In this Article
- व्हिडिओ: गरोदरपणानंतर पोटाची चरबी कशी कमी करावी (सोप्या टिप्स आणि व्यायाम)
- प्रसूतीनंतरही तुम्ही गर्भवती स्त्रीसारख्या का दिसत आहात?
- तुमचे पोट सामान्य स्थितीत परत येण्यासाठी किती वेळ लागतो?
- प्रसूतीनंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
- गरोदरपणानंतरचे वाढलेले पोट कमी करण्यासाठी 5 व्यायाम
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स
- तुमच्या पोटाच्या स्नायूंना सुस्त वाटणे सामान्य आहे का?
प्रसूतीनंतर, बाळाच्या आईचे पोट पूर्ववत होत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे बाळंतपणानंतर संप्रेरकांमध्ये होणारे बदल होय. गर्भारपणाच्या आधीसारखा पोटाचा आकार पुन्हा होण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. परंतु, पोट लगेच आधीसारखे होणार नाही. त्यासाठी तुमच्या शरीरात होणारे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीराचे स्वरूप बदलण्यामागील शारीरिक बदलांबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच तुमचे शरीर पुन्हा पूर्ववत कसे होऊ शकते ह्याविषयीची माहिती देखील तुमच्याकडे असली पाहिजे.
व्हिडिओ: गरोदरपणानंतर पोटाची चरबी कशी कमी करावी (सोप्या टिप्स आणि व्यायाम)
प्रसूतीनंतरही तुम्ही गर्भवती स्त्रीसारख्या का दिसत आहात?
तुमच्या गरोदरपणाच्या जमा झालेली चरबी आणि सुजलेल्या पेशी प्रसूतीनंतरही आणखी काही तशाच काळ राहतात, आणि हळूहळू नाहीशा होतात. गरोदरपणात नऊ महिने पोटाचा आकार वाढत असतो. तो पूर्ववत होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे, प्रसूतीनंतरही, तुमच्या पोटाचा घेर तुम्ही सहा महिन्यांच्या गरोदर असल्यासारखा असू शकतो.
तुमचे पोट सामान्य स्थितीत परत येण्यासाठी किती वेळ लागतो?
प्रसूतीनंतर तुमच्या पोटात टप्प्याटप्प्याने बदल होतात. त्यापैकी काही जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा.
1. प्रसूतीनंतर 24तास
तुमच्या शरीरातील पाण्याचे वजन कमी होते, त्यामुळे बाळाच्या वजनासोबत तुम्ही 12 पौंड आणखी जास्त कमी करू शकता. हा फरक पोटाच्या आकारावर परिणाम करू शकतो.
2. एका आठवड्यानंतर
बरेचसे अतिरिक्त वजन लघवीच्या स्वरूपात कमी होते, तर स्तनपान केल्याने कॅलरीज जाळल्या जातात आणि वजन कमी होते.
3. दोन आठवड्यांनंतर
अतिरिक्त द्रव आणि कॅलरी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे स्तनपान आणि हार्मोनल बदलांचे परिणाम थोडेसे दिसायला लागतील.
4. एका महिन्यानंतर
वजनातील बदल अधिक दिसू लागतो, काहीजण म्हणतात की नवीन आई या कालावधीत 40 पौंडांपर्यंत वजन कमी करू शकते. त्यामुळे तुमचे वजन गरोदरपणापूर्वीइतके होणे शक्य आहे.
5. सहा आठवड्यांनंतर
शरीरात होणारे अंतर्गत बदल देखील तुमचे शरीर पूर्ववत होण्यासाठी मदत करतील. जसजसे गर्भाशय आकुंचन पावते तसतसे पोट तुलनेने सपाट दिसू लागते.
6. काही महिन्यांनंतर
निरोगी आहार आणि योग्य व्यायाम अशी जीवनशैली अंगिकारल्यास तुमचे पोट पूर्वीसारखे होण्यास मदत होईल.
7. नऊ महिन्यांनंतर
प्रसूतीनंतरच्या नऊ महिन्यानंतर गरोदरपणात वाढलेली सर्व अतिरिक्त चरबी कमी झाली पाहिजे.
प्रसूतीनंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
प्रसूतीनंतर सर्व नव्याने आई झालेल्या स्त्रियांना आपले पोट सपाट हवे असते. परंतु हे लगेच होत नाही. कालांतराने पोट कमी होऊ लागते. ह्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही. आईचे आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेता, फॅड डाएट आणि अत्यंत टोकाचे उपाय करू नयेत.
त्याऐवजी पोटाची चरबी कमी करणारे अनेक घरगुती उपाय आहेत.
1. स्तनपान
ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ह्या प्रक्रियेदरम्यान आईच्या शरीरातील बऱ्याच कॅलरी जाळल्या जातात. (आणि त्याच वेळेला बाळाच्या शरीरातील कॅलरी वाढतात)
2. आहार
शरीर मूळ आकारात परत येण्यासाठी चरबी, कर्बोदके आणि प्रथिनांचे योग्य संतुलन देखील महत्त्वाचे आहे.
3. पाणी प्या
अतिरिक्त कॅलरी नष्ट करण्यासाठी शरीराचे मुख्य कार्य चालू ठेवणे महत्वाचे आहे. म्हणून, नव्याने आई झालेल्या स्त्रियांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
गरोदरपणानंतरचे वाढलेले पोट कमी करण्यासाठी 5 व्यायाम
बाळंतपणानंतर तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नाही. परंतु तुम्ही तुमचे पोट टोन करण्यासाठी काही सुरक्षित व्यायाम करू शकता. येथे पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम प्रकार दिलेले आहेत. हे व्यायाम केल्यास तुमचे शरीर पूर्ववत होण्यास मदत होईल.
टीप: हे व्यायाम शस्त्रक्रियेनंतर/सी-सेक्शन नंतर 6 महिन्यांनंतरच करावे लागतात. सामान्य प्रसूतीसाठीही यापैकी कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्ही वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे अशी आम्ही शिफारस करतो.
1. पेल्विक टिल्ट
पेल्विक टिल्ट ह्या व्यायाम प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या पाठीवर झोपून तुमच्या नितंबाखाली आणि तुमच्या गुडघ्यांमध्ये उशा ठेवता. तुमचा नितंबाकडील भाग आवळून घ्या आणि पोटात एक ताण निर्माण करून आपले ऍब्स आत घ्या. सामान्य प्रसूतीनंतर एका आठवड्यानंतर टिल्ट केले जाऊ शकतात. तुमचे सी-सेक्शन असल्यास तुम्हाला किमान 6 महिने प्रतीक्षा करावी लागेल.
2. पेल्विक ब्रिज
प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनी पेल्विक ब्रिज केले जाऊ शकतात. यासाठी टिल्ट सारखीच पोझ घेणे आवश्यक आहे, परंतु यावेळी तुम्ही तुमचा नितंबाकडील भाग वर उचलून घेता आणि शरीराचा तो भाग पुन्हा जमिनीवर ठेवण्याआधी तुम्ही पुलासारखी स्थिती कायम ठेवता. तुम्ही ह्या व्यायामाचे 5 सेट करू शकता.
3. हिल स्लाइड्स
हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जमिनीला पाठ टेकवून झोपावे लागेल. या व्यायामामध्ये, तुम्हाला एक पाय गुडघ्यापासून वर वळवावा लागेल आणि टाच जमिनीला स्पर्श करत असताना 90-अंशाचा कोन मिळेपर्यंत टाच जमिनीवर सरकवावी लागेल. तुमचा ओटीपोटाकडील भाग घट्ट असल्याची खात्री करा. टाच दूर नेताना श्वास सोडा. दुसऱ्या पायाने पुन्हा असेच करा. हा व्यायाम तुमच्या पाठीच्या खालच्या भागासाठीही चांगला आहे.
4. टॉवेल पल्स
टॉवेल पल्स हा क्रंचचा एक सौम्य प्रकार आहे. ह्या व्यायामप्रकारामध्ये तुम्ही गुडघे वाकवून तुमच्या पाठीवर झोपता. आता, एक टॉवेल पोटऱ्यांच्या खाली ओढून घ्या, तो तुमच्या हातांनी दोन्ही बाजूंनी धरा. आपले खांदे जमिनीवरून उचलून धरा, आकुंचन करा आणि पोटाचे स्नायू सोडा. 10-12 वेळा पुनरावृत्ती करा.
5. सिंगल लेग स्ट्रेच विथ टॉवेल
सिंगल-लेग स्ट्रेच ह्या व्यायामासाठी तुम्हाला टॉवेलची गरज भासेल. बाळाचा जन्म होऊन 12-14 आठवडे झाल्यानंतर हा व्यायाम करण्यास सांगितले जाते. या व्यायामासाठी, आपण आपल्या पाठीवर झोपणे गरजेचे आहे. तुमच्या मांड्यांमध्ये एक टॉवेल ठेवा आणि प्रतिकार निर्माण करण्यासाठी तुम्ही पायाची स्थिती कायम ठेवत असताना तो बाहेर ढकलून द्या. तुमची मान आणि खांदे वर उचलून तुमच्या शरीराच्या वरच्या भागाला सुद्धा ह्या व्यायामप्रकारात सामील करा आणि तुम्ही श्वास सोडत असताना पाय ताणून घ्या.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स
पोटाचा घेर कमी करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला काही टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
1. हळूहळू व्यायाम सुरू करा
जेव्हा तुम्ही व्यायाम सुरू करता, तेव्हा तुम्ही ते योग्य प्रकारे करत आहात ना ह्याकडे लक्ष द्या. स्वतःला आवश्यक विश्रांती द्या आणि स्वतःला थकवू नका.
2. व्यायाम करणाऱ्या मित्रासोबत व्यायाम करा
वर्कआउट पार्टनर शोधणे नेहमीच चांगले असते कारण त्यामुळे व्यायाम करताना मजा येते. एखादा स्नायू खेचला गेल्यास कुणीतरी जवळ असणे गरजेचे असते.
3. पोट कमी करण्यासाठी बॉलची मदत घेऊन व्यायाम प्रकार
व्यायामाच्या बॉलच्या मदतीने, तुम्ही बॉल क्रंचसारखे पोटाच्या स्नायूंचे अनेक व्यायाम करून पाहू शकता. हे व्यायामप्रकार तुमच्या मूळ स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि तुमचे संतुलन सुधारण्यासाठी उत्तम आहेत.
4. थोडे थोडे आणि वारंवार जेवण घ्या
मेजवानी पासून दूर रहा आणि त्याऐवजी पौष्टिक आहाराकडे लक्ष द्या. थोडे थोडे आणि वारंवार खाल्ल्याने तुमचे (आणि तुमच्या बाळाचे) पोषण होईल. तुमच्या शरीरावर एकाच वेळी खूप जास्त कॅलरींचा ओव्हरलोड होणार नाही.
तुमच्या पोटाच्या स्नायूंना सुस्त वाटणे सामान्य आहे का?
गरोदरपणात तुमच्या शरीरात असंख्य बदल होतात. बाळंतपणाच्या ताणानंतर, तुमच्या पोटाच्या स्नायूंना सुस्त वाटणे शक्य आहे. शेवटी, त्या स्नायूंवर सुद्धा गरोदरपणात बराच ताण आलेला आहे. या स्थितीला रेक्टस ऍबडोमिनिस डायस्टेसिस (आरएडी) म्हणतात. आरएडी अनेक कारणांमुळे होऊ शकते. तुमच्या पोटाचे स्नायू कमकुवत असणे, किंवा तुम्हाला मोठे बाळ (किंवा जुळी मुले) असणे, अरुंद श्रोणि किंवा अगोदर गर्भधारणा झालेली असणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. दोषानुसार काही फिजिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेने आरएडी वर उपचार केले जाऊ शकतात.
प्रसूतीनंतरचा पोटाचा वाढलेला आकार तुम्हाला आवडणार नाही. परंतु शरीर पूर्ववत होण्याचा प्रवास हा, गरोदरपण आणि बाळंतपणाचे श्रेय स्वतःला देण्यापासून सुरू होतो. स्वतःवर प्रेम करणे हा ह्या सर्व प्रक्रियेचा भाग आहे. प्रत्येक आठवड्यासाठी किंवा महिन्यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करा आणि प्रसूतीनंतरच्या टप्प्यात शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा. सकस आहार, आवश्यक व्यायामांसह, तुम्ही काही काळातच पूर्ववत होण्याच्या मार्गावर असाल.
आणखी वाचा:
गरोदरपणानंतर वजन कमी करण्यासाठी आहार योजना
प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी पट्टा वापरल्याने मदत होते का?