आरोग्य

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय

तुमच्या लहान मुलाला जेव्हा छातीत दुखू लागते आणि अस्वस्थता जाणवते तेव्हा पालक म्हणून तुमच्यासाठी तो सर्वात भयानक क्षण असतो आणि लहान मुलांना नक्की काय होते आहे हे सांगता सुद्धा येत नाही. पालक म्हणून हे सगळे बघणे हा खूप वेदनादायक अनुभव असू शकतो. परंतु जेव्हा तुमचे लहान मूल आजारी पडते तेव्हा संसर्ग किंवा अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे आणि त्यांची काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य आहे.

लहान मुलांच्या सर्दी आणि खोकल्यासाठी भारतीय घरगुती उपचार

लहान मुलांच्या सर्दीवर उपाय म्हणून बरेचसे भारतीय घरगुती उपचार आहेत. येथे काही साधे सोपे घरगुती उपचार दिलेले आहेत जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून बघू शकता आणि त्यांना बरे वाटण्यास मदत करू शकता.

. ओव्याची पुरचुंडी आणि लसूण

ओवा आणि लसूण ह्यामध्ये प्रतिजीवाणू आणि प्रतिविषाणू गुणधर्म असतात. ओवा आणि लसूण जेव्हा एकत्र केले जातात तेव्हा ते खूप शक्तिशाली असू शकतात. लहान मुलांची सर्दी कमी करण्यासाठी त्याची नक्कीच मदत होते. ते एकत्र करणे खूप सोपे आहे आणि लहान मुलांना सर्दी खोकला झालेला असताना दिल्यास त्याचा खूप उपयोग होतो. ही पुरचुंडी बनवण्यासाठी तुम्हाला काही ओवा, लसूण आणि मऊ कापड लागेल. लसणाच्या २ पाकळ्या भाजून घ्या. १ चमचा ओवा एका लहान तव्यावर भाजून घ्या. पुरचुंडी बनवण्यापूर्वी थोडे थंड होऊ द्या. वापरण्याआधी पुरचुंडी घट्ट बांधणे आवश्यक आहे.

पुरचुंडी तयार झाल्यावर, तुमचे बाळ जिथे झोपलेले असेल तिथे ठेवा. पुरचुंडीतून निघणारा ओवा आणि लसणीचा धूर तुमच्या बाळाचे चोंदलेले नाक मोकळे करण्यास मदत करेल आणि छातीतील कफ मोकळा होण्यास त्यामुळे मदत होईल.

. पाम शुगर किंवा ताल मिश्री

२ वर्षांच्या मुलांमध्ये खोकल्यासाठी आणखी एक लोकप्रिय घरगुती उपचार म्हणजे पाम शुगर त्यास, ताल मिश्री म्हणून देखील ओळखले जाते. पाम शुगर अनेक स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असून खरेदी करता येते. आपल्याला यासाठी आवश्यक असलेल्या इतर घटकांमध्ये तुळशी आणि आले यांचा समावेश आहे.

थोडे पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये तुळशी आणि पाम शुगर घाला. तुम्ही तुमच्या मुलाला देण्यासाठी चहा मध्ये आले देखील घालू शकता. आपल्या मुलाला हे देण्याचा दुसरा मार्ग म्हणजे काळी मिरी, बदाम आणि पाम शुगर समान प्रमाणात घेणे आणि ते एकत्र मिसळणे. त्यानंतर तुम्ही ते गरम करू शकता आणि हिवाळ्यात तुमच्या लहान मुलांना ते खायला देऊ शकता. हे दुधात मिसळून तुमच्या मुलाला दिले जाऊ शकते.

. गूळ आणि ओव्याचे पाणी

ही एक साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही फक्त एक कप पाण्यात चिमूटभर ओवा आणि एक चमचा गूळ घाला. चांगले उकळून घ्या आणि नंतर गाळा. आणि एक टीस्पून तुमच्या मुलाला द्या. साधे पाणी उकळून त्यात ओवा घालून दिल्यास तुमच्या मुलाच्या खोकल्यासाठी तो एक चांगला उपाय आहे. बाळ सजलीत राहण्यासाठी नियमितपणे हे पाणी बाळाला द्या.

. कोमट मोहरीच्या तेलात मीठ घालून मालिश करणे

थोडेसे मोहरीचे तेल गरम करून त्यात थोडे रॉक सॉल्ट घाला. मीठ एक चमचा घाला. हे मिश्रण बाळाच्या शरीरावर लावण्याइतपत कोमट करून घ्या आणि नंतर ह्या तेलाने तुम्ही हळू हळू त्याच्या छाती, पाठ आणि पायांची मालिश करू शकता. मालिश झाल्यावर बाळाला सुती कापडाने झाकून ठेवा जेणेकरून बरे वाटण्यासाठी बाळाला आवश्यक तो उबदारपणा मिळेल.

. पांढऱ्या कांद्याचा रस

उत्तर भारतातील इतर लोकप्रिय पाककृतींपैकी एक पांढरा कांदा आहे. हा पांढरा कांदा साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात उपलब्ध असतो. आपल्या लहान मुलाला बरे वाटण्यासाठी, एक कांदा कापून एका भांड्यात ठेवा. त्यात थोडे पिण्याचे पाणी घाला, ते गाळून घ्या आणि आपल्या लहान मुलाला दिवसातून एक चमचा द्या. ह्यामुळे नाक मोकळे होईल आणि त्याला कोणत्याही सर्दी, कफ किंवा खोकल्यापासून मुक्त करेल.

. लिंबाचा रस मधात मिसळून

मुलांना सहसा औषधी पेय आवडत नसले तरी, मध घातलेला काढा मुले नाकारू शकत नाहीत. एका कपा मध्ये तुम्ही मध आणि लिंबाचा रस घ्या. नंतर, त्यात कोमट पाणी घाला आणि ते आपल्या बाळाला द्या जेणेकरून त्यांना ह्या चवदार उपायामुळे बरे वाटेल.

. लवंग आणि मध मिक्स

भरपूर कफ झालेल्या बाळांना देण्यासाठी सर्वोत्तम घटक म्हणजे काही लवंगा आणि मध. हे एक उत्कृष्ट कफ पाडणारे औषध आहे. खोकला कमी करण्यासाठी आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. खाण्यासाठी, फक्त ५ लवंगा भाजून घ्या आणि त्या थंड झाल्यावर बारीक करा. नंतर, त्यात मध घाला आणि बाळाला झोपण्यापूर्वी द्या.

. तूप आणि काळी मिरी

एक चमचा तूप आणि एक चिमूटभर ताजी मिरपूड पावडर लहान मुलांना सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी मदत करते, दोन्ही मिक्स करा आणि हिवाळ्यात बाळाला द्या. ह्याची चव देखील चांगली लागते.

. केशर दूध

मुलांना सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी केशर दूध हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. एक कप उकळलेल्या दुधात थंड होण्यापूर्वी केशर घाला. केशर गाळून घ्या आणि आपल्या मुलाला झोपण्यापूर्वी द्या. सर्दी खोकल्यावर हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही एक किंवा दोन चमचे दुधात केशरच्या काही काड्या मिसळून सर्दीपासून त्वरित आराम मिळण्यासाठी कपाळावर लावू शकता.

१०. लिंबू, मध आणि दालचिनी

एका कप दुधात थोडा लिंबाचा रस, मध आणि थोडी दालचिनी पावडर मिसळा आणि थोडे गरम करा. नंतर, तुमच्या लहान मुलाला तेच मिश्रण खायला द्या. ह्यामुळे बाळाचे नाक साफ होते आणि सर्दी कमी होते.

११. मीठ आणि आले

लहान मुलांमध्ये सर्दी आणि खोकल्यावरील आणखी एक लोकप्रिय घरगुती उपाय म्हणजे मीठ आणि आले यांचे मिश्रण. हे मिश्रण करण्यासाठी आल्याचे पातळ तुकडे करा. नंतर, त्यात थोडे मीठ घाला आणि ते आपल्या बाळाला द्या. हे मिश्रण बाळाची सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे कमी करते.

१२. मिरपूड आणि गूळ मिश्रण

कफ पाडण्यासाठी उत्तम औषध म्हणजे गूळ आणि मिरपूड यांचे मिश्रण. सुमारे ११/२ चमचा चूर्ण गूळ ३-४ मिऱ्यांची पूड करून त्यात घाला. हे मिश्रण हवाबंद असलेल्या कंटेनरमध्ये साठवा आणि जेव्हा तुमच्या मुलाला सर्दी किंवा खोकला सुरू होईल असे वाटेल तेव्हा त्यांना हे मिश्रण चिमूटभर द्या.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

हे उपाय लहान मुलांना सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करणारे असले तरी, अशी अनेक उदाहरणे असू शकतात जेव्हा हे उपाय बाळासाठी पुरेसे नसतात. तुमच्या बाळासाठी वेळेवर वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणे दिसत असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

1. निरोगी राहण्यासाठी बाळ पुरेसे द्रवपदार्थ घेत नसेल, काही खात नसेल किंवा थोडा वेळ सुद्धा झोपू शकत नसेल तर 2. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अनियंत्रितपणे बाळ रडत असेल आणि तुम्ही त्याला शांत करू शकत नसाल तर 3. श्वास घेण्यात अडचण येत असेल आणि बाळ वेगाने श्वास घेत असेल, घरघर होत असेल किंवा उथळ श्वास घेत असेल तर 4. घशात अडकणे किंवा काहीही गिळू शकत नसेल तर 5. बाळ बेशुद्ध पडले असेल तर 6. बाळ नेहमीपेक्षा जास्त झोपत असेल आणि सुस्त वाटत असेल तर 7. खूप ताप असेल तर 8. तीव्र कान दुखणे असेल तर (कान खेचणे किंवा कान चोळणे) 9. एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ खोकला किंवा सर्दी 10. कोणत्याही ट्रिगरशिवाय वारंवार आजारी पडते

तुमचे लहान मूल आजारी पडल्यावर त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून परिणामकारक घरगुती उपाय आहेत. जेव्हा सर्दीची थोडी लक्षणे दिसतात तेव्हा हे घरगुती उपाय करून पहा. बाळाचा सर्दी खोकला लवकरच बरा होईल!

आणखी वाचा:

लहान मुलांच्या तापावर ८ घरगुती उपाय मुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved