Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १९ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १९ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण –  १९  वा आठवडा

जेव्हा तुम्ही तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात प्रवेश करता तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही गर्भधारणेपासून बरेच पुढे आला आहात. ह्यात काही शंका नाही की तुम्ही अधिक आरामशीर असाल आणि आपल्या स्वत: च्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकाल. गर्भारपणाच्या इतक्या आठवड्यांनंतर होणारे सूक्ष्म बदल आता तुम्हाला माहिती झाले असतील. बाळाच्या वाढीस आवश्यक घटक असणारा आहार, संतुलित व्यायाम आणि स्वतःचा फिटनेस राखल्यास गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांसाठी तुम्हाला दोघांनाही तयार राहण्यास मदत होऊ शकते.

१९ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गर्भधारणेच्या १९ व्या आठवड्यात तुम्हाला चकित करणाऱ्या असंख्य घटना असतील. येत्या आठवड्यांमध्ये आपल्या मुलांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाविषयी जास्तीत जास्त जाणीव होत आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांत हे असेच सुरु राहील.

लहान बाळांचे हातावर जास्त नियंत्रण येऊ लागेल त्यामुळे बोटे एकत्र करून बाळ मुठी आवळून घेऊ लागेल आणि कदाचित बरेच दिवस ते तसे करत राहतील. काहीजण छातीजवळ हाताची घडी घालू लागतील आणि अंगठा चोखण्यास सुद्धा सुरुवात करतील.

जरी तुमच्या शरीराचे निरनिराळे भाग बाळांना जिवंत आणि आनंदी ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्रिया करीत असले तरीही, मनुष्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व इंद्रियांना तुमच्या लहान मुलांमध्ये देखील सक्रिय केले जाते. जेव्हा तुम्ही काही बोलता किंवा सूर लावता किंवा एखादे गाणे ऐकता किंवा जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा गर्भाशयातल्या बाळांची संवेदनाक्षम समज वाढविली जाते, कारण त्यांचे मेंदू या संदेशांवर प्रक्रिया करण्यास सुरवात करतो तसेच त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे मज्जासंस्था शरीरातील प्रत्येक भाग मेंदूला जोडण्यासाठी एक भव्य नेटवर्क तयार करते.

जर तुमच्या गरोदरपणाच्या आधीच्या आठवड्यात तुमच्या बाळाला व्हेरानिक्सने झाकलेले नसेल तर नक्कीच या आठवड्यात ते घडेल. तुमच्या बाळाचे शरीर, केस आणि द्रवाच्या थरांनी झाकून गेलेले असते त्यामुळे बाळांच्या शरीराचे तापमान इष्टतम पातळीवर राहून बाळे संरक्षित राहतात. हाडांचा विकास निरंतर होत राहतो आणि कालांतराने हाडे कठोर होतात तसेच हृदय आणि मूत्रपिंडांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होते.

बाळांचा आकार केवढा असतो?

जर तुम्ही गर्भावस्थेच्या ८ व्या किंवा ९ व्या आठवड्यात केलेल्या अल्ट्रासाऊंडची तुलना ह्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडशी केलीत तर बाळाच्या आकारातील बदल पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. बाळाचे वजन साधारणतः २०० ग्रॅम्स असते. एकापेक्षा जास्त बाळे असतील तर हे वजन कमी असते. त्यांचा शारीरिक आकार आंबा किंवा टोमॅटोपेक्षा मोठा असेल. बहुतेक बाळांची लांबी सुमारे १४ ते १५ सेंमी असते. जुळी किंवा तिळी बाळे तुलनेने लहान असतात.

बाळांचा आकार केवढा असतो?

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात होणारे बदल हे सहसा शारीरिक असतात. कारण गर्भाशयातील बाळाच्या वाढीस आधार देण्यासाठी शरीरात अंतर्गत बदल होऊन वजनात वाढ होते.

तुमच्या शरीरात रक्ताभिसरण अद्याप खूपच वेगात सुरु आहे. आपल्या लहान बाळांच्या वाढत्या आकारास समर्थन देण्यासाठी भरपूर पोषण आणि ऑक्सिजन आवश्यक आहेत. तुमच्या रक्ताच्या प्रमाणात आणि रक्ताभिसरणात वाढ होते. तुमच्या शरीराच्या निरनिराळ्या भागात, विशेषत: तुमच्या नाकामध्ये ते जास्त जाणवते. सर्व स्त्रियांना नाकातून रक्तस्त्राव होण्याचा अनुभव येत नाही, परंतु जवळजवळ १५ ते २० टक्के स्त्रियांमध्ये तसे होताना आढळते. ज्या स्त्रिया जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदर असतात त्यांच्यामध्ये नाकातून रक्त येण्याची समस्या जास्त आढळते. जितकी जास्त मुलं, तितके नाकांच्या आत असलेल्या रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव येतो. कधीकधी, त्या दबावामुळे रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होण्यास सुरवात होते. त्याचप्रमाणे गुदाशयातून रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो.

एक अद्भुत गोष्ट घडते आणि ती म्हणजे शरीराच्या इतर भागातून श्रोणीकडे भागात रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे वाढत्या गर्भाशयावर आणि ओटीपोटाकडील भागातील रक्तवाहिन्यांवर दबाव निर्माण होतो आणि म्हणूनच पायाकडील रक्तप्रवाह कमी होतो. ह्याचा परिणाम म्हणजे त्वचेखालील रक्तवाहिन्या सुजलेल्या, मुरडलेल्या आणि निळ्या जांभळ्या स्वरूपात दिसू लागतात. ह्या स्थितीला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात. जरी काही समस्या त्रासदायक नसल्या आणि त्यामुळे क्वचितच काही समस्या निर्माण होत असली तरी व्हेरिकोज व्हेन्सची समस्या काही वेळा वेदनादायक असू शकते.

रक्ताभिसरणाच्या बाबतीत होणारी आणखी एक बाब म्हणजे शरीराच्या विशिष्ट भागात रक्त प्रवाहित होते. तसेच, जरी एखाद्या स्त्रीने संतुलित आहार घेतला तरीसुद्धा तिच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीराच्या विविध भागात सूज येते. शिवाय, जर तुम्ही गर्भवती असताना जास्त तास उभे राहिल्यास किंवा उन्हात बाहेर पडण्याची सवय असल्यास, तुमचा चेहरा, पाय आणि पावले त्या मुळे अक्षरशः सुजतात. आहारात कॅफेनचे प्रमाण कमी करून पोटॅशियमचे प्रमाण वाढवल्यास ही समस्या प्रभावीपणे सोडवण्यास मदत होऊ शकते.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यातील लक्षणे

जेव्हा तुम्ही तुमच्या गर्भाशयात एकाधिक बाळे बाळगता तेव्हा तुमच्या बाळांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.

  • तुमच्या बाळांची वाढ होत आहे आणि त्यामुळे तुमचे वजन वाढत आहे. यामुळे आपले गुरुत्व सामान्य स्थितीपासून दूर जाते. तुमचा पावित्रा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या पाठीवर खूप ताण येतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाठदुखी सुरु होतो. योग्य पावित्रा ठेवून डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न केल्यास तुमची ह्या त्रासातून सुटका होण्यास मदत होते.
  • वाढत्या वजनदार बाळांचा हा दबाव पूर्णपणे शारीरिक नसतो. शरीरातील विविध मज्जातंतू आणि स्नायू तसेच रक्तवाहिन्यांवर सुद्धा दबाव येतो. तुमच्या पायात पेटके येणे हा त्याचाच परिणाम आहे परंतु पटकन पायांना मसाज करून किंवा वारंवार ताणून कुशलतेने ही समस्या हाताळली जाऊ शकते. गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे उद्भवणारी आणखी एक वेदना ओटीपोटातून येते. गर्भाशयाला जागा मिळण्यासाठी अस्थिबंध ताणले जातात. तिळे असल्यास ह्या वेदना तुम्ही समजता त्यापेक्षा आणखी जास्त असतात.
  • सर्व रक्तप्रवाह बाळावर केंद्रित होतो. वाढत्या गर्भाशयाचा दाब फुप्फुसांच्या झडपांवर येतो. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन आत घेतला जात नाही त्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. म्हणूनच तुमच्या स्थितीमध्ये अचानक बदल झाला किंवा खूप काळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित झाले तर त्यामुळे डोकेदुखी किंवा चक्कर येण्याची शक्यता असते. असे जर वारंवार होत राहिले तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा पोटाचा आकार

आधीच्या आठवड्यांच्या तुलनेत, पोटाच्या आकारात झालेली महत्त्वपूर्ण वाढ यावेळी स्पष्टपणे दिसून येईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा बॅलन्स सांभाळावा लागतो. गर्भाशय नाभीच्या अगदी खालच्या भागात जाणवते आणि येथेच आपल्या पोटात बाळांची उपस्थिती स्वीकारली जाते.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा १९ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

तुम्ही गर्भावस्थेच्या प्रवासाच्या अचूक मध्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही डॉक्टर तुमचे अल्ट्रासाऊंड पुढे ढकलू शकतात. तुम्ही ते आधी करण्याचा निर्णय घेतल्यास, ह्या अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला बाळे स्पष्ट दिसतील. बाळांची विकसित होणारी त्वचा अर्धवट पारदर्शक असल्याने नीट पाहिल्यास तुम्हाला बाळांच्या हाडांची संरचना आणि आतील विकसित होणारे अवयव दिसतील. बहुतेक डॉक्टर्स महत्वाच्या पॅरामीटर्सची पुन्हा तपासणी करतात आणि काही विकृती किंवा आरोग्यविषयक समस्या तर नाहीत ना हे पुन्हा पडताळून पाहतात.

काय खावे?

गरोदरपणात जसजशी मुलांची वाढ होते तसतसे योग्य पोषणाची जास्त गरज असते. तळलेले, मसालेदार किंवा ट्रान्स फॅटने समृद्ध असलेल्या कोणत्याही खाद्यपदार्थापासून दूर राहण्याची शिफारस केली जाते, तसेच रंग, संरक्षक इत्यादींचा समावेश असलेले कोणतेही खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. उकडलेले मांस, भाज्या आणि लोह आणि कॅल्शियम समृध्द नट्स आहारात समाविष्ट केले जावे.

काय खावे?

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

आपल्या शरीराची स्थिती आणि आपल्या सवयींवर लक्ष ठेवणे हे सुरक्षित गरोदरपणाची पुरेसे आहे.

हे करा

  • बाळांसाठी योग्य बालरोगतज्ञांची ह्या आठवड्यात तुम्ही निवड करून ठेवू शकता.
  • विशेषत: संध्याकाळी थोडा विश्रांती घ्या आणि आपल्या बाळांसोबत थोडासा चांगला वेळ घालवा. त्यांच्याशी बोला गर्भाशयात फिरत असताना ते आपल्या आवाजावर प्रेम करतात.

काय टाळावे?

  • पुढील आठवड्यांमध्ये तीव्र व्यायाम करणे टाळा.
  • योनिमार्गामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा खाज सुटण्याकडे दुर्लक्ष करू नका कारण ते यीस्टच्या संसर्गाचे चिन्ह असू शकते.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

गरोदरपणाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींची खरेदी करू शकता

  • बाळांचे वाढते वजन पेलण्यास मदत करण्यासाठी प्रसूती पट्टा खरेदी करा.
  • तुम्ही यापूर्वी खरेदी केलेली नसल्यास सूती कपडे किंवा ब्रा खरेदी करा.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या १९ व्या आठवड्यात घरात किंवा बाहेर फिरून यायला काहीच हरकत नाही आणि त्यात चिंता करण्याजोगे काहीही नाही. नियमित आणि हलका व्यायाम करा. तुमच्या पतीसह थोडे चालायला जा. सुरक्षित आणि आनंदी रहा!

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १८ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २० वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article