गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ८ वा आठवडा

दुहेरी किंवा एकाधिक गर्भधारणेची पुष्टी तुम्हाला मिळते तेव्हा एकाच वेळी  तुम्ही चिंता आणि आनंद ह्या दोन्ही भावना अनुभवता. तुम्ही तुमच्या बाळांचे संगोपन आणि बाळे आरामात कशी राहतील त्याविषयीच्या तयारीचा विचार करण्यास सुरुवात कराल. ही सर्व तयारी आवश्यक आहे, परंतु तुम्ही स्वत: ला ताण देऊ नये, त्याऐवजी एकावेळी एक पाऊल उचला. जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे दोन महिने म्हणजेच ८ आठवडे पूर्ण कराल तेव्हा तुमच्या लहान जुळ्या किंवा एकाधिक बाळांचा लक्षणीय विकास होईल. गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुमच्या बाळांची किती वाढ झाली आहे ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

८व्या आठवड्यात बाळाची वाढ

गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यात गर्भाच्या अवयवांमध्ये सातत्याने वाढ होण्यास सुरवात होते. मज्जातंतूची वाढ, जी या संदर्भात सर्वात महत्वाची आहे. मेंदूमध्ये भरीव प्रगती होते. मेंदूचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मज्जातंतूच्या पेशी एकमेकांपर्यंत पोहोचू लागतात आणि असंख्य शाखा आणि कनेक्शन तयार करतात. हे मुख्यतः बाळांच्या मेंदूला कार्य करण्यास मदत करते आणि अशा मज्जातंतूंच्या मार्गाचे अस्तित्व त्यात योगदान देते. डोळ्याची निर्मिती दोन आठवड्यांपूर्वी आधीच सुरू आहे, तथापि, ती स्पष्ट नाही. गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात, पापण्या अर्धपारदर्शक ऊतकांसारख्या सामग्रीमध्ये तयार होण्यास सुरवात  होते आणि त्या तुमच्या बाळांच्या डोळ्यांना झाकण्यास सुरवात करतात. हातपायांची वाढ देखील बरीच आहे. जरी अद्याप हात आणि पाय पूर्णपणे विकसित होणे बाकी असले तरी सुद्धा मनगटाच्या भागात लवचिकपणा वाढतो आणि ते हृदयाच्या जवळ स्थित असतात. बाळांची बोटे देखील वाढत आहेत. ८ व्या आठवड्यापर्यंत त्यांचे हात व पाय विकसित होतात आणि तसेच ते वाकण्यास सुरुवात होते. बहुतेक बाळांमध्ये गुडघा विकसित होतो आणि स्कॅनमध्ये डॉक्टरांद्वारे तो ओळखला जाऊ शकतो.

८ आठवड्यांच्या बाळांचे आकार

मागील आठवडे तुमची जुळी किंवा एकाधिक बाळे केवळ बियाणे अथवा वाटाण्याच्या आकाराची होती परंतु आता ८व्या आठवड्यात ते राजम्याइतके मोठे आहेत. बहुतेक वाढ दररोज फक्त एक मिलिमीटरच्या आसपास असते, जी कदाचित जास्त दिसत नाही, परंतु त्यांच्या एकूण आकाराच्या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात असते. गर्भाशयात जसजशी बाळांची वाढ होते तसतसे तुमचे शरीर देखील बदलांतून जाईल. हे बदल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये आढळणारे सामान्य शरीर बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये होणारे बहुतेक बदल आंतरिक असतात, तर त्यांची शारीरिक वाढ हळूहळू वेगात पुढे जात आहे. तथापि, स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतील : मॉर्निंग सिकनेस सोबत आता तुमचे शरीर गर्भारपणाची आणखी काही चिन्हे दर्शवेल. खाली आपल्या गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यात दिसणारी लक्षणे खाली दिली आहेत.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील लक्षणे

८व्या आठवड्यात जुळे किंवा तिळे होण्याची चिन्हे फारच स्पष्ट दिसतात आणि जर तुम्ही जुळे किंवा एकाधिक बाळे असल्याचे सेलिब्रेट केले नसल्यास तुम्ही दोन महिने पूर्ण झाल्यावर आनंद साजरा करू शकता. त्या व्यतिरिक्त, इतर बरीच लक्षणे आहेत जी आपल्या प्रवासाच्या या टप्प्यावर स्पष्ट दिसतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील पोटाचा आकार

८ व्या आठवड्यात पोट अजिबात स्पष्ट दिसत नाही. तुम्हाला तुमच्या कंबरेच्या आकारात कोणतेही बदल दिसणार नाहीत आणि तुम्हाला बेबी बंप देखील दिसणार नाही. गरोदरपणाच्या नंतरच्या काळात पोटाचा आकार वाढतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

आत्तापर्यंत,अल्ट्रासाऊण्ड दरम्यान डॉक्टरांनी दाखवलेले काळे ठिपके म्हणजे बाळे असे तुम्हाला विश्वास होता परंतु,  आपल्या गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे  स्पष्टचित्र पाहू शकाल. या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्याने तुमच्या बाळाचे अवयव पूर्वीपेक्षा अधिक चांगले तयार झालेले असतील आणि ते स्पष्टपणे दिसू शकतील गरोदरपणात गर्भवती आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि जुळ्या बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीची काळजी अधिक प्रमाणात घेतली पाहिजे. गर्भारपणाच्या मुदत संपेपर्यंत बाळांना सहन करण्यायोग्य कोणता आहार असावा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. दुहेरी/एकाधिक गरोदरपणात तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय खावे हे जाणून घ्या

८ व्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक गर्भधारणेस समर्थन देण्यासाठी काय खावे?

तुमच्या आहारात गरोदरपणाच्या ८व्या आठवड्यात आणि खरं तर, संपूर्ण गरोदरपणात निरोगी खाद्यपदार्थ असावेत. संतुलित आहार आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या सर्वांगीण विकासास समर्थन देईल. प्रथिने आणि कॅल्शियमचे सेवन हे प्रमाणित असणे आवश्यक आहे कारण मुलांच्या हाडांमध्ये आणि स्नायूंच्या विकासामध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. लोहाबरोबरच इतर जीवनसत्त्वे आणि भरपूर प्रमाणात फॉलिक ऍसिड्स देखील आवश्यक आहेत. पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी प्यायल्यास बद्धकोष्ठतेची शक्यता कमी होण्यास मदत होते. या आठवड्यात तुम्हाला आणि तुमच्या बाळास  आवश्यक असलेले सर्व पोषण मिळावे यासाठी आपल्या आहारात खालील गोष्टी समाविष्ट कराः आपला आहार पौष्टिक आणि सेवन करण्यास सुरक्षित आहे याची खात्री करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घरगुती अन्न. तथापि, तुम्ही फळे, भाज्या आणि मांस पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि ८व्या आठवड्यात संवेदनशील बनलेल्या तुमच्या पचनसंस्थेस मदत करण्यासाठी ते योग्य प्रकारे शिजवलेले आहेत याची खात्री करुन घ्या.

गरोदरपणात काळजी घेण्याविषयक टिप्स

एकापेक्षा जास्त बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रियांसाठी गरोदरपणाचा आठवा आठवडा कठीण असतो कारण मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची वाढ निरंतर ठेवण्यासाठी  शरीरातून भरपूर पोषणमूल्ये घेतली जातात. परंतु येथे काही टिप्स आहेत ज्याद्वारे तुमच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.

हे करा

काय टाळावे?

तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या आगमनाची तयारी करत असताना, तुमच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांसाठी सज्ज होण्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी काही खरेदी करणे आवश्यक आहे. तुमच्या गर्भावस्थेच्या ८ व्या आठवड्यात तुम्ही काय खरेदी केले पाहिजे ह्यावर एक नजर टाकूया.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या आठव्या आठवड्यात तुमचे शरीर ज्या शारीरिक बदलांमधून जाते त्यापैकी एक म्हणजे स्तनांना येणारी सूज. तुमच्या कप साईझ मध्ये अधिक वाढ होईल. म्हणूनच, तुम्ही चांगल्या मॅटर्निटी ब्रा खरेदी करणे आवश्यक आहे ज्या तुमच्या आवश्यकतेपेक्षा आकाराने मोठ्या असतील जेणेकरून त्या आपल्या गरोदरपणाच्या शेवटपर्यंत सहजपणे वापरता येतील. तुम्हाला तुमचा सध्याचा वॉर्डरोब १ किंवा २ साईझ लहान देखील वाटू शकेल. म्हणूनच, येत्या काही महिन्यांत वापरण्यासाठी काही सोयीस्कर कपडे खरेदी करा. सध्याच्या आकारापेक्षा ते एक किंवा दोन साईझ मोठे असतील ह्याची खात्री करा आरामदायक पादत्राणे वापरण्यास सुरुवात करा. चांगले शूज तुम्हाला दिवसभर चांगला पावित्रा आणि उर्जा पातळी राखण्यास मदत करतात जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह आठ आठवडे गरोदर असलेल्या स्त्रीसाठी पहिले काही महिने खडतर असू शकतात आणि येणाऱ्या काही महिन्यांविषयी तुम्हाला काळजी वाटू शकते. तथापि, स्वत: वर ताण येऊ देऊ नका, काळाबरोबर सर्व काही ठीक होईल. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ७वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ९ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved