काळजी

लहान मुलांचे केस अकाली पांढरे आणि राखाडी रंगाचे होणे

एका विशिष्ट वयात पांढरे आणि राखाडी केस असतील तर ते तुमचे व्यक्तिमत्व उठावदार होण्यासाठी मदत करू शकतात. परंतु जेव्हा लहान मुलांचे केस पांढरे आणि राखाडी असतात तेव्हा ती एक समस्या बनते. जर तुमच्या मुलाचा एखादा दुसरा केस पांढरा असेल तर ठीक आहे, परंतु खूप जास्त प्रमाणात केस पांढरे असतील तर लक्ष देणे गरजेचे आहे. अकाली पांढरे होण्यामुळे मुलाच्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, परंतु केस पांढरे होणे हे इतर शारीरिक समस्यांचे निर्देशक असू शकते. केस पांढरे होण्याचा तुमच्या मुलावर मानसिक परिणामही होऊ शकतो. म्हणूनच, समस्येच्या मुळाशी जाणे आणि सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे हाच ह्या समस्येचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

मुलांचे केस अकाली पांढरे होण्याची कारणे

तुम्हाला तुमच्या मुलांचे केस अकाली पांढरे झालेले आढळल्यास ते शरीरात काही पौष्टिक घटकांची कमतरता असल्याचे निर्देशक आहे. बालपणात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असली तरी बहुतेक कारणांवर उपाय करता येतात. मुलांचे केस पांढरे होण्याची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. आनुवंशिक

मुलांमध्ये केस अकाली पांढरे होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे आनुवंशिकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना बालपणात केस अकाली पांढरे होण्याची समस्या असेल, तर मुलांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती उद्भवण्याचा धोका असतो. मुलांचे केस अकाली पांढरे होण्यामागे अनुवंशिकता हे कारण असू शकते. मुलांचे केस अकाली पांढरे होण्याचे हे प्रमुख कारण आहे. प्रोजेरिया, वर्नर सिंड्रोम, रॉथमंड-थॉम्पसन सिंड्रोम इ. आनुवंशिक समस्या असू शकतात.

२. वैद्यकीय समस्या

मुलांमध्ये केस अकाली पांढरे होण्यामागे काही गंभीर कारण असू शकते. केसांचे रंगद्रव्य कमी होणे हे त्वचारोग आणि पायबाल्डिझम सारख्या अनेक विकारांचे लक्षण आहे. मेलेनिन हे त्वचा आणि केसांच्या रंगासाठी जबाबदार रंगद्रव्य आहे. जेव्हा मेलेनोसाइट त्वचेमध्ये मेलेनिन तयार करू शकत नाही, तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्वचारोगाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्वचेवर पांढरे ठिपके येतात. त्याचप्रमाणे, जेव्हा थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम अतिक्रियाशील किंवा कमी क्रियाशीलता ह्या स्थिती मध्ये होतो. अशी परिस्थती ग्रेव्ह्ज डिसीज किंवा हाशिमोटोज डिसीज यांसारख्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आढळते आणि त्यामुळे केस अकाली पांढरे होतात. परंतु, प्रत्येक वेळेला हे एकमेव लक्षण नसते. लहान मुलाला ट्यूमर होणे, श्रवणशक्ती कमी होणे, केसांचा रंग जाणे इत्यादी समस्या सुद्धा होऊ शकतात.

३. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लहान मुलांचे  केस अकाली पांढरे होऊ शकतात. शाकाहारी आहारात व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात आढळत नाही, म्हणून शाकाहारी आहार घेत असलेल्या लहान मुलांना ही समस्या होण्याची शक्यता असते.

४. ताण

लहान मुलांमध्ये तणावामुळे केस पांढरे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. परंतु, येथे तणावाचा अर्थ मानसिक ताण नाही. हा जीनोटॉक्सिक तणाव आहे. अश्या प्रकारचा तणाव पर्यावरणीय घटकांमुळे होतो.

५. सिंथेटिक साबण आणि शैम्पू वापरणे

आपल्या सर्वांना माहित आहे की केसांच्या उत्पादनांची गुणवत्ता गेल्या काही वर्षांमध्ये खालावली आहे. आज आपण वापरत असलेली केसांची निगा राखणारी उत्पादने आधीसारखी नाहीत. आज लहान मुले जे सिंथेटिक साबण आणि शैम्पू वापरतात त्यामुळे केस खडबडीत आणि पांढरे होऊ शकतात. पालक म्हणून, तुम्ही सुरुवातीपासूनच काळजी घेणे आवश्यक आहे, कारण प्रौढांच्या शाम्पू मुळे लहान मुलांच्या केसांचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलासाठी बेबी शैम्पू वापरणे आवश्यक आहे, कारण त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजांचा अर्क असतो. तुमच्या बाळाचे केस धुण्यासाठी तुम्ही हर्बल शैम्पू देखील वापरू शकता.

६. धूर

लहान मुलांच्या आसपास कुणी धूम्रपान करीत असेल तर मुलांचे केस अकाली पांढरे होण्याची शक्यता असते. निष्क्रिय धुम्रपानामुळे तुमच्या मुलाच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो आणि मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे असे होऊ नये म्हणून लहान मुलांजवळ धूम्रपान करणे टाळावे.

७. अस्वास्थ्यकर अन्न खाणे

फास्ट-फूड संस्कृतीमुळे, आधुनिक जगात लहान मुलांचे केस पांढरे होणे ह्यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. मेनकेस हेअर सिंड्रोम आणि क्वाशिओरकोर (प्रथिने कुपोषण) मुळे देखील केस अकाली पांढरे होऊ शकतात.

८. अशक्तपणा

लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो. त्यामुळे मुलांना थकवा येऊन केस पांढरे होतात.ऍनिमियामुळे  लहान मुलांचे केस अकाली पांढरे होऊ शकतात.

मुलांचे केस अकाली पांढरे होण्यावर उपचार

मुलांचे केस अकाली पांढरे होण्यावर कोणतेही उपचार किंवा औषध नाही. त्यासाठी एकमेव उपचार म्हणजे पौष्टिक पदार्थ खाणे. तुमचे मूल पौष्टिक पदार्थ खात आहे ना ह्याची तुम्ही खात्री करा. बहुतेक वेळा अशी परिस्थिती अयोग्य पोषणामुळे उद्भवते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि तांबे तसेच जस्त ह्या सारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ शकतात. परंतु ही जीवनसत्वे पूरक आहाराद्वारे किंवा मुलांना पौष्टिक अन्न देऊन नियंत्रित केले जाऊ शकते. जर अकाली केस पांढरे होण्यामागे आनुवंशिक कारण असेल तर तुम्ही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केस पांढरे होणे हे इतर परिस्थिती किंवा सिंड्रोमचे परिणाम असल्यास, त्या परिस्थितींवर उपचार करा, म्हणजे केस अकाली पांढरे होणे खूप कमी होईल.

केस अकाली पांढरे होणे टाळण्यास मदत करणारे पौष्टिक घटक

तुमच्या मुलाच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून तुम्ही त्याचे केस पांढरे होण्यापासून रोखू शकता. तुम्ही तुमच्या मुलाला जे काही अन्नपदार्थ खायला देणार आहात, ते आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असल्याची खात्री करा. मुलांचे केस अकाली पांढरे होण्यापासून टाळण्यासाठी काही महत्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात.

१. व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए हिरव्या भाज्या आणि पिवळ्या फळांमध्ये आढळते. हे जीवनसत्व सर्वसाधारणपणे टाळू आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

२. व्हिटॅमिन बी

निरोगी केसांसाठी व्हिटॅमिन बी १२ आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी तेलाचा स्राव नियंत्रित ठेवते आणि केसांना दीर्घकाळ निरोगी आणि मुलायम ठेवते. व्हिटॅमिन बी दही, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, फुलकोबी आणि केळीमध्ये आढळते. त्यामुळे तुमच्या मुलाच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.

३. खनिजे

निरोगी केसांसाठी लोह, जस्त आणि तांबे ही सर्वात महत्वाचे खनिजे आहेत. ही खनिजे तुमच्या मुलाच्या केसांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास आणि केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया टाळण्यास मदत करतील. झिंक हिरव्या भाज्या, चिकन आणि लाल मांसामध्ये आढळते, तर खनिज लोह अंडी, वाळलेल्या जर्दाळू, गहू, अजमोदा आणि सूर्यफूल बियांमध्ये आढळते. तुमच्या लहान मुलाच्या तांब्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आहारात संपूर्ण धान्य किंवा सीफूडचा समावेश करा. ही सर्व खनिजे पुरेशा प्रमाणात दिल्यास केस अकाली पांढरे होणे टाळता येते.

४. प्रथिने

प्रथिने केसांची चमक कायम ठेवतात आणि त्यांची रचना सुधारतात. संपूर्ण धान्य, सोया, तृणधान्ये आणि मांस हे प्रथिनांचे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.

राखाडी केसांसाठी घरगुती उपाय

लहान मुलांचे केस पांढरे होणे हे नैसर्गिक उपायांनी हाताळले जाऊ शकते. मुलांमध्ये केस अकाली पांढरे होणे कसे थांबवायचे याचा विचार करत असाल तर येथे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही घरी करून पाहू शकता.

१. आवळा आणि खोबरेल तेल

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ते पांढऱ्या केसांवर उपाय करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. टाळूवर खोबरेल तेल लावल्याने केसांच्या कूपांमध्ये रंगद्रव्य पेशी टिकून राहतात, त्यामुळे केसांना नैसर्गिक रंग येतो. खोबरेल तेल देखील टाळूला आर्द्रता देते आणि त्यामुळे केसांची ताकद सुधारते. ह्या उपायासाठी आवळा आणि खोबरेल तेल एकत्र उकळून तुमच्या मुलाच्या टाळूची मालिश करा.

२. आवळ्याचा रस आणि बदामाचे तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई देखील असते, आणि ते केस निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे आणखी एक पोषक तत्व आहे. हे केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया देखील थांबवते. बदाम तेल आणि आवळा रस समान प्रमाणात मिसळा आणि सर्वोत्तम परिणामांसाठी या मिश्रणाने तुमच्या मुलाच्या टाळूची मालिश करा.

३. कढीपत्ता आणि खोबरेल तेल

कढीपत्ता केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबण्यास मदत होते. कढीपत्त्यामुळे मेलेनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे केसांना नैसर्गिक रंग प्राप्त होतो. हा उपाय करण्यासाठी खोबरेल तेलात पाने काळी होईपर्यंत उकळून घ्या. नंतर केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी मुलाच्या केसांना तेल लावा.

४. तूप (गाईच्या दुधापासून तयार केलेले)

तुपामध्ये भरपूर प्रमाणात एंझाईम्स असतात त्यामुळे केसांची चमक वाढण्यास मदत होते. केसांची मुळे देखील मोठ्या प्रमाणात मजबूत होतात. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा तूप लावा आणि तासभर राहू द्या.

५. बदाम तेल आणि तीळ

बदाम तेल आणि तीळ ब्लेंडरमध्ये मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या मुलाच्या टाळूवर लावा. सुमारे २० मिनिटे मालिश करा. आणखी २० मिनिटे ते तसेच राहूद्या.  हर्बल शैम्पू आणि कोमट पाण्याने धुवा.
हे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी आहेत परंतु हे उपाय करताना काळजी घ्या. तुमच्या डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर हे उपाय करून पहा.

काळजीविषयक टिप्स

खाली काही सावधगिरीच्या टिप्स दिल्या आहेत. जर तुमच्या मुलाचे केस पांढरे असल्यास तुम्ही ह्या टिप्सचा अवलंब करावा. अनेक मुलांचे केस अकाली पांढरे होतात. परंतु, घरगुती उपायांचा वापर करून आणि आपल्या मुलाच्या आहारावर नियंत्रण ठेवून ते सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घरगुती उपाय करून पहा आणखी वाचा: मुलांच्या डोक्यातील उवांसाठी परिणामकारक उपाय मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved