In this Article
आपले नुकतेच जन्मलेले बाळ आणि आता १७ आठवड्यांनंतरचे बाळ ह्यामधील फरक खूप लक्षणीय आणि आश्चर्यकारक आहे. नुसते किलकिले डोळे करून पाहणारे बाळ आता वेगवेगळे आवाज करून आपले अस्तित्व सिद्ध करू लागले आहे. जर तुमचे बाळ १७ आठवड्याचे झाले असेल तर त्याने वाढीचा आणखी एक टप्पा पार केला आहे. ह्या वाढीच्या टप्प्यातील काही महत्वपूर्ण घटकांचा आढावा घेऊयात.
१७ आठवड्यांच्या बाळाचा विकास
या टप्प्यावरही, आपल्या बाळाचा विकास पूर्ण ताकदीने चालू आहे. १७ व्या आठवड्यात, तुमचे बाळ असंख्य क्रियाकलापांच्या स्वरूपात लक्षणीय वाढ झालेली दर्शवेल. ज्या गोष्टी बाळ पाहू शकतो किंवा ऐकू शकतो अशा सर्व दृष्टीने त्याचा मेंदू त्याच्या आजूबाजूच्या जगातील काही गोष्टी समजण्यास सुरुवात करेल. अशा प्रकारे होणारा मानसिक विकास आपल्या छोट्या बाळास संवादासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करते. हा विकास त्याला शक्य तितक्या अनेक मार्गांनी इतरांशी संवाद साधण्यास उत्सुक करतात
१७ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
तुमच्या बाळाचे वय १७ आठवड्याचे होईल तेव्हा त्याचे सामान्य विकासाचे काही महत्वाचे टप्पे आहेत
- तुमच्या लहान बाळाचे वजन त्याच्या जन्माच्या वेळेच्या दुप्पट होणार आहे
- पोटाच्या आकारात दृश्यमान फरक असेल आणि तो वाढेल
- जर बाळ आधीपासून पालथे पडत असेल तर आता ते वारंवार पालथे पडण्यास सुरुवात करेल. जर बाळ पालथे पडत नसेल तर आता ते पालथे पडण्यास सुरुवात होईल. त्याची छाती, पाठ आणि मान मजबूत झाल्याने ते शक्य होईल
- पोट मोठे असले तरी फीड्सची संख्या किंचित कमी होईल. या वयात आपल्या बाळाची निरोगी वाढ होण्यासाठी आणि संक्रमणास सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषणासाठी आणि अँटीबॉडीजसाठी अद्याप स्तनपानाचा आहार हा एक उत्तम पर्याय आहे
- आपले बाळ अधिक उत्सुक होईल आणि त्याच्या सभोवतालच्या प्रत्येक नवीन वस्तू बघून मोहित होईल. अशा प्रकारे तो नाद, वास आणि रंगामुळे उत्सुक होईल. तुम्ही वापरत असलेल्या नवीन परफ्यूम किंवा तुम्ही घातलेला विविध रंगाचा ड्रेस यावर कदाचित प्रतिक्रिया दर्शवेल
- तुमच्या बाळाची स्मरणशक्ती इतर संज्ञानात्मक बाबींसह विकसित होण्यास सुरवात होते, ज्यामुळे त्याला काही दिवस विविध गोष्टी आठवतात
- त्याच्या भावना व्यक्त करण्याची अधिक आवश्यकता असल्यास, तुमचे बाळ इतरांशी संवाद साधण्यास सुरुवात करेल किंवा तुमचे अधिक बारकाईने निरीक्षण करेल. तो आपले डोके वळवून किंवा जोरात हसून आपल्या टोपणनावाला प्रतिसाद देऊ शकेल
- श्रवणविषयक संवेदनांबरोबरच, तुमच्या बाळाचे व्हिज्युअल सामर्थ्य विकसित होते ज्यामुळे त्याला समान रंगाच्या वेगवेगळ्या छटा किंवा वेगवेगळे रंग ओळखण्याची क्षमता प्राप्त होते
- बाळ त्याला हवे असलेले खेळणे किंवा कपडे ओळखते तेव्हा बाळाची ही क्षमता दिसून येते
- तुमचे बाळ जास्त वस्तू घेऊन तोंडात घालू लागेल. समन्वय अद्यापही आवश्यकतेइतका चांगला होणार नाही. त्यामुळे एखादे खेळणे खेळण्यासाठी अंतराचा किंवा हालचालींचा नीट अंदाज बाळाला येणार नाही
आता आपण बाळाच्या वाढीच्या प्रत्येक बाबीकडे थोडे सखोल नजर टाकूया:
१. दूध देणे
१७ व्या आठवड्यांत, तुमचे बाळ आजूबाजूला जे काही पाहतो किंवा ऐकतो त्या प्रत्येक गोष्टीस आत्मसात करण्यास तयार होईल. जरी या विकासाची आवश्यकता असली तरी जेव्हा बाळाला दूध देण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला कदाचित आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बाळाला स्तनपान कराल तेव्हा बाळ विचलित होईल. बाळाचे स्तनपानावरील लक्ष विचलित होऊन तो आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेऊ लागेल. स्तनपान घेताना व्यत्यय आणणे, स्तनपान घेण्यास नकार देणे किंवा मध्येच सोडणे तसेच बाळाचे विचलित होणे अगदी थोड्या वेळाने वारंवार होते. हे सततचे विचलित होणे आणि स्तनपानाकडे लक्ष परत आणण्यामुळे तो अस्वस्थ आणि हट्टी होऊ शकतो.
यासाठी तुम्हाला कदाचित बाळाला स्तनपान देण्याच्या सवयी किंवा वेळापत्रकांमध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता असू शकेल. आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी घरात शांत कोपरा असावा किंवा खोली असली पाहिजे. तसेच, जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात दिवसभर गोंगाट असेल तर स्तनपान वारंवार आणि जास्त वेळा दिले जाऊ शकते. ह्या काळात स्तनपानाचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी आपले शरीर त्यानुसार अनुकूल बदल करते. काही प्रकरणांमध्ये, आपण आपल्या बाळाला स्तनपान देताना त्याला सभोवतालच्या जगाचे निरीक्षण करण्यात मग्न ठेवण्याने मदत देखील होऊ शकते.
३. बाळाची झोप
जर बाळाला दूध पाजणे एक आव्हान असेल तर लहान बाळाला झोपवायला सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागेल. १७ आठवड्यांच्या बाळाचे झोपेचे चक्र अद्याप नियमित झालेले नाही आणि कोणत्याही प्रकारचा व्यत्यय किंवा उत्तेजनामुळे बाळ उत्तेजित होऊ शकते आणि त्याला झोपेचा त्रास होऊ शकतो. ह्या काळात बहुतेक माता दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी झोपी जाण्याची कला प्राप्त करतात. कधीकधी, आपल्या बाळासाठी योग्य झोप घेणे नेहमीच शक्य नसते आणि दिवसभर तो थोडा थोडा वेळ झोपतो आणि कदाचित बाळासाठी तेवढी झोप पुरेशी असते. डिजिटल उपकरणे दूर ठेवणे, हलके संगीत लावणे, बाळासाठी गाणे गुणगुणणे किंवा शांत दुपारी बाळाला स्ट्रोलर मध्ये बसवून फिरायला नेल्यास बाळाला झोप येण्यास मदत होईल. बाळामध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा असेल, त्यामुळे झोपेच्या वेळी त्याच्या हातापायांच्या हालचालींमध्ये वाढ होईल. बाळ क्रिबमध्ये सुद्धा हालचाल करू लागते. म्हणूनच, जरी तो गुंडाळल्यावर हात पाय बाहेर काढू शकतो तरी सुद्धा त्याला लपेटून ठेवणे अजूनही चांगले आहे.
३. चाचण्या आणि लसी
आवश्यक असणाऱ्या लसी १४ आठवड्यांच्या वयापर्यंत दिल्या जातात. म्हणूनच, तुमच्या १७ आठवड्यांच्या बाळाचे एकतर लसीकरण होणार नाही, किंवा द्यायच्या राहिल्या आहेत अशाच लसी दिल्या जातील. जर सर्व लसी यशस्वीरित्या दिल्या गेल्या तर हा आठवडा तुमच्या बाळासाठी लसीकरणमुक्त आहे.
४. खेळ आणि क्रियाकलाप
आतापर्यंत तुमच्या बाळास विशिष्ट वस्तू आणि लोक कसे दिसतात हे समजण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांकडे बरेच तास बारकाईने निरीक्षण करून, तो तुम्ही कशा दिसता आणि तो त्यावर कसा अवलंबून राहू शकतो या आठवणीत त्याने एक चित्र रंगविणे सुरू केले असेल. तुमच्या आवाजाचा स्वर, तुम्ही ज्या प्रकारे पाहता आणि हसता ह्या सर्व बाबी तुमच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनतात. म्हणूनच विचित्र चेहरे आणि मजेदार आवाज बनविणे या टप्प्यावर पूर्वीपेक्षा जास्त कार्य करते असे दिसते. काही वस्तू जसे की भांडी, रंगीबेरंगी फॅब्रिक, खेळणी इ. गोळा करा आणि त्या आपल्या बाळासाठी हेडगियर प्रमाणे घाला. प्रत्येकवेळी तुमच्या ह्या अनोख्या चेहऱ्याला अनोखा आवाज द्या. हे सर्व तुमच्या लहान बाळासाठी मनोरंजक असेल आणि त्याबद्दल तो तुमच्यावर प्रेम करेल!
या वयात बाळे विशिष्ट खेळांचा आनंद घेतात. सर्वात लोकप्रिय क्रियांपैकी एक म्हणजे आपण एकत्र नौका चालवत असल्यासारखे भासविणे. आपल्या बाळाच्या बाहूंमध्ये आणि त्याच्या मागच्या भागामध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी रोइंग–ऍक्शन उत्कृष्ट आहे. आपल्या बाळाला पलंगावर बसू द्या आणि त्याला आधार देण्यासाठी मागे उशी ठेवा. मग, त्याचे दोन्ही हात आपल्या हातात धरून घ्या आणि त्यांना पुढे मागे करा. ही क्रिया करत असताना तुम्ही पाण्याचा आवाज करू शकता किंवा बाल गीते देखील गाऊ शकता.
दरमहा लहान बाळांची नियमित तपासणी केली जाते, परंतु बाळ जेव्हा १७ आठवड्यांचे होते तेव्हा पालकांनी बाळाला बालरोगतज्ञाकडे नेण्याची आवश्यकता असू शकते. आपण कुठल्या परिस्थितीत आपल्या बाळाला डॉक्टरांकडे नेऊ शकता त्यावर एक नजर टाकूया.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
आपले बाळ बहुधा सामान्यपणे प्रगती करत असेल आणि योग्य वेळी त्याचे सर्व टप्पे गाठेल. तथापि, विलंब झाल्यास आपण बालरोगतज्ञाचा सल्ला घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुमच्या बाळाला मानेवर पूर्ण नियंत्रण प्राप्त झालेले नसेल किंवा त्याचे डोके अद्याप डगमगत असेल आणि तो संतुलन गमावत असेल तर त्याचा विकास हवा तसा होत नसल्याची शक्यता आहे.
त्या व्यतिरिक्त, बहुतेक बाळे पुनरावृत्ती होणार्या आवाजांना प्रतिसाद देतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचे नाव प्रत्येक वेळी घेता आणि जेव्हा आपण त्याला खाऊ घालता किंवा अंघोळ घालता तेव्हा तुम्ही विशिष्ट आवाज केला तर तो प्रतिक्रिया देईल. कदाचित तो भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे आवाज काढू शकतो, हसू शकतो किंवा लाथ मारू शकतो. जर तुम्ही त्याला कितीही वेळा हाक मारली किंवा आवाज काढला तरीही आपल्या बाळाने यापैकी कोणतीही प्रतिक्रिया दर्शविली नाही तर त्याची संवेदनाक्षम समज किंवा मानसिक विकासामध्ये काही समस्या उद्भवू शकतात. अशा दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्ही बालरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा आणि आपल्या बाळाची तपासणी करुन घ्यावी.
तुमच्या १७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स
तर, आम्हाला माहिती आहे की बाळाची वाढ होत असताना काही आव्हानांना सामोरे जावे लागते. आपल्या बाळाची वाढ सर्वोतोपरी योग्य होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समायोजित करण्याची, परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि अंगीकारण्याची आवश्यकता असू शकते. तुमच्या बाळाचे हे विकासात्मक टप्पे व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्यासाठी काही टिप्स येथे देत आहोत.
- आपले बाळ कितीही हट्टी असले तरीही निरंतर निरोगी वाढीसाठी त्याचे स्तनपान योग्य होते आहे ना हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. फीड्स पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक ठरवा आणि बाळाची सतत वजनवाढ होत आहे ना ह्यावर लक्ष ठेवा
- तुमच्या बाळाला एकटे पलंगावर किंवा टेबलावर ठेऊ नका कारण आता आजूबाजूला फिरू शकेल किंवा अचानक तसे करण्याचा निर्णय घेईल. कोणतीही तीक्ष्ण वस्तू किंवा निरुपयोगी वस्तू बाळाच्या जवळपास ठेऊ नका
- बर्याच बाळांना व्यस्त रहायला आवडते आणि ती नेहमीच बडबड सुरु ठेवतात. जर आपल्या बाळाने तसे केले असेल आणि त्याला एकटेच थोडा वेळ घालवायला आवडत असेल तर त्याला तसे करू द्या. तथापि, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कोणताही अपघात रोखण्यासाठी नेहमीच सदैव त्याच्या जवळपास रहा.
प्रत्येक विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर, तुमचे आणि बाळामधील बंध अधिक मजबूत बनू लागतील. जेव्हा तुमच्या बाळाचे वय १७ आठवड्यांचे होते तेव्हा हे विशेषतः खरे आहे कारण तो तुम्हाला ओळखू लागेल तसेच प्रतिसाद देऊ लागेल. हे सगळे आनंददायी क्षण आहेत आणि सर्व पालकांनी ते साजरे केले पाहिजेत.
मागील आठवडा: तुमचे १६ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे १८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी