अन्य

कोरोनाविषाणूचा उद्रेक झालेला असताना, तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी घरात करता येतील असे १५ क्रियाकलाप

सगळे जग कोविड-१९ कोरोना विषाणूच्या उद्रेकाचा सामना करीत आहे. तुम्ही सुद्धा तुमचे कुटुंब सुरक्षित रहावे म्हणून योग्य ती काळजी घेत असाल आणि त्याचाच भाग म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर जाऊ न देता घरात ठेवले असेल. तुमच्या बाळाची सुरक्षितता आणि आरोग्य हे खूप महत्वाचे आहे. विशेषकरून ह्या अस्वस्थ काळात हे जास्त महत्वाचे आहे आणि ते आपण समजू शकतो. परंतु शाळा बंद झाल्या आहेत आणि मुले घरात अडकली आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांची ऊर्जा नीट वापरणे गरजेचे आहे जेणेकरून घरात शांतता राखली जाईल. मुलांना घरात सुरक्षित ठेऊन त्यांचे मनोरंजन कसे करावे ह्याची तुम्हाला चिंता असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. टॉडलर्स पासून शाळेत जाणाऱ्या मुलांपर्यंत प्रत्येकासाठी आमच्याकडे खूप मजेदार खेळ आहेत. म्हणून, तुमच्या मुलांना आरामदायक कपडे घाला आणि एका साहसास सुरुवात होऊ द्यात!

टॉडलर्ससाठी ५ मजेदार खेळ

. स्टिकी स्पायडर वेब

https://youtu.be/4zKI_FEL0qQ हा खूप सोपा परंतु मजेदार खेळ आहे, ह्यामुळे तुमच्या मुलाला हालचाल कौशल्याचा सराव होईल आणि त्यामुळे हात आणि डोळे ह्यांचा समन्वय सुधारेल. त्यासाठी तुम्हाला दारावर चिकट सेलोटेपचे जाळे तयार करावे लागेल. नंतर, जुन्या वर्तमानपत्रांचे छोटे छोटे बॉल तयार करून त्या जाळ्यावर फेकण्यास सुरुवात करा आणि कुणाचा बॉल त्यावर चिकटतो ह्यावर लक्ष ठेवा.

. क्लाऊड डोव ऍक्टिव्हिटी

https://youtu.be/HYqyYuV8Chw काही तास तुमच्या मुलाचा वेळ मजेत घालवण्यासाठी हा क्रियाकलाप अगदी योग्य आहे आणि तसेच तो तयार करण्यास सुद्धा अगदी सोपा आहे. त्यासाठी ५ कप पीठ घ्या आणि त्यामध्ये एक कप बेबी ऑईल घाला आणि ते मोठ्या भांड्यात ठेवा. तुमच्या मुलाला हे दोन्ही घटक चांगले मळून घेऊ द्या. त्याला खूप मजा येईल! पिठाच्या मऊ पोतामुळे संवेदनांशी निगडित हा खेळ आहे. तुम्ही त्याला काही मोल्ड्स देऊ शकता आणि कणकेपासून वेगवेगळे मोल्ड्स बनवण्यास शिकवू शकता.

. कार्डबोर्डवर वॉटर पेंटिंग

https://youtu.be/2FYD5FKeAyk मुलाला खरे रंग दिल्यावर तो घराचे नुकसान करू शकेल अशी भीती आहे का? आमच्याकडे ह्यावर चांगला उपाय आहे - वॉटर पेंटिंग! कार्डबोर्ड बॉक्सचा एक शीट तुमच्या मुलाला द्या तसेच तुमच्या मुलाला एक भांड्यात पाणी आणि पेंटब्रश द्या. तुमच्या मुलाच्या आतील कलाकारास उजळू द्या, व्यक्त होऊ द्या! तुमच्या मुलाने रंगवण्यास सुरुवात करण्याआधी कार्डबोर्ड शीट खाली वर्तमानपत्र घालण्यास विसरू नका. असे केल्याने फरशी ओली होऊन, कुणी पडून अपघात होणार नाही.

. खेळण्यांसाठी आईस स्केटिंग

तुमचे मूल स्केटिंग करू शकत नाही तर त्याच्या खेळण्यांना स्केटिंग करण्यासाठी बर्फाचा पृष्ठभाग तयार करायला काय हरकत आहे? बेकिंग ट्रे मध्ये बर्फ गोठण्यास ठेवा आणि एकदा बर्फाचे हे ट्रे तयार झाले की तुमच्या मुलाची छोटी खेळणी जसे की कार किंवा बाहुल्या बाहेर काढा आणि ही खेळणी बर्फाच्या ट्रे वर खेळवताना मग्न झालेल्या तुमच्या मुलाला बघा. बर्फ वितळू लागल्यानंतर तुमच्या मुलाला तो बर्फ लाकडाच्या चमच्याने फोडू द्या. संवेदनांच्या विकासासाठी हे चांगले आहे.

. खेळणी वेगवेगळी करणे

https://youtu.be/6I2r3mba-1Y तुमच्या मुलाची खेळणी घरभर पसरलेली आहेत आणि ह्या खेळामुळे स्वच्छता तर होईलच परंतु तुमचे मूल व्यस्त राहण्यास सुद्धा मदत होईल. सगळी खेळणी गोळा करा आणि खेळण्याच्या समोर रंगीबेरंगी ट्रे किंवा पेपर ठेवा. तुमच्या मुलाला आता रंगानुसार खेळणी वेगळी करण्यास सांगा उदा: निळ्या रंगाची खेळणी निळ्या ट्रेमध्ये ठेवण्यास सांगा. ह्या खेळामुळे तुमच्या मुलाचे लक्ष खेळावर केंद्रित होऊन स्वच्छता सहज होऊन जाईल. तुमचे मूल सुरक्षित राहण्यासाठी खेळणी ठेवण्यासाठी घेतलेले ट्रे किंवा कंटेनर निर्जंतुक करून घेण्यास विसरू नका.

प्रीस्कूलर्ससाठी ५ मनोरंजक क्रियाकलाप

. पत्र लपवा आणि शोधा

आपल्या प्रीस्कूलरला व्यस्त कसे ठेवावे आणि वर्णमाला कशी सुधारित करावी असे प्रश्न तुम्हाला पडत आहेत का? आम्हाला तुमच्यासाठी योग्य क्रियाकलाप मिळाला आहे. पूर्णपणे अंधार पडलेल्या खोलीत, वर्ण मालेची सर्व अक्षरे भिंतीवर चिकटवा आणि दिवे बंद करा. आपल्या मुलास फ्लॅशलाइट द्या आणि मजेला सुरुवात होऊ द्या. त्याला भिंतीवर टॉर्चचा उजेड पाडून विशिष्ट अक्षरे शोधण्यास सांगा. ह्या क्रियाकलापामुळे अनेक तास मजेत जाऊ शकतात.

. हॉप-स्कॉच फन

https://youtu.be/6KOvsbuxIaY हॉप-स्कॉच किती मजेदार असायचे ते आठवते? तुमच्या मुलाची साठलेली उर्जा खर्च करण्यासाठी ह्या गेमची त्यास ओळख करून द्या! आपण हॉप-स्कॉच गेम आपल्या घरात किंवा खाजगी मैदानी भागावर खडू वापरुन काढू शकता किंवा तो रंगीत टेपने देखील तयार करू शकता. आपल्या लहान मुलाची सर्व शक्ती वापरण्याचा आणि आपले मूल घरात अडकलेले असताना त्याचे मनोरंजन करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. शिवाय, आपण गेममध्ये सामील होण्याचे ठरवल्यास त्यामुळे व्यायाम सुद्धा होतो!

. पेपर प्लेट्सवर उड्या मारणे

आपल्या छोट्या मुलाची उर्जा वापरण्याचा आणि त्याला रंगांबद्दल सर्व काही शिकविण्याचा हा आणखी एक मजेदार मार्ग. आपल्या घरातील फरशीवर काही रंगीत कागदाच्या प्लेट्स लावून मजा करण्यासाठी सज्ज व्हा. रंगांचे नाव सांगा आणि आपल्या मुलास एका प्लेटमधून दुसर्‍या प्लेटवर जाण्यास सांगा. ही सोपी क्रिया मूर्खपणाची वाटू शकते परंतु आम्ही आपल्याला खात्री देतो की आपल्या मुलास हा उड्या मारण्याचा खेळ नक्कीच आवडेल.

. बिंदू जोडा

ह्या खूप दमवणाऱ्या खेळांनंतर श्वास घेण्यास थोडा वेळ हवा आहे का? स्वत: साठी एक कप छानशी कॉफी करत असताना आपल्या छोट्या मुलास व्यस्त ठेवेल असा हा खेळ आहे. हा सोपा क्रियाकलाप आपल्या लहान मुलाच्या एकाग्रतेस मदत करेल आणि त्याला एका मनोरंजक खेळाशी ओळख करून देईल. आपल्याला फक्त कागदाच्या तुकड्यावर ठिपक्यांच्या सहा आडव्या आणि उभ्या ओळी तयार करायच्या आहेत. आपल्या मुलास काही स्केचपेन द्या आणि त्याला हवे तसे ठिपके जोडू द्या. हा खेळ तुमच्या मुलासाठी एक्सप्लोर करण्यासाठी आणि त्याची पेन्सिलवरील पकड सुधारण्यासाठी एक चांगला मार्ग आहे.

. साबणाचा फेस

https://youtu.be/Bobuj5Mgd7A ह्या खेळामुळे तुमचे मूल आनंदी होईल तसेच त्याचे हात सुद्धा स्वच्छ राहतील. ब्लेंडरमध्ये थोडेसे पाणी आणि डिशवॉशिंग लिक्विड घाला आणि भरपूर फेस होईपर्यंत तो फिरवत रहा. हा फेस आता एका ट्रेमध्ये टाका. हा फेस पाहून आपल्या लहान मुलाचे डोळे आनंदाने चमकतील आणि त्याबरोबर खेळून मजा घेताना तो हा फेस सगळीकडे पसरवेल! फक्त हा फेस त्याच्या डोळ्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्या.

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी ५ रोमांचक क्रियाकलाप

. स्कॉलिस्टिक लर्न ऍट होम प्रोग्रॅम

शाळेत जाणाऱ्या मुलांचे पालक जास्त चिंतीत आहेत कारण त्यांच्या शाळा बंद आहेत आणि शिक्षण थांबले आहे. परंतु, स्कॉलिस्टिक नावाचे प्रसिद्ध पब्लिशिंग हाऊस आहे त्यांनी मुलांचा रिकामा वेळ कारणी लागावा तसेच त्यांना जगाची माहिती वहावी म्हणून रिमोट स्कुलिंग प्रोग्रॅम तयार केले आहेत. हे प्रोग्रॅम वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी तयार केले गेले आहेत आणि तुमच्या मुलाला सूट होईल असा प्रोग्रॅम तुम्ही त्याच्यासाठी निवडू शकता. ह्या प्रोग्रॅम मध्ये असलेले शैक्षणिक व्हिडीओ आणि क्रियाकलापांमुळे मुले व्यस्त राहतील.

. चिखल तयार करा

https://youtu.be/yI3X3AqRvX4 आपल्या मुलाचे कंटाळवाणे तास हाताळण्यासाठी उपाय म्हणजे-चिखल तयार करणे. ते करणे खरोखर सोपे आहे आणि ह्या खेळामुळे आपल्या मुलास बराच काळ व्यस्त ठेवले जाईल. एका वाडग्यात अर्धा कप गोंद घ्या आणि अर्धा कप पाणी घाला. हे मिश्रण खूप पातळ होईल असे आपल्याला वाटत असल्यास थोडे कमी पाणी घाला. थोडे फूड कलरिंग घालून मिक्स करावे. आता, शेव्हिंग क्रीम घाला आणि चांगले मिसळा. स्ट्रेच होण्यासाठी थोडे लोशन घाला आणि नंतर हळूहळू थोडासा द्रव डिटर्जेंट घाला. हे मिश्रण चांगले मळून घ्या आणि हो आता ते तयार आहे! आपल्या मुलास ते द्या किंवा तो स्वतः करत असल्यास त्यास मदत करा. आपण पृष्ठभागाचे चांगले निर्जंतुकीकरण केले आहे ह्याची खात्री करा आणि त्यास एका स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा.

. क्रेप पेपरचे चक्रव्यूह

https://youtu.be/LbE-fsXTYno गेल्या वाढदिवसाच्या पार्टीपासून आपल्या घरात काही क्रेप पेपर बंडल पडलेले आहेत का? ते वापरण्याची वेळ आली आहे. चक्रव्यूह करण्यासाठी घरातील अरुंद वाटेमध्ये किंवा दरवाजाच्या कडेवर क्रेप पेपर चिकटवा आणि तुमच्या मुलाला त्यामधून जाण्यास सांगा. आपण आपल्या मुलास क्रेप पेपर, काही सेलो टेप देखील देऊ शकता आणि हे चक्रव्यूह तयार करताना त्याला हवा तसा दंगा घालू द्या.

. ऍक्टिव्हिटी बॉक्सेस

https://cdn.cdnparenting.com/articles/2020/03/19181835/Intellikit.jpg जेव्हा मूल घरात अडकून राहते तेव्हा क्रियाकलाप बॉक्स उत्तम असतात! त्यामध्ये सहसा ४-८ क्रियाकलाप असतात जे वारंवार खेळले जाऊ शकतात. आम्ही आपल्या मुलाच्या कौशल्यांचा विकास व्हावा तसेच त्यांनी व्यस्त रहावे यासाठी फर्स्ट क्राय इंटेलिकिटची शिफारस करतो! हा एक मासिक सदस्यता-आधारित क्रियाकलाप बॉक्स प्रोग्राम आहे ज्यामध्ये हे वेगवेगळे क्रियाकलाप करताना आपल्या मुलास शिकताना मजा सुद्धा घेता येईल अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले असतात. जेव्हा आपल्या मुलाचे अनिश्चित काळासाठी विलगीकरण असते तेव्हासाठी हा बॉक्स त्याच्यासाठी उत्कृष्ट आहे!

. मुलांसोबत झेंटँगल्स

https://youtu.be/qBwHUKHUdD8 शांत वेळ नेहमीच कंटाळवाणे नसतो! आपण या कलात्मक झेंटाँगलसारख्या सोप्या आणि सोप्या गोष्टी करण्यासाठी आपल्या मुलास प्रोत्साहित करू शकता. आपल्याला फक्त कागदाच्या तुकड्यावर आपला हात ट्रेस करायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या मुलाला ते एकच डिझाइन रिपीट करण्यास सांगा. या क्रियेचा शांत प्रभाव पडतो आणि काही काळ त्याचे लक्ष वेधून घेते.

घरात अडकल्यामुळे तुमच्या मुलाला व्यस्त ठेवण्यासाठी काही टिप्स

. वेळापत्रक तयार करा: आता सगळेच घरात अडकलेले असल्यामुळे, व्यस्त राहणे अवघड आहे. म्हणून वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी करा. तुमच्या दिनक्रमात मजेदार क्रियाकलापांचा समावेश करा आणि तुमच्या कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवा. . फॅमिली मुव्ही नाईट: घरात अडकलेले असताना फॅमिली मुव्ही नाईटचा पर्याय सर्वात चांगला आहे. काही जुने चांगले चित्रपट किंवा काही हलकेफुलके नवीन चित्रपट पाहिल्यास तुमचे मूल आनंदी राहण्यास मदत होईल. . सोप्या पाककृती करून पहा: मुलांना जीवनविषयक कौशल्ये शिकवण्यासाठी ही चांगली वेळ आहे. काही सोप्या पाककृती करून पहा आणि घरी बिस्किटे करून पहा किंवा चविष्ट नाश्ता तयार करा. . पुस्तक वाचा: दिवसभर फक्त पुस्तक वाचण्याचे स्वप्न आपण कितीवेळा पहिले आहे. तुमच्या मुलाला दिवसभर पुस्तक वाचायला आवडेल असे नाही, परंतु ह्या वेळेचा सदुपयोग आपण त्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी करू शकतो. . पिलो फाईट: मुलांची ऊर्जा वापरण्यासाठी आणि एकुणातच संपूर्ण कुटुंबाला मजा येणारी गोष्ट म्हणजे जुन्या उश्या वापरून केलेली पिलो फाईट. आम्हाला खात्री आहे की तुम्ही हा खेळ खेळताना खूप हसाल. अशाप्रकारे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल काळजी न वाटणे अशक्य असले तरी तर्कसंगत असणे आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. घरी राहणे, विशेषत: आपल्याकडे आपल्या कुटुंबात लहान मुले किंवा वृद्ध लोक असल्यास त्यांना सुरक्षित आणि निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. संपूर्ण कुटुंब घरात असताना, हा वेळ एकत्रितपणे चांगला घालवता येईल आणि त्यामुळे कुटुंबातील समस्यांमधील बंध आणखी घट्ट होतील. म्हणून, घरात असताना मजा करण्यासाठी सज्ज व्हा आणि आपले हात धुण्यास विसरू नका! आणखी वाचा: तुमचे घर कोरोनाविषाणू मुक्त कसे ठेवाल?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved