गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १६ वा आठवडा

तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह १६ महिन्यांच्या गर्भवती आहात. तुम्ही तुमच्या गरदोरपणाच्या दुसऱ्या तिमाहीचा  पहिला महिना अधिकृतपणे पूर्ण केलेला आहे. ह्या कालावधीत बऱ्याच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या आनंदी असतात. दुसरी तिमाही शरीरासाठी तितकीशी कठीण नसते आणि त्यामुळे मातांना जीवनाच्या इतर पैलूंवर लक्ष केंद्रित करता येते आणि ते तुमच्या कुटंबात येणाऱ्या नवीन सदस्यासाठी सुद्धा महत्वाचे असू शकते. काही वैद्यकीय समस्या किंवा गुंतागुंत नाही ना हे समजण्यासाठी  ह्या कालावधीत बऱ्याच्या चाचण्या करण्यास सांगितल्या जाऊ शकतात. गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात तुमच्यामध्ये आणि बाळामध्ये कुठले बदल होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील बाळांची वाढ

आपल्या गर्भाशयातील लहान बाळांचा आकार आणि वजन वाढेल. बाळाचा विकास वेगाने होतो आहे. या सर्व महिन्यांमध्ये बाळांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केले जाते जेणेकरून सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांचे शरीर पुरेसे टिकाव धरू शकेल. डोळ्यांचे मुख्य कार्य सुरु होते आणि प्रकाशातील बदलांना बाळाचे डोळे संवेदनशील होतात कारण प्रकाशामुळे बाळ लगेच पापण्या मिटून घेते. तुमच्या गर्भाशयात अंधार आणि शांतता असते परंतु तुम्ही जेव्हा पोटावर टॉर्चचा प्रकाश टाकता तेव्हा बाळ त्यास प्रतिसाद देते. आपल्या आजूबाजूचे आवाज ऐकण्यास केवळ आपले कानच मदत करत नाहीत तर मेंदूतील स्पंदने पुढे नेण्यासाठी आपली हाडे सुद्धा मदत करतात आणि ऐकण्याच्या क्रियेतील महत्वपूर्ण साधन बनतात. १६  गरोदरपणाच्या व्या आठवड्यात हाडांचा विकास आणि कुर्चेची सर्वोच्च वाढ होते त्यामुळे बाहेरील जगातील आवाज सुद्धा बाळाला अस्पष्टसे ऐकू येतात. तुमचा आवाज मात्र त्याला अगदी स्पष्ट ऐकू येईल. त्यामुळे ह्या काळात डॉक्टर तुम्हाला बाळाशी संवाद वाढविण्यास सांगतात. तुम्ही विशिष्ट गाणी ऐकण्याचे वेळापत्रक ठरवू शकता. बाळाने बाहेरच्या जगात प्रवेश केल्यानंतर बाळाला ती गाणी अगदी सहज ओळखू येतील.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात बाळांचा आकार

तुमच्या गर्भाशयातील बाळांचा आकार लहान असला तरी त्यांची वाढ होणे थांबले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचा विकास वेगाने सुरू आहे. एकट्या बाळांची लांबी साधारणत: १०.५ सेमी ते ११. ५ सेमी  असते आणि वजन साधारणपणे २७-३०ग्रॅम असते. संख्येचा विचार करण्याऐवजी आपली बाळे किती मोठी आहेत हे पाहणे आवश्यक आहे. बाळांच्या वाढीची फळांशी तुलना करणे हा पारंपारिक मार्ग आहे.  ह्या आठवड्यात तुमचे प्रत्येक बाळ अवोकाडो इतके मोठे होईल.

जुळ्या आणि एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात होणारे शारीरिक बदल

एकापेक्षा जास्त बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात शरीरात होणारे बदल आईच्या जीवनातील काही मौल्यवान क्षण असतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या जुळ्यांसह गरोदरपणाचा १६ वा आठवडा म्हणजे एक आनंददायक गोष्ट आहे. त्यासोबत येणारी  विविध लक्षणे सामान्यत: स्वागतार्ह असतात, तर काही थोडी त्रासदायक देखील असू शकतात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १६ वा आठवडा - पोटाचा आकार

तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असल्यामुळे सगळ्यांना तुमचा वाढलेला पोटाचा आकार लक्षात येईल. जर ही तुमची पहिली गर्भधारणा असे तर पोट नेहमीपेक्षा थोडे जास्त बाहेर येते. गडद रेषा आणखी गडद होते आणि नाभीच्या खालचा पोटाचा भाग दोन भागात विभागला जातो.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १६ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

मागील महिन्यातील अल्ट्रासाऊंड मध्ये जे स्पष्ट दिसले नाही ते आता १६ व्या आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड मध्ये स्पष्ट दिसू लागते. तुमच्या पोटातील प्रत्येक बाळाच्या हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकू येतील. ह्या टप्प्यावर केलेला अल्ट्रासाऊंड महत्वाचा आहे कारण त्यामुळे गर्भपाताची शक्यता आहे की नाही हे समजते. जोखमीची टक्केवारी जवळपास ५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे आणि त्यामुळे चिंताग्रस्त मातांसाठी तो एक मोठा दिलासा असू शकतो. मुलांची नखे लवकरच वाढू लागतील तसेच केसांनी त्यांचे शरीर आच्छादले जाईल, हे सर्व बदल अल्ट्रासाऊंड दरम्यान स्क्रीनवर स्पष्ट दिसतील. तसेच, तुमच्या लक्षात येईल बाळाची नाळ पोटाच्या खालच्या बाजूस असेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण  - १६ वा आठवडा -  आहार

आपले वजन झपाट्याने वाढत जाईल म्हणून, निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. वजन कमी ठेवण्यासाठी जेवण कमी करण्याचा प्रयत्न करू नका. आधी सांगितल्याप्रमाणे, जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीसाठी आवश्यक असलेला पौष्टिक आहार घ्या. थोडे थोडे दिवसभर खात राहिल्यास तुम्हाला खूप भूक लागणार नाही तसेच जळजळ होण्याची शक्यता कमी होईल.
सकाळची न्याहारी भरपूर करा. त्यानंतरच्या अन्नाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. रात्रीचे जेवण सर्वात हलके घ्या. मीठ फक्त आवश्यक प्रमाणात घ्या. मीठ आणि मसालेदार पदार्थ टाळा. उकडलेले खाद्यपदार्थ आणि भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्यास ते पचनास सोपे  जातात तसेच त्यामुळे तुम्हाला कुठल्याही संक्रमणापासून संरक्षण मिळते.

गरोदरपणात काळजी घेण्याविषयक टिप्स

गरोदरपणाचा १६ वा आठवडा एक चांगला आठवडा असल्याने, स्वत: ची काळजी घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या काही टिप्स दिल्या आहेत त्यांचे पालन करा.

हे करा

काय टाळावे?

जुळ्या  किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १६ व्या आठवड्यात तुम्हाला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

निद्रानाश टाळण्यासाठी आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी गरोदरपणातील उशांची खरेदी करा. पार्टी आयोजित करताना, इतरांनाही सामील करून घेण्यासाठी काही निरोगी ज्यूस तयार करण्यासाठी मॉकटेल रेसिपी बुक खरेदी करा. तुम्हाला तुमच्या वॉर्डरोबमध्ये पुन्हा भेट द्यावी लागेल आणि येत्या आठवड्यांत सैल कपडे आणि आरामदायक ब्रा खरेदी कराव्या लागतील. गरोदरपणाचा १६ आठवडा हा गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे. ह्या आठवड्यांमध्ये स्वतःची काळजी घेतल्यास पुढे येणारी आव्हाने चांगल्या प्रकारे हाताळता येतील. ह्या सर्व क्षणांचा आनंद घ्या. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १५ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १७ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved