In this Article
छोले (काबुली चणे) खायला कुणाला आवडत नाहीत? ह्या डिशचा आपण सर्वजण आनंद घेतो. परंतु जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही काय खात आहात ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. छोले म्हणजेच काबुली चणे हा त्यापैकीच एक अन्नपदार्थ आहे. गरोदरपणात पहिल्या ते तिसर्या तिमाहीदरम्यान तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही छोले खाणे पूर्णपणे बंद करावेत असे नाही. ते खाण्याच्या तोट्यांपेक्षा फायदे अधिक आहेत आणि गरोदरपणात त्याचा स्त्रियांना चांगला फायदा होतो. गरोदरपणात काबुली चणे खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
गरोदरपणात काबुली चणे खाणे सुरक्षित आहे का?
गरोदरपणात काबुली चणे खाणे सर्वात सुरक्षित मानले जाते. फक्त ते योग्यरीत्या म्हणजेच मऊ होईपर्यंत शिजवणे आवश्यक आहे. नेहमी ते मध्यम प्रमाणात खावे. काबुली चणामध्ये उच्च पौष्टिक मूल्य असते आणि त्यामधून प्रथिने, खनिजे आणि फॉलिक ऍसिड हे पौष्टिक घटक मिळतात. हे सगळे पौष्टिक घटक गरोदरपणात आवश्यक असतात.
गरोदरपणात काबुली चणे खाण्याचे फायदे
काबुली चण्यामुळे बाळ आणि आई दोघांनाही अनेक प्रकारे फायदा होतो. हा फायदा कसा होतो ते वाचण्यासाठी हा लेख वाचा.
१. न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास काबुली चणे मदत करतात.
अभ्यासात असे दिसून आले आहे की काबुली चणे फोलेट किंवा फॉलिक ऍसिडने समृद्ध असतात. शरीरात फॉलिक ऍसिडची उपस्थिती म्हणजे वरदान ठरली आहे कारण त्यामुळे स्पायना बिफिडा आणि ऍनेसेफली सारख्या न्यूरल ट्यूब दोष टाळण्यास मदत होते. सामान्यतः तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात या मज्जातंतूतील दोषांमुळे गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे, पुढच्या वेळी गरोदरपणात बेसन सुरक्षित आहे की नाही याबद्दल तुम्हाला प्रश्न पडेल , तेव्हा लक्षात ठेवा की फॉलेटची उच्च पातळी गर्भाला निरोगी ठेवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.
२. अॅनिमिया
अॅनिमिया झाल्यास एकतर लाल रक्तपेशींची संख्या कमी होते किंवा हिमोग्लोबिन कमी होते. त्यामुळे शरीराच्या ऊतींना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होतो. अॅनिमिया दीर्घकालीन किंवा तात्पुरता असू शकतो. लाल रक्तपेशींची पातळी योग्य राखण्यासाठी, गरोदर स्त्रियांनी लोहयुक्त अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे. एक चांगली गोष्ट म्हणजे काबुली चण्यामध्ये प्रत्येक १००–ग्रॅम सर्व्हिंगमध्ये जवळपास २२ % लोह असते, त्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात आणि गरोदरपणातील थकवा आणि मळमळ यापासून काही प्रमाणात आराम मिळतो.
३. ऊर्जेचा उत्तम स्रोत
गरोदरपण हा एक आव्हानात्मक प्रवास आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. जसजसा गरोदरपणातील कालावधी वाढत जाईल तसतसे तुम्हाला खूप थकवा जाणवू लागेल आणि म्हणून, तुमच्या गर्भाचे अतिरिक्त वजन वाहून नेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त उर्जेची आवश्यकता भासेल. ह्या टप्प्यावर काबुली चणे तुमच्या बचावासाठी येऊ शकतात. गरोदरपणात काळे काबुली चणे (काळे चणे) खाण्याचे फायदे दुर्लक्षित करता येत नाहीत. काळे किंवा काबुली चणे गरोदरपणात तुम्हाला येणाऱ्या शारीरिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवतात.
४. मेंदूचा विकास
काबुली चण्यामध्ये कोलीन नावाचा सूक्ष्म पोषक घटक असतो. हा घटक मेंदूच्या विकासात आणि निरोगी नसा तयार करण्यासाठी मदत करतो. गरोदरपणात तुम्ही काबुली चणे खाल्ल्याने गर्भाचा मेंदू आणि पाठीचा कणा विकसित होण्यास मदत होईल. 100 ग्रॅम चणामध्ये 43 ग्रॅम कोलीन असते. ह्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते?
५. एकूणच गर्भाचे आरोग्य
काबुली चण्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फेट, मॅंगनीज, झिंक आणि व्हिटॅमिन के असतात आणि ते एकत्रितपणे हाडांची मजबूती आणि कूर्चा तयार करण्यास मदत करतात. काबुली चणे पेशींचे संरक्षण करतात आणि अमीनो ऍसिड आणि कार्बोहायड्रेट्सच्या चयापचयात मदत करतात. महिलांना दररोज सुमारे २ मिग्रॅ मॅंगनीजची आवश्यकता असते. एक कप (अंदाजे १६४ ग्रॅम) चण्यांमधून सुमारे १.६९ मिग्रॅ मॅंगनीज मिळू शकते.
६. गरोदरपणात एकूण आरोग्य आणि वजन नियंत्रण
हा अन्नपदार्थ रक्तदाब सामान्य राखण्यास मदत करतो. खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतो. तसेच त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहून तीव्र सूज कमी होण्यास मदत होते. त्यामधील आहारातील फायबरचे उच्च प्रमाण बद्धकोष्ठता आणि दाह होण्यापासून बचाव करून पचनास मदत करते. काबुली चणे प्रथिनांसाठी देखील एक उत्तम पर्याय मानला जातो. ज्यांना ग्लुकोज असहिष्णुता आहे त्यांच्यासाठी ह्याची शिफारस केली जाते. गरोदरपणात, तुमचे वजन एक समस्या बनू शकते. परंतु काबुली चण्यामुळे तुमचे वजन आणि लठ्ठपणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
फायद्यांसोबतच, तुम्हाला गरोदरपणात काबुली चण्यांचे दुष्परिणाम देखील माहित असले पाहिजेत. त्यावरही एक नजर टाकूया.
गरोदरपणात काबुली चणे खाण्याचे दुष्परिणाम
काबुली चण्याचे विविध फायदे असले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात काबुली चण्याचे सेवन केल्यास त्यांचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात:
- काबुली चण्यांमुळे तुम्हाला ऍलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते
- काबुली चण्यामुळे काही स्त्रियांना आम्लपित्त होऊ शकते. परंतु काळजी करू नका. रात्रभर भिजवून ठेवल्यास तुमची ऍसिडिटी पासून सुटका होऊ शकते.
- काबुली चण्यामध्ये प्युरीन असते ज्यामुळे यूरिक ऍसिडची जास्त निर्मिती होऊन गाउट होतो.
- काबुली चण्यामुळेही मुतखडा होऊ शकतो.
- जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल तर काबुली चणे खाणे टाळावे कारण त्यात आहारातील फायबरमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
- काबुली चणे सारख्या उच्च फायबरयुक्त अन्नाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, परंतु कमी शिजवलेले काबुली चणे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आणि अश्या समस्या तुम्ही गरोदरपणात टाळल्या पाहिजेत.
- कोणतेही अन्न जास्त खाणे हानिकारक आहे. काबुली चण्याच्या बाबतीतही तेच आहे. नियमितपणे काबुली चणे खाल्ल्याने पोटदुखी होते. जास्त प्रमाणात काबुली चणे खाल्ल्याने पोट फुगते आणि गॅस जमा झाल्यामुळे अस्वस्थता येते.
- काही वेळा, ज्या स्त्रियांना सोयाबीनची ऍलर्जी आहे त्यांना देखील काबुली चण्याची ऍलर्जी होऊ शकते. त्यांना खाज सुटणे, मळमळ होणे किंवा पोट खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळी काबुली चणे खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे.
हे दुष्परिणाम सर्वच गर्भवती स्त्रियांमध्ये दिसून येत नाहीत. काहींना अजिबात कुठलाच त्रास होत नाही आणि अश्या स्त्रिया काळजी न करता चण्यांचा आस्वाद घेऊ शकतात. असे असले तरी, हे काबुली चणे पचण्यास सोपे जावेत म्हणून तुम्ही त्यांना योग्य प्रकारे शिजवावे. त्यानंतर तुम्ही या शिजवलेल्या काबुली चण्याचे अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. काबुली चण्याच्या काही पाककृती बनवण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.
काबुली चणे कसे शिजवायचे?
काबुली चणे शिजवण्यासाठी येथे काही उपयुक्त टिप्स आहेत:
- सहसा, चण्याची कोणतीही डिश तयार करण्यासाठी, काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून घ्या. भिजवल्याने शिजण्याची वेळ कमी होण्यास मदत होते आणि चणामधील काही अम्लीय घटक देखील दूर होतात.
- काबुली चणे योग्य प्रकारे उकडून घेतल्यानंतर, त्यांना तुमच्या आवडीचे काही मसाले घालून चांगले परतून घ्या म्हणजे तुमची डिश तयार होईल.
- जर तुम्ही कॅन केलेला काबुली चणे वापरणार असाल, तर तुम्ही फक्त डबा उघडून ते खाण्याचा आनंद घेऊ शकता. परंतु ते शिजवून खाणे चांगले असते. कॅन केलेले अन्नपदार्थ टाळा कारण गरोदरपणात ते आरोग्यदायी नाही.
- काबुली चणे खाण्याची दुसरी पद्धत म्हणजे काबुली चणे असो किंवा काळे चणे ह्यापैकी कुठल्याही प्रकारचे चणे नीट उकडून घ्या. उकडल्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरपूड, टोमॅटो आणि कोथिंबीर घाला. ही डिश गर्भवती स्त्रियांसाठी, नाश्त्यासाठी एक उत्तम डिश आहे.
- तुम्ही ऑलिव्ह ऑइल मध्ये थोडे काबुली काबुली चणे मसाला घालून भाजून घेऊ शकता आणि आणखी एक स्वादिष्ट आणि कुरकुरीत स्नॅक बनवू शकता.
- उकडलेले काबुली चणे सूपमध्ये घालणे हा चांचे सेवन करण्याचा आणखी एकचांगला मार्ग आहे. ही डिश तुमची भूक भागवण्यासाठी पोटभरीचे आणि योग्य आहे. शिवाय, त्यामुळे तुम्हाला सूप सुद्धा चविष्ट लागेल.
- आणखी एक चवदार स्नॅक तयार करण्यासाठी तुम्ही चण्यांमध्ये दही घालू शकता. पदार्थाची चव वाढवण्यासाठी तुम्हीत्यामध्ये काकडी किंवा मनुके देखील घालू शकता.
हे काबुली चण्याचे काही फायदे आणि दुष्परिणाम होते. आम्हाला वाटते की तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू पहा आणि त्यानुसार तुमच्या आहारात काबुली चण्यांचा समावेश करा. आपले स्वतःचे आणि गर्भाचे आरोग्य राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे, काबुली चणे खाताना, ते चांगले शिजवा आणि त्यापासून वरीलपैकी एक स्वादिष्ट पदार्थ तयार करा. त्या पदार्थांचा पूर्ण आनंद घ्या. परंतु ते नेहमी कमी प्रमाणात खाण्याचे लक्षात ठेवा.
आणखी वाचा:
गरोदरपणात केळी खाणे
गरोदरपणात आवळा खाणे – फायदे, खाण्याच्या पद्धती आणि बरंच काही