In this Article
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का? तुमची मासिक पाळी चुकली आहे का? मग आत्ता तुमच्या मनात तुम्ही गरोदर आहात कि नाही हा विचार सुरु असेल. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा क्षण असतो. आता, तुम्हाला फक्त गर्भधारणा चाचणी किट विकत घेऊन चाचणी करायची आहे आणि तुमच्या गरोदरपणाबाबतचे सत्य उलगडायचे आहे. परंतु गरोदर चाचणी किट नेहमीच अचूक नसतात. विश्वासार्ह निकाल मिळविण्यासाठी काही मूलभूत सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. हा लेख तुम्हाला घरी गरोदर चाचण्या कशा आणि केव्हा कराव्यात तसेच गरोदरपणाची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांची कधी भेट घ्यावी ह्याबाबतचे मार्गदर्शन करेल.
गरोदर चाचणी म्हणजे काय?
रक्तातील एचसीजीची (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन) पातळी तपासण्यासाठी ही चाचणी तयार केली गेली आहे. फलित बीजाचे जेव्हा गर्भाशयात रोपण होते तेव्हा एचसीजी हे संप्रेरक तयार होते. गरोदर चाचणी किटच्या मदतीने ही चाचणी घरी केली जाऊ शकते. ही चाचणी सर्व औषधांच्या दुकानात उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्ही स्त्रीरोगतज्ञांना दाखवू शकता. जर तुम्ही घरी चाचणी करण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही किटमध्ये नमूद केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. तुम्ही स्त्रीरोगतज्ञांकडे गेल्यास ते तुम्हाला रक्ताची चाचणी करण्यास सांगतील. लघवीच्या चाचणीपेक्षा रक्ताची चाचणी अधिक अचूक असते हे कृपया लक्षात घ्या.
गरोदर चाचण्या कशा कार्य करतात?
तुम्ही गरोदर राहिल्यापासून तुमच्या शरीरात प्रचंड बदल होऊ लागतात. तुमचे शरीर एचसीजी हे संप्रेरक तयार करते. ह्या संप्रेरकाची पातळी गर्भधारणा झाल्यानंतर दर ३६ ते ४८ तासांनी दुप्पट होते. तुमच्या लघवीमधील ह्या संप्रेरकाची पातळी तपासली जाऊ शकते. गरोदर चाचणी किट तुमच्या लघवीतील एचसीजीची पातळी शोधण्याचे काम करते. तुमच्या लघवीचे काही थेंब ह्या गरोदर चाचणी किट मधील पट्टीवर टाकताच काही मिनिटांतच तुमच्या लघवीमध्ये एचसीजी आहे की नाही हे दिसून येते. जर गरोदर चाचणीच्या पट्टीवर २ रंगीत उभ्या रेषा दिसल्या तर ह्याचा अर्थ चाचणीचे परिणाम सकारात्मक आहेत आणि जर फक्त एकच रेष दिसली तर चाचणीचे परिणाम नकारात्मक आहेत. तथापि, प्रत्येक किटनुसार परिणाम भिन्न असू शकतात. म्हणूनच, आपल्या स्त्रीरोगतज्ञाचे मत घेणे नेहमीच चांगले असते.
गरोदर चाचण्या किती अचूक असतात?
चाचणी किटमध्ये दिलेल्या सूचनांचे तुम्ही किती तंतोतंत पालन करण्यावर चाचणीची अचूकता अवलंबून असते. चाचणी योग्य दिवशी आणि आणि योग्य वेळी करण्यावर देखील चाचणीची अचूकता अवलंबून असते. सर्वात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, चाचणी किट मधील सूचनांचे अचूकपणे पालन केल्यास त्याचे परिणाम देखील ९९% अचूक असतात. परंतु पुन्हा एकदा, आपल्या स्त्रीरोगतज्ञाद्वारे रक्त तपासणी करून निकाल पुन्हा तपासणे नेहमीच चांगले असते.
गरोदर चाचणी करण्याची योग्य वेळ कोणती आहे?
तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात का आणि कोणतीही खबरदारी न घेता तुमच्या जोडीदारासोबत संबंध ठेवत आहात का? आणि तेव्हापासून तुमची मासिक पाळी चुकली आहे का? जर उत्तर होय असे असेल, तर तुम्हाला बाळ होणार आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही चाचणी करून घ्यावी.
१. गरोदर चाचणी करून घेण्यासाठी दिवसाची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
गरोदर चाचणीसाठी लघवीचा नमुना घेण्यासाठी दिवसाची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ होय. जेव्हा तुम्ही रात्रभर झोपलेले असता तेव्हा तुमचे शरीर संपूर्ण रात्रभर मूत्राशयात लघवी साठवून ठेवते. ह्या लघवीमध्ये एचसीजीसह सर्व काही उच्च पातळीवर असते. म्हणूनच, जर गर्भधारणेसाठी लघवीची चाचणी सकाळी केली सर्वात पहिली केली गेली, तर परिणाम ९९% अचूक असण्याची शक्यता आहे.
२. मासिक पाळीच्या चुकल्यानंतर गरोदर चाचणी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
तारीख चुकल्यास अगदी लगेच चाचणी केल्यास तुम्हाला चाचणीचा खोटा सकारात्मक परिणाम दिसू शकतो, त्यामुळे तुमची किट वापरण्यापूर्वी एक आठवडा वाट बघणे उचित आहे. तथापि, जर तुम्हाला नियमित मासिक पाळी येत असेल, तर तुमची मासिक पाळी चुकताच तुम्ही चाचणी घेऊ शकता.
३. खालीलप्रमाणे सुरुवातीची काही लक्षणे दिसल्यास तुम्ही चाचणी करून घ्यावी का?
गर्भधारणेची खालीलप्रमाणे लक्षणे दिसल्यास चाचणी करून घेणे गरजेचे आहे –
- जर तुम्हाला स्पॉटिंग किंवा हलका रक्तस्त्राव झालेला दिसला तर तुम्ही गर्भधारणा चाचणी करून घेऊ शकता. गर्भाचे जेव्हा गर्भाशयात रोपण होते तेव्हा असे होते
- जर तुम्हाला पोटात पेटके येत असतील तर
- जर तुमचे स्तन कोमल वाटत असतील आणि तुमची ब्रा घालताना तुम्हाला तुमच्या स्तनांमध्ये अस्वस्थता जाणवत असेल
- जर तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असेल तर
- जर तुम्हाला सभोवताली येणारा अन्नपदार्थांचा आणि इतर गोष्टींचा वास अस्वस्थ करत असेल तर
- जर तुम्हाला कधीही न आवडलेल्या अन्नपदार्थांची लालसा वाटत असेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दल तिरस्कार वाटत असेल तर
- जर तुम्हाला दुखण्यासोबत जास्त योनीतून स्त्राव दिसला तर
- जर तुम्हाला बहुतेक वेळा बद्धकोष्ठता वाटत असेल तर
ओव्हुलेशन झाल्यानंतर पहिल्या सात ते दहा दिवसांत ही चिन्हे दिसतात. तुम्हाला यापैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्या.
कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या गरोदर चाचण्या उपलब्ध आहेत?
गरोदर चाचण्या दोन प्रकारच्या असतात,पहिली म्हणजे लघवीची चाचणी, ही चाचणी तुम्ही गरोदर चाचणी किटच्या मदतीने घरीच करू शकता आणि दुसरी रक्त तपासणी, ही तपासणी वैद्यकीय केंद्रात केली जाते. दोन्ही चाचण्या तुमच्या शरीरातील एचसीजी ह्या संप्रेरकाची उपस्थिती तपासतात. एचसीजी हा संप्रेरक गरोदरपणात तयार होतो. हे संप्रेरक तुमच्या गर्भाशयात गर्भाचे रोपण झाल्यानंतर तयार होते.
१. गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी रक्त चाचणी
गर्भधारणेची पुष्टी करण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे रक्त तपासणी. खालील प्रकारच्या रक्त चाचण्या आहेत
अ) गुणात्मक एचसीजी चाचणी
ही चाचणी वैद्यकीय केंद्रात केली जाते. तुमची मासिक पाळी चुकल्यास १० दिवसांनी या चाचणीची शिफारस केली जाते. ही चाचणी तुमच्या रक्ताच्या नमुन्यातील एचसीजीचे अंश तपासते आणि तुमच्या गर्भधारणेची स्थिती ठरवू शकते
ब) परिमाणात्मक एचसीजी चाचणी
तुमच्या शरीरात एचसीजी ह्या संप्रेरकाची उपस्थिती शोधण्यासाठी वैद्यकीय केंद्रात ही रक्त तपासणी केली जाते. ही चाचणी अधिक अचूक आहे आणि तुमच्या रक्तातील एचसीजीचे अचूक प्रमाण शोधते. ह्या चाचणीद्वारे गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या काळात एचसीजीची सर्वात कमी पातळी देखील शोधली जाते.
२. गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी लघवीची चाचणी
लघवीची चाचणी घरी केली जाऊ शकते आणि ही चाचणी खूप सोयीस्कर आहे. तुम्हाला फक्त कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून गर्भधारणा चाचणी किट विकत घ्यायची आहे आणि तुम्ही स्वतःच चाचणी करायची आहे. ह्या किटवर सगळ्या सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा आणि त्यानंतर तुम्हाला एक अचूक परिणाम मिळेल. तुमची मासिक पाळी चुकल्याच्या एक आठवड्यानंतर तुम्ही लघवीची चाचणी करू शकता किंवा, जर तुमची मासिक पाळी नियमित येत असेल, तर तुमची पाळी चुकल्याबरोबर तुम्ही ही चाचणी करू शकता.
अ) चाचणी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
तुम्ही दिवसभरात कधीही लघवीची चाचणी करू शकता, परंतु तुम्ही सकाळी उठल्याबरोबर ही चाचणी करणे चांगले. ह्याचे कारण म्हणजे सकाळच्या पहिल्या लघवीमध्ये एचसीजीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे अचूक परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते.
ब) चाचणीला काम करण्यासाठी किती वेळ लागतो?
लघवीच्या चाचणीचे परिणाम दिसण्यासाठी ५ ते १० मिनिटे लागू शकतात. १० मिनिटांनंतर तुम्ही वाचलेले कोणतेही परिणाम दिशाभूल करणारे असू शकतात. तसेच, ५ मिनिटे संपण्यापूर्वी निकाल पाहू नका. ते देखील चुकीचे असू शकतात.
क) सकारात्मक गर्भधारणा चाचणीचे निकाल कसे दिसतात?
जेव्हा गर्भधारणा चाचणी स्टिक वर दोन रेषा दिसतात, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही गर्भवती आहात असा होतो. काही चाचणी किटमध्ये, २ वेगळ्या खिडक्या असतील आणि चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्यास दोन्ही खिडक्यांमध्ये रेषा दिसतील. कृपया लक्षात घ्या की वैद्यकीय केंद्रात रक्त तपासणी करून समान परिणामाची पुष्टी करणे आवश्यक आहे.
ड) नकारात्मक चाचणी कशी दिसते?
नकारात्मक परिणामाच्या बाबतीत, फक्त नियंत्रण रेषा दिसते आणि दुसरे काहीही नाही. या निकालाची पुष्टी करण्यासाठी तुम्ही एका आठवड्यानंतर चाचणीची पुनरावृत्ती करू शकता किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटू शकता तसेच रक्त तपासणी करून घेऊ शकता.
ई) अस्पष्ट रेषेबद्दल काय?
फिकट रेषा म्हणजे रक्तातील एचसीजी संप्रेरकाचे प्रमाण खूपच कमी आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात हे अगदी स्वीकार्य आहे. गरोदरपणाचे वय वाढत असताना शरीरात एचसीजीची पातळी वाढते.
गर्भधारणेची खात्री करण्यासाठी चाचणी घेण्याचे फायदे आणि तोटे
आजकाल गर्भधारणा चाचणी किट खूप लोकप्रिय आणि सहज उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे फायदे आणि तोटे सुद्धा माहिती असले पाहिजेत.
फायदे:
- तुमची मासिक पाळी चुकल्यानंतर तुम्ही गरोदर आहात की नाही याची खात्री करण्यासाठी गर्भधारणा चाचणी हा सर्वात जलद मार्ग आहे
- जेव्हा तुम्ही गरोदरपणासाठी तयार नसाल, परंतु जन्म–नियंत्रणासाठी वापरलेली साधने अयशस्वी झालेली असतील तेव्हा तुम्ही गर्भधारणा चाचणीद्वारे तुमच्या गर्भधारणेच्या स्थितीची पुष्टी करू शकता
- काहीवेळा, गर्भधारणा चाचणीद्वारे, पाळी चुकल्यानंतर ४–५ दिवसात तुम्हाला अचूक परिणाम मिळू शकतात
तोटे:
- काहीवेळा, किट वापरून मिळालेला गर्भधारणा चाचणीचा निकाल दिशाभूल करणारा असू शकतो
- बऱ्याच वेळेला, किटवर रासायनिक गर्भधारणा सकारात्मक दिसून येते, परंतु नंतर गर्भपात होतो. काही वेळेला गर्भधारणा किटद्वारे नकारात्मक परिणाम मिळतात परंतु नंतर ते सकारात्मक असल्याचे दिसून येते
घरी चाचणी केल्यानंतर त्यास पुष्टी मिळण्यासाठी रक्ताची चाचणी करून घेणे चांगले असते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गर्भधारणा चाचणी किट बद्दल येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत:
१. चाचणीवर कोणत्याही रेषा न दिसल्यास काय?
गरोदर चाचणीच्या स्टिकवर कोणत्याही रेषा न दिसल्यास, चाचणी अवैध ठरेल. यापैकी बहुतेक वेळा, समस्या किटमध्येच असते. सुरक्षिततेसाठी, २ ते ३ दिवसांनी चाचणी पुन्हा करा.
२. चाचणीची पुनरावृत्ती कधी करावी लागते?
गर्भधारणा चाचणी किटवर एक अस्पष्ट दुसरी ओळ दिसल्यास किंवा कोणत्याही रेषा अजिबात दिसत नसल्यास, खात्री करण्यासाठी परत चाचणी करण्याची गरज भासू शकते.
३. ९९ टक्के अचूकता म्हणजे काय?
जेव्हा किटवर दुसरी रेष स्पष्टपणे दिसते, तेव्हा तुम्ही गर्भवती असल्याची ९९ टक्के पुष्टी होते. ९९ टक्के अचूकता म्हणजे चाचणी १०० वेळा (त्याच ब्रँड/कंपनीच्या किटसह) केल्यास, ती ९९ वेळा योग्य परिणाम देईल. चाचणीचा निकाल चुकीचा असण्याची शक्यता १०० पैकी १ असते.
४. औषधे घेतल्याने गर्भधारणा पुष्टीकरण चाचणीच्या निकालावर परिणाम होतो का?
होय, औषधे घेतल्याने गर्भधारणा पुष्टीकरण चाचणीच्या निकालावर परिणाम होतो. आधी चर्चा केल्याप्रमाणे, घरी गरोदर चाचणी केल्यानंतर पूर्ण खात्री होण्यासाठी, वैद्यकीय केंद्रात रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रत्येक गरोदरपण आणि त्यावेळची परिस्थती हे वेगवेगळे असते. हा लेख तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या वेळी असलेली तुमची स्थिती आणि परिस्थिती, निश्चित करण्यात मदत करेल.
आणखी वाचा:
चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी
लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात