मोठी मुले (५-८ वर्षे)

शिक्षक दिनाच्या ५ मराठी कविता

अगदी पुराण काळापासून गुरुचे महत्व सांगितलेले आहे. आपल्या आई वडिलांइतकेच गुरूला महत्व आहे. आयुष्याची वाटचाल करताना आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणूनच प्रत्येकाला आयुष्यात गुरु हवा असतो. शिक्षकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या मनातल्या भावना काव्यातून व्यक्त केल्या तर त्या जास्त अलंकारिक रीतीने पोहोचतात. म्हणूनच इथे आम्ही काही छोट्या कविता देत आहोत. तुम्ही ह्या कविता तुमच्या शिक्षकांना पाठवून कृतज्ञता व्यक्त करू शकता

शिक्षकदिनासाठी 5  मराठी कविता

कविता क्र. १

ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी.. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून , गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून... माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली, मोक्ल्याहती जाईल कशी बायको मात्र वाचली ... भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... कार्भारीनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे... खिशाकडे हात जाताच हासत हासत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा  वाटला... मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.. - कुसुमाग्रज

कविता क्र. २

आदी गुरुसी वंदावे ! मग साधनं साधावे !! गुरु म्हणजे मायबाप ! नाम घेता हरतील पाप !! गुरु म्हणजे आहे काशी ! साती तीर्थ तया पाशी !! तुका म्हणे ऐसे गुरु ! चरण त्यांचे ह्रदयी धरू !! - संत तुकाराम महाराज

कविता क्र. ३

आयुष्याच्या वाटेवरचा असशी तू दीपस्तंभ तिमिरातुनी तेजाकडे दिशा दाखवणारा आधारस्तंभ पाठीवरती शाबासकी कधी तळहातावर छडी निरपेक्ष ज्ञानाचे दान जणू परमेश्वरी वरदान कुंभार जसा घडवी मडके घडवता तुम्ही माणसाशी ऊर्जा, ज्ञान आणि विरक्ती नाही कसली आसक्ती कित्येक वाटा चाललो जरी गुरुविण नाही दुजा आधार गुरुविण नाही दुजा आधार

कविता क्र. ४

भाग्य होते म्हणुनी गुरु लाभला ज्ञान दान करुनि ज्याने माणूस घडविला कधी मेणाहून मऊ कधी लोखंडासम कठोर आई आणि गुरु माउली थोर वाट चुकू नये म्हणुनी वाट दाखविशी शिकवताना माणसाशी जीवनात घडविशी

कविता क्र. ५

गुरुचरणी नतमस्तक व्हावे भरभरून ते आशीर्वाद घ्यावे कृतज्ञता,आभार भरभरून द्यावे आयुष्यात यशाकडे जात रहावे तिमिरातुनी तेजाकडे वाट दाखवूनी ज्ञानाचे भांडार उघडून देई गुरु तोचि देव दिसे ठाई ठाई आपल्या सगळ्यांना गुरूशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. आपण सगळे योग्य मार्गावरून जात आहोत की नाही हे फक्त गुरूच सांगू शकतात. म्हणून आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक नमन करण्यासाठी ह्या लेखात दिलेल्या ह्या कविता तुम्हाला नक्कीच मदत करतील.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved