In this Article
बाळाची निर्मिती होतानाच्या जादुई प्रवासासाठी लागणाऱ्या दोन अत्यावश्यक गोष्टी म्हणजे – स्त्रीबीज आणि शुक्रजंतू. स्त्रीबीज हे स्त्री किंवा मादी कडून आणि शुक्रजंतू हे पुरुष किंवा नराकडून पुरवले जाते. एक नवीन आयुष्य म्हणजे खरंच चमत्कार असतो आणि ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घेताना प्रत्येक क्षणी आश्चर्य वाटते.
इथे बाळाच्या निर्मितीची प्रक्रिया दिली आहे
स्त्रीबीजाच्या विकासाची प्रक्रिया स्त्रियांमध्ये कशी होते?
पालक होणे हा एक महत्वाचा निर्णय आहे आणि त्याची सुरुवात स्त्रीबीजापासून होते. शेकडो स्त्रीबीजे स्त्रीच्या अंडाशयात, बीजनलिकेतून गर्भाशयात जाण्याची वाट पहात असतात. मुलगी जन्माला येतानाच तिच्या अंडाशयामध्ये लाखो स्त्रीबीजे असतात, परंतु जेव्हा ती मोठी होते, तारुण्यात पदार्पण करते तेव्हा स्त्रीबीजांची संख्या फक्त काही शेकड्यांपर्यंत कमी होते. स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यात म्हणजेच पहिली मासिक पाळी ते रजोनिवृत्ती ह्या प्रजनन कालावधीत सरासरी ४०० स्त्रीबीजे सोडली जातात. (रजोनिवृत्तीचा कालावधी हा ४५-५५ वर्षे इतका असतो)
अंडाशयामध्ये स्त्रीबीज निर्मिती होते. बीजनलिकेतून गर्भाशयाकडे स्त्रीबीजाचा प्रवास होणे महत्वाचे असते. प्रत्येक महिन्यात स्त्रीच्या शरीरात १ किंवा २ स्त्रीबीजे बीजनलिकेत सोडली जातात. मासिक पाळीच्या मध्यावर म्हणजेच मासिक पाळीच्या ९व्या-२८व्या दिवशी स्त्रीबीज सोडले जाते. साधारणपणे ४ इंच लांबीच्या बीजवाहिन्याद्वारे स्त्रीबीजाचे गर्भाशयाकडे वहन होते. ह्या संपूर्ण प्रक्रियेला ओव्यूलेशन म्हणतात आणि गर्भधारणेसाठी हा उत्तम काळ असतो. जर गर्भधारणा झाली नाही तर हे स्त्रीबीज गर्भाशयात मरून जाते, विरघळते आणि पुन्हा शरीरात शोषून घेतले जाते.
पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची निर्मिती कशी केली जाते?
स्त्रीप्रमाणेच पुरुषांमध्ये सुद्धा आयुष्याच्या निमिर्तीसाठी आवश्यक असणारी गोष्ट असते आणि ती म्हणजे शुक्रजंतू. परंतु पुरुषामध्ये प्रत्येक दिवशी लाखो शुक्रजंतूंची निर्मिती होते. पुरुषाचे शरीर सतत शुक्रजंतूंची निर्मिती करत असते आणि त्यामागे फक्त स्त्रीबीजाशी संयोग हा हेतू असतो. जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा आयुष्यभराचे स्तऱबीज तिच्या शरीरात असते, पुरुषाचे शरीर मात्र आयुष्यभर शुक्रजंतूंची निर्मिती करीत असते. नवीन शुक्रजंतूंच्या पेशींच्या विकासास ६४-७२ दिवस लागतात.
पुरुषामध्ये शुक्रजंतू अंडकोषात तयार होतात आणि ते जननेंद्रियाच्या (Penis) खाली स्क्रोटल सॅक मध्ये असतात. पुरुषाचे अंडकोष हे शरीराच्या बाहेर असतात कारण जास्त तापमानाला ते खूप संवेदनशील असतात. हे शुक्रजंतू निरोगी राहण्यासाठी ९४ डिग्री फॅरेनहाईट इतके तापमान आवश्यक असते. हे शुक्रजंतू स्खलनाच्या (ejaculation) आधी ‘epididyamis’ मध्ये साठवले जातात.
बाळ होण्यास ‘ऑरगॅझम’ ची मदत होते का?
अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की गर्भधारणेसाठी ‘ऑरगॅझम’ ची मदत होते. ऑरगॅझममुळे पुरुषांच्या वीर्यामध्ये खूप शुक्रजंतू असतात. स्त्रीमध्ये ऑरगॅझमनंतर लाटेप्रमाणे संवेदना जागृत होतात आणि त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाकडे त्यांचे वाहन होते.
बाळ होण्यासाठी संभोगाची काही विशिष्ट स्थिती असावी का असा संभ्रभ बऱ्याच जोडप्याना पडतो. परंतु बाळ होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचीही पालकत्वाच्या प्रवासाची तयारी हवी तसेच दोघांचे बंध मजबूतरित्या जुळलेले हवेत. पुरुषाच्या जननेंद्रियाचा योनीमध्ये खूप खोल प्रवेश होण्यासाठी काही स्थिती आहेत परंतु बाळ होण्यासाठी ह्या गोष्टींची गरज लागते ह्याचा कुठलाही पुरावा नाही.
कुठला शुक्राणु स्त्रीबीजाजवळ सर्वात आधी पोहोचतो?
जेव्हा जोडप्याला बाळ कसे जन्म घेते हेच माहिती नसते तेव्हा कुठला शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचतो ह्याबद्दलची माहिती असणे कठीण असते. संभोगानंतर स्त्रीच्या पश्चभागाखाली उशी ठेवल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा फायदा होतो आणि तिला सुद्धा आरामदायक वाटते.
जेव्हा संभोगानंतर तुम्ही दोघे मिठीत गप्पा मारत असता, तेव्हा स्त्रीच्या शरीरात खूप मोठ्या गोष्टी घडत असतात. सोडलेल्या लाखो शुक्रजंतूंना स्त्रीबीज शोधण्याचा अवघड प्रवास करावा लागतो. त्यामध्ये खूप अडथळेही असतात उदा: योनीमध्ये आम्लाची पातळी जास्त असल्यास शुक्रजंतू मरून जाण्याची शक्यता असते. योनीमार्गातील स्त्राव सुद्धा त्यांच्यासाठी धोकादायक असतो ह्याला अपवाद म्हणजे स्त्रीची जननक्षमता जास्त असणे. सर्वात मजबूत शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहोचतो. शुक्रजंतूने गर्भाशयाचे मुख ते गर्भाशय हा प्रवास केलेलं अंतर ७ इंच इतके असते.
स्त्रीबीजाचे फलन कसे होते?
जर बीजवाहिनीमध्ये स्त्रीबीज नसेल तर फलन होत नाही. फक्त काही डझन शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहोचतात. काही मधेच अडकतात तर काही चुकीच्या बीजवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि मरून जातात. काही भाग्यवान शुक्रजंतू स्त्रीबीजापर्यंत पोहोचतात पण त्यांना स्त्रीबीजाचे कवच भेदून आत शिरावे लागते. सर्वात मजबूत असलेला शुक्रजंतू हे करू शकतो आणि नव्या आयुष्याच्या निर्मितीस सुरुवात होते. जेव्हा शक्रजंतू स्त्रीबीजामध्ये शिरतो, स्त्रीबीजामध्ये बदल होतो जेणेकरून दुसरा शुक्रजंतू आत शिरत नाही. स्त्रीबीज एक सुरक्षित आवरण तयार करते आणि शुक्रजंतू कवचाच्या आत राहतो. ह्या प्रक्रियेस फलन असे म्हणतात. संपूर्ण प्रक्रियेला ३-४ दिवस लागतात आणि फलन २४ तासाच्या आत होते.
फलनानंतर काय होते?
फलनानंतर पेशी झपाट्याने विभाजित होऊ लागतात. जोपर्यंत हा पेशींचा संच म्हणजेच ‘भ्रूण’ बीजवाहिनीतून प्रवास करून गर्भाशयाच्या भिंतीमध्ये स्वतःचे रोपण करत नाही तोपर्यंत तुम्ही तो पर्यंत गरोदर नसता.
तथापि जर बीजवाहिनी मध्येच किंवा गर्भाशयाच्या बाहेर जर भ्रूणाचे फलन झाले तर त्यास ‘ectopic pregnancy’ असे म्हणतात. हे खूप धोकादायक असते. त्या गर्भाची वाढ होऊन बीजवाहिनी फुटू नये म्हणून औषध आणि शस्त्रक्रियेची गरज भासते.
फलित अंड्याच्या प्रवासाचा अंतिम टप्पा ३-४ दिवसांचा असला तरी तुमची पाळी चुकून तुम्ही आई होणार आहात हे समजण्यासाठी काही आठवडे लागतील. जर तुमची मासिक पाळी चुकली किंवा तुम्ही गरोदर असल्याची काही लक्षणे दिसली तर घरी गरोदर चाचणी करणे आवश्यक आहे.
बाळ मुलगा असेल की मुलगी?
शुक्राणू आणि स्त्रीबीज ह्यावर बाळ मुलगा होणार आहे की मुलगी हे ठरते. प्रत्येक स्त्रीबीज आणि शुक्रजंतू मध्ये ‘sex chromosome’ असतात. त्याचे दोन प्रकार असतात XX आणि XY. स्त्रीबीजामध्ये XX तर शुक्राणूमध्ये XY गुणसूत्रे असतात. जर X गुणसूत्राचा X गुणसूत्राशी संयोग झाला तर मुलगी होते आणि X गुणसूत्राचा Y गुणसूत्राशी संयोग झाला तर मुलगा होतो. बाळाचे सगळे गुण, नाक डोळे , वागणं हे त्याच्या आई बाबांकडून येते. त्यामुळे तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वानुसार बाळाचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्व तयार होते.
बाळ होण्याआधी तुमची मानसिक, शारीरिक, भावनिक अशी सगळीच तयारी हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या दोघांचा बंध घट्ट असला पाहिजे म्हणजे ह्या जगात तुमच्या बाळाचे स्वागत प्रेम आणि जिव्हाळ्यासह होईल.