In this Article
मुलांना दात घासायला लावणे सोपे नाही. जर तुमच्या लहान बाळाला दात घासायला आवडत नसतील तर, त्याची सकाळची दिनचर्या ठरवणे आणि तुम्ही त्याचे दात घासून देणे कठीण होईल. बाळ चिडचिड करू शकते त्यामुळे तुम्हाला प्रयत्न सोडावेसे वाटतील. परंतु लहान मुलांना दातांच्या स्वच्छतेच्या सवयी आधीपासूनच लावणे सुद्धा महत्वाचे आहे. दातांच्या स्वच्छतेच्या सवयी लावल्यास त्यांना त्यांच्या दातांची काळजी घेण्याचे महत्त्व समजण्यास मदत होऊ शकते आणि लहान वयातच तोंडाला दुर्गंधी येणे किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण होणे टाळले जाऊ शकते.
तुम्हाला तुमच्या बाळाच्या दातांची काळजी का घ्यावी लागते आणि तुम्ही तुमच्या बाळाला कसे दात घासायला लावू शकता हे जाणून घेण्यासाठी वाचा.
तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या दातांची काळजी घेण्याची गरज का आहे?
तुमच्या बाळाच्या दातांची स्वच्छता राखण्याची गरज का आहे ह्याची कारणे खाली दिलेली आहेत:-
- अन्नपदार्थ चावून खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी तुमच्या बाळाचे दात त्याला मदत करतील.
- तुमच्या लहान मुलाचे दात ‘कायमचे दात‘ तयार करण्यासाठी हिरड्या आणि जबड्याना मदत करतात.
- निरोगी हिरड्यांमुळे तुमच्या बाळाच्या दातांचे योग्य संरेखन होऊ शकते.
- दात स्वच्छ ठेवल्यास दातांमध्ये पोकळ्या तयार होत नाहीत आणि दातांच्या स्वच्छतेची सवय देखील लागते आणि तो मोठा झाल्यावर सुद्धा ही सवय टिकून राहू शकते
तुमच्या बाळाचे दात घासण्यास कधी सुरुवात कराल?
तोंडाच्या स्वच्छतेची सुरुवात लहान वयातच होऊ शकते. तुमचा बाळ लहान असल्यापासून तुम्ही प्रत्येक फीडिंग सेशननंतर त्याचे तोंड स्वच्छ करू शकता. तुम्ही तुमच्या एका हातात त्याचे डोके धरून हे करू शकता आणि दुसऱ्या हाताचा वापर करून त्याचे तोंड मऊ कापडाने, सॅनिटाइज्ड कापडाने किंवा झायलिटॉल वाइपने हळूवारपणे पुसून टाकू शकता. जेव्हा तुमच्या बाळाच्या तोंडात तुम्हाला त्याचा पहिला दात दिसेल, तेव्हा तुम्ही त्याचे दात घासण्याची दिनचर्या सुरू करू शकता.
तुमच्या बाळाचे दात घासण्यास सुरुवात करताना लक्षात ठेवण्याचे मुद्दे
तुम्ही तुमच्या बाळाचे दात घासण्याची दिनचर्या जेव्हा सुरू करता तेव्हा, येथे काही गोष्टी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
- तुमच्या बाळाचे दात घासताना, टूथपेस्टचा वापर करा. 0 ते 3 वर्षे वयोगटातील बाळांसाठी वापरल्या जाणार्या टूथपेस्टचे प्रमाण स्मीअरपेक्षा जास्त किंवा दाण्याएवढे नसावे. 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, वाटाण्याच्या आकाराएवढ्या टूथपेस्टची शिफारस केली जाऊ शकते. आपल्या मुलासाठी टूथब्रश निवडताना, त्याचे डोके लहान आणि ब्रिस्टल्स मऊ असल्याची खात्री करा.
- तुमच्या मुलाला सिंकजवळ उभे करा. दात घासताना तुमच्या मुलाला आरशात स्वतःकडे पाहू द्या.
- हिरड्यांजवळ कोणत्याही प्लाक तयार झालेला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या लहान मुलाचे तोंड तपासा.
- कोणतीही पोकळी आहे का हे पाहण्यासाठी तुमच्या लहान बाळाला त्याचे तोंड उघडण्यास सांगा.
- तुमच्या चिमुकलीला ब्रश केल्यानंतर टूथपेस्ट थुंकण्यास सांगा.
- टूथब्रश दर तीन किंवा चार महिन्यांनी किंवा तो जीर्ण झाल्यावर बदला.
- तुमच्या बाळाला दिवसातून दोनदा, सकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा ब्रश करण्यास प्रोत्साहित करा.
आपल्या लहान बाळाचे दात कसे घासावेत?
तुम्हाला तुमच्या बाळाला नियमित सूचना देऊन दात योग्य प्रकारे कसे घासायचे ते शिकवावे लागेल. हे करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आपल्या बाळासोबत उभे राहणे आणि त्याला मार्गदर्शन करणे होय. जर तो खूप लहान असेल तर तुम्ही त्याचे दात घासू शकता. तुम्ही त्याचे दात घासताना
- लहान, गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे ब्रश करा.
- ब्रशला 45-अंशाच्या कोनात गम लाईनच्या दिशेने धरा आणि गोलाकार हालचालीत पुढे आणि मागे हलवा.
- सुरुवातीला मागचे दात घासा आणि नंतर पुढचे दात घासा.
- समोरच्या दातांच्या मागील बाजूस वरच्या आणि खालच्या जबड्यांवर ब्रश करताना ब्रशचे टोक सरळ स्थितीत ठेवा.
- हिरड्यांची किनार हळूवारपणे स्वच्छ करा.
- पृष्ठभागावरील कोणतेही जीवाणू काढून टाकण्यासाठी जीभ हळूवारपणे ब्रश करा.
- आपल्या लहान बाळाला टूथपेस्ट थुंकून टाकण्यास सांगा.
- आपल्या मुलाने दात घासल्यानंतर सिंक साफ करण्यास मदत करा.
- प्रत्येक वापरानंतर, टूथब्रश स्वच्छ करा आणि कोरडे होऊ द्या.
तुमच्या लहान मुलाचे दात घासण्यासाठी टिप्स
लहान बाळांना योग्य गोष्टी करायला लावणे कठीण असू शकते. परंतु दात घासण्याची सवय जीवनात लवकर लावणे गरजेचे आहे. जर तुमचे बाळ खूपच लहान असेल तर त्याचे दात घासण्यासाठी खालील सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.
- तुमच्या लहान मुलाला स्वतःचा ब्रश आणि टूथपेस्ट निवडू द्या. एक रंगीबेरंगी ब्रश आणि चांगली चव असलेली टूथपेस्ट निवडा. तसेच त्यावर त्यांचे आवडते कार्टून असल्यास त्यांना दात घासताना मजा येईल.
- तुमच्या बाळासोबत ब्रश करा. तुम्ही ते कसे करता ते त्याला पाहू द्या. त्याला त्याचे दात घासताना कदाचित मजा सुद्धा येऊ शकते.
- आनंददायी संगीत किंवा त्याच्या आवडत्या ट्यून मध्ये गुंतवून दात घासतानाची मजा वाढवा.
- तुम्ही बॅटरीवर चालणारा आकर्षक टूथब्रश घेऊ शकता आणि तो टूथब्रश थांबेपर्यंत त्यामधील ट्यून वाजू शकते.
- तुम्ही एक पाऊल पुढे जाऊ शकता आणि तुमच्या बाळाला सराव करू देऊ शकता. त्याहूनही उत्तम म्हणजे, तुम्ही त्याला एक खेळणे देऊ शकता आणि त्यावर ब्रश करण्याचा सराव करण्यास मदत करू शकता.
- ब्रश करताना एक गेम तयार करा. तुमचे बाळ त्याच्या तोंडातील जिवाणू नष्ट करू शकेल अशा छोट्या काल्पनिक खेळांचा शोध लावून तुम्ही ब्रशिंगला रोमांचक बनवू शकता.
- आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या मुलाला ब्रश करतांना पाहू द्या
- ब्रशिंग केल्याबद्दल त्याचे कौतुक करा आणि त्याला बक्षीस किंवा स्टार द्या.
तुमच्या बाळाचे दातांचे आरोग्य हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या बाळाला दात घासायला आवडत नसले तरी, तुम्हाला ते त्याच्यासाठी मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून त्याला दररोज दात घासण्याची सवय लागेल. वरील पद्धती वापरून पहा आणि बाळाचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहावे म्हणौन दररोज त्याला ब्रश करण्यास मदत करा.