गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ११ वा आठवडा

गरोदरपणाचा सुरुवातीचा टप्पा पार करणे गर्भवती महिलेसाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. जुळी मुले किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाचा ११ वा आठवडा पार केलेला असेल तर ह्या कठीण काळात सुद्धा तुम्ही स्थिर राहिल्याबद्दल स्वतःचा अभिमान बाळगा. पुढच्या आठवड्यांमध्ये तुम्ही थोडं आरामांत राहू शकता. तुम्ही पहिल्या तिमाहीच्या जवळ आहात आणि मॉर्निंग सिकनेस व मळमळ कमी होण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता. पूर्वीच्या तुलनेत तुम्हाला आता बरेच उत्साही वाटेल. ह्या टप्प्यावर बऱ्याचशा स्त्रिया डॉप्लर मशीनच्या साहाय्याने बाळाच्या हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू शकतील कारण लहान बाळांना सामावून घेण्यासाठी पोट जागा बनवते. तुमचे बाळ ११व्या आठवड्यात कसे विकसित होते आणि ह्या आठवड्यात बाळामध्ये तुम्ही कुठल्या बदलांची अपेक्षा करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

११ व्या आठवड्यात बाळांची वाढ

एकदा तुम्ही तुमच्या गर्भारपणाच्या ११ व्या आठवड्यात पोहोचलात की तुमची जुळी किंवा एकाधिक वेगाने वाढतील. जर एका बाळासह गर्भवती असलेल्या एखाद्या महिलेच्या बाळाशी तुलना केली तर आपल्या जुळ्या बाळांचे आकार त्यांच्यापेक्षा लहान असतील. एकाधिक बाळांना सामावून घेताना गर्भाशयाच्या आतील जागेचा विचार केल्यास, ही एक पूर्णपणे सामान्य वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका कारण लवकरच तुमची बाळे इतर बाळांप्रमाणे दिसू लागतील. मुलांचे गुप्तांग आधीच तयार झाले आहेत, परंतु अद्याप ते सांगणे शक्य होणार नाही. तथापि, त्यांचे शरीर संबंधित संप्रेरक किंवा अंतर्गत संस्था विकसित करून आधीच प्रतिसाद देत आहेत. जर बाळ मुलगा असेल तर टेस्टोस्टेरॉनची निर्मिती चांगली सुरू होते आणि मुलगी असेल तर अंडाशय तयार होऊ लागतात. एक आठवड्यापूर्वी बाळाच्या शरीरावरील लहान केस आता वाढण्यास सुरुवात होते तसेच डोक्यावरील केस सुद्धा वाढू लागतात. नखांचा तळ सुद्धा बोटांवर दिसू लागतो आणि पायाची बोटे सुद्धा तयार होतात. जरी ते गर्भाशयात असताना त्याचा फारसा उपयोग होत नाही तरी ह्या टप्प्यावर होणारा महत्वाचा विकास म्हणजे डायफ्रॅम तयार होतो. काही बाळांना आत असताना उचक्या येण्यास सुरुवात होते तसेच बाळाच्या अंतर्गत हालचाली सुद्धा सुरु असतात. पोटामध्ये असताना लहान बाळे फिरू लागतात आणि गर्भजलात पलटतात. तुम्हाला त्यांच्या हालचाली जाणवू शकत नाही कारण त्या जाणवण्याइतक्या तीव्र नसतात. परंतु त्यांच्या हालचाली अल्ट्रासाऊंडमध्ये नक्कीच पाहिल्या जाऊ शकतात.

११ आठवड्यांच्या बाळाचा आकार केवढा असतो?

बहुतेक बाळांचे वजन अंदाजे ३० - ४५ ग्रॅमइतके असते आणि जेव्हा डोक्यापासून नितंबापर्यंत लांबी मोजली जाते तेव्हा ती सुमारे ५ सेंटीमीटर इतकी असते. या टप्प्यावर, त्यांचे डोके सर्वात मोठे आणि सहसा संपूर्ण शरीराच्या आकारापेक्षा निम्मे असते. जरी ११व्या आठवड्यात लहान बाळे अंजिराइतकी मोठी असू शकतात तरीसुद्धा गर्भाशयात एकाधिक बाळे असल्यास बाळाचा आकार लहान असू शकतो.

सामान्य शारीरिक बदल

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रीला तिच्या शरीरातील कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल दिसतील. तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात पुढील बदलांची अपेक्षा करू शकता.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळे किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असताना, तुम्ही गरोदरपणाच्या ११ व्या आठवड्यात पुढील गोष्टींची अपेक्षा करू शकता.

जुळ्या बाळांसह गर्भधारणा - ११ वा आठवडा - पोटाचा आकार

गर्भधारणेच्या ११ व्या आठवड्यात पोट दिसू लागल्यामुळे स्त्रीला ती गर्भवती असल्यासारखे वाटते. गर्भाशय जवळजवळ ओटीपोटाचा सर्व भाग व्यापते, जेव्हा तुम्ही तुमच्या पोटास स्पर्श करता तेव्हा तुम्हाला पोटाचा घट्टपणा जाणवू शकतो. बाळे पोटात फिरत असल्याचेही काही स्त्रियांना जाणवते आणि त्यांची लहान बाळे आत उत्साही आहेत असे त्या समजतात. परंतु, या आठवड्यात जुळी किंवा एकाधिक बाळे लाथ मारण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह दाखविण्यासाठी अद्याप खूपच लहान आहेत आणि ह्या सर्व हालचाली म्हणजे वायू असू शकतो.

जुळ्या/एकाधिक बाळांसह गरोदरपण - ११ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

या टप्प्यातील बहुतेक अल्ट्रासाऊंड हे बाळे योग्य प्रकारे विकसित होत आहेत की नाही हे तपासण्यासाठी आणि त्यांच्यामधील विकार दूर करण्यासाठी आहेत. जुळ्या आणि एकाधिक बाळांच्या बाबतीत, नाळेवरून तुम्हास एकसारखे जुळे आहेत की नाही हे देखील डॉक्टर आपल्याला सांगू शकतात. गरोदरपणातील कोणत्याही अडचणी देखील या चेकअपमध्ये सापडू शकतात.

काय खावे?

११ आठवड्यांच्या गर्भवती स्त्रीच्या आहारावर चांगले लक्ष ठेवणे आवश्यक आहे. निरोगी जुळ्या बाळांच्या गर्भारपणासाठी तुमच्या आहारात प्रथिने, लोह, आयोडिन, कार्बोहायड्रेट्सची उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. तथापि, ह्या घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करू नये कारण यामुळे वायू आणि बद्धकोष्ठता उद्भवू शकते आणि बाळाला त्रास होऊ शकतो. चरबीयुक्त पदार्थ अजिबात खाऊ नका. निरोगी भाज्या, चीज उत्पादने, लापशी हे पर्याय निवडा, हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त आरोग्यदायी पर्याय आहेत. नेहमीप्रमाणेच, गरोदरपणात पाणी आणि इतर रस आपले सर्वोत्तम मित्र बनवा

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

पहिल्या तिमाही पूर्ण झाल्यामुळे, येत्या काही महिन्यांत स्वत: ला सुलभ ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा काही मूलभूत टिप्स इथे दिलेल्या आहेत.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपण लहान बाळांच्या मॉनिटर अ‍ॅम्पलीफायरमध्ये गुंतवणूक करणे निवडू शकता ते तुम्हाला बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे, मॉर्निंग सिकनेसच्या या शेवटच्या टप्प्यातून जाण्यासाठी छान सुवासिक धूप खरेदी करा त्यामुळे तुम्हाला बरे वाटू शकेल. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती राहणे तुमच्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते, परंतु जर तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली आणि निरोगी आहाराचा अवलंब केला तर तुम्ही निरोगी बाळांना जन्म द्याल. तुम्ही गर्भारपणाचे ११ आठवडे अगदी छान पार केले आहेत. लवकरच तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश कराल आणि तुम्ही ते साजरे करण्याची गरज आहे! आपल्या पतीसह छान डिनर करा आणि बाळे आल्यानंतर तुमचे एकत्र कुटुंब कसे असेल याबद्दल स्वप्न पहा. निरोगी शरीर आणि निरोगी मन गर्भाशयात असलेल्या तुमच्या लहान बाळांना आनंदी ठेवण्यासाठी मदत करू शकते. मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १० वा आठवडा पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - १२ वा आठवडा
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved