Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूती प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे

प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे

प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे

काही वेळा गर्भवती स्त्रीने गरोदरपणाचे 40 आठवडे पूर्ण करून सुद्धा तिला प्रसूती कळा सुरु होत नाहीत. अश्या वेळी प्रसूती प्रेरित केली जाऊ शकते. गरोदरपणात एरंडेल तेल वापरणे ही प्रसूती प्रेरित करण्यासाठी चांगली युक्ती आहे.

प्रसूती प्रेरित करण्यासाठी गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कोणतेही पूर्ण आणि निर्णायक संशोधन नाही. प्रसूती प्रेरित करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर कारण्याबद्दलची माहिती पूर्णपणे ऐकीव आहे.

एरंडेल तेलाचा दुष्परिणाम म्हणजे त्यामुळे मळमळ होते. कुठल्याही गरोदर स्त्रीला प्रसूतीच्या वेळेला हा त्रास नको असतो. त्यामुळेच , गरोदरपणात कोणतेही संभाव्य धोके टाळण्यासाठी तसेच प्रसूती प्रेरित करण्यासाठी कोणत्याही उपायांचा अवलंब करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ह्या लेखात एरंडेल तेलाचा वापर करण्याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

एरंडेल तेल म्हणजे काय?

एरंडेल तेल

एरंडेल तेल हे एक  चकचकीत आणि घट्ट असे वनस्पती तेल आहे. हे तेल एरंडेलच्या बियांपासून म्हणजेच  रिसिनस कम्युनिसच्या बियापासून काढले जाते. यामध्ये प्रामुख्याने रिसिनोलिक ऍसिड नावाचे फॅटी ऍसिड असते. हे फॅटी ऍसिड त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी मुख्यतः जबाबदार असल्याचे मानले जाते. या संदर्भात वैज्ञानिक पुरावे कमी आहेत. तरीही अनेक वर्षांपासून, एरंडेल तेलाचा उपयोग बद्धकोष्ठता, त्वचेच्या काही समस्या आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो. तसेच अनेक विकारांवर उपचार करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो.

असे असले तरी, एरंडेल तेलाचे काही गैर-औषधी उपयोग सुद्धा आहेत. एरंडेल तेल संरक्षक आणि चव वाढवणारा घटक म्हणून वापरले जाते. साबण, शैम्पू आणि लिपस्टिक यांसारख्या स्किनकेअर वस्तू आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये हा एक सामान्य घटक आहे. रंग, पेंट, प्लास्टिक आणि फायबरच्या निर्मितीमध्ये देखील एरंडेल तेल वापरले जाते.

एरंडेल तेल भारतात सामान्यतः आढळते. एरंडेल तेलाची सुसंगतता स्वयंपाकाच्या तेलासारखीच असते आणि चविष्ट असते. परंतु एरंडेल तेलामुळे अतिसार, मळमळ आणि अगदी तीव्र निर्जलीकरण यांसारखे काही वाईट दुष्परिणाम होतात हे सर्वांना माहिती आहे.

गरोदरपणात एरंडेल तेल वापरणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात एरंडेल तेलाचा वापर करणे ह्या विषयावर केलेल्या वैद्यकीय संशोधनात सविस्तर निष्कर्ष दिसून येतात. प्रसूतीसाठी एरंडेल तेलाच्या वापराच्या विश्लेषणाअंती असे दिसून आले आहे की एरंडेल तेलाच्या वापरामुळे सामान्य किंवा सिझेरियन प्रसूतीच्या कालावधीत कोणताही उल्लेखनीय फरक दिसून येत नाही. प्रसूती दरम्यान एरंडेलच्या वापराने कोणतीही गुंतागुंत झाल्याचा कोणताही पुरावा वैज्ञानिक अभ्यासात सापडला नाही. जन्माच्या वेळी एरंडेल तेलाच्या वापरामुळे अस्वस्थता निर्माण होते. आणि ही प्राथमिक चिंता होती. काही स्त्रियांना मळमळ तर काहींना अतिसाराचा त्रास झाला.

अशाप्रकारे, ज्या स्त्रियांनी गरोदरपणाचे 40 आठवडे पूर्ण केलेले आहेत अश्या काही स्त्रिया गरोदरपणात एरंडेल तेलाच्या वापरामुळे फायदा झाला असे म्हणतात, तर इतर स्त्रिया (आणि काही डॉक्टर) याकडे चिंतेने पाहतात आणि एरंडेलचा वापर करताना सावधगिरी बाळगतात.

याशिवाय, डॉक्टरांनी प्रेरित प्रसूतीच्या इतर विश्वासार्ह आणि प्रभावी पद्धती वापरण्यास सुरुवात केली आहे. ह्या पद्धती यशाची हमी देतात. शिवाय, जर तुमची गर्भधारणा गुंतागुंतीची असेल, तर तुम्ही एरंडेल तेल वापरू नका. तुम्ही त्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

प्रसूती प्रेरित करण्यासाठी एरंडेल तेल

एरंडेल तेलामध्ये रेचक गुणधर्म असतात म्हणून एरंडेल तेलाचा वापर प्रसूती प्रेरित करण्यासाठी केला जात असावा. एरंडेल तेलाचे सेवन केल्यावर ते आतड्यांना उत्तेजित करते आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते. शिवाय, एरंडेल तेलाचा मुख्य घटक असलेले रिसिनोलिक ऍसिड, गर्भाशयात आणि आतड्यांमधील प्रोस्टॅग्लॅंडिन रिसेप्टर्सवर हल्ला करते,त्यामुळे ते आकुंचन पावतात. असेही मानले जाते की एरंडेल तेल आतड्यांमधील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स शोषणावर परिणाम करते आणि त्यामुळे अतिसार होतो आणि गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते.

लोक सहसा एरंडेल तेल कसे वापरतात?

एरंडेल तेलाचा वापर अनेक प्रकारे केला जातो:

  • एरंडेल तेलाची चव चांगली नसते त्यामुळे ते संत्र्याच्या रसात किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही रसात मिसळले जाते.
  • तुम्ही ते एकाच वेळी पिऊ शकता आणि तुमच्या आवडीचे फ्लेवर्ड ड्रिंक घेऊन त्याची चव बदलू  शकता.
  • एरंडेल तेलाचे सेवन केल्यानंतर भरपूर पाणी प्या, कारण ते रेचक आहे आणि त्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते.

एरंडेल तेल प्रसूती प्रेरित करण्याचे कार्य किती वेगाने करते?

एरंडेल तेलाच्या वापराचे निश्चित परिणाम बरेच वैविध्यपूर्ण आहेत. काही वेळा, गरोदर स्त्रियांनी एरंडेल तेल घेतल्याच्या काही तासांतच त्याचे परिणाम अनुभवले आणि प्रसूती झाल्याची नोंद केली, तर काही प्रकरणांमध्ये कोणतेही परिणाम नोंदवले गेले नाहीत.अशा प्रकरणांमध्ये, काही दिवसांच्या कालावधीत प्रसूती प्रेरित होऊ शकते.

परंतु, एरंडेल तेल घेतल्यानंतर काही तासांत त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात आणि ते 1-6 तासांपर्यंत टिकू शकतात. त्याचे परिणाम तपासण्यासाठी तपशीलवार संशोधन आवश्यक आहे.

प्रसूतीसाठी एरंडेल तेल घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही एरंडेल तेल वापरू नये कारण त्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, एरंडेल तेल घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगली जाऊ शकते.

  • एरंडेल तेलाचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो. त्यामुळे जुलाब झाल्यास शौचालयाजवळ असणे चांगले
  • भरपूर पाणी पिऊन स्वत:ला योग्य प्रकारे सजलीत ठेवणे आवश्यक आहे
  • “कमी प्रमाणात सेवन करणे सुरक्षित आहे” या तत्त्वाचे अनुसरण करा. 24तासांच्या आत 1किंवा 2 चमचे एरंडेल तेल घेऊ नका.
  • गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात एरंडेल तेलाचे सेवन करणे सुरक्षित नाही. 40आठवडे वाट पहा कारण जर तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार नसेल, तर एरंडेल तेलाचा अपेक्षित परिणाम होणार नाही.
  • एरंडेल तेल प्रसूतीला गती देण्यासाठी वापरू नये कारण त्यामुळे वेदना होऊ शकतात आणि अस्वस्थता वाढू शकते.

प्रसूती होण्यासाठी जास्त दुष्परिणाम नसलेल्या इतर नैसर्गिक पद्धतींचाही तुम्ही  विचार करायला हवा. तुमची हॉस्पिटल बॅग तयार ठेवा. तसेच, काही शंका असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

प्रसूती प्रेरित करण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करण्याचे दुष्परिणाम

प्रसूतीसाठी एरंडेल तेल घेतल्याच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांची संमिश्र मते आहेत. काही संभाव्य दुष्परिणाम खाली सूचीबद्ध आहेत:

  • काही तज्ञांचे मत आहे की,  एरंडेल तेलाचा आईसोबत न जन्मलेल्या बाळावर देखील रेचक प्रभाव पडतो. आणि त्यामुळे बाळाला प्रसूतीदरम्यान पहिल्यांदा (मेकोनियम) शौचास होऊ शकते. त्यामुळे संभाव्य गुंतागुंत होऊ शकते. परंतु ह्याचे समर्थन करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा नाही
  • प्रसूतीसाठी एरंडेल तेलाचा वापर केल्यास अतिसार आणि निर्जलीकरण होण्याची शक्यता असते
  • एरंडेल तेल प्यायल्याने मळमळ होऊ शकते. उलट्यासुद्धा होऊ शकतात
  • काही स्त्रियांना तीव्र पेटक्यांचा अनुभव येऊ शकतो

काहीवेळा गर्भवती स्त्रियांना कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. म्हणून एरंडेल तेल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा:

तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे
प्रसूती प्रवृत्त करणे: प्रसूतीकळा सुरु होण्यासाठी सर्वोत्तम उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article