गर्भधारणा होताना

मॉर्निंग आफ्टर पील (प्लॅन बी) – तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे आहेत

असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर, सर्वात आधी स्त्रिया प्लॅन बी गोळी किंवा मॉर्निंग आफ्टर पिल कडे वळतात. योग्य पद्धतीने, योग्य वेळेत घेतल्यास ह्या गोळीमुळे नको असलेली गर्भधारणा रोखली जाते. बऱ्याच स्त्रियांना ह्या गोळ्यांची सुरक्षितता,परिणामकता आणि इतर अनेक प्रश्न असतात. इथे प्लॅन बी गोळ्यांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे, म्हणजेच त्यांचे काम कसे चालते, यशाचा दर आणि बरेच काही.

प्लॅन बी/वन स्टेप/मॉर्निंग आफ्टर पिल म्हणजे काय?

प्लॅन बी वन स्टेप पिल हे एक आपत्कालीन गर्भनिरोधक आहे जे असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यानंतर घेतले जाऊ शकते, त्यास मॉर्निंग आफ्टर पिल असे सुद्धा म्हणतात. परंतु, त्याची परिणामकता वाढवण्यासाठी असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर ही गोळी लगेच घेतली पाहिजे.

प्लॅन बी गोळी किती परिणामकारक आहे?

असुरक्षित संभोगानंतर ७२ तासांच्या आत प्लॅन बी गोळी घेतल्यास ती ८९% परिणामकारक असते. जर लैंगिक संबंधांनंतर १२ तासांच्या आत गोळी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता ९५% ने कमी होते.

प्लॅन बी गोळी कसे काम करते?

प्लॅन बी वन स्टेप ही एक गोळी असून आपत्कालीन गर्भनिरोधक आहे आणि त्यामध्ये लीव्होनॉरगेस्ट्रेल नावाचे स्त्री संप्रेरक असते त्यामुळे ओव्यूलेशनला प्रतिबंध घातला जातो. ह्या संप्रेरकांमुळे अंडाशयातून स्त्रीबीज सोडले जात नाही किंवा गर्भाशयाच्या आवरणामध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखातील स्रावात बदल केल्यामुळे शुक्राणू अथवा फलित अंडे गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये वापरले जाणारे लीव्होनॉरगेस्ट्रेल हे संप्रेरक प्लॅन बी गोळ्यांमध्ये वापरले जाते परंतु त्याचा डोस १.५ मिलिग्रॅम इतका जास्त असतो.

मॉर्निंग आफ्टर पिल घेताना

ह्या गोळ्यांबद्दल एक लक्षात ठेवले पाहिजे आणि ते म्हणजे 'sooner the better'. ही गोळी केव्हा आणि कशी घ्यावी ह्याविषयी इथे माहिती दिली आहे.

मॉर्निंग आफ्टर पिल कुणी घेतली पाहिजे?

ज्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळी घेण्याचे विसरतात किंवा संतती नियमनाची पद्धती वापरण्यास अयशस्वी ठरल्या असतील तर उदा: कॉन्डोम फाटणे किंवा गर्भनिरोधक साधन न वापरणे इत्यादी. त्यांच्यासाठी ही गोळी घेणे ठीक आहे.

मॉर्निंग आफ्टर पिल केव्हा घेतली पाहिजे?

असुरक्षित संभोगानंतर ही गोळी ७२ तासाच्या आत घेतली पाहिजे. जितकी लवकर तुम्ही गोळी घ्याल तितके लवकर तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील.

प्लॅन बी गोळी कशी घ्याल?

प्लॅन बी गोळी ची एक गोळी असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर तीन दिवसांच्या आत ( ७२ तास) घेतली पाहिजे. म्हणून उशीर होऊ नये म्हणून ही गोळी हाताशी असली पाहिजे.

प्लॅन बी गोळी घेणे केव्हा टाळले पाहिजे?

जेव्हा तुम्हाला गर्भधारणा झालेली असते तेव्हा ही गोळी घेणे टाळावे कारण ती परिणामकारक होणार नाही. तसेच, तुम्ही लेवोनॉरजेस्ट्रॉल किंवा गोळीमधील इतर घटकांची ऍलर्जी असेल तर ही गोळी घेऊ नका. स्त्रियांचे वजन ७५ किलो किंवा १६५ पौंड्स पेक्षा जास्त असेल तर ही गोळी परिणामकारक होणार नाही. कारण ज्या स्त्रियांचे वजन जास्त असते अशा स्त्रिया औषधांचे चयापचय करणारे द्रव्य जास्त प्रमाणात यकृतामधून तयार केली जातात.

तुम्ही किती वेळा प्लॅन बी गोळी घेऊ शकता?

जेव्हा तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा पद्धती अयशस्वी होतात तेव्हाच फक्त प्लॅन बी गोळी घेतली पाहिजे. ही आपत्कालीन परिस्थितीत घ्यायची गोळी असून असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर किंवा संतती नियमनाच्या इतर पद्धती अयशवी ठरल्या तर लगेच घेतल्यास परिणामकारक होते. दीर्घ कालीन गर्भनिरोधकांप्रमाणे ह्यापासून कुठलेही संरक्षण मिळत नाही.

तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक पद्धतीसोबत प्लॅन बी गोळी घेणे सुरक्षित आहे का?

प्लॅन बी गोळी असुरक्षित संभोगानंतर घेल्यास कार्य करते आणि ती असुरक्षित संभोगाआधी घेतल्यास त्याचा कुठलाही परिणाम दिसत नाही. तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या सुरु असताना, आणि त्या घेण्यास विसरल्यास प्लॅन बी गोळी घेणे सुरक्षित आहे. परंतु तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी ह्या गोळ्या घेऊ नका.

प्लॅन बी गोळ्यांचे दुष्परिणाम

प्लॅन बी गोळी जर सूचनांचे योग्य पालन करून घेतल्यास सुरक्षित आहेत. परंतु त्यांचे काही दुष्परिणाम खालीलप्रमाणे
काही स्त्रियांमध्ये पाळीच्या आधी अनपेक्षित रक्तस्त्राव किंवा हलके डाग दिसून येतात. जर एक आठवड्यांपेक्षा जास्त दिवस पाळीला उशीर झालेलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि गर्भधारणा चाचणी करून घ्या. तसेच, गोळी घेतल्यानंतर तुम्हाला दोन तासांच्या आत उलटी झाली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि दुसरी गोळी घेतली पाहिजे का हे विचारले पाहिजे.

सुरक्षितता

बऱ्याच स्त्रियांसाठी ही गोळी खूप सुरक्षित आहे, परंतु समस्या आणि गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

मॉर्निंग आफ्टर पिल वर परिणाम करणारी औषधे

तुम्ही कुठली औषधे घेत आहात ह्याविषयीची माहिती डॉक्टरांना देणे हे महत्वाचे आहे. तुम्ही इतर औषधे घेत असताना ह्या गोळ्या स्वतःच्या मनाने दुकानातून आणून घेऊ नका. काही औषधे किंवा वनौषधे ह्याचा प्लॅन बी गोळ्यांच्या परिणामकतेमध्ये अडथळा येऊ शकतो.

जर तुम्ही आधीच गर्भवती असाल आणि मॉर्निंग आफ्टर पिल घेतलीत तर?

जर गर्भवती असताना मॉर्नींग आफ्टर पील घेतल्यास काहीही परिणाम होणार नाही. आधीच गर्भवती असलेल्या स्त्रियांनी ही गोळी घेतल्यास त्यांच्या लक्षात येईल की ही उपचारपद्धती परिणामकारक नाही आणि त्याचा बाळाच्या विकासाला कुठलेही नुकसान पोहचत नाही. प्लॅन बी गोळी घेतल्यानंतर तुमची प्रजननक्षमता लवकरात लवकर पूर्ववत केव्हा होईल? जेव्हा तुम्ही गोळी घेता त्या महिन्यातच फक्त ओव्यूलेशन प्रतिबंधित होते. पुढच्या मासिक पाळी चक्राच्या वेळी तुमची प्रजननक्षमता पूर्ववत होते. म्हणून, तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या लवकरात लवकर घेण्यास सुरुवात करणे चांगले. कारण ह्या मासिक पाळी दरम्यान जर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले तर त्या गोळीमुळे संरक्षण मिळणार नाही.

इतर महत्वाची माहिती

प्लॅन बी गोळीविषयी महत्वाची माहिती आहे ज्याची तुम्हाला मदत होऊ शकते मॉर्निंग पील परिणाम कारक होते आहे किंवा नाही हे कसे ओळखावे ? जेव्हा तुमची मासिक पाळी नियमित वेळेला येईल तेव्हा गोळीचा परिणाम झालेला आहे असे समजावे. जर तुमची मासिक पाळी एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लांबली तर तुम्ही गर्भधारणा चाचणी करून बघितली पाहिजे किंवा डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे कारण तुम्ही गर्भवती असण्याची शक्यता असू शकते. जर तुम्ही मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास प्लॅन बी गोळी काम न करण्याची शक्यता असते. एकाच मासिक पाळी चक्रात दुसऱ्यांदा असुरक्षित सम्बन्ध ठेवल्यास आधी घेतलेल्या गोळीने संरक्षण मिळत नाही कारण एका गोळीमुळे एकदाच असुरक्षित लैंगिक संबंधातून गर्भधारणा राहण्यापासून संरक्षण मिळते. जर गोळी घेतल्यानंतरच्या दोन तासात तुम्हाला उलटी झाली तर गोळीचा परिणाम जाणवणार नाही. तुम्ही दुसरी गोळी घेतली पाहिजे का ह्या संदर्भात डॉक्टरांशी बोलून घेतले पाहिजे. प्लॅन बी वन स्टेप गोळी घेतल्यानंतर किती कालावधीनंतर तुम्ही तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करू शकता? प्लॅन बी गोळी घेतलेल्या दिवसापासून तुम्ही तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या नेहमीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करणे महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी असुरक्षित संबंध ठेवलेत तर गर्भधारणा टाळता येईल.

जर तुम्ही डोस चुकवला तर काय?

जर तुम्ही डोस चुकवला आणि जर ७२ तासांच्या आत तुम्ही प्लॅन बी गोळी सुद्धा घेतली नाही आणि तुम्ही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवलेले असतील तर तुम्हाला गर्भधारणा होण्याच्या धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
अशावेळी, तात्काळ डॉक्टरांशी इतर पर्यायांविषयी चर्चा केली पाहिजे.

प्लॅन बी मुळे लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते का?

नाही. प्लॅन बी गोळी मुळे तुम्हाला लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून किंवा एचआयव्ही/एड्स पासून संरक्षण मिळत नाही. शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केल्यास लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते. तुमच्या दोघांमध्ये ह्याविषयी मोकळा संवाद होणे गरजेचे आहे जेणेकरून त्याची चाचणी करून त्यावर उपचार करता येतील.

मॉर्निंग आफ्टर पिल चे कार्य कमी होण्याची शक्यता केव्हा असते?

गर्भधारणेनंतर ७२ तासांनी प्लॅन बी गोळी घेतल्यास त्याचा काहीही परिणाम होत नाही. जर तुम्ही आधीच गर्भवती असाल तर गोळीचा काही परिणाम होत नाही. ज्या स्त्रियांचे वजन जास्त म्हणजेच ७५किलो किंवा १६५ पौंड इतके असेल तर गोळी काम न करण्याची शक्यता असते आणि जर वजन १७५ पौंड किंवा ८० किलो असेल तर गोळीचा अजिबात परिणाम होत नाही

प्लॅन बी गोळी कुठे मिळते आणि किंमत किती आहे?

प्लॅन बी गोळी औषधांच्या दुकानात मिळू शकते. त्यासाठी डॉक्टरांच्या चिट्ठीची गरज नसते आणि त्यासाठी वयाची मर्यादा नसते. औषधांच्या दुकानात गोळीची किंमत ७५ रुपये इतकी असते. प्लॅन बी गोळ्यांसारखे आपत्कालीन स्थितीत वापरण्याचे गर्भनिरोधक असुरक्षित संबंध ठेवल्यानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी स्त्रियांसाठी एक वरदान आहे. योग्य पद्धतीने, योग्य वेळेला घेतल्यास बऱ्याच स्त्रियांसाठी ते खूप परिणामकारक असते. परंतु, एक महत्वाचे लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे विशिष्ट कालावधीसाठी संरक्षण मिळू शकते आणि संतती नियमनासाठी नियमित वापरण्याचे हे साधन नाही. तसेच, लैंगिक संबंधांदरम्यान योग्य सुरक्षिततेची खात्री करणे आवश्यक आहे त्यामुळे असुरक्षित संबंध आणि त्यानंतरची गर्भधारणेची भीती टाळता येईल. आणखी वाचा: इन्ट्रायुटेरिन डिव्हाईस (IUD): प्रकार, दुष्परिणाम, यश आणि बसवण्याची प्रक्रिया तसेच इतरही बरेच काही
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved