अन्य

सिझेरिअन प्रसूती – सी-सेक्शन पद्धतीने जन्माविषयी सर्व काही

ह्या जगात तुमचे बाळ सिझेरिअन करून यावे अशी कल्पना करणे योग्य नाही, परंतु लक्षात ठेवा की जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सिझेरिअन प्रसूतीची गरज आहे असे सांगतात तेव्हा तुम्हाला त्यांचा सल्ला ऐकावा लागेल कारण बाळासाठी तो निर्णय योग्य असेल.

सी-सेक्शन पद्धतीने प्रसूती म्हणजे काय?

मेरिअम-वेब्स्टर डिक्शनरी नुसार (सी- सेक्शन) म्हणजे "अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पोटाचे आणि गभाशयाच्या भित्तिकांना छेद देऊन बाळाचा जन्म होतो" ही व्याख्या आजही बरोबर आहे. सी-सेक्शन मध्ये प्रामुख्याने २ प्रकार असतात.

. ऐच्छिक सी- सेक्शन

जेव्हा सी-सेक्शन हे पूर्वनियोजित असते तेव्हा त्यास ऐच्छिक म्हणजेच इंग्रजीमध्ये इलेक्टिव्ह सी-सेक्शन असे म्हणतात. पहिल्यांदाच आई होणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया हल्ली ऐच्छिक सी सेक्शन करतात त्यामागे कुठलेही वैद्यकीय कारण नसते. तर काहीजणींच्या मते जेव्हा सी-सेक्शन प्रसूती नियोजीत असते तेव्हा सुट्टी किंवा मदतीची आधीच योजना करून ठेवता येते, तर काही जणींना असा विश्वास असतो की सी-सेक्शनचे आधी नियोजन केल्यामुळे नॉर्मल प्रसूतीमध्ये होणाऱ्या वेदना किंवा गुंतागुत टाळता येतात. काही वेळा वैद्यकीय कारणामुळे जेव्हा नॉर्मल प्रसूती बाळासाठी धोकादायक असते तेव्हा डॉक्टर तात्काळ सी-सेक्शन करण्याचा सल्ला देतात.

. तात्काळ सी-सेक्शन

काही वेळा अनपेक्षित कारणांमुळे सी-सेक्शन केले जाते तेव्हा त्यास तात्काळ सी-सेक्शन असे म्हणतात. प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर जेव्हा गुंतागुंत वाढते तेव्हा तात्काळ सी-सेक्शन करण्याची गरज भासू शकते. इथे ह्या प्रक्रियेची तपशीलवार माहिती तसेच जन्मानंतर बाळाची कशी काळजी घ्यावी ह्याविषयी सुद्धा माहिती दिली आहे.

सी-सेक्शन साठी कारणे कोणती आहेत?

आपली आई किंवा आजी सांगते की बाळाला जन्म देणे ही ह्या जगातील सर्वात नैसर्गिक क्रिया आहे, खेडेगावात अशा काही स्त्रिया आहेत ज्या शेतात काम करत असताना प्रसूतीकळा सुरु झाल्यावर झाडामागे जाऊन बाळाला जन्म देतात. बाळाला कापडात गुंडाळून पुन्हा कामाला लागतात! हे ऐकायला खूप सोपे वाटते पण ते खूप दुर्मिळ आहे. बऱ्याच स्त्रियांना नॉमल प्रसूती नंतर पुनर्प्राप्ती होण्यासाठी निदान दोन चार दिवस लागतात. जरी नॉर्मल प्रसूतीला प्राधान्य दिले जाते तरीसुद्धा काही वेळा सी-सेक्शन करावे लागते. उदाहरणार्थ, जर तुमच्या आधीच्या गरोदरपणात काही गुंतागुंत असेल किंवा आताच्या गर्भारपणात तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्हाला ऐच्छिक सी-सेक्शन करण्याची किंवा 'पुन्हा नियोजित सिझेरिअन'करण्याची गरज असते. खालील परिस्थितीत तुम्हाला नियोजित सी-सेक्शन करावे लागते: काही वेळा स्त्रिया आपणहून सी-सेक्शन प्रसूतीची विनंती करतात कारण तो शारीरिक किंवा भावनिकरीत्या क्लेशदायक अनुभव असतो. होणाऱ्या आईला बऱ्याच वेळा प्रसूतीच्या वेदनांची भीती वाटत असते. बरेच डॉक्टर्स आईला नॉमल प्रसूतीसाठी समुपदेशन करतात. काहीवेळा जर प्रसूती अपेक्षितरित्या पुढे सरकली नाही तर तुमचे डॉक्टर तात्काळ सी-सेक्शन करून प्रसूती करू शकतात. सी-सेक्शन प्रसूती करणे किती तात्काळ आहे ह्यावर ती किती लवकर करावी हे अवलंबून आहे. जेव्हा तात्काळ सी-सेक्शन केले जाते तेव्हा नेहमीच आयुष्याला धोका असतो असे नाही. काही वेळा तात्काळ सी-सेक्शन खालील परिस्थितीत केले जाऊ शकते. जेव्हा आई किंवा बाळाला धोका असेल तेव्हा सी-सेक्शन तात्काळ केले जाते.आणि ते खालील कारणांमुळे केले जाते

सिझेरिअन प्रसुती कशी केली जाते?

. प्रक्रियेदरम्यान काय होते

जरी सी-सेक्शन प्रसूती पूर्वनियोजीत असली किंवा शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय असला तरी सी-सेक्शन ची प्रक्रिया ही खूप साधी आहे. बाळाच्या जन्म होण्यासाठी ह्या शस्त्रक्रियेला १० मिनिटे लागतात आणि टाके घालण्यासाठी ३० मिनिटे लागतात. इथे सी-सेक्शनची प्रक्रिया टप्प्यांमध्ये दिली आहे.

. तयारी आणि भूल देणे

सी-सेक्शनची पहिली पायरी म्हणजे आय. व्ही. आणि भूल देणे. पाठीच्या कण्यात इंजेक्शन देऊन हे केले जाते. त्यामुळे तुमच्या शरीराचा खालील भाग बधिर होतो पण तुम्ही शुद्धीवर असता. तुमच्या पोटावरील केस काढून जंतुनाशक द्रव्याने तो भाग स्वच्छ केला जातो. तुमच्या मूत्राशयात कॅथेटर घातला जातो आणि शस्त्रक्रियेच्या कालावधीत तो तसाच ठेवला जातो. छोट्या पडद्याद्वारे शत्रक्रियेचा भाग झाकला जातो. त्यामुळे तो भाग जंतुविरहित तर होतोच परंतु तुम्हाला शस्त्रक्रिया किंवा प्रसूती दिसत नाही. तुम्हाला जरी शस्त्रक्रिया बघण्याची भीती वाटत असली तरी तुम्हाला बाळ बघायची उत्सुकता असते. जन्म झाल्यावर बाळाला लगेच वर धरून तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला बाळ दाखवण्यास सांगा.
जेव्हा तात्काळ सी- सेक्शन प्रसूती केली जाते, तेव्हा, काहीवेळा तुम्हाला भूल देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो आणि तुम्हाला त्याऐवजी जनरल ऍनेस्थेशिया दिला जातो. त्यामुळे तुम्हाला मळमळ होऊ शकते परंतु ही अस्वस्थता कमी होईल, तुम्हाला सी-सेक्शन दरम्यान तोंडात नळी घातली तर तुम्हाला काही वेळ घशास सूज येऊ शकते.

. छेद घेणे

जेव्हा तुम्हाला भूल दिली जाते तेव्हा तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूस छेद दिला जातो. काळजी करू नका, जर शिवण नीट घातली घेलेली असेल तर टाके घातलेले लक्षात पण येणार नाहीत आणि नंतर हळूहळू नाहीसे होते. दुसरा छेद गर्भाशयाच्या खालच्या बाजूस घेतला जातो आणि बाळाचा जन्म होतो. हे छेद दोन प्रकारचे असतात. तुमचे डॉक्टर दोन प्रकारचे छेद घेऊ शकतात.

सी-सेक्शन करताना गर्भाशयाला घेतलेले जाणारे दोन प्रकारचे छेद

. खालच्या बाजूला घेतला जाणारा आडवा छेद

बऱ्याच सी-सेक्शन मध्ये अशा प्रकारचा छेद घेतात आणि गर्भाशयाच्या खालच्या बाजूस जिथे स्नायू मऊ असतात तिथे हा छेद घेतला जातो.

. उभा छेद

जर तुमचे बाळ गर्भाशयाच्या खालच्या बाजूस सरकलेले असेल किंवा वेगळ्या स्थितीत असेल तर गर्भाशयाच्या मध्ये छेद घेतला जातो.

. प्रसूती

छेद घेतल्यावर, गर्भजल बाहेत येते आणि बाळाचा जन्म होतो. बाळाला बाहेर काढल्यावर तुम्हाला ते जाणवेल. श्वसननलिकेतील जास्तीचा श्लेष्मा काढल्यावर तुम्हाला बाळाचे रडणे ऐकू येईल.

सी-सेक्शन वेदनादायी असते का?

कुठल्याही शस्त्रक्रियेसारखे, सी-सेक्शननंतर काही प्रमाणात वेदना आणि अस्वस्थता येते. नॉर्मल प्रसूतीपेक्षा सी-सेक्शननंतर रिकव्हर होण्यास थोडा जास्त वेळ लागतो. शस्त्रक्रियेनंतर, तुम्हाला थोडे मळमळल्यासारखे होईल तसेच शस्त्रक्रिया आणि भूल दिल्यानंतरचे परिणाम दिसतील. तुमचे डॉक्टर्स ह्या परिणामांसाठी तुम्हाला काही औषधे लिहून देतील. खोकला आणि शिंकाचा थोडा काळ त्रास होऊ शकतो.

सिझेरिअन पद्धतीने बाळाचा जन्म - सी-सेक्शन प्रसूतीसाठी काय तयारी करावी ?

प्रसूती नॉर्मल असो किंवा सी-सेक्शन पद्धतीने असो तुमच्या मनाची स्थिती सर्वात महत्वाची असते. जितके तुम्ही शांत रहाल ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले असते.

. सी-सेक्शन सुरु असताना तुम्हाला काय हवे त्याची यादी करा

जर तुम्ही आई होणार असाल तर तुम्ही शस्त्रक्रिया सुरु असतानाच तुमचा अनुभव सकारात्मक होण्यासाठी बरेच घटक नियंत्रित करू शकता. इथे काही घटक आहेत ज्यांचा तुम्ही विचार करू शकता:

. सी-सेक्शन प्रसूती हा बाळाला जन्म देण्याचा एक मार्ग आहे

पोषक आहार, नियमित व्यायाम आणि तुमचे वजन नियंत्रित करून तुम्ही शस्त्रक्रियेसाठी स्वतःला तयार करू शकता. सक्रिय जीवनशैलीमुळे तुमच्या बाळाच्या चांगल्या तब्येतीची खात्री होते आणि तुम्हाला शस्त्रक्रियेदरम्यान काही समस्या येत नाही आणि रिकव्हरी पटकन होते. जितके तुम्ही निरोगी असाल तितके तुम्हाला शस्त्रक्रियेनंतर पटकन रिकव्हर व्हायला मदत होईल. तसेच उठून बसणे, थोडे चालणे आणि नेहमीची कमी करणे सोपे जाईल. शस्त्रक्रियेनंतर हालचाल केल्याने रक्ताच्या गुठळ्या होणार नाहीत तसेच तुमची पचनसंस्था सुद्धा चांगली कार्यरत राहील.

. पचनास हलके अन्न खा

शस्त्रक्रियेआधी १२ तास पचायला हलके अन्न खा. आतड्यांच्या स्नायूंच्या हालचालीमुळे अन्नपदार्थ आणि इतर टाकाऊ पदार्थ हळूहळू पुढे सरकतात. शस्त्रक्रियेमुळे, आतड्यांच्या स्नायूंची हालचाल मंदावते आणि त्यामुळे अन्नपदार्थ आणि पाणी तुमच्या शरीरातून हळूहळू पुढे सरकते. हलके आणि पचनास सोपे अन्न खा त्यामुळे गॅस होणार नाही आणि आतड्याचे कार्य सुरळीत सुरु राहील.

. मंत्र

जरी तुमची सी-सेक्शन प्रस्तुती पूर्वनियोजित नसेल तरी तुम्ही एक साधा मंत्र किंवा देवाचे नाव मनात ठेवा आणि त्याचा जप करत रहा त्यामुळे मन शांत होण्यास मदत होईल. त्यामुळे मन तर शांत होतेच आणि श्वासावर नियंत्रण राहते आणि ताण येण्यास कारणीभूत असलेली संप्रेरके जसे की ऍड्रिनॅलीन आणि कॉर्टिसॉल ह्यांची पातळी कमी होण्यास मदत होते आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो.

सिझेरिअन प्रसूतीचा धोका

सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये जसा धोका असतो तसाच सिझेरिअन प्रसूतीचा सुद्धा असतो. त्यामुळे सिझेरिअन प्रसूतीच्या आधी त्याबाबतचे धोके माहिती करून घेणे महत्वाचे असते. ह्या बाबतच्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यास तुमच्या डॉक्टरांशी तुम्हाला चर्चा करता येईल आणि निर्णय घेता येईल.

सिझेरिअन प्रसूतीमुळे आईला असणारा धोका आणि गुंतागुंत

लक्षात ठेवा खालील प्रकारचा धोका कुठल्याही पोटाच्या शास्त्रक्रियेशी निगडित असतो १. संसर्ग: जिथे शस्त्रक्रियेसाठी छेद घेतला जातो त्या जागेतील अवयव जसे की मूत्राशय, गर्भाशय ह्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो २. खूप जास्त रक्तस्त्राव: सिझेरिअन प्रसूती होताना खूप जास्त रक्तस्त्राव होतो आणि त्या वेळेला रक्त भरण्याची गरज भासू शकते ३. अवयवांना हानी पोहचू शकते: मूत्राशय किंवा आतड्याना जखम होण्याची शक्यता असते ४. जखमेच्या भागातील टिश्यू: सी-सेक्शन झाल्यामुळे ओटीपोटाच्या आतील भागातील टिश्यू मुळे वेदना होऊ शकतात. पुढील गर्भारपणात नाळ विलग होणे किंवा प्लॅसेंटा प्रेव्हिया सारखे आजार भविष्यात उद्भवू शकतात. ५. पुनर्प्राप्ती होण्यास लागणारा जास्तीचा वेळ: सी सेक्शन झाल्यावर रिकव्हरी साठी काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो ६. औषधांना प्रतिसाद: वेदनाशामक औषधे किंवा शस्त्रक्रियेनंतर किंवा शस्त्रक्रियेदरम्यान भुलीची औषधे ह्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो ७. आणखी शस्त्रक्रियेचा धोका: सी-सेक्शन मुळे इतरही काही शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टोमी किंवा पुन्हा सिझेरिअन होऊ शकते ८. मातेचा मृत्युदर: सी-सेक्शन प्रक्रियेने बाळाचा जन्म झाल्यास आईचा मृत्युदर नॉर्मल प्रसूतीपेक्षा जास्त असतो ९. भावनिक प्रतिक्रिया: काही स्त्रियांना सी-सेक्शन द्वारे जन्मलेल्या बाळाशी भावनिक बंध निर्माण करताना त्रास होतो आणि त्यांना बाळाला जन्म दिल्याचे समाधान मिळत नाही.

बाळासाठी धोका आणि गुंतागुंत

१. अकाली प्रसूती: सी-सेक्शनद्वारे जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असू शकते कारण जर बाळाचे वय नीट मोजले गेले नसेल तर बाळाचा जन्म खूप आधी होऊ शकतो २. श्वसनाच्या समस्या: सी-सेक्शन ने जन्म झालेल्या बाळांना श्वसन संस्थेशी संबंधित विकार होऊ शकतात ३. बाळाला जखम: खूप दुर्मिळ प्रकरणांमध्ये सी-सेक्शन मध्ये छेद घेताना बाळाला जखम होऊ शकते.

सी-सेक्शन प्रसूतीनंतर आईची काळजी

१. पुनर्प्राप्ती

आपल्या नुकत्याच झालेल्या बाळाची काळजी घ्यावीशी वाटणे हे खूप नैसर्गिक आहे. नॉर्मल प्रसूतीपेक्षा सी-सेक्शन ने झालेल्या प्रसूतीमध्ये भावनिक आणि शारीरिक रिकव्हरीला जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला शस्त्रक्रियेनंतर पुरेसा आराम मिळतो आहे ना ते पहा. म्हणजे तुम्ही लवकर रिकव्हर व्हाल. तुम्हाला नॉर्मल होण्यासाठी रुग्णालयात तीन ते चार दिवस घालवावे लागतील आणि नंतर चार ते सहा आठवडे घरी आराम करावा लागेल. तुमचे डॉक्टर तुम्हाला आराम करायला सांगतील त्यामुळे तुमच्या शस्त्रक्रियेच्या जागी जास्त ताण येणार नाही. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर रिकव्हरी साठी आणखी जास्त वेळ लागू शकतो

२. काळजी घ्या

पुढील काही आठवडे टाके दुखतील त्यामुळे तुम्ही बाळाशिवाय अन्य कुठल्याही गोष्टी उचलून घेऊ नका. बाळाला स्तनपान देताना उशी तुमच्या शस्त्रक्रियेच्या जागी ठेवा आणि त्यावर बाळाला ठेवा

३. निवांत रहा

सी-सेक्शन रिकव्हरी खूप महत्वाची आहे. तुमच्या नवजात बाळाची काळजी घेणे महत्वाचे असतेच परंतु तुम्ही स्वतःची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. मदत मागण्यासाठी अजिबात संकोच बाळगू नका. तुम्ही दरवेळी उठण्याऐवजी बाळाला कुणालातरी तुमच्याकडे देण्यास सांगा. तुमचे आयुष्य सोपे होण्यासाठी तुम्हाला हवं ते करा आणि कुठलीही अपराधीपणाची भावना बाळगू नका.

४. सिझेरिअन नंतर जखमेला संसर्ग होऊ नये म्हणून जखमेवर लक्ष ठेवा

शस्त्रक्रियेची जखमेच्या भागात ओढल्यासारखे होणे, खाज सुटणे किंवा बधिर वाटणे हे नॉर्मल आहे. ते नंतर कमी होईल. जर तुम्हाला वेदना होत असतील तर किंवा तुम्हाला ताप येत असेल किंवा जखम लाल झाली तर डॉक्टरांना फोन करा. ही संसर्गाची लक्षणे असू शकतात. जखमेतून थोडा द्रव येणे हे नॉर्मल आहे , तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याबाबत बोलले पाहिजे.

५. ताण कमी करा

ज्या अन्नपदार्थांमुळे गॅसेस होतात ते टाळा कारण पोटात वायू साठल्याने अस्वस्थता येते. त्यामुळे जखमेवर ताण येतो तसेच ते अपचनाचे लक्षण आहे कारण भूलीच्या औषधांमुळे तुमचे पचन मंदावते. जर तुम्हाला अपचन झाले असेल तर पाठीवर किंवा एका कुशीवर झोपून गुडघे जवळ घेऊन दीर्घ श्वसन करा. लक्षात ठेवा असे करताना शस्त्रक्रियेच्या जागी धक्का लागणार नाही ह्याची काळजी घ्या.

६. नियमितता

गर्भारपणानंतर बद्धकोष्ठता हा स्त्रियांमध्ये आढळणारा कॉमन प्रश्न आहे. तुम्ही शौचास करताना आरामात रहा आणि जोर देऊ नका. तंतुमय अन्नपदार्थ जसे भाज्या आणि फळे खाल्ल्याने तसेच भरपूर द्रवपदार्थ घेणे ही काळजी सी-सेक्शन नंतर घेतली पाहिजे. तुमचे डॉक्टर तुम्हाला सौम्य रेचक किंवा स्टूल सॉफ्टनर घेण्यास सांगू शकतात.

७. स्वतःचे पोषण करा

सी-सेक्शन नंतर तुमचा आहार महत्वाचा आहे. पोषक आहार अन खूप जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्यास तुमची शक्ती आणि ऊर्जा नीट राहते.

८. हालचाल करा

तुमची जखम भरून येईपर्यंत तुम्ही वाट बघू नका. तुमच्या नियमित व्यायामाला सुरुवात करा. तसे केल्याने व्यायामास सोपे जाते आणि तुमच्या हालचाली जरी नियंत्रित असल्या तरी त्याने रिकव्हरीला मदत होते. स्ट्रेचिंग करून, जितके शक्य होईल तितके पाय हलवून तुमचे रक्ताभिसरण आणि स्नायूंचा पोत तुम्ही सुधारू शकता. घरात हळू हळू चालण्याचा प्रयत्न करा तसे करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्या. त्यामुळे तुमच्या पचनास मदत होते. चालल्याने स्टॅमिना वाढतो, आणि लवकरच तुम्ही बाळाला घेऊन बाहेर पडण्याचे अवघड काम करू शकता. जरी घराची आणि बाळाची काळजी घेणे तुम्हाला आव्हानात्मक वाटत असले तर लक्षात ठेवा ही सगळी कामे करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात आणखी वाचा: तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे प्रसूती प्रवृत्त करणे: प्रसूतीकळा सुरु होण्यासाठी सर्वोत्तम उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved