गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १० वा आठवडा

जेव्हा एखादी स्त्री गर्भारपणाचा दहावा आठवडा पूर्ण करते तेव्हा तिचे पोट लक्षणीयरीत्या दिसू लागते आणि तीक्ष्ण डोळे असलेले बरेच लोक ती स्त्री गर्भवती असल्याची अधिकृत घोषणा करण्याआधी ती गर्भवती आहे हे ओळखतील. जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर तो क्षण साजरा करण्याची ही वेळ आहे. अधिकृतपणे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आधी ही गोड़ बातमी दिली नसेल तर तुम्ही ती आता देऊ शकता. भ्रूणावस्थेपासून आत्तापर्यंत झालेल्या वाढीच्या प्रवासात काही महत्वपूर्ण टप्पे आणि गंभीर काळ तुमच्या मागे आहे. पहिल्यांदा पालक होणाऱ्या बऱ्याच जणांना सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये गर्भपात तर होणार नाही ना अशी चिंता वाटत राहते. ही भीती आता केव्हाच मागे पडली आहे, तुमच्या पोटाचा उंचवटा आता लक्षणीयरित्या दिसू लागला आहे त्यामुळे तुम्ही गर्भावस्थेच्या सुवर्णकाळाची वाट बघू शकता.

१० व्या आठवड्यात बाळाची वाढ

मागील काही आठवड्यांमध्ये त्यांची लांबी आणि आकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असेल तर हा आठवडा सामान्यतः थोडा शांत असतो. त्यांची लांबी साधारणत: एक इंच किंवा त्याहून अधिक वाढते. तथापि त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात सुधारते, कधीकधी मागील आठवड्यापेक्षा ते दुप्पट होते. दहाव्या आठवड्यात, बहुतेक बाळांच्या मूळ अवयवांचा विकास झालेला असतो आणि ते संपूर्ण तयार झालेले असतात. त्यानंतर त्यांचा सामान्य विकास सुरु राहतो. लहान बाळे थोडी हालचाल करू लागतील आता त्यांचे पाय आणि हात लवचिक आणि मुक्त आहेत. कूर्चा बर्‍याच वेगाने वाढत असताना हाडांची वाढ सुद्धा योग्य रीतीने होत आहे. दातांचा विकास आहे तसा सुरु राहतो आणि त्यांची वाढ हिरड्यांखाली होत राहते. जर तुम्ही तुमच्या बाळाचे मॅग्निफाइंग लेन्ससह निरीक्षण केले तर तुम्हाला बाळाच्या हातापायांच्या बोटांवर नखे दिसू लागतील. तसेच बाळाच्या शरीरावर हलकी लव दिसू लागेल. नर बाळांमध्ये टेस्टेस्टेरॉनचे उत्पादन सुरु होते.

बाळांचा आकार केवढा असतो?

बियाण्यापासून मटार आणि पुढे द्राक्षाएवढा बाळाचा आकार वाढत जातो. ह्या आठवड्याभरात तुमच्या बाळांच्या आकारात त्यांची लक्षणीय वाढ होते. १० व्या आठवड्यात तुमच्या गर्भाशयात बाळे स्ट्रॉबेरीच्या आकाराइतके लहान असतात. जेव्हा बाळाच्या डोक्यापासून कुल्य्यांपर्यंतची लांबी मोजली जाते तेव्हा ती ३-४ सेंमी इतकी भरते. काही डॉक्टर कदाचित या आठवड्याभरात बाळाचे वजन मोजण्यास प्रारंभ करतात तर काही डॉक्टर वाट पाहतात कारण बाळ प्रत्येक बाळाचे वजन ५ ग्रॅम्स पेक्षा जास्त नसते.

सामान्य शारीरिक बदल

जेव्हा तुमच्या गर्भाशयातील जुळ्या किंवा एकाधिक बाळांचे वजन आणि आकार वाढू लागतो तेव्हा ते आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दर्शविण्यास सुरवात करेल.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील लक्षणे

आपले शरीर निःसंशयपणे १० व्या आठवड्यांत वेगवेगळ्या मार्गांनी जुळी बाळ असल्याची चिन्हे दर्शवेल. काही लक्षणे अगदी स्पष्ट दिसू लागतील, तर बरीचशी लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - १० वा आठवडा - पोटाचा आकार

तुमच्या गर्भाशयात जुळी किंवा एकाधिक बाळे असल्यामुळे तुमचे पोट आतापर्यंत टरबुजासारखे दिसत आहे असे तुम्हाला वाटेल. परंतु अद्याप तुमची पहिली तिमाही पूर्ण होणे बाकी आहे म्हणूनच वाढलेल्या पोटाचा आकार तुम्हाला आणि काही लोकांना लक्षात येईल परंतु ते सर्वांच्या लक्षात येणार नाहीकाही स्त्रियांमध्ये सामान्यत: पोटावरील त्वचेच्या रंग कमी झालेला दिसतो. त्वचेच्या त्या भागात मेलॅनिन जास्त प्रमाणात असल्याने असे होते.

जुळ्या बाळांसह गर्भधारणा - १० वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

साधारणत: मागील आठवड्यांत अल्ट्रासाऊंड केल्यानंतर , डॉक्टर तुम्हाला ह्या आठवड्यात पुन्हा अल्ट्रासाऊंड करण्यास सांगणार नाहीत. परंतु ह्या आठवड्यात तुम्ही अल्ट्रासाऊंड केल्यास तुम्हाला बाळाच्या हृदयाचे थोडे पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे ऐकू येतील. तुमच्या स्ट्रॉबेरीच्या आकारांच्या बाळांचे हात आणि पाय दिसू लागतील. हे छोटेसे हात पाय हलताना दिसतील किंवा कधी कधी ते बाळाच्या चेहऱ्यापाशी सुद्धा दिसतील

काय खावे?

होय, तुम्ही तुमच्या शरीरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीव वाढवत आहात आणि त्यांना आवश्यक सर्व पौष्टिकतेसाठी ते तुमच्यावर अवलंबून आहेत. तथापि, ह्याचा अर्थ तुम्ही ३ किंवा अधिक जणांसाठी खाणे आवश्यक आहे असा होत नाही. घरातील सदस्य गर्भवती स्त्रीला जास्त खाण्यास भाग पाडतात. तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त भूक लागणे खूप नैसर्गिक आहे आणि डॉक्टर किंवा आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही फक्त ६०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त कॅलरीज घेणे महत्वाचे आहे. ह्या जास्तीच्या कॅलरी आपण खातो त्या स्नॅक्सद्वारे सहज मिळतात. वजन वाढणे चांगले आहे परंतु ती वाढ नैसर्गिक पाहिजे. काहीही जास्त खाल्ल्यास त्याचा तुमच्या शरीरावर ताण येऊ शकतो आणि प्रसूतीनंतर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

तुमची पहिली तिमाही आता लवकरच संपणार आहे आणि तुम्हाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी काही काळजीविषयक टिप्स तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

एकापेक्षा जास्त बाळे आता तुमच्या कुटुंबात येणार आहेत त्यामुळे, कौटुंबिक अर्थसंकल्पात मदत करण्यासाठी तुम्हा काही आर्थिक सल्लापुस्तके किंवा व्याख्याने विकत घ्यावी लागतील. स्ट्रेच मार्क्स आता जास्त स्पष्ट दिसू लागतील. त्यामुळे गरोदरपणात वापरण्यास सुरक्षित असलेली स्ट्रेच-मार्क्स क्रीम्स खरेदी करणे सुद्धा आवश्यक आहे. गर्भाशयात दहा आठवड्यांच्या जुळ्या बाळांची काळजी घेणे तितकेसे कठीण नाही कारण तुमच्या गर्भारपणाचा सुरुवातीचा अवघड टप्पा यशस्वीरीत्या पार पडलेला आहे. आता तुमची बाळे वेगाने वाढण्यास तयार आहेत. त्याबरोबरच तुमच्या शरीराची सुद्धा आता वाढ होईल. एक दीर्घ श्वास घ्या कारण तुमचा सर्वोत्तम काळ लवकरच येणार आहे. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ९ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ११ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved