गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ९ वा आठवडा

तुमच्या गर्भाशयातल्या बाळांच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी हा एक टप्पा आहे कारण ९ व्या आठवड्यात जुळ्या बाळांच्या शरीरातील काही महत्वाच्या अवयवांचा विकास होतो. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा असंख्य बदल घडून येतात. येत्या आठवड्यात पहिल्या तिमाही जवळ येऊ लागताच, तुमचे शारीरिक आरोग्य उत्कृष्ट आहे हे सुनिश्चित करणे आणखी आवश्यक बनले आहे. नोकरी करणार्‍या महिला त्यांच्या गरोदरपणाबद्दल त्यांच्या मॅनेजरशी चर्चा करण्याच्या निर्णयावर येऊ शकतात आणि सुट्टीवर कधी जायचे आहे याबद्दल टाइमफ्रेम तयार करू शकतात. कामाची सवय असणाऱ्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी घरी बैठ्या जीवनशैलीचा अवलंब करणे हा खूप मोठा बदल आहे.

९ आठवड्यांत बाळांची वाढ

तुमच्या गर्भाशयात जुळी किंवा एकाधिक बाळे असली तरीही, ९व्या आठवड्यापर्यंत त्यांची प्रगती अगदी महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे आणि बाळाचे बरेच अवयव ह्या कालावधीत तयार होण्याच्या मार्गावर आहेत. बाळांचे डोळे जवळजवळ पूर्णपणे तयार झालेले आहेत, ह्या डोळ्यांचे पापण्यांनी संरक्षण केले आहे. तोंड आणि नाक ह्यासारख्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांना देखील योग्य आकार मिळू लागतो. त्यांच्यासमवेत, डोक्याच्या बाजूने कान तयार होऊ लागतात आणि पावलांमधून बोटे तयार व्हायला लागतात. बाळांची बोटे देखील अगदी स्पष्ट दिसू लागतात. बाळांच्या शरीरात, विकसित झालेले बहुतेक अंतर्गत अवयव त्यांची योग्य स्थिती घेतात आणि पुढे वाढतच राहतात. हृदयाचे सामान्यत: सर्व चार कक्ष पुरेसे विकसित होतात, ज्यामुळे हृदय त्याचे कार्य अधिक चांगले करते. ह्या काळात दात तयार होतात आणि हिरडीपर्यंत येतात. योग्य वेळेला ते बाहेर येतात.

बाळांचे आकार केवढा आहे?

गरोदरपणाच्या ९व्या आठवड्यापर्यंत प्लेसेंटा पूर्णपणे तयार झाल्यामुळे, बाळांची उंची आणि वजन वेगाने वाढू लागते. ह्या टप्प्याची समाप्ती चिन्हांकित करते आणि विकासाच्या पुढच्या टप्प्यासाठी प्रारंभ करते. त्यांचा आकार कदाचित द्राक्षे किंवा चेरीइतका मोठा असू शकेल आणि वेगाने होणारी वाढ स्वीकारण्यास ते तयार आहेत.

सामान्य शारीरिक बदल

एका बाळासह गर्भवती असलेल्या स्त्रीच्या तुलनेत एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीच्या शरीरात वेगळे बदल होतात. काही बदल हे दोघींमध्ये सारखे असतात आणि ती स्त्री किती बाळांसह गरोदर आहेत ह्याच्याशी त्याचा संबंध नसतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील लक्षणे

शरीरात होत असलेल्या वेगवेगळ्या बदलांशिवाय, ९ व्या आठवड्यात जुळे होण्याची चिन्हे आपल्यामध्ये भावनात्मक आणि सूक्ष्म मार्गाने प्रकट होऊ शकतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ९ वा आठवडा - पोटाचा आकार

तुम्ही आधी घालू शकत असलेल्या बऱ्याचशा पँट्स आता सहज बसत नाहीत. वजन आणि कंबरेच्या भागातील वाढ स्पष्ट होईल आणि तो फक्त तुम्हाला जाणवेल. पोटाच्या आकारात होणारा बहुतेक बदल गर्भाशयाच्या वाढीचा परिणाम आहे आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये थोडा पोटाचा उंचवटा दिसू लागेल

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ९ वा आठवडा  - अल्ट्रासाऊंड

जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा अल्ट्रासाऊंड केल्यास तुम्हाला तुमच्या बाळांच्या नवीन विकासाची ओळख होते. हे कमी व्हिज्युअल आणि अधिक आभासी आहे.  डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळांच्या हृदयाचे ठोके ऐकण्याची परवानगी देतील. आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांची  स्थिती त्या ठोक्यांना वेगळी करण्यास सक्षम ठरेल, परंतु कधी कधी तुम्हाला ते एकसंध आणि अगदी वेगाने पडताना सुद्धा ऐकू येतील

काय खावे?

बाळाच्या वाढीस अनुकूल अशी पोषकद्रव्ये प्रदान करू शकते अशा आहाराचे अधिक महत्व आहे उकडलेले मांस हा एक उत्तम पर्याय आहे. हंगामी फळे आणि भाज्यांमुळे अधिक आवश्यक पौष्टिकता सुनिश्चित होते. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा येऊ शकतो. लोह समृद्ध अन्नपदार्थांसह लोहाची पातळी संतुलित करणे महत्वाचे आहे.
आपल्या आहारात हिरव्या भाज्या, लाल फळे, सुका मेवा या सर्व गोष्टींचा समावेश करणे चांगले आहे.  जन्मपूर्व पूरक जीवनसत्वे घेतल्यास हा आहार आपणास निरोगी ठेवू शकतो

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या या टप्प्यात स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स लक्षात घेतल्यास तुम्हाला आगामी आठवडे आणि महिने सुरक्षित राहण्यास मदत होते.

हे करा

हे टाळावे

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास आणखी वाढेल, म्हणून गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित असलेले काही शुगर-फ्री च्युइंगम मिळविणे खूपच उपयुक्त ठरेल. आपल्या भावना लिहून ठेवण्यासाठी आणि स्वत: ला शांत आणि निवांत ठेवण्यासाठी डायरी लिहिण्यास प्रारंभ करा. जेव्हा एखादी स्त्री जुळ्या बाळांसह ९ आठवड्यांची गर्भवती असते, तेव्हा तिने तिच्या आयुष्यात कधीही अनुभवलेला नसेल इतका ताण तिच्यावर असू शकतो. असंख्य शारीरिक बदलांमुळे गरोदरपणातील सर्व आनंद पूर्ण घेतला जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या पतीची वेळोवेळी मदत घ्या  आणि थोडा वेळ जाऊ द्या कारण उत्तम क्षण लवकरच येतील! मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ८ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १० वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved