In this Article
- २३ व्या आठवड्यात बाळांची वाढ
- बाळांचा आकार केवढा असतो?
- सामान्य शारीरिक बदल
- जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्याची लक्षणे
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा – बाळाचा आकार
- जुळ्या बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
- काय खावे?
- गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
- आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहात आणि तुम्ही तुमच्या जुळ्या बाळांना गर्भात सुरक्षितपणे ठेवल्यामुळे तुमची बाळे खूप आनंदी असली पाहिजेत. गरोदरपणाचा ‘हनिमून स्टेज‘ म्हणून ओळखला जाणारा कालावधी संपायला आता फक्त एक आठवडा बाकी आहे. परंतु काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण आता सगळे सुरळीत आणि चांगले होणार आहे. हा आठवडा विशेषकरून खूप महत्वाचा आहे, ह्या आठवड्यात तुमचे आणि तुमच्या बाळाचे वजन खूप वाढेल.
२३ व्या आठवड्यात बाळांची वाढ
मागील आठवड्यांमध्ये तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांमध्ये वाढ आणि विकासाच्या अनुषंगाने लक्षणीय बदल झालेले तुम्हाला दिसतील. हा आठवडा तुलनेने शांत असेल. बाळांची वाढ आणि नैसर्गिक प्रगती वेगाने होत आहे ना ह्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
तुमच्या बाळांचे आच्छादन करणारी त्वचा ह्या काळात थोडी संकुचित होऊन त्वचेला सुरकुत्या पडतील. कारण त्वचा योग्य प्रमाणात ताणली जाईल इतका चरबीचा साठा अजून तयार झालेला नाही. अर्धपारदर्शक लाल त्वचेमुळे बाळे विचित्र दिसू शकतात. परंतु येत्या काही महिन्यात त्यात बदल होईल.
जर तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या हृदयाचा ठोका ऐकण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अल्ट्रासाउंडची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. सहसा, २३ व्या आठवड्यात, आपल्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांचे हृदय मजबूत होईल आणि ते अधिक तीव्रतेने रक्त पंप करेल. केवळ स्टेथोस्कोप वापरुन आपल्या हृदयाचे ठोके ऐकणे शक्य असते. आपले डॉक्टर त्यासाठी मार्गदर्शन करू शकतात.
या काळात, तुमची जुळी किंवा तिळी बाळे बरीच वेगाने वाढतील. विकसित झालेल्या शेवटच्या अवयवांपैकी एक म्हणजे फुफ्फुस. तथापि, बाळे श्वास घेण्याचा प्रयत्न करतात कारण ते आतमध्ये असतानाच त्याचा सराव करतात आणि अशाच हालचाली करतात ज्या वास्तविक जगात आल्या की त्यांची नक्कल होईल. मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आणि डोळ्यांचे सामर्थ्य वाढत गेले तर तुमचे बाळ अधूनमधून आतमध्ये स्वप्न पाहू शकतात. हे त्यांच्या पापण्याखालील डोळ्यांच्या हालचालींद्वारे आणि शरीराच्या वेगवान हालचालींमध्ये देखील प्रकट होते.
बाळांचा आकार केवढा असतो?
आता तुमच्या बाळांच्या आकारात वाढ होईल. बाळाचा आकार नारळापासून परिपक्व आंब्याच्या आकारामध्ये बदलेल. आधीच्या आठवड्यापेक्षा बाळांमध्ये लक्षणीय वाढ होईल. बाळाची लांबी, योग्यरीत्या मोजल्यास ती २८ सेंटिमीटर्सच्या आसपास असते आणि वजन ५०० ग्रॅम्सच्या आसपास असते. जुळ्या किंवा तिळ्या बाळांचा आकार पुढच्या दोन आठवड्यांमध्ये अगदी लक्षणीयरीत्या वाढेल.
सामान्य शारीरिक बदल
बहुतेक स्त्रियांचा गरोदरपणाचा २३ वा आठवडा शांततेत जातो. शरीरात होणारे कोणतेही बदल हे मागील आठवड्यांतील उर्वरित भाग असतात, ते पुढे तसेच राहतात किंवा तीव्रतेने वाढतात.
- ज्याप्रकारे तुमच्या पोटाची वेगाने वाढ होते, त्याचप्रमाणे तुमच्या स्तनांच्या आकारात सुद्धा वाढ होईल. असे आणखी एक किंवा दोन आठवडे सुरू राहील आणि मग त्यांच्या आकाराची वाढ पूर्ण होईल. ही वाढ केवळ एक शारीरिक पैलू नाही. त्यांच्यातही वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. प्रसूतीनंतर बाळांना दूध देण्यासाठी स्तन ग्रंथी हळूहळू सक्रिय होऊ लागतात. काही स्त्रियांच्या स्तनातून पिवळसर रंगाचा स्त्राव गळतो आणि तो खूपच घट्ट असतो. तुमच्या स्तनांनी बनवलेले हे पहिले दूध आहे; त्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात. सहसा, हे जन्मानंतर लवकर होते जेणेकरून बाळाला त्वरित ते मिळेल. तथापि, त्याची निर्मिती आधी झाली तरी हरकत नाही. ब्रा भिजल्यामुळे तुम्हाला फक्त एक अस्वस्थता जाणवेल.
- गरोदरपणात प्रगती होत असताना, हार्मोन्स पुन्हा नियंत्रण गमावतात आणि त्यांच्या पातळीमध्ये सहजगत्या चढ–उतार होतात. परिणामी, तुम्हाला काहीही कारण नसताना उदास किंवा दुःखी वाटू शकेल आणि अचानक तुम्हाला उर्वरित दिवसात आनंदी वाटू लागेल. प्रत्येक दिवस किंवा आठवडा तुम्हाला अद्वितीय वाटू शकतो. तुमच्या विचारांची नोंद ठेवून तुम्हाला नक्की कसे वाटते ह्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.
- प्रीक्लेम्पसिया ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे आणि कोणत्याही वेळी गर्भवती महिलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यातील एक प्रमुख लक्षण म्हणजे सूज येणे हे होय. ही सूज वेगाने उद्भवते आणि जास्त प्रमाणात असते व बरेच दिवस टिकते. इतर प्रकरणांमध्ये, सूज सामान्यत: काही काळांत दूर होते. याला एडिमा असे म्हणतात आणि त्याचा पायांवर जोरदार परिणाम होतो. ह्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रक्त परिसंचरण कमी होणे हे होय कारण गर्भाशयाकडे जास्त रक्त पुरवठा होत असतो. आपल्या पायांना वर ठेवून आणि आहाराचा एक भाग म्हणून तुम्ही वापरत असलेल्या सोडियमची मात्रा कमी करुन या प्रकारची सूज हाताळली जाऊ शकते.
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्याची लक्षणे
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यातील लक्षणे स्पष्ट दिसतात. तुमच्या लक्षात येईल की मागील काही लक्षणे सुद्धा पुन्हा दिसू लागतील.
- जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या २३ व्या आठवड्यात प्रवेश करता तेव्हा सराव कळा येण्यास सुरुवात होते. तुम्हाला प्रसव कळांसारख्या सराव कळा येण्यास सुरुवात होते. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही कारण सराव कळा प्रसव कळांसारख्या तीव्र नसतात. २३ व्या आठवड्याच्या दरम्यान त्यांची वारंवारिता वाढू शकते कारण शरीराचे बरेचसे स्नायू ह्यामध्ये भाग घेतात. प्रसूतीच्या वेळेला ते नीट काम करतील की नाही हे तपासून पाहण्याचा हा एक मार्ग आहे.
- हातापायांना सूज येणे कमी होते म्हणून कि काय पण त्यासोबत आता पाठ सुद्धा दुखू लागते. आणि जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असताना तुमच्या पाठीवर सुद्धा दाब जास्त प्रमाणात येतो. तुम्हाला ह्या संपूर्ण आठवड्यात पाठदुखी जाणवेल आणि कंबरेकडील भागात ती जास्त प्रमाणात असू शकेल. तुमच्या गर्भाशयाचा सुद्धा विस्तार होईल. त्यामुळे अंतर्गत अवयव हलवले जातील आणि जवळपासच्या मज्जातंतूंवर दाब येईल. तसेच वजन वाढल्यामुळे तुमच्या मणक्यांवर सुद्धा भार येईल त्यामुळे त्या संपूर्ण भागावर ताण येईल. त्याबद्दल जागरूक राहून दबाव वाढवू शकेल अशा कोणत्याही क्रियाकलापांपासून दूर राहिल्यास ही परिस्थिती प्रभावीपणे हाताळली जाऊ शकेल.
- दात घासल्यानंतर आपल्या तोंडातून रक्त येण्याच्या घटना या आठवड्यात पुन्हा दिसून येतील. आपल्या गर्भाशयाच्या आकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास, रक्ताभिसरण वाढेल, हिरड्या अत्यंत संवेदनशील बनतील. बहुतेक रक्तस्त्राव सामान्यत: हिरड्यांना चिडचिडेपणामुळे होतो, म्हणूनच जेव्हा आपण ब्रश करता तेव्हा थोडेसे रक्त येऊ शकते. तथापि, जर रक्तस्रावासोबत कोणत्याही प्रकारचे दातांचे दुखणे असेल तर यामुळे दात किडणे किंवा हिरड्यांना आलेली सूज ही त्यामागील कारणे असू शकतात.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा – बाळाचा आकार
तुम्ही २३ आठवड्यांच्या गर्भवती असताना तुमचे पोट जुळ्या बाळांसह गरोदर असल्याची वैशिष्ट्ये दर्शवण्यास सुरुवात करते. म्हणजेच एका बाळासह गरोदर असताना दिसत असलेल्या पोटाच्या आकाराच्या तुलनेत जुळ्या बाळांसह गरोदर असतानाचा आकार तुम्ही गरोदरपणात तुलनेने पुढे असल्याचे दर्शवते. परंतु प्रत्येक गरोदरपण वेगळे असते आणि जनुके, उंची आणि वजन ह्या घटकांचा परिणाम तुमच्या पोटाच्या आकारावर होतो.
जुळ्या बाळांसह गरोदरपण – २३ वा आठवडा – अल्ट्रासाऊंड
शरीरावर चरबीचा साठा आणि वजन वाढत असल्याची खात्री करण्यासाठी ह्या कालावधीत अल्ट्रासाऊंड केला जातो. तसेच, ह्या आठवड्यात स्तनाग्रे सुद्धा स्पष्ट दिसू लागतात. तुम्ही पोटावर हात ठेवल्यास किंवा बाळाशी बोलल्यास तुमचे बाळ तुम्हाला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे.
काय खावे?
ह्या आठवड्यात विविधता ही मुख्य गोष्ट आहे, तुम्ही जो आहार घेत आहात त्यामध्ये प्रत्येक पौष्टिक घटक विपुल प्रमाणात आहेत याची खात्री करुन घ्या. लोह, कॅल्शियम, आणि असंख्य जीवनसत्त्वे नेहमीप्रमाणे सर्वोच्च क्रमांकावर आहेत. पिण्याचे पाणी आणि इतर द्रवपदार्थांवर सुद्धा लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स
ह्या आठवड्यात तुम्हाला थोडी अस्वस्थता येऊ शकते, परंतु काही सोप्या टिप्ससह तुम्ही ते हाताळू शकता.
हे करा
- नाक चोंदल्यास तुमच्या खोलीत अनुनासिक पट्टे किंवा ह्युमिडिफायर्स वापरा.
- मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.
काय टाळावे?
- विश्रांतीशिवाय बरेच तास काम करणे टाळा कारण तसे केल्यास सूज आणखी वाढू शकते.
- रात्री शांतपणे झोप येत नसल्यास दुपारी झोप घेण्यास टाळाटाळ करू नका.
आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?
आपल्याकडे आधीपासून बहुतेक वस्तू असू शकतात, म्हणून काही जलद खरेदी करू शकता.
- बाळांसाठी मऊ ब्लॅंकेट.
- आपल्या गर्भावस्थेबद्दल असंख्य विचारांची नोंद ठेवण्यासाठी एक जर्नल.
जुळ्या बाळांसह २३ आठवड्यांच्या गर्भवती असताना पोटात कोणत्याही प्रकारची हालचाल झाल्यास तात्काळ तुमचा तुमच्या बाळांशी बंध निर्माण होतो. ह्या सगळ्या सुंदर क्षणांचा आनंद घ्या. तुमची बाळे मोठी झाल्यावर तुम्ही ह्या सगळ्या आठवणी पुनःपुन्हा आठवू शकता.