्यांनी यावर युक्ती शोधून काढली. पुढच्या वेळी त्यांनी लोण्यासाठी घरावर छापा टाकला, कृष्णाने आपल्या मित्रांना मानवी डोंगर बनवले. कृष्णाने स्वतः माथ्यावर जाऊन लोण्याचे भांडे फोडले. मित्रांनी त्याला मुक्त केले, यामुळे गोपिकांमध्ये राग आणि निराशाच जास्त होती!

तात्पर्य: समस्येवर नव्हे तर समाधानावर लक्ष केंद्रित करा.

. नालाकुवारा आणि मणिग्रीवा

यशोदा कृष्णच्या विविध लीलांनी इतकी त्रस्त झाली होती की, एके दिवशी तिने कृष्णाला उखळेला बांधून ठेवले. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी कृष्ण अंगणातील झाडांवर चढला. नंतर दोन झाडांच्या मध्ये असलेल्या जागेत रांगू लागला. मध्येच उखळ अडकली. ह्याचा फायदा घेत कृष्णाने संपूर्ण जोर लावत दोर ओढला. झाडे उन्मळून खाली पडली आणि नालाकुवारा आणि मणिग्रीवा अवतरले. त्यांची शापातून मुक्तता झाली.

तात्पर्य: चमत्कारांवर विश्वास ठेवा ते घडतात

. कृष्णच्या मुखात काय होते?

एकदा कृष्ण आणि बलराम खेळत होते, ह्या विष्णूच्या अवताराने तोंडात मूठभर माती घातली. जेव्हा कृष्णाच्या सवंगड्यानी त्याची आई यशोदेकडे तक्रार केली तेव्हा यशोदा धावत कृष्णाजवळ पोहोचली आणि त्यास तोंड उघडण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने नकार दिला परंतु यशोदेने रागाने पाहिल्यावर कृष्णाने तोंड उघडले.

यशोदेला त्याच्या तोंडात माती चिखल नव्हे तर संपूर्ण जग दिसले तेव्हा तिच्या लक्षात आले की कृष्ण हा मानवरूपातील देवाचा अवतार आहे!

तात्पर्य: नेहमी आपल्या पालकांचे ऐकावे

. कृष्ण आणि कालिया

दररोज, कृष्ण गायींना चरण्यासाठी नदीकाठी घेऊन जात असे. अचानक नदीचे पाणी प्यायल्यानंतर गायी मरु लागल्या. दैवी शक्तीने कृष्णाच्या लक्षात आले की दहा तोंडाचा विषारी साप कालिया आपल्या विषाने नदीचे पाणी विषारी करत आहे.

कृष्ण आणि कालिया

त्याने कालियाला तसे करणे थांबवण्यास सांगितले, परंतु कालियाने नकार दिला. कृष्णाने नदीत उडी मारली आणि कालियाच्या डोक्यावर नाचू लागला. आता गावकरी नदीकाठी जमा झाले होते आणि त्यांना कृष्णाची काळजी वाटू लागली . हळूहळू, कृष्ण मोठा आणि जड होत गेला आता कालियाला त्याचे वजन पेलणे अशक्य होऊन गेले. कालियाच्या पत्नीने कृष्णाची माफी मागितली आणि थांबण्याची विनंती केली. आणि कधीही न परतण्यासाठी ते नदीपासून दूर निघून गेले.

तात्पर्य: युद्धापेक्षा शांतता केव्हाही चांगली

. कृष्ण आणि अरिष्ठासूर

एके दिवशी एक भला मोठा वळू वृंदावनात आला आणि त्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवला. कुणालाच माहिती नव्हते तो कुठून आला. आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण सैरावैरा धावू लागले. ते कृष्णाकडे मदत मागण्यासाठी आले.

जेव्हा कृष्णाने वळूकडे पहिले, त्याच्या लक्षात आले की त्याच्यामध्ये अरिष्ठसुर संचारला आहे. कृष्णाने वळूच्या शिंगावर टोचले आणि वळूच्या शरीरातून राक्षस बाहेर पडला आणि कृष्णदेवापुढे नतमस्तक झाला. तो म्हणाला की तो भगवान बृहस्पतीचा शिष्य आहे आणि त्याने आपल्या शिक्षकाचा अनादर केल्यामुळे वळू बनण्याचा शापही देण्यात आला.

तात्पर्य: आपल्या गुरूंचा नेहमी आदर करा

१०. कृष्ण आणि केशी

कृष्णाने अरिष्ठसुराचा पराभव केल्यानंतर, नारदाने कंसाला सांगितले की कृष्ण जिवंत आहे आणि त्याला ठार करेल. रागाच्या भरात कंसाने केशीला बोलवून कृष्णाला ठार करण्याची आज्ञा केली.

केशीने घोड्याचे रूप घेतले आणि वृंदावन वासियांना त्रास देण्यास सुरुवात केली. कृष्णाला लक्षात आले की राक्षस युद्धासाठी आवाहन करीत आहेत. म्हणून, त्याने घोड्याचा सामना केला. तरूण मुलगा पाहताच घोड्याने त्याला घेरले. कृष्णाने मात्र घोड्याचा एक पाय पकडला आणि शंभर यार्ड दूर फेकला. जेव्हा केशी शुद्धीवर आला, तेव्हा त्याने कृष्णाकडे बघत तोंड उघडले. कृष्णदेवाने डावा हात घोड्याच्या तोंडात घातला ज्यामुळे त्याचे दात पडले. मग, त्याने त्याचा वध केला. अशा प्रकारे केशीचा शेवट झाला होता.

तात्पर्य: भीतीला सामोरे जा

११. कृष्ण आणि ब्रह्मदेव

एकदा ब्रह्मदेवाने कृष्णाच्या सामर्थ्यांची चाचणी करण्याचे ठरवले. म्हणून त्यांनी ब्रह्मलोकात वृंदावनची सर्व मुले आणि वासरे लपवून ठेवली. कृष्णा ब्रह्मदेवाच्या कृत्यावर नाराज होता आणि त्याने धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. म्हणून, त्याने आपल्या सर्व मित्रांचे आणि वासरांचे रूप धारण केले आणि त्यांच्या घरी गेले. कुणालाही फरक सांगता आला नाही.

जेव्हा ब्रह्मदेवाने वृंदावनमधील परिस्थिती तपासण्याचे ठरविले तेव्हा सर्व मुले व वासरे पाहून त्यांना धक्का बसला. ब्रह्मदेवाला लगेच आपली चूक लक्षात आली आणि कृष्णाकडे क्षमा मागितली.

तात्पर्य: पेराल ते उगवेल

१२. कृष्ण आणि गोवर्धन

वृंदावन येथील लोकांमध्ये पर्जन्य देवता इंद्राची पूजा करणे हा एक विधी होता. एकदा, तयारी जोरात सुरू असताना कृष्णाने सुचवले की ग्रामस्थांनी त्याऐवजी गोवर्धन टेकडीची पूजा करावी. त्यांनी संमती दर्शविली आणि टेकडीची उपासना करण्यास सुरवात केली. यामुळे इंद्राला खूप राग आला आणि त्याने पावसाचे ढग गावात पाठवले.

खूप मुसळधार पाऊस झाला आणि सर्वांनी कृष्णाची मदत घेतली. आपल्या भक्तांचे दुर्दैव पाहण्यास असमर्थ, कृष्णदेवाने त्याच्या छोट्या बोटाने गोवर्धन उचलले. त्यांनी गावक्यांना डोंगराच्या खाली आश्रय घेण्यास सांगितले आणि सात रात्री त्या स्थितीत उभे राहिले. इंद्राला आपली चूक कळली आणि त्याने कृष्णाची माफी मागितली.

तात्पर्य: नेहमी गरजवंतांना मदत करा

१३. कृष्ण आणि अघासुर

एकदा कृष्णा आणि त्याचे मित्र शेजारच्या जंगलात सहलीला गेले होते. ते आनंद घेत असतानाच, पुतना राक्षसीणीचा भाऊ अघासुर त्या ठिकाणी आला. त्याला कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठवले होते. राक्षसाने अजगराचे रूप धारण केले आणि स्वतःला गुहेसारखे लांब आणि डोंगरासारखे मोठे बनविले. मग, तो थांबला.

गुहेच्या सौंदर्याने मोहित असलेल्या गोरक्षक मुलांनी त्यात प्रवेश केला. कृष्णाला माहित होते की तो अघासुर आहे आणि त्याने आपल्या सवंगड्याना थांबण्याचा इशारा करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. एकदा कृष्णाने तोंडात शिरल्यावर राक्षसाचे तोंड बंद करण्याची योजना होती. आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी कृष्णाने गुहेत प्रवेश केला आणि स्वत: चा विस्तार केला. यामुळे राक्षस गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला.

तात्पर्य: चांगला सल्ला तुम्हाला चांगले ठेवेल

१४. कृष्णाने कंसाला ठार केले

कंस कृष्णाला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होता पण व्यर्थ ठरला. तर, त्याने आणखी एक योजना आखली. त्याचा सेवक अकुरा याच्यासमवेत त्याने मथुरा येथील कुस्ती सामन्यासाठी कृष्णा आणि बलराम यांना आमंत्रित केले.

दोघांनीही या कार्यक्रमास हजेरी लावण्याचे मान्य केले. तिथे आल्यावर, कंसाने त्याच्या दोन बलवान पैलवानांविरुद्ध भावांना लढण्यास सांगितले. कृष्णा आणि बलराम यांनी हे आव्हान स्वीकारले आणि त्यांच्या विरोधकांना सहज पराभूत केले.

कृष्णाने कंसाला ठार केले

कंसाला खूप राग आला आणि आपल्या सैनिकांना त्या मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला. हे ऐकून कृष्णाने मैदानाबाहेर उडी घेतली, डोक्यावरुन कंसाचा मुकुट खाली पडला आणि केसांना ओढत त्याला कुस्तीच्या फडात खेचले. आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी हताश असुराने कृष्णाला कुस्तीचे आव्हान दिले. कृष्णाच्या हाताच्या एका झटक्याने कंस जागेवर ठार केले. कृष्णदेवाने आपल्या जन्मदात्यांना म्हणजेच देवकी आणि वासुदेव ह्यांना मुक्त केले आणि उग्रसेनाला पुन्हा सिंहासनावर बसवले.

तात्पर्य: शेवटी सत्य आणि चांगुलपणाचाच नेहमी विजय होतो

आपल्या मुलांना कृष्णाविषयी शिकवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ह्या कथा केवळ मनोरंजकच नाहीत तर त्या मुलांच्या मनात नैतिकता आणि मूल्ये रुजवतात.

आणखी वाचा:

मुलांसाठी १५ उत्तम नैतिक लघुकथा
मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी १५ मजेदार खेळांच्या कल्पना

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article