गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १२ वा आठवडा

तुम्ही गरोदरपणाचा इतका मोठा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन! तुम्ही शक्य तितक्या सुरक्षित मार्गाने आपल्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह हा कालावधी पार केलेला आहे. १२ आठवडे हा काही छोटा  कालावधी नाही.  गर्भवती स्त्रीसाठी पहिली तिमाही महत्त्वपूर्ण  असते. हा कालावधी गर्भाच्या वाढीच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. ह्या काळात तुम्ही विश्रांती घेऊ शकता कारण तुमच्या गरोदरपणाच्या उच्च जोखमीची वेळ संपुष्टात आली आहे आणि तुम्ही आता स्वतःवर आणि आपल्या बाळावर लक्ष केंद्रित करू शकता.

१२ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमची बाळे १२ व्या आठवड्यात प्लम ह्या फळाएवढी दिसतील. गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांची वाढ वेगाने झाली आहे. ह्या कालावधीत त्यांचा आकार दुपटीने वाढतो. मानवी शरीरात असलेले बहुतेक अंतर्गत अवयव गर्भावस्थेच्या १२ व्या आठवड्यात बाळांमध्ये विकसित केले जातात. त्या व्याख्येनुसार, तुमच्या लहान बाळाला एक प्रकारे संपूर्ण विकसित माणूस म्हणून संबोधले जाऊ शकते. आता फक्त आकारात वाढ होते आणि अवयवांची त्याच वेगाने वाढ होत राहते. बाळे पोटात असताना त्यांच्या पचनक्रियेविषयी काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना सगळी पोषणमूल्ये आणि ऑक्सिजन नाळेतून संश्लेषण झालेल्या स्वरूपात मिळत असते. तथापि, पोटाचे स्नायू आणि नवीन तयार झालेले आतडे विशिष्ट हालचाली करण्यास सुरुवात करतात. जणू काही त्यांचे कार्य योग्य प्रकारे सुरु आहे की नाही हे तपासण्याचा तो प्रयत्न असावा. हाडे आणि कुर्चांमुळे  केवळ त्यांच्या शरीराला चांगला आकार मिळत नाहीत तर पांढऱ्या रक्त पेशींचा विकास आणि निर्मिती सुद्दा वेगाने होते.  ह्या काळात तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांची प्रतिकार  प्रणाली स्वतःस बळकट होण्यास सुरवात करते. ह्या कालावधीत विकसित झालेल्या बहुतेक अवयवांसह, आपल्या जुळ्या बाळांचे मज्जातंतूचे नेटवर्क देखील एक महत्वाचा टप्पा गाठते. बाह्य उत्तेजना जाणवू लागते आणि रिफ्लक्स ऍक्शन्स ना प्रतिसाद देण्यास सुरुवात होते. पोटावर हात ठेवल्यास किंवा कूस बदलल्यास तुमची बाळे प्रतिक्रिया देऊ शकतात. तथापि, ह्या टप्प्यावर तुम्ही हे समजण्यास सक्षम नसाल.

बाळांचा आकार केवढा असतो?

१२ आठवड्यांपर्यंत बहुतेक बाळे सामान्यतः लिंबाएवढी मोठी असतात. आईच्या पोटात जागा कमी असल्याने जुळी किंवा एकाधिक बाळे त्यापेक्षा थोडीशी लहान असतील परंतु काळजी करू नका, ती लवकरच इतर मुलांसारखी दिसतील. तुमच्या लहान बाळांची लांबी देखील ६-७ सेंटीमीटर असेल.

सामान्य शारीरिक बदल

१२ व्या आठवड्यात गर्भवती महिलेच्या शरीरात होणारे बदल मागील आठवड्यात झालेल्या काही बदलांइतके तीव्र  नसतात. काही सुधारणा किंवा बदल होऊ शकतात ते पुढीलप्रमाणे

जुळ्या बाळांसह गरोदरपणाची लक्षणे

मागील महिन्यांतील लक्षणांच्या तुलनेत १२ व्या आठवड्यांत जुळ्या बाळांसह गर्भारपणाची लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी होतील. इतर काही लक्षणे सुद्धा दिसू लागतात जी आधीपेक्षा चांगली असू शकत नाहीत.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - १२ व्या आठवड्यात पोटाचा आकार

सहसा, १२ व्या आठवड्यात गरोदर स्त्रीचे पोट दिसू लागते, परंतु काही स्त्रियांमध्ये कदाचित पोट मोठे नसते आणि म्हणूनच त्यांना त्यांचे जुने कपडे काहीही अडचण न येता बसू शकतात. पोटाचा आकार हा गर्भारपणातील प्रगतीसाठी एक सशक्त सूचक असला तरीही, बाळांची वाढ नीट होत असल्यास काळजी करण्याचे काही कारण नाही. पोटाव्यतिरिक्त, शरीराच्या इतर भागातील आकारात सुद्धा वाढ होते. त्यामुळे जुने कपडे घातल्यास अस्वस्थता येईल. मांड्या आणि कुल्ल्याच्या आकारात वाढ होईल. त्यामुळे सैल अर्धी चड्डी किंवा पायघोळ विजारीची निवडणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे स्तनांना सूज येऊन त्यांचा आकार वाढल्याने मोठी ब्रा घेण्याची गरज भासू शकते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - १२ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

जेव्हा तुम्ही १२ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंडद्वारे तुमच्या गर्भाशयातील लहान बाळांचे निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की या अवस्थेत तुमच्या बाळांच्या अंतर्गत अवयवांचा पूर्णपणे विकास झाला असेल. अल्ट्रासाऊंडद्वारे, तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की मागच्या आठवड्यात बाळाचे आकार अस्पष्ट दिसत होते परंतु ह्या आठवड्यात ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसू लागतील. स्कॅन दरम्यान बाळांच्या हालचाली सुद्धा दिसू शकतात ज्यामध्ये बाळे हातापायांचा वापर करताना दिसतात. तसेच त्यांच्या स्नायूंची चाचणी घेण्यासाठी बाळे शरीराला ताण देताना दिसतात.

काय खावे?

बाळांच्या अंतर्गत अवयवांचा संपूर्ण विकास झालेला आहे म्हणून तुम्हाला न आवडणारे पदार्थ तुम्ही टाळावेत असा त्याचा अर्थ होत नाही. गरोदरपणात संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे आणि तुम्ही त्याबाबतीत कधीही तडजोड करू नये. तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांची अजूनही वाढ होत आहे आणि म्हणून तुम्ही पौष्टिक आहार घेतला पाहिजे. मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि भाज्या खाण्याची शिफारस केली जाते. तसेच तळलेले किंवा हवाबंद डब्यातील पदार्थ खाण्याऐवजी भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खाणे चांगले. तुम्ही तुमच्या नाश्त्यातही नियमितपणे फायबरयुक्त पदार्थ खात आहात ना सुनिश्चित करा. रात्रीचे जेवण हलके ठेवा कारण झोपल्यावर जळजळ आणखी तीव्र होऊ शकते. दिवसभर थोडे आणि वारंवार खा. व्हिटॅमिन पूरक आहारांसह आपले संतुलन राखणे देखील एक चांगली निवड आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

मागील महिन्यांमध्ये आपल्याला त्रास देणारी बहुतेक लक्षणे कमी होतील, पुढे दिलेल्या काही उपयुक्त टिप्ससह तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

मॅटर्निटी ड्रेसेस फक्त औपचारिक प्रसंगांसाठी नसतात. आपल्याला काही उत्कृष्ट नाईटवेअर देखील मिळू शकतात जे आरामदायक आणि सुंदर असतात. मोबाइल ऍपचा वापर करून आपल्या पौष्टिक आहाराचा मागोवा ठेवा आणि कोणतीही कमतरता असल्यास ती आत्ताच भरून काढा. जुळ्या बाळांसह १२ आठवड्यांच्या गरोदर असताना, तुम्ही गरोदरपणातील महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे त्यामुळे हा क्षण साजरा करा. येथून पुढे सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या होतील. स्वत: ची काळजी घ्या, आनंदी वातावरण ठेवा. तुमचा गरोदरपणाचा प्रवास आता तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला होईल. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ११ वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १३ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved