गर्भारपण

गरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार

तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्हाला आरोग्याची आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे कारण या काळात आरोग्याच्या कोणत्याही समस्येमुळे गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होऊ शकते. गरोदरपणात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे तुमची त्वचा चमकदार होते किंवा केस घनदाट होतात, परंतु यामुळे टॉन्सिलायटिससारख्या अनेक समस्या सुद्धा उद्भवू शकतात. टॉन्सिलायटिस ही एक संसर्गजन्य वैद्यकीय समस्या आहे. संसर्गामुळे टॉन्सिल्सला सूज येते. गरोदरपणात टॉन्सिलायटिसला सूज येणे ही एक गंभीर समस्या आहे कारण यामुळे तुम्हाला तसेच तुमच्या बाळालाही धोका पोहोचू शकतो.

टॉन्सिलायटिस म्हणजे काय?

टॉन्सिल म्हणजे माणसाच्या घशातील लिम्फयाटिक टिश्यू होय. ते घश्याच्या मागच्या बाजूला असतात. टॉन्सिल्स शरीराची मुख्य संरक्षण रेषा म्हणून कार्य करतात आणि विविध संसर्गापासून शरीराचे संरक्षण करतात. परंतु, कधीकधी टॉन्सिल्स विषाणू अथवा जिवाणूंच्या संसर्गाला बळी पडतात त्यामुळे त्यांचा आकार वाढतो. अशा प्रकारे टॉन्सिलला जेव्हा सूज येते त्या स्थितीला टॉन्सिलायटिस असे म्हणतात. टॉन्सिलायटिस सौम्य (काही आठवड्यांत बरे) किंवा तीव्र (काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहते) स्वरूपाचे असू शकते. ह्या दोन्ही प्रकारच्या टॉन्सिलायटिस मध्ये ताप येणे, घसा दुखणे, त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात आणि त्यामुळे गरोदरपणात अस्वस्थता वाढते अशा प्रकारे वेळेत टॉन्सिलायटिस उपचार करणे चांगले.

टॉन्सिलायटिसची कारणे काय आहेत?

टॉन्सिलायटिसची काही कारणे खाली नमूद केली आहेत.

टॉन्सिलायटिस लक्षणे

टॉन्सिलायटिसच्या सामान्य लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

टॉन्सिलायटिस गर्भवती स्त्रीसाठी धोकादायक असू शकतो का?

टॉन्सिलायटिस गर्भवती स्त्रीच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते कारण ते कमकुवत प्रतिकार शक्तीचे लक्षण आहे. जर तुम्हाला गरोदरपणात टॉन्सिलायटिस असेल तर तुम्ही इतर संसर्गांप्रती सुद्धा असुरक्षित होऊ शकता. आणि त्यामुळे गर्भपातासह गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एकदा संसर्ग तुमच्या शरीरात शिरल्यानंतर तो गर्भापर्यंत जाऊ शकतो आणि ते बाळासाठी धोकादायक असू शकते. गर्भाशयात संसर्ग, बाळाचा अकाली जन्म आणि कमकुवत प्रसूतीची क्रिया ह्या काही सामान्य समस्या आहेत. ह्या समस्या गरोदरपणाच्या दुसर्‍या तिमाहीत टॉन्सिलायटिसमुळे उद्भवतात. टॉन्सिलायटिसमुळे गरोदरपणात टॉक्सिकोसिस देखील होऊ शकतो. जिवाणूंमुळे होणाऱ्या टॉन्सिलायटिसचा उपचार करण्यासाठी, प्रतिजैविकांचा एक कोर्स आवश्यक आहे, परंतु यामुळे पोट बिघडून अतिसाराची समस्या होऊ शकते आणि आरोग्यास धोका उद्भवू शकतो. तसेच त्यामुळे निर्जलीकरण, जठरासंबंधी त्रास तसेच मळमळ, छातीत जळजळ, उलट्या अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. शिवाय, गर्भवती असताना प्रतिजैविकांचे सेवन गर्भाच्या विकासाच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. टॉन्सिलायटिस तीव्र स्वरूपाचा असल्यास त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि शरीराच्या महत्वाच्या अवयवांना संसर्ग होऊ शकतो. तीव्र टॉन्सिलायटिस असलेल्या गर्भवती स्त्रियांची सामान्यतः सिझेरिअन प्रसूती होते. गरोदरपणात होणाऱ्या स्ट्रेप टॉन्सिलायटिसवर (स्ट्रेप्टोकोकल जीवाणूमुळे) त्वरित उपचार आवश्यक असतात कारण स्ट्रेप टॉन्सिलायटिसमुळे संधिवाताचा ताप (ज्यामुळे हृदयाच्या झडपावर परिणाम होतो) आणि ग्लोमेरुलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाला हानी पोहोचते) यासारखी घातक परिस्थिती उद्भवू शकते.

गरोदरपणात टॉन्सिलायटिसवर उपचार

गरोदरपणात औषधांचा वापर करणे हितावह नाही, म्हणून शक्यतो गर्भधारणेपूर्वी टॉन्सिलायटिसवर उपचार करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणात त्यामुळे टॉन्सिलायटिसचा उपचार करता येत नाही . विषाणूंमुळे झालेल्या टॉन्सिलायटिसवर औषधोपचार आवश्यक नसतात. तथापि, जिवाणूंमुळे झालेल्या टॉन्सिलायटिसवर तुम्हाला प्रतिजैविके घ्यावी लागू शकतात. टॉन्सिलायटिस बरा करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमची तपासणी व तुमच्या स्थितीनुसार काही विशिष्ट एनाल्जेसिक आणि दाहक-विरोधी औषधे लिहून देतील.

गरोदरपणात सुरक्षित उपचार

गर्भवती महिलांना सहसा टॉन्सिलायटिसवर खालील उपचार सुचवले जातात.

गर्भवती महिलांनी टाळले पाहिजे असे उपचार

खाली दिलेले काही उपचार गर्भवती महिलांनी टाळले पाहिजे

टॉन्सिलायटिसवर घरगुती उपचार

गरोदरपणात टॉन्सिलायटिस बरे होण्यास मदत करणारे काही घरगुती उपचार येथे आहेतः

गरोदरपणात टॉन्सिलिटिस कसा रोखायचा?

गरोदरपणात किंवा इतर वेळी सुद्धा टॉन्सिलायटिस पासून बचाव करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी सर्वप्रथम पाणी पिणे आणि हायड्रेटेड रहावे. पुरेसे पाणी आणि इतर द्रव पिण्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. पाणी पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही योग्य स्वच्छता देखील राखली पाहिजे. तुम्ही निरोगी आहार घेत असल्याची खात्री करा. आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, निरोगी पेये, प्रथिने ह्यांचा समावेश करा. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती सुधारेल. गाजर, काकडी, बीट तसेच भाज्यांचे सूप पिण्यामुळे संसर्गाविरुद्ध नैसर्गिकरीत्या लढायला मदत होईल. तळलेले, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा कारण त्यामुळे स्थिती अधिक खराब होऊ शकते. तसेच, रंगीत पदार्थ आणि कृत्रिम सुगंध असलेले पदार्थ टाळा. विषाणू आणि जिवाणू पसरण्यापासून रोखण्यासाठी आपले हात धुवा आणि ज्यांना घशाचा त्रास आहे अशा लोकांशी संपर्क टाळा. आधी काळजी घेणे हे उपचार करण्यापेक्षा नेहमीच चांगले असते, म्हणूनच आवश्यक उपाययोजना करा आणि गरोदरपणात सुरक्षित रहा. टॉन्सिलायटिसच्या उपचारांसाठी बर्‍याच गर्भवती महिला हर्बल काढा किंवा एखादे टिंक्चर औषध म्हणून घेतात. तथापि, खासकरुन गरोदरपणात स्वतःचे स्वतः औषध घेणे टाळा. अन्यथा गरोदरपणात आई आणि बाळ दोघांमध्ये नको असलेली गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आणखी वाचा: गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय गरोदरपणातील सर्दीवर परिणामकारक घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved