In this Article
गरोदर स्त्रियांच्या चमकदार त्वचेमुळे नेहमी त्यांचे कौतुक होते. परंतु, त्यांच्या शरीरात असंख्य, अंतर्गत आणि बाह्य बदल होत असतात. डोळ्याखालची काळी वर्तुळे हा त्यापैकीच एक बदल आहे. गरोदर स्त्रियांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे हे सामान्य आहे . थोडक्यात सांगायचे झाले तर, काळी वर्तुळे झोप नीट न होणे , तणाव इत्यादी मुळे दिसू लागतात. जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसत असतील तर ती कमी करण्यासाठी काही उपाय आहेत. अधिक जाणून हा लेख संपूर्ण वाचा.
गरोदरपणात तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे होऊ शकतात का?
होय, गर्भवती असताना तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होण्याची शक्यता असते. वैद्यकीयदृष्ट्या, या स्थितीला ‘मेलास्मा‘ असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये ह्याचे वर्णन ‘प्रेग्नन्सी मास्क‘ असेही करतात. जेव्हा त्वचेतील मेलेनिन डोळ्यांच्या आजूबाजूला जमा होते तेव्हा डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होण्यास सुरुवात होते.
गर्भवती महिलांमध्ये काळी वर्तुळे कशामुळे होतात ते बघूयात.
गरोदरपणात काळी वर्तुळे कशामुळे होतात?
काळी वर्तुळे तयार होण्यामागे पिग्मेंटेशन हे एक प्रमुख कारण असले तरी, त्यामागे इतरही अनेक कारणे आहेत.
१. संप्रेरकांमुळे रक्तवाहिन्यांचा प्रसार होणे
गर्भवती महिलेच्या शरीरात सतत संप्रेरकांच्या पातळीमध्ये चढ–उतार होत असतात. ह्याचा रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम होऊ शकतो. अधिक रक्त सामावून घेण्यासाठी त्यांचा आकार वाढतो. डोळ्यांखालील त्वचा चेहऱ्याच्या इतर भागांच्या त्वचेपेक्षा खूप नाजूक आणि पातळ असते. डोळ्यांखाली पसरलेल्या रक्तवाहिन्यांमुळे तो भाग गडद होतो त्याला आपण सामान्यतः काळी वर्तुळे (डार्क सर्कल) म्हणतो.
२. व्यायामाचा अभाव
व्यायामामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. निरोगी व्यक्तीचे रक्त लाल रंगाचे असते. कारण रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो. जेव्हा व्यायामाच्या अभावामुळे ऑक्सिजन संश्लेषण कमी होते, तेव्हा रक्ताचा रंग निळसर–काळा होतो, त्यामुळे त्वचेचे काही भाग काळसर दिसतात.
३. अपुरी झोप
झोपेची कमतरता किंवा अपुरी झोप हे डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचे एक प्रमुख कारण आहे. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेला पुनर्प्राप्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे डोळ्यांवरही ताण येतो आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात.
४. द्रव धारण
अनेक गर्भवती महिलांमध्ये द्रव धारणा ही एक सामान्य समस्या आहे. जरी हा घटक काळी वर्तुळे तयार होण्यास कारणीभूत नसला तरी सुद्धा द्रव धारण करून ठेवल्यामुळे सूज येऊ शकते. ह्यामुळे प्रभावित भागात रक्त जमा होते. जर डोळ्याखालील भागाला सूज आली तर त्यामुळे काळी वर्तुळे तयार होऊ शकतात.
सहसा, फक्त विश्रांती आणि चांगला आहार घेतल्यास काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. परंतु, सूज जास्त प्रमाणात असल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. गरोदरपणात काळी वर्तुळे दिसल्यावर लगेच डॉक्टरकडे धाव घ्यावी का? तर नाही. तुम्ही ह्या काळ्या वर्तुळांची घरी काळजी घेण्यासाठी खालीलपैकी काही उपयुक्त टिप्स वापरून पाहू शकता.
गरोदरपणात काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
गरोदर स्त्रियांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे बरी करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.
- गरोदरपणात एरेटेड ड्रिंक पिणे टाळा
- व्हिटॅमिन सी समृध्द अन्नपदार्थांची निवड करा
- ताजे दुधाचे क्रीम वापरा आणि द्रुत परिणामांसाठी ते डोळ्यांखाली लावा
- बदामाचे कच्चे तेल डोळ्यांखाली लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या
- पुदिन्याची पाने ठेचून घ्या, त्याचा रस काढा आणि टोमॅटोच्या रसात मिसळा. डोळ्याखालील भागासह संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ५ ते ६ मिनिटांनी चेहरा धुवा
- डोळ्याखाली थंड चहाच्या पिशव्या ठेवणे देखील प्रभावी ठरू शकते
- चांगल्या दर्जाचे गुलाबपाणी हा एक प्रभावी उपाय आहे. कापूस गुलाब पाण्यात भिजवा, अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि तो कापूस डोळ्यांवर ठेवा. तुम्ही कापूस डोळ्यावर असेपर्यंत १० मिनिटांची छोटी डुलकी सुद्धा घेऊ शकता
- तणाव कमी करण्यासाठी आणि अधिक चांगल्या झोपेसाठी ध्यान करा आणि विश्रांती घ्या, व्यायाम करा.
- काकडी किंवा कच्च्या बटाट्याचे तुकडे तुमचे डोळे थंड ठेवू शकतात आणि डोळ्याभोवतीचे रक्ताभिसरण सुद्धा सुधारू शकतात
या घरगुती उपचारांसह, डोळ्याखालील भागातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी तुम्ही तिथे मालिश सुद्धा करू शकता.
काळी वर्तुळे कमी करण्यासाठी मसाज
आधी सांगितल्याप्रमाणे, काळी वर्तुळे डोळ्याखालील भागातील रक्त प्रवाहात अडथळा निर्माण करतात. हा साधा मसाज केल्यास तुमच्या डोळ्यांच्या आसपासच्या भागात ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेण्यास तसेच काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होऊ शकते. खाली मसाज कसा करावा हे दिलेले आहे.
- मालिश सुरू करण्यापूर्वी तुम्ही डोळ्यांचे क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावू शकता
- तर्जनी आणि मधल्या बोटाचा वापर करून, तुमच्या डोळ्यांच्या भोवतीचा भाग हळूवारपणे टॅप करा
- डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापासून सुरुवात करा. आपल्या दोन्ही हातांनी, डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यात थांबून, आपली बोटं बाहेरच्या दिशेने नेत हळूवारपणे मसाज करा
- असे पुन्हा ३ ते ५ वेळा करा
- मग, तुमच्या भुवयांना संपूर्णपणे मालिश करा
- ही स्टेप ३ ते ५ वेळा पुन्हा करा
- आता, भुवयांच्या सुरवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत मालिश सुरू करा. डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापर्यंत मालिश सुरू ठेवा, एक वर्तुळ तयार करा
- असे आणखी ३ ते ५ वेळा पुन्हा करा
डोळ्यांखाली त्वचा ताणू नका आणि फक्त हळुवारपणे त्या भागाची मालिश करा.
तुमच्यापैकी काहींना हे सगळं करणे खूप अवघड वाटू शकते आणि गरोदरपणात काळी वर्तुळे टाळण्याचे मार्ग आहेत का असा प्रश्न पडू शकतो. काळी वर्तुळे टाळण्यासाठी काही मार्ग आहेत, परंतु काळी वर्तुळे कशी तयार होतात हे तुमच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. असे असले तरी, तुम्ही ह्यापैकी काही टिप्स वापरून त्यांना प्रतिबंधित करू शकता आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घेऊ शकता.
गरोदरपणात काळी वर्तुळे कशी टाळावीत?
गरोदरपणात काळी वर्तुळे टाळण्याचे काही मार्ग आहेत. आणि ते खालीलप्रमाणे,
- नियमितपणे पाणी पीत रहा आणि आपली त्वचा सजलीत ठेवा
- तणाव कमी करण्यासाठी आणि मज्जातंतूंना आराम देण्यासाठी डोळ्यांवर थंड टॉवेल ठेवा
- झोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड काकडी आणि लिंबाचे काप ठेवा
- नियमित व्यायाम करा
- डोळ्यांभोवती कठोर रसायने असलेली सौंदर्यप्रसाधने किंवा क्रीम वापरू नका
योग्य ती काळजी घेऊनही तुम्हाला अजूनही काळी वर्तुळे येत असतील तर तुम्ही वरील लेखात दिलेले उपाय करू शकता . तथापि, काही महिलांना वैद्यकीय समस्यांमुळे काळी वर्तुळे येऊ शकतात. तुमच्या नियमित तपासणीदरम्यान तुम्हाला हि समस्या जाणवली असली तरी, डॉक्टरांचा वेळेवर सल्ला न घेतल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. तर, आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? ते पाहूयात.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे हे थायरॉईड किंवा अशक्तपणाचे लक्षण देखील असू शकते. खात्री करून घेण्यासाठी आरोग्य तपासणी करा. जर तुम्हाला ह्या काळ्या वर्तुळाचा त्रास होऊ लागला, त्वचा नाजूक आणि लालसर होत असेल किंवा रक्तस्त्राव होऊ लागला, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
गरोदरपणात डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे हे काही चिंतेचे कारण नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागे जीवनशैली आणि काही वैद्यकीय कारणे असू शकतात. व्यायामाच्या योग्य नियमांचे पालन करणे, स्वतःला सजलीत ठेवणे आणि चांगले विश्रांती घेणे ह्या नियमांचे पालन केल्यास काळी वर्तुळे लवकरच दूर होण्यास मदत होऊ शकते.
स्रोत अणि सन्दर्भ:
आणखी वाचा: