गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २१ वा आठवडा

आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या बदलांमुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, परंतु तुमच्यात वाढत असलेल्या लहान मुलांना सामावून घेण्यासाठी ते आवश्यक आहेत. २१व्या आठवड्यात तुमच्या बाळांचा विकास कसा होतो, तसेच तुमच्या शरीरात कुठल्या बदलांची अपेक्षा केली पाहिजे आणि इतर बरेच काही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

२१ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाचा अर्धा टप्पा पार केल्याने आता बाळांनासुद्धा वाढीचा वेग वाढवला पाहिजे हे समजण्यास सुरुवात होते. सगळ्या यंत्रणा नीट कार्यरत करण्यावर सगळे लक्ष केंद्रित केले जाते. अन्न हे जगण्याची गुरुकिल्ली आहे आणि या आठवड्यात बाळांच्या वाढीसाठी तो सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. पचनक्रिया योग्य प्रकारे विकसित झाल्यानंतर, कार्य करण्यास सुरुवात करते आणि अन्न पचविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करते ह्याच कालावधीत काळ्या रंगाचे मेकोनियम बाळाच्या शरीरात तयार होते आणि बाळाच्या पहिल्या शौचाद्वारे बाहेर येईपर्यंत ते तिथेच राहते. बाळाची सुरुवातीची पचनक्रिया नीट कार्यरत होण्यासाठी एंझाइम आणि ऍसिड्सची निर्मिती होते. शोधण्याच्या आणि गिळण्याची क्रियेमध्ये देखील बाळे वेगाने प्रगती करतात, कारण तुमच्या बाळांची भरपूर प्रमाणात अ‍ॅम्निओटिक द्रवपदार्थ घेण्याची प्रवृत्ती असते आणि बाळे नेहमीपेक्षा जास्त अंगठा चोखण्यास देखील प्राधान्य देतात. ह्या सर्व पद्धती बाळाला बाहेरच्या जगात टिकून राहण्यास मदत करतात. अन्न आणि पचन यावर लक्ष केंद्रित केले की ते संश्लेषित केले जाऊ शकते आहे ना ह्याची खात्री करुन, बाळांमधील मलमूत्र प्रणाली देखील अगदी सुरळीत कार्य करण्यास सुरवात करते. बाळांनी आत घेतलेल्या गर्भजलवार मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे अवयव प्रक्रिया करणे सुरु करतात आणि पुन्हा बाहेर टाकतात. हे अशा प्रकारचे चक्र शरीराच्या कार्यप्रणालीला योग्य पद्धतीने कार्य करण्यास प्रवृत्त करते. या व्यतिरिक्त, अंतःस्रावी प्रणाली आणि प्लीहा देखील कार्य करण्यास सुरवात करतात, तर स्नायू आणि हाडांची रचना वेगाने विकसित होते.

बाळांचा आकार केवढा आहे?

गरोदरपणाच्या २१व्या आठवड्याच्या आसपास, डॉक्टर सामान्यत: बाळांच्या डोक्यांपासून पायांपर्यंत बाळाची लांबीही मोजतात. बहुतेक वेळा बाळांची लांबी साधारणतः २५ सेंटीमीटर असते. एकाधिक बाळांसाठी ती कमी असते. तसेच बाळांचे वजन सुद्धा २५०-३०० ग्रॅम्सच्या आसपास असते आणि जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या बाबतीत ते थोडे कमी असते. तुमच्या पोटातील बाळे आता जवळपास गाजराच्या आकाराची असतात.

सामान्य शारीरिक बदल

गर्भधारणेचा २१ वा आठवडा हा जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण ह्या आठवड्यात बाळांना तसेच आईला प्रसूतीपूर्वी होणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्यास मजबूत संकेत दिले जातात

जुळ्या गर्भधारणेसह गरोदरपणाच्या २१ व्या आठवड्यातील लक्षणे

एकीकडे, तुम्ही कदाचित सुरुवातीच्या काळात जाणवणाऱ्या पूर्वीच्या लक्षणांना निरोप देत आहात. परंतु २१व्या आठवड्यापासून अंतिम तिमाहीत काय येऊ शकते याचा टीझर तुम्हाला जाणवण्यास सुरुवात होईल.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २१ वा आठवडा - पोटाचा आकार

तुमच्या पोटाचा आकार आता लक्षणीयरित्या वाढला असेल. एकाधिक बाळे असतील तर त्वचा खूप ताणली जाते, त्यामुळे बाळाच्या हालचाली अधूनमधून दिसू शकतात.

एकाधिक बाळांसह गरोदरपण - २१ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

मागील आठवड्यात वगळण्यात आलेले अल्ट्रासाऊंड स्कॅन, सर्व चाचण्या आणि तपासणीसह या आठवड्यात पूर्ण केली जाईल. तुमची बाळे आता अगदी स्पष्ट दिसायला लागतील, अधूनमधून काही क्षण तुम्ही त्यांना गिळताना आणि फिरत असताना देखील पाहू शकता.

काय खावे?

गरोदरपणात तुम्ही निरोगी रहाणे महत्वाचे आहे. तुम्ही कोणत्या आठवड्यात आहात याची पर्वा नाही, निरोगी पदार्थ खाणे आणि तीव्र वास असणारा कोणताही आहार टाळणे महत्वाचे आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या २१ व्या आठवड्यात होणारे बहुतेक बदल सामान्यत: आपल्या स्वतःच्या शरीराची चांगली काळजी घेतात आणि येणाऱ्या महिन्यांमध्ये त्याची सवय होऊन नियमित दिनक्रम तयार होतो.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे

आपली मुले आपल्या प्रगतीशी सुसंगत आहेत हे जाणून घेतल्याने आपण एक पाऊल पुढे जाऊन काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता, जसे की: या आठवड्यापासून जुळ्या बाळाची वाढ वेगवान होते. बाळांच्या जन्मानंतर तुम्ही त्यांच्यासाठी तयार असल्याची स्वत: ला खात्री द्या आणि वेळ येईल तेव्हा आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य इष्टतम ठेवा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved