Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात

लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात

लघवीची गर्भधारणा चाचणी – घरी आणि दवाखान्यात

ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतात त्या स्त्रिया गर्भधारणा यशस्वी झाली आहे किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी लघवीच्या चाचणीवर अवलंबून असतात. रक्ताच्या चाचणी मध्ये अचूक निदान होत असले तरी, लघवीची चाचणी जास्त सोयीची, परवडणारी असते तसेच तुमची गोपनीयता अबाधित राहते (कारण तुम्ही ती घरी सुद्धा करू शकता), त्यामुळेच रक्ताच्या चाचणीपेक्षा लघवीची चाचणी जास्त प्रसिद्ध आहे.

घरी करता येणारी लघवीची गर्भधारणा चाचणी

गर्भवती महिलेमध्ये विकसित होणारी नाळ ही hCG (Human chorionic gonadotropin) नावाच्या संप्रेरकाची निर्मिती करते आणि ते गर्भधारणा संप्रेरक म्हणूनही ओळखली जाते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने गर्भधारणा चाचणी केल्यास ही चाचणी मूत्रमार्गात या संप्रेरकाची उपस्थिती ओळखून गर्भावस्थेची खात्री करुन घेऊ शकते.

लघवीची चाचणी केव्हा करावी?

लघवीची गर्भारपण चाचणी केव्हा करावी ह्या विचाराने तुम्ही संभ्रमात असाल. पाळी चुकल्यास तुमचे डॉक्टर दोन आठवडे वाट पाहायला सांगतात आणि मग गरोदर चाचणी करण्याचा सल्ला देतात. तथापि काही चाचण्या इतरांपेक्षा खूप प्रभावी असतात आणि वाट पाहण्याची गरज नसते.

चाचणी काय दर्शवते?

स्त्रीच्या लघवीमध्ये Human chorionic gonadotropin (hCG) आहे किंवा नाही हे लघवीची चाचणी सुनिश्चित करते. ह्या संप्रेरकाचे प्रमाण किती आहे हे मात्र रक्ताच्या चाचणीद्वारे समजते. लघवीच्या नमुन्यात hCG असणे म्हणजे गर्भधारणा झाली असल्याचे दर्शवते.

अचूक गर्भधारणा चाचणी करण्यासाठीच्या पायऱ्या

बऱ्याच गरोदर चाचण्यांच्या किटमध्ये सविस्तर सूचना असतात. चाचणीच्या अचूक निकालासाठी त्या सूचना काळजीपूर्वक पाळा. चाचणी करण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे:

१. चुकलेल्या पाळीची तारीख काढा: तुमच्या चुकलेल्या पाळीचा पहिला दिवस काढा आणि त्या तारखेपासून २८ किंवा ३५ दिवस (तुमच्या मासिक पाळी चक्रानुसार) मोजा. आता तुम्हाला मिळालेल्या तारखेला तुमची पाळी सुरु होणे अपेक्षित होते आणि हि तारीख म्हणजेच तुमच्या चुकलेल्या पाळीची तारीख होय.

२. चाचणी कधी करावी हे माहित करून घ्या: तुमच्या चुकलेल्या पाळीच्या तारखेपासून २ आठवडे पुढे मोजा. ह्या तारखेला तुम्ही चाचणी केली पाहिजे. लक्षात ठेवा आधी चाचणी केल्यास तुम्हाला चाचणीचा निकाल चुकीचा नकारात्मक मिळू शकेल.

३. योग्य चाचणीची निवड करा: घरी करता येणाऱ्या गरोदर चाचणीची निवड करताना सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या चाचणीची निवड करा. तसेच विकत घेताना त्यावरील समाप्तीची तारीख तपासून पहा. चाचणीच्या उत्पादनाची तारीख जितकी अलीकडली असेल तितके परिणाम अचूक मिळतील. गरोदर चाचणी किट घेताना नीट तपासून पहा.

४. काळजीपूर्वक किट उघडा: तुमचा स्पर्श ‘activation tab’ ला होऊ नये म्हणून काळजी घ्या. हातमोजे घालणे हा उत्तम उपाय आहे.

५. सकाळच्या लघवीची चाचणी: सकाळच्या लघवीचा नमुना वापरून केलेल्या चाचणीद्वारे अचूक निकाल मिळतात. दिवसाच्या पहिल्या  लघवीमध्ये hCG ह्या संप्रेरकाचे प्रमाण जास्त असते.

लघवीची गर्भधारणा चाचणी - घरी आणि दवाखान्यात

६. चाचण्यांचे विविध प्रकार: (Stream test or Dip test): काही चाचण्यांमध्ये गरोदर चाचणी पट्टी लघवीच्या धारेखाली पूर्ण भिजेपर्यंत धरावी लागते तर काही किट्समध्ये लघवीचा नमुना एका कपात घेऊन त्यामध्ये गर्भधारणा चाचणीची पट्टी  बुडवावी लागते. काही किट्स सोबत ड्रॉपर असतो, त्या ड्रॉपरच्या साहाय्याने लघवीचे काही थेम्ब गर्भधारणा चाचणीच्या पट्टीवर टाकावे लागतात.

७. चाचणीसाठी लागणारा वेळ: वेगवेगळ्या गरोदर चाचण्यांना निकालासाठी वाट पाहण्याचा कालावधी वेगवेगळा असतो, काही वेळा निकालासाठी संकेतचिन्हांचा वापर केला ज़ातो. निकाल व्यवस्थित समजण्यासाठी गरोदर चाचणीच्या किटवरील सूचनांची नीट माहिती करून घ्या. सूचनांमध्ये सांगितलेल्या वेळेनंतर चाचणीचा निकाल पाहिल्यास अचूक निकाल मिळत नाही कारण त्यावर चुकीचा सकारात्मक निकाल दिसू शकतो.

८. सकारात्मक/ नकारात्मक: आता बऱ्याच चाचण्या डिजिटल झाल्या आहेत त्यामुळे चाचणीचा निकाल सकारात्मक किंवा नकारात्मक ह्यापैकी काहीही असेल तर लगेच तो चाचणीवर दर्शवला जातो. त्यामुळे निकाल चुकीचा वाचला गेला असे होत नाही. जर चाचणीच्या निकालावर फिकट रेषा दिसत असेल तर कदाचित दोन दिवसांनी पुन्हा चाचणी करणे चांगले.

९. खात्रीसाठी रक्ताची चाचणी करून घेणे: गरोदर चाचणीच्या सकारात्मक निकालाची खात्री क्लिनिक मध्ये रक्ताची चाचणी करून घेता येईल. जर चाचणी सकारात्मक असेल तर रक्ताच्या चाचणीचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला गर्भाचे वय समजेल. जर तुमच्या चाचणीचा निकाल नकारात्मक असेल आणि तरीही तुमची मासिक पाळी सुरु झाली नाही, तर रक्ताची चाचणी केल्याने तुम्हाला गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे लगेच कळेल.

१०. मानसिकरीत्या स्वतःला तयार करा: गरोदर चाचणी करताना खूप संमिश्र भावना असतात. ज्यांची ही पहिलीच वेळ असते त्यांना थोडी भीती/ दडपण वाटू शकेल तर काहींना अपेक्षित निकाल न मिळाल्यामुळे निराशा येऊ शकते. स्वतःला मानसिकरीत्या तयार करून आपल्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा आधार घेणे महत्वाचे ठरेल.

लघवीच्या गर्भधारणा चाचणीच्या निकालाचा अर्थ काय आहे?

गर्भधारणेच्या लघवीच्या चाचणीच्या परिणामांचे योग्य रीतीने कसे वाचन करावे हे आवश्यक आहे.

  • जर गर्भधारणा चाचणी सकारात्मक असेल तर

वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची वेगवेगळी संकेतचिन्हे असतात, परंतु जर गरदोर चाचणीच्या पट्टीवर फिकट रेषा असेल (पहिली रेषा उमटल्या नंतर) तर चाचणीचा परिणाम सकारात्मक असतो. जर तुम्हाला रेषा खूपच फिकट आहे असे वाटले तर लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी दुसऱ्या दिवशी सकाळी चाचणी पुन्हा करून बघा. नंतर तुमच्या लघवीच्या चाचणीचे निकाल तपासून पाहण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला रक्ताची चाचणी करण्याचे सुचवू शकतात.

  • जर गर्भधारणेसाठीची लघवीची चाचणी नकारात्मक असेल तर

मासिक पाळी चुकूनसुद्धा तुमची गर्भधारणा चाचणी नकारात्मक आली असेल तर थोडा काळ वाट बघून पुन्हा चाचणी करून बघा. बऱ्याच वेळा चाचणीचे परिणाम नकारात्मक येतात कारण ओव्यूलेशनचा दिनांक चुकीचा काढलेला असतो  किंवा चाचणी खूप आधी केली तरी नकारात्मक परिणाम दिसतात.

घरी करता येणाऱ्या गरोदर चाचण्या १००% अचूक असतात का?

सामान्यतः, लघवीच्या गर्भधारणा चाचणीच्या अचूकतेबाबत काहीच शंका नाही परंतु घरगुती गर्भधारणा चाचणी १००% अचूक असेलच असे नाही त्यांचा असा दावा आहे की ह्या चाचण्या जर योग्यरितीने योग्य वेळेला केल्या तर ९९% अचूक असतात. गर्भधारणा चाचणीचे अचूक परिणाम हे तुम्ही किती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित सूचनांचे पालन करत आहात त्यावर अवलंबून असतात. परंतु मानवी चूक होण्याची खूप शक्यता असते आणि त्यामुळे चाचणीच्या १००% अचूकतेवर प्रश्नचिन्ह येते.

लघवीची गर्भधारणा चाचणी - घरी आणि दवाखान्यात

चुकीच्या सकारात्मक परिणामांची कारणे

चुकीच्या सकारात्मक निकालांची कारणे खालीलप्रमाणे

  • लवकर गर्भपात: एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाली असेल परंतु रोपणानंतर ताबडतोब बाळ गमावले असेल तर चाचणीचा निकाल चुकीचा सकारात्मक येऊ शकतो.
  • प्रक्रियेसाठीचा विलंब: काही वेळा सांगितलेल्या वेळेच्या खूप उशीरानंतर निकाल पडताळून पहिला जातो आणि त्यामुळे निकाल चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे चाचणीचे परिणाम खूप उशिराने बघण्याने चुकीचा सकारात्मक निकाल दिसू शकतो.
  • औषधे: काही केसेस मध्ये स्त्रिया गर्भधारणेसाठी वैद्यकीय उपचार घेत असतात ज्यामध्ये hCG च्या इंजेकशन्सचा समावेश असतो. त्यामुळे  चाचणीच्या परिणामांमध्ये गोंधळ उडू शकतो. म्हणून गरोदर चाचणी करण्याआधी तुमच्या शरीरातून hCG च्या इंजेकशनचा परिणाम जाऊ द्यावा.
  • भ्रामक रेषा: काही वेळा वेगळ्या रंगातील भ्रामक रेषा गर्भधारणा चाचणीवर उमटू शकते. ती रेषा सकारात्मक रेषेसारखी दिसू शकते परंतु तो गर्भधारणा चाचणीचा चुकीचा सकारात्मक निकाल ठरतो.

चुकीच्या नकारात्मक निकालाची कारणे

चुकीच्या नकारात्मक परिणामाची कारणे खालीलप्रमाणे

  • घाईघाईत चाचणी करणे: घाईघाईत चाचणी करणे किंवा पाळी चुकल्यावर लगेच चाचणी केल्यास चुकीच्या नकारात्मक परिणामांना चालना मिळू शकते.
  • कमी संवेदनशीलता: अशीही शक्यता आहे की गर्भधारणा चाचणी कमी संवेदनशीलतेची असेल ह्यामुळे hCG पातळी शोधून काढण्यात चूक होऊ शकते. चाचणीची कमी संवेदनशीलता ही उत्पादनाच्या वेळी झालेली चूक असू शकते.
  • पातळ लघवी: जर चाचणीसाठी वापरलेला लघवीचा नमुना पातळ असेल  तर निकालाच्या अस्पष्टतेची किंवा चुकीच्या नकारात्मक निकालाची शक्यता जास्त आहे.

स्त्रीरोगतज्ञांच्या दवाखान्यात लघवीची चाचणी

डॉक्टर्स तुम्हाला गर्भधारणा चाचणीसाठी लघवीची तपासणी करण्यास सांगतील आणि ते खूप सामान्य आहे. तुमच्या पहिल्या प्रीनेट्ल  भेटीदरम्यान लघवीची तपासणी केली जाईल आणि घरी केलेल्या गर्भधारणा चाचणीचे निकाल प्रमाणित केले जातील तसेच त्यामध्ये काही विसंगती आढळ्यास ती तपासली जाईल. तुमच्या पुढील भेटीदरम्यान किंवा दपासणीदरम्यान तुम्हाला वेळोवेळी लघवीची चाचणी करावी लागू शकते.

लघवीची चाचणी दवाखान्यात का केली जाते?

दवाखान्यात सामान्यपणे लघवीची चाचणी  केली जाते त्याची कारणे खालीलप्रमाणे:

  • गर्भधारणेदरम्यान तपासणीचा भाग म्हणून लघवीची तपासणी करण्यास सांगितली जाते. यकृताचे प्रश्न किंवा मधुमेहाची शक्यता तपासून पाहण्यासाठी हे केले जाते.
  • तुमची वैद्यकीय स्थिती कशी आहे जे जाणून घेण्यासाठी लघवीची चाचणी सांगितली जाते.  पोटात किंवा पाठीत दुखणे तसेच लघवी करताना दुखणे इत्यादींची कारणे जाणून घेण्यासाठी लघवीची चाचणी सांगितली जाते.
  • नियमित वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून लघवीची तपासणी केली जाते, मूत्राशयाचे प्रश्न किंवा मूत्रपिंडासंबंधित काही अनियमितता असतील तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा लघवीची तपासणी केली जाते.

दवाखान्यात केलेल्या लघवीच्या चाचणीचे मूल्यांकन कसे केले जाते?

लघवीची चाचणी चुकीची असू शकते का? लघवीची तपासणी करून घेणाऱ्या स्त्रीची हे जाणून घेण्याची इचछा असू शकते. परंतु ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे चाचणी चुकीची असण्याची शक्यता खूप कमी असते. गर्भधारणा तपासणीसाठी केलेल्या लघवीच्या चाचणी दरम्यान ३ मार्गानी काळजीपूर्वक मूल्यांकन केले जाते.

  • लघवीची नुसत्या डोळ्यांनी तपासणी: पॅथॉलॉजिस्ट आपल्या मूत्राचा रंग गढूळ किंवा स्पष्ट आहे की नाही हे तपासू शकते. कोणताही अपरिचित गंध किंवा असामान्य रंग म्हणजे संसर्ग झाला असल्याचा संकेत असू शकतो. कधीकधी, काही खाद्यपदार्थांचा वापर जसे  बीट मुळे आपल्या मूत्राचा रंग लाल होऊ शकतो.
  • डिप्सटिक चाचणी: प्लास्टिकच्या पातळ पट्ट्या लघवीच्या नमुन्यात बुडवून काही संकेतांचे मूल्यांकन केले जाते जसे की पीएच, आम्लता, साखरेची मात्रा, किटोन्स, प्रथिनांची पातळी तसेच बिलिरुबिन आणि रक्त.
  • सूक्ष्मदर्शकावर तपासणी: मुत्राच्या नमुन्याची सूक्ष्मदर्शकाद्वारे तपासणी केली जाते, त्यादरम्यान त्यात रक्ताच्या पेशी, पांढऱ्या पेशी, यीस्ट, जिवाणू आढळतात का हे तपासून पहिले जाते. त्याद्वारे काही अनियमितता असतील तर त्या लक्षात येतात.

घरी केलेल्या गर्भधारणा चाचणीमध्ये निकालाच्या सत्यतेबाबत खूप प्रश्न असू शकतात. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी घरी चाचणी करताना ती योग्य मार्गाने कशी करावी हे जाणून घेतले पाहिजे तसेच परिणामांसाठी योग्य वेळ दिला पाहिजे, त्यामुळे चुकीचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम टाळता येतील. घरी चाचणी करून झाल्यावर ती दवाखान्यात जाऊन सुद्धा केली पाहिजे त्यामुळे घरी केलेल्या चाचणीचा निकाल प्रमाणित करता येईल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article