गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ७ वा आठवडा

जुळ्या मुलांसह सात आठवडे गर्भवती राहणे ही एका स्त्रीची सर्वोच्च भावना आहे आणि पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांसाठी हा संपूर्णपणे वेगळा अनुभव आहे. तुम्हाला तुमच्या गर्भारपणाच्या सुरूवातीस अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी या काळात ठळकपणे दिसू लागतील. तुमचे कपडे घट्ट होण्यापासून तुमच्या आत एक जीव वाढण्यापर्यंतच्या भावना निर्माण होण्यापासून त्या नियंत्रित होण्यापर्यंत सर्व काही गर्भारपणाच्या ७ व्या आठवड्यात होते. बाळे त्यांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेत आणि आधीच्या आठवड्यापेक्षा त्यांच्या आकारात दुप्पट वाढ झालेली आहे.

सामान्यपणे शरीरात होणारे बदल

बाळाची वाढ ह्या काळात सर्वोच्च गतीने होत असते, आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीला जाणवणारे शारीरिक बदल सुद्धा लक्षणीय असतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील लक्षणे

७व्या आठवड्यांत जुळ्या गर्भधारणेची चिन्हे तीव्रपणे दिसू लागतात

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्या पोटाच्या वाढलेल्या आकारावरून बाळांची झालेली वाढ दिसून येते आणि त्यामुळे  त्याची उपस्थिती पूर्वीपेक्षा जास्त जाणवते. काही स्त्रियांच्या त्वचेवर काही हलक्या रंगांच्या रेषा देखील दिसू शकतात, ज्याचा रंग किंचित लालसर असू शकतो. ह्या रेषा स्तन आणि मांडीवर देखील दिसतात. आपल्या वाढत्या बाळांना सामावून घेण्यासाठी शरीर तयार होत असल्यामुळे त्वचा ताणली जाते आणि स्ट्रेच मार्क्स दिसण्यास सुरुवात होते.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड

बहुतेक डॉक्टर ह्या टप्प्यावर जुळे किंवा एकाधिक बाळे अपेक्षित आहेत का हे पालकांना सांगू शकतात. दोन आठवडे अगोदरही ठराविक पुरावे मिळू शकतात, परंतु या टप्प्यामुळे पालकांना देखील या तथ्याशी सहमत होणे सोपे होते, म्हणूनच बहुतेक डॉक्टर सातव्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करतात. सातव्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये दोन (किंवा अधिक) वेगळ्या थैल्यांची उपस्थिती सहजपणे आढळू शकते. जरी तुम्हाला बाळाच्या आकारात जास्त विकास दिसू शकत नसला, तरीसुद्धा जोपर्यंत तुमच्या प्रत्येक बाळामध्ये महत्वाचे अवयव आणि शारीरिक अंग विकसित होत आहेत तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स राहू शकता.

काय खावे?

गरोदरपणाच्या सातव्या आठवड्यात सहसा अशी वेळ येते जेव्हा बहुतेक स्त्रियांना त्यांनी आतापर्यंत  ऐकलेल्या पदार्थांची लालसा निर्माण होण्याचा अनुभव येण्यास प्रारंभ होतो! काही प्रकरणांमध्ये, कदाचित यापूर्वी फारसे आवडत नसलेले खाद्यपदार्थ अचानक सर्वात स्वादिष्ट वाटू शकतील! काही जण म्हणतात की लालसा वाटणे हे शरीरातील पोषक तत्वांच्या भरपाईची आवश्यकता आहे हे तुम्हाला सांगण्याचा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, आईस्क्रीमची इच्छा असणे हे कॅल्शियम कमतरता असल्याचे लक्षण असू शकते किंवा मांस खावेसे वाटल्यास प्रथिनांची आवश्यकता असू शकते. आपली अन्नपदार्थांची लालसा तीव्र किंवा कमीतकमी असली तरीही, तुम्हाला आवश्यक असलेले सर्व घटक आणि पोषक द्रव्यांची संतुलित तरतूद करण्यासाठी काही खाद्यपदार्थ आपल्या आहाराचा एक भाग असावेत. सुरुवातीला, मॉर्निंग सिकनेस कुठल्या अन्नपदार्थांमुळे होतो हे समजणे कठीण आहे. तीव्र गंध नसलेली विशिष्ट फळे किंवा पर्याय निवडल्यास आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते.

गरोदरपणात काळजी घेण्यासाठी काही टिप्स

निरोगी खाणे आणि आपल्या शरीराची काळजी घेण्यापलीकडे सुद्धा गरोदरपणात तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत.

हे करा

हे टाळावे

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमची मॉर्निंग सिकनेसची लक्षणे येत्या आठवड्यांत अधिक मजबूत झाल्याने काही सुवासिक उदबत्त्यांमध्ये किंवा चहामध्ये गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आपली त्वचा गुळगुळीत आणि निरोगी ठेवण्यासाठी सौम्य स्क्रब आणि मॉइश्चरायझर घ्या. गर्भधारणेच्या आणि बाळाच्या विकासाच्या आसपासची पुस्तके किंवा लेख वाचण्यास प्रारंभ करा मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ६ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ८ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved