गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ६ वा आठवडा

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार आहे तसेच तुम्हाला थोडी चिंता सुद्धा वाटू शकते. त्यामुळे शांत राहणे महत्वाचे आहे. कोणतीही चिंता न करता तुम्ही त्यातून मार्ग काढणार आहात हे स्वतःला सांगा.

गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासामध्ये ६ वा आठवडा खूप महत्वाचं आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाचे शरीर आता मानवासारखे दिसू लागले आहे. कान, नाक आणि ओठ ह्या कालावधीत आता थोडे थोडे दिसू लागले आहेत. गर्भाची वाढ होत असताना फुप्फुस सर्वात शेवटी तयार होते, परंतु त्यांचे प्रारंभिक ऊतक या कालावधीत एकत्रित होतात. बाळाचे आतडे तयार होऊ लागतात आणि लहान प्रोजेक्शन दिसू लागतात, ते  शेवटी हात आणि पायांमध्ये विकसित होतात. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भारपणाच्या ६ व्या आठवड्यात, मेंदूच्या उर्वरित भागांसह, हाडांची रचना आणि स्नायूंना आधार देणारी पिट्यूटरी ग्रंथीची वाढ देखील दिसून येते. या वेगवान विकासामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके आईच्या हृदयापेक्षा दुप्पट वेगाने पडायला सुरुवात होते.

बाळांचा आकार केवढा आहे?

अगदी ह्यासर्व मोठ्या घडामोडी झाल्या तरी, बाळे साधारण अर्धा सेंटीमीटर लांबीच्या वाटाण्यापेक्षा मोठे नसतात.

सामान्य शारीरिक बदल

जेव्हा तुमच्या गर्भाशयातील लहान बाळे वेगाने विकसित होऊ लागतात आणि शरीराला ते जाणवते आणि त्यानुसार त्यांच्या वाढीस शरीर प्रतिसाद देते

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील लक्षणे

बर्‍याच स्त्रिया जुळी बाळे असल्याची चिन्हे ६ व्या आठवड्यात जोरदारपणे अनुभवतात, परंतु तुम्ही ती लक्षणे तीव्रतेने अनुभवत नसाल तर निराश होण्याची गरज नाही. त्यापैकी काही येथे आहेत:

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा ६ वा आठवडा - पोटाचा आकार

गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यांत, तुमच्या पोटाचा वाढलेला आकार दिसत नाही. पोटाचा आकार दिसण्यास अजून वेळ आहे .- तुमचे बाळ आता वाटाण्याच्या आकाराएवढे आहे!

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा ६ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

ज्या स्त्रियांना त्या एकाधिक बाळांसह गर्भवती आहेत की नाही ह्याची अद्यापही पुष्टी मिळालेली नाही त्यांच्यासाठी ६ वा आठवडा निर्णायक उत्तर देण्यास उपयुक्त ठरतो. जरी गरोदरपणात अनेक सॅक ४ थ्या आठवड्यापासून तयार होऊ लागतात तरी सुद्धा गर्भारपणाच्या ६ आठवडे पूर्ण झाल्यानंतरच त्या चांगल्या दिसू लागतात. बाळाची वाढ आणि परिमाण इत्यादींबद्दल अधिक माहिती मिळविण्यात देखील त्याची मदत होते. या टप्प्यावर अनेक बाळांचे हृदय पूर्णपणे तयार नसले तरीही बाळाचे हृदयाचे ठोके सामान्यत: प्रति मिनिट ९०-११० बीट्सच्या आसपास असतात. ह्या कालावधीत स्कॅन केल्यास आपल्या गर्भाशयात दोन मोठ्या स्पॉट्स च्या स्वरूपात बाळे दिसू शकतात, परंतु होणाऱ्या आईसाठी बाळांचे हे पहिलेच दर्शन आनंददायक ठरू शकते.

काय खाल?

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भूक अचानक बदलणे आणि तीव्र भूक लागणे. बाळाचा विकास वेगाने होत असल्याने बाळे आईच्या शरीरातून पोषणमूल्ये शोषून घेतात आणि त्यामुळे आईला दिवसभर भूक लागते. तुमच्या आहारात पोषक अन्नपदार्थांचा समावेश करणे आणि भरपूर प्रमाणात अन्नपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच त्याबरोबर प्रमाणापेक्षा जास्त खात नाही ना ह्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय, गर्भाशयाचा वाढता आकार आणि बाळे स्वतःसाठी जागा करत असल्याने त्याचा पोटावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटीच्या घटना वाढतात. ह्यासोबत बद्धकोष्ठता झाल्यास  एकत्रितपणे, गर्भवती महिलेसाठी हे पूर्णपणे त्रासदायक असू शकते. दिवसभरात द्रवपदार्थाचे योग्य प्रमाणात  सेवन करणे आणि तंतुमय फळे आणि खाद्यपदार्थांचा समावेश करणे लक्षात असुद्या.

गरोदरपणात काळजी घेण्यासाठी काही टिप्स

जेव्हा तुम्ही गर्भवती असाल तेव्हा तुमच्या शरीराची काळजी घेण्याने बदल करता येईल. काही टिप्स आपल्यासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरतील.

हे करा

काय टाळाल?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपल्या शरीराचा आणि पोटाचा आकार वाढत आहे. त्यामुळे इव्हेंट्स किंवा कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणार्‍या मोठ्या आणि आरामदायक कपड्यांची खरेदी करणे आवश्यक असू शकते. फॅशन आणि आराम ह्यांचे संतुलन राखत बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रसूती कपड्यांद्वारे हे सहज शक्य आहे.
तुमच्या स्तनांचा आकार वाढू लागेल आणि ते पूर्वीपेक्षा मोठे आणि हळुवार होतील. म्हणूनच, तुमच्या  स्तनांना आधार देणाऱ्या चांगल्या ब्रामध्ये गुंतवणूक करणे ही चांगली कल्पना आहे. फिरायला जाताना चांगली पकड असलेले आणि मऊ तळ असलेले शूज वापरा. ६ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅनवर आपल्या जुळ्या बाळांना पाहिल्यावर बहुतेक जोडप्यांना प्रथमच पालक झाल्यासारखे वाटते. बाळे वाटाण्याच्या लहान शेंगेसारखे दिसतात आणि त्यांचा आकार केवळ काही सेंटीमीटर इतका असतो. ह्या बाळांची लवकरच संपूर्ण वाढ होईल. त्यांचा विकास नीट होईल आणि ती सुरक्षित राहतील ह्याची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. होणारी आई ही शांत आणि सुरक्षित जागेत असली पाहिजे तसेच तिला पोषक आहार आणि कुटुंबियांचे प्रेम मिळणे आवश्यक आहे. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ५ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ७वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved