आहार आणि पोषण

गरोदरपणात कोळंबी खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि टिप्स

तुम्हाला कोळंबीचे काही स्वादिष्ट पदार्थ हवे आहेत? बटर गार्लिक प्रॉन्स, प्रॉन करी, फ्राईड प्रॉन्स, प्रॉन्स  बिर्याणी, पेपर प्रॉन्स वगैरे! चला तर मग कोळंबीविषयी अधिक जाणून घेऊयात.  कोळंबी समुद्री प्राण्यांच्या क्रस्टेशियन गटात मोडतात आणि चविष्ट असतात. परंतु, कोळंबीच्या ऍलर्जीमुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे गर्भावस्थेत कोळंबी खाणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. ह्या लेखात, आपण गरोदरपणात कोळंबी खाऊ शकतो की नाही यावर एक नजर टाकूयात, गरोदर असताना कोळंबी खाण्याविषयीच्या टिप्स आणि गरोदरपणात कोळंबी खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही चविष्ट  प्रॉन रेसिपी सुद्धा ह्या लेखामध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही कोळंबी प्रेमी असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला सुरुवात करुया!

गरोदर असताना कोळंबी खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सीफूड खाणे टाळणे आवश्यक असले तरी, कोळंबी खाणे सामान्यतः सुरक्षित असते. परंतु कोळंबी दूषित पाण्यातील नसावी आणि पूर्णपणे शिजवलेली असावी. गरोदरपणात काही पदार्थ आवडत असतील तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.. गरोदरपणात  जास्त प्रमाणात कोळंबीचे सेवन केल्यास किंवा कोळंबीचे सेवन करताना सावधगिरी बाळगली नाही तर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. शंका असल्यास, कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोळंबी खाण्याचे आरोग्यविषयक फायदे

कोळंबी चविष्ट असते. गरोदर स्त्रीसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि जीवनसत्त्वे कोळंबी मध्ये भरपूर प्रमाणात असतात. गरोदरपणात कोळंबी खाण्याचे फायदे पाहूया:

1. जास्त प्रमाणात प्रथिने

गरोदरपणात कोळंबी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. प्रथिनेयुक्त पदार्थ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास आणि गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने, कोळंबी खाल्ल्याने तुमचे स्नायू निरोगी राहण्यास मदत होईल.

2. भरपूर जीवनसत्त्वे

कोळंबी मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, लोह, जस्त, कोलीन, आयोडीन, तांबे आणि फॉस्फरस असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, थायरॉईडचे कार्य नीट चालू राहण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी जीवनसत्वे आवश्यक असतात. ही जीवनसत्वे हाडे आणि दातांच्या विकासासाठी देखील उपयुक्त असतात.

3. इतर पोषक तत्वे समृद्ध प्रमाणात असतात

कोळंबीमध्ये पोषक घटक असतात. हे घटक आपल्या शरीराद्वारे सहज शोषले जातात आणि आपल्या शरीराला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते आवश्यक असतात. सेलेनियम हे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि ते पेशींच्या नुकसान कमी करण्यास मदत करते आणि विशिष्ट कर्करोगापासून संरक्षण करते. अमीनो ऍसिड नवीन पेशी पुन्हा निर्माण करण्यास आणि खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. अँसटॅझानथिन मध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. कोळंबीमध्ये सर्व पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात.

4. कॅलरीज कमी

गरोदरपणात, निरोगी वजन वाढणे आणि पुरेसे पोषण मिळणे आवश्यक असते. कोळंबीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे अनावश्यक चरबी नसलेला पौष्टिक आहार घेणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे असते.

5. ओमेगा 3समृद्ध

हे फॅटी ऍसिड कोळंबीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ते बाळाचे डोळे आणि मज्जातंतूंच्या विकासासाठी मदत करते.

गरोदरपणात कोळंबी खाणे टाळावे का?

आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे गरोदरपणात कोळंबीचे सेवन केल्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. परंतु कोळंबी किंवा कोणत्याही प्रकारचे समुद्री अन्न खाण्याआधी तुमच्या डॉक्टरांना विचारा. तुम्ही साशंक असल्यास, थोडे खाऊन सुरुवात करा आणि तुमचे शरीर त्यावर कशी प्रतिक्रिया देते ते पहा. त्यानंतर तुमचा आहार त्यानुसार बदलता येईल. कोणत्याही परिस्थितीत,संयम ठेवा आणि कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. जर कोळंबी खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाला नाही तर कोळंबी तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप पौष्टिक तसेच आरोग्यदायी असू शकते. काही गर्भवती स्त्रियांना गरोदरपणात कोळंबीच्या ऍलर्जीचा धोका असू शकतो. गरोदरपणात कोळंबी खाण्याचे धोके तसेच तुम्ही कुठली सावधानता बाळगली पाहिजे याबद्दलची माहिती येथे दिलेली आहे.

गर्भवती स्त्रिया किती प्रमाणात कोळंबी खाऊ शकतात?

संशोधनानुसार, दर आठवड्याला 8 ते 12 औंस शेलफिश किंवा मासे खाणे गरोदर स्त्रियांसाठी चांगले असते. पण ते नीट शिजवून खाल्ले पाहिजेत.

गरोदर असताना कोळंबी खाण्याविषयी काही टिप्स

गरोदरपणात करून बघण्यासाठी कोळंबीच्या पाककृती

येथे काही कोळंबीच्या पाककृती आहेत. ह्या पाककृती तुम्ही गरोदर असताना करून खाऊ शकता.

1. गार्लिक प्रॉन्स

साहित्य कसे बनवावे?

2. प्रॉन स्टर फ्राय

साहित्य कसे बनवावे?
  1. पॅन मध्ये तेल गरम करून घ्या आणि कांदा घालून तीन मिनिटे परतून घ्या
  2. लसूण, पाणी, मटार आणि बीन स्प्राउट्स घाला आणि आणखी तीन मिनिटे शिजवून घ्या
  3. स्प्रिंग ओनियनसह पॅनमध्ये कोळंबी घाला आणि आणखी तीन मिनिटे शिजवा
  4. भाताबरोबर सर्व्ह करा

3. प्रॉन टेंपुरा

साहित्य कसे बनवावे?
  1. बॅटर तयार करण्यासाठी एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, साधा मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
  2. पिठात एक थेंब सोडा पाणी घाला. जोपर्यंत पीठ गुळगुळीत होत नाही तोपर्यंत घटक मिक्स करताना पाणी घालत रहा
  3. एका कढईत थोडे ऑलिव्ह ऑइल घेऊन गरम करा
  4. तयार पिठात कोळंबी बुडवून गरम तेलात टाका
  5. पाच मिनिटे तळून घ्या आणि बाहेर काढा
  6. सर्व कोळंबी अशाप्रकारे तळून घ्या
  7. सर्व्ह करा

4. प्रॉन, मँगो आणि एवोकॅडो सॅलड

साहित्य कसे बनवावे?
  1. एवोकॅडोचे तुकडे करा आणि आंबे चिरून घ्या
  2. एका भांड्यात कोळंबी आणि कोथिंबीर घालून ठेवा
  3. ड्रेसिंगचे चार चमचे हलक्या हाताने लावा
  4. सॅलडच्या पानांचे दोन प्लेट्समध्ये दोन भाग करा आणि प्रत्येकावर अॅव्होकॅडो आणि कोळंबीचे मिश्रण घाला
  5. सॅलडवर उरलेले ड्रेसिंग घाला आणि लगेच सर्व्ह करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. तुम्ही गरोदर असताना प्रॉन कॉकटेल आणि टोस्ट खाऊ शकता का?

होय, कोळंबी पूर्णपणे शिजवलेली असल्यास गरोदरपणात कोळंबी खाणे सुरक्षित आहे. गरोदरपणात खाण्यासाठी अनुकूल अश्या कोळंबीच्या अनेक रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता.

2. स्तनपान करणाऱ्या आईसाठी कोळंबी खाणे सुरक्षित आहे का?

होय, गरोदरपणात आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी कोळंबी खाणे सुरक्षित आहेत. आई आणि बाळ दोघांनाही त्याचे अनेक फायदे आहेत. विश्वासू दुकानदाराकडून चांगली कोळंबी विकत घेऊन योग्य प्रमाणात खाल्ल्यास कोणतीही समस्या निर्माण होत नाहीत. तुम्हाला अस्वस्थता वाटल्यास किंवा ऍलर्जीची कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात चिकन खाणे गरोदरपणात मासे खाणे – सुरक्षित की असुरक्षित?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved